महापुरावर निबंध मराठी । महापुराचे थैमान निबंध । Essay on River Flood in Marathi

महापुरावर निबंध मराठी । महापुराचे थैमान निबंध । Essay on River Flood in Marathi

नमस्कार मित्रांनो ! आपले मराठी मित्र या वेबसाईटवर खूप खूप स्वागत आहे. या वेबसाईटवर तुम्हाला विविध निबंध बघायला मिळतील.

आजच्या पोस्टमध्ये आम्ही ” महापुरावर मराठी निबंध “ घेऊन आलोत.

या वेबसाईट वरील पोस्ट वाचून आपणास नक्कीच आनंद मिळेल.

महापुरावर निबंध मराठी । महापुराचे थैमान निबंध । Essay on River Flood in Marathi

हा निबंध लिहीत असताना महापूर आल्याने काय परिस्थिती निर्माण होऊ शकते ? कशा प्रकारे नुकसान होते ? या विषयावर माहिती पाहणार आहोत.

महापुराचे थैमान निबंध

मी ज्या गावामध्ये राहतो, त्या गावाच्या अगदी मधोमधून भोगावती नदी वाहते. पावसाळ्याचे दिवस नुकतेच चालू झालते. सुरुवातीला भरपूर पाऊस पडला आणि नदीचे पात्र गच्च पाण्याने भरलेले होते. आणि अजूनही जोरदार पाऊस चालू होता. आज सकाळपासून बातम्यांमधून जास्त पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली होती.

गावातूनच नदी वाहत असल्यामुळे आमच्या गावाला पाण्याचा वारसा लाभला होता. परंतु दरवर्षी पावसाळ्या मध्ये नदीच्या पाण्यात वाढ होत असत हे पाहून गावातील लोक अगदी आनंदी होत पण अलीकडे पडणाऱ्या पावसामुळे गावातील सर्व लोक चिंतेने ग्रासले होते.

कारण नदीचे पात्र पाण्याचे भरून वाहत होते आणि त्यात जोराचा पडणारा पाऊस थांबण्याचा पत्ता लागत नव्हते. त्यामुळे नदीचे पात्र धोक्याची परिस्थिती ओलांडण्याची शक्यता निर्माण झाली. संध्याकाळी 4 वाजण्याची वेळ झाली मी, आई आणि बाबा नुकतेच जेवायला बसणार होतो. तोपर्यंत ” अरे अरे पळा, पळा ! गावात नदीचे पाणी शिरत आहे ! नदीला पूर आला ! उठा, उठा, पळा पळा ! ”

अशी आरोळी ऐकायला आली आणि आमच्या सगळ्यांचा जीव बाहेर आला. हात- पाय कापायला लागले. मी आणि बाबा बाहेर येऊन पाहतो तर काय, जोरदार पाऊस कोसळत होता आणि त्यात नदीच्या पाण्याचा लोंढा गावाच्या दिशेने शिरला होता. ते दृश्य पाहून माझे डोळे बाहेरच आले.

हाच तो मी माझ्या आयुष्यात पाहिलेला पहिला महापुर होता. नदीचे पाणी गावात शिरत होते आणि गावातील प्रत्येक नागरिक जीव वाचवत ‘ तुकाई डोंगराच्या ‘ दिशेने पळत होते. आमचे घर नदीपासून थोडे दूर टेकडीवर असल्याने आमच्या घरापर्यंत पाणी येईपर्यंत थोडा वेळ लागला. तोपर्यंत आई – बाबांनी किमती आणि जरुरी सामान बरोबर घेतले आणि आम्ही सुद्धा तुकाई डोंगराच्या दिशेने जाणार तोपर्यंत पाण्याचे लोंढे आमच्या घरात वेढत होते.

त्यात मुसळधार पाऊस आणि भयंकर विजांचा कडकडाट ! सारे वातावरण अगदी भयंकर ! अश्या भयंकर परिस्थिती मध्ये आमची सुधाकाकू पाण्यात ओढली गेली ते पाहून आई जोराने ओरडली ! व आम्ही सर्व डोंगरावर पोहोचलो. थोड्याच वेळात गावातील सर्व झोपड्या, मातीचे घरे, गायी- म्हशी, बकऱ्या सर्व

पाण्याच्या प्रवाहात वाहताना दिसू लागले. सगळीकडे भयानक स्थिती निर्माण झाली. अंगाला थरकाप सुटणारी ती परिस्थिती होती. पावसाचा जोर इतका होता की आमचा दुसऱ्या कुठल्या गावाशी संपर्कच लागेनासा झाला. गावातील सर्व वृद्ध, बायका, माणसे, लहान मूले सर्वजण तुकाई डोंगरावर असलेल्या तुकाई मंदिराचा सहारा घेऊन बसले. मुसळधार पाऊस चालूच होता आणि नदीच्या पात्राने महापुराचे रूप धारण केले.

दरवर्षी पडणाऱ्या पावसापेक्षा ह्या पावसाने अक्राळ- विक्राळ रूप धारण केले. गावातील सर्वांच्या घराची छते, कोणाच्या भिंती तर कोणाचे संपूर्ण घर पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. सुमारे दोन दिवस हा पाऊस चालू होता. आणि दोन दिवस नदीने महापुराचे रूप धारण केले होते.

या महापुराच्या वेळी दोन दिवस आम्ही तुकाई डोंगरावरच काढले. पिण्यासाठी पाणी नाही होते ना खाण्यासाठी अन्न.

लहान मुलांची तर रडून- रडून परिस्थिती खराब झाली. दोन दिवसानंतर पावसाचा जोर कमी झाला आणि नदीच्या पाण्याच्या पातळीत सुद्धा कमी झाली. तेव्हा गावातील थोर माणसांनी दुसऱ्या गावातील लोकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला योगायोगाने संपर्क ही साधला. थोड्या वेळाने शासनामार्फत अन्नाची पाकिटे, औषधोपचार, पिण्याचे पाणी आणि ब्लांकेट्स पुरवठा केले.

दुसऱ्या दिवशी संपूर्ण पूर ओसरला संपूर्ण गावाला दलदलीचे स्वरूप प्राप्त झाले होते. सर्वजण आपली घरे पाहण्यासाठी गेली तर कोणाच्या घराचे अवशेष ही सापडले नाही सर्वत्र फक्त कचरा, गाळ आणि गढूळ पाणीच होते. कित्येकांची शेती वाहून गेली. पिकाला आलेले धान्य वाहून गेल्याने सर्वांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. या

महापुरात कित्येक जीवन हानी झाली. आणि आर्थिक नुकसान ही. आजही या महापुराचे दृश्य डोळ्यासमोर आले तर हात पाय थरथर कापतात. आणि डोळ्यांतून अश्रू वाहतात. या महापुरात मी माझ्या सुधा काकुला गमविले याची आजही खंत वाटते.

अशा भयंकर महापुर मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच पाहिला होता. आणि हा महापूर मी कधीही विसरू शकणार नाही.


ये निबंध देखील अवश्य वाचा :-

धन्यवाद मित्रांनो !

Leave a Comment