माझे आवडते कार्टून निबंध मराठी | Maza Avadte Cartoon Nibandh in Marathi

माझे आवडते कार्टून मराठी निबंध | Maza Avadte Cartoon Nibandh in Marathi

नमस्कार मित्रांनो ! आपले मराठी मित्र या वेबसाईटवर खूप खूप स्वागत आहे या वेबसाईटवर तुम्हाला विविध निबंध वाचायला मिळतील.

आजच्या पोस्टमध्ये आम्ही ” माझे आवडते कार्टून मराठी निबंध | Maza Avadta Cartoon Nibandh in Marathi “ या विषयावर निबंध घेऊन आलोत.

आम्हाला खात्री आहे की, या वेबसाईट वरील सर्व निबंध वाचून आपणास नक्कीच आनंद मिळेल.

My Favourite Cartoon : Chota Bheem

दिवसभरामध्ये टीव्हीवर विविध चैनल व ते विविध कार्टून दाखविले जातात. अणि हे कार्टून पाहणे लहान मुलांना खूपच आवडतात. प्रत्येक घरामध्ये लहान मुले टीव्हीवर विविध कार्टून पाहत असतं.

टीव्हीवर लागणाऱ्या सर्व कार्टून पैकी माझे आवडते कार्टून म्हणून पोगो चैनल वर लागणारे छोटा भीम हे होय. लहानपणापासून माझ्या आजच्या जगाकडून भीम च्या कथा ऐकल्या होता. परंतु या कथा प्रत्यक्ष रिता कार्टून च्या माध्यमातून पहाणे मला खूपच आवडले. त्यामुळे मी लहान असल्यापासूनच छोटा भीम हे कार्टून पहात आलोय.

या कार्टून मधून साहसाचे धडे, धाडस, धैर्य, भीम ची‌ शक्ती, चुटकी ची बुद्धिमत्ता आणि जग्गू माकडाचे नटखटपणा सर्वत्र एकत्रितपणे दाखविला आहे.

या कार्टून मध्ये दाखविणारा छोटा भीम नावाच्या एका छोट्याशा गावात राहत असतो. भीम ला अतिशय ताकदवान आणि बुद्धिमान दाखवण्यात आले आहे. तसेच भीम लाडू खायला खूप आवडते असे दाखवले आहे. भीमचं ढोलकपुर गावांमध्ये टूनटून नावाची मावशी असते. ती खूप छान लाडू करते आणि तिच्या हातचे लाडू खाणे भीमला खूप पसंत असते.

तसेच या ढोलकपुर गावातील राजू, चुटकी, भीम आणि जग्गू माकड त्यांच्यामध्ये खूप पक्की मैत्री असते. तसेच ढोलकपूर गावामध्ये कालिया आणि त्याचे दोन मित्र ढोलू, भोलू हे मित्र असतात. कालीया हा नेहमी भीमला पराभूत करण्यासाठी प्रयत्न करीत असतो.

ढोलकपुर हे गाव राजा इंद्र वर्मा यांच्या राज-पदा खाली चालत असते. तसेच राजा इंद्र वर्मा यांना एक मुलगी असते तिचे नाव इंदुमती असते ती देखील भीम यांची मैत्रीण असते.

छोटा भीम या कार्टून मध्ये भीम च्या साहसाचे छोटे छोटे भाग दाखवलेले आहेत. भीम हा नेहमी आपल्या ढोलकपुर चे रक्षण करीत असतो. याशिवाय भीम नेहमी राजा इंद्र वर्मा, आपले मित्र आणि ढोलकपुर चे रक्षण करीत असतो. तसेच जादूगर, चुडेल, डाकू यांच्यापासून नेहमी स्वतःला आणि त्याच्या मित्राला वाचत असतो.

छोटा भीम या कार्टून मध्ये भीम मला खूप बुद्धिमान दाखवले आहे. तसेच या छोटा भीम या कार्टून मध्ये भीम इतरांची मदत करताना दाखविला आहे.

मला वाटते की, छोटा भीम सारखे दुसरे कुठलेही कार्टून चांगले नसेल जे लोकांना चांगले जीवन जगण्यासाठी प्रेरणा करते. छोटा भीम का कार्टून मधून मनोरंजन होते सोबत आपल्याला विविध गोष्टी शिकायला सुद्धा मिळतात. भीम हा चांगला व्यक्ती बनण्यासाठी प्रेरणा देतो. मी रोज छोटा भीम हे कार्टून पाहतो.

छोटा भीमचे अनेक चित्रपट देखील आहेत. काही चित्रपटात चित्रपटगृहांमध्ये देखील प्रदर्शित करण्यात आलेले आहेत. मी छोटा भीम चे सर्व भाग पाहिल्या आहेत. आणि एकाच भाग मला आवडला तर तो भाग पुन्हा पुन्हा पाहत असतो. आठवड्यातील दर रविवारी छोटा भीम चे दोन नवीन भाग दाखवले जातात.

सहसा सर्व कार्टून पहिण्यास सर्वांचे पालक रागलत असतात. परंतु माझे पालक मला रागवत नाहीत. कारण त्यांना वाटते की, माझ्या कार्टून बघण्याची सवय चांगली आहे. कारण छोटा भीम या कार्टून मधून शिकण्यासाठी नवीन प्रेरणा मिळतात.

तसेच चांगले व्यक्तिमत्व घडविण्यासाठी मदत मिळते. त्यामुळे मी जेव्हा छोटा भीम हे कार्टून बघत असतो तेव्हा माझे वडील सुद्धा माझ्या सोबत छोटा भीम कार्टून पाहतात. त्यांनाही हे कार्टून पाहण्यास खूप आवडते. परंतु मी जास्त वेळ टीव्ही न पाहता दिवसातून एकच तास छोटा भीम हे कार्टून पाहण्यासाठी  टीव्ही पाहात असतो.

मला छोटा भीम चा आवाज खूप आवडतो आणि माझी इच्छा आहे की मी भविष्यामध्ये छोटा भीमचा डबिंग आर्टिस्टला नक्की भेटावे.

तर मित्रांनो ! ” माझे आवडते कार्टून मराठी निबंध | Maza Avadte Cartoon Nibandh in Marathi “ वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.

” माझे आवडते कार्टून मराठी निबंध | Maza Avadte Cartoon Nibandh in Marathi “  यामध्ये आमच्याकडून काही पॉईंट्स राहिले असतील तर कमेंट करून नक्की कळवा.


ये निबंध देखील अवश्य वाचा :-

धन्यवाद मित्रांनो !

Leave a Comment