मला आवडलेले पुस्तक निबंध । My Favourite Book Essay in Marathi

मला आवडलेले पुस्तक निबंध । My Favourite Book Essay in Marathi

नमस्कार मित्रांनो ! आपले मराठी मित्र या वेबसाइटवर खूप खूप स्वागत आहे. या वेबसाईटवर तुम्हाला विविध निबंध वाचायला मिळतील.

आजच्या पोस्टमध्ये आम्ही ” मला आवडलेले पुस्तक निबंध । My Favourite Book Essay in Marathi “  घेऊन आलोत.

आम्हाला खात्री आहे की, या वेबसाईटवर सर्वच निबंध वाचून आपणास नक्कीच आनंद मिळेल.

मला आवडलेले पुस्तक निबंध । My Favourite Book Essay in Marathi

मला वाचायला खूप आवडते वाचन हा माझा छंद आहे आणि मी या छंदाची जोपासना सुद्धा करतो. मी आजपर्यंत अनेक कथा कादंबऱ्या बोधकथा वाचल्या आहेत.

आपल्या देशातील विविध लेखकांची पुस्तके मी वाचलेली आहेत. वाचनातून आपल्याला बरेच ज्ञान मिळते. आपल्याला अशी एकही व्यक्ती सापडणार नाही, ज्यांनी एकही पुस्तक वाचलेले नसेल.

एक यशस्वी व्यक्तीच्या मागे पुस्तकांचा खूप महत्त्वाचा वाटा असतो. विविध पुस्तकांचे वाचन करणे ही मनासाठी लागलेली एक चांगली क्रिया आहे, त्यासोबतच आत्म्यासाठी सुद्धा चांगले ठरतात. पुस्तके आपल्याला आपली भाषा आणि लेखन कौशल्य विकसित करण्यासाठी मदत करतात.

पुस्तकातून आपल्याला प्राचीन काळाबद्दल,इतिहासाबद्दल, धार्मिक, पौराणिक अशा सर्व बाबतीत ज्ञान मिळते.

मी बरीच पुस्तके वाचली आहेत ,यातून माझ्या मनावर कायमची छापा पडली आहे. मला पुस्तक या वाचायला आवडतील त्यातल्या त्यात पौराणिक पुस्तके वाचायला फार आवडते.

मी आज पर्यंत वाचलेल्या सर्व पुस्तकांपैकी मला आवडलेले पुस्तक म्हणजे,  वि. स. खांडेकर यांचे “यायाती” पुस्तक. ययाती वि स खांडेकर यांनी लिहिलेली एक कादंबरी आहे. वि स खांडेकर यांच्या वयातील हे पुस्तक आवडले मागे कारण म्हणजे या पुस्तकामध्ये अनेक पुराणातील घटना कैद केलेल्या आहेत. ययाती या कादंबरीचा पुराणाशी केवळ नावापुरता संबंध नसून, ही कादंबरी पौराणिक घटना एकत्र करून स्वतंत्ररित्या मांडली आहे.

पौराणिक कथा म्हणजे त्यामध्ये खूप काही भव्य आणि भयंकर लढा आढळून येतो. परंतु ययाती या कादंबरीमध्ये पुराणातील काही ठराविक कथा व घटना घेऊन जीवन हे काही क्षणापुरते तेच असते, असे सांगितले आहे. तर दुसऱ्या बाजूने जीवन हे चिरंतन, भौतिक आणि अध्यात्मिक आहे असे सांगितले आहे.

मी वाचलेला बहुतांश पुराणांमध्ये मला लढाई, युद्ध , डावपेच हे सर्व वाचायला मिळाले. परंतु यायाती या कादंबरीमध्ये किंवा पुस्तकामध्ये एका राजाच्या जीवनातील उतार चडपणा अतिशय सोप्या आणि सरळ शब्दांमध्ये आपल्या समोर मांडली आहे, त्यामुळे ययाती हे मला आवडलेले पुस्तक आहे.

वि.स. खांडेकर यांनी ययाती या कादंबरीची सुरुवात देव-दानव विद्या पासून केली आहे. या कादंबरीतील कथा अशी आहे ती म्हणजे – ययाती ची कथा ही महाभारतातील आदिपर्व या भागातील बरसे पात्र वि स खांडेकर यांनी या कादंबरीत दाखवले आहेत. वि स खांडेकर यांनी या कथेचे अगदी सुलभ आणि इतरांना कळेल अशा भाषेमध्ये मांडणी केली आहे.

ययाती चे वडील नहुष हे खूप शूर वीर असतात. परंतु त्यांच्या गैरवर्तन ना मुळे इंद्रदेव त्यांना शाप देतात की, नहुष नहाराजांची मुले कधीही सुखी राहणार नाहीत. जेव्हा नहुष महाराज युद्धावर असतात तेव्हा, यायातिला या शापा बद्दल कळते. ययाती चा लहान भाऊ याती हा लहानपणीच रजविलासा पासून दूर संन्यासी जीवन व्यतीत करतो.

ययाति ल नात्या शपाबद्दल कळाल्याने तो ही घाबरून जातो त्याला वाटते की, आता मला कधीही सुखी जीवन मिळणार नाही. पुढे ययाती चे लग्न शुक्राचार्य ची मुलगी देवयानी यांच्यासोबत झाले. देवयानी त्यांच्यासाठी त्यांची सखी सर्विष्ठा दासी म्हणून यायाती व देवयानी यांच्या सोबत राहू लागली. सर्विष्ठा‌चे सुंदर रुप पाहून यायाती राजा तिच्यावर मोहित झाला.

देवयानी काढून राजाला दोन पुत्र प्राप्त झाले,तर सर्विष्ठा कडून ययाती ला तीन पुत्र प्राप्त झाले. जेव्हा ही बातमी देवयानीला करती तेव्हा ती शुक्राचार्याला ययाती बद्दल सर्व हकीकत सांगते, त्यावर शुक्राचार्य य त्याला वृद्ध होण्याचा शाप देतात. तरी सुद्धा यायातीचा मनातील ही वासराचे भावना नष्ट होत नाही.

एके दिवशी यमराज देव ययाती ला घेण्यासाठी येतात, तेव्हा ययाती यम राजाजवळ विनंती करतो की त्याला पुन्हा तरुण्य दिले जावे. त्यावर यमराज म्हणतात की, तुझ्या सर्व पुत्रांपैकी एकादा पुत्र तुला त्याचे तारूण्य दान देत असेल तर, तुला तुझ्या यौवन परत मिळेल. आपला पितावर द्या करून यायाती चा पाचवा मुलगा त्याला यौवन दान करतो.

ययाती पुन्हा तरूण होऊन आपली वासनाची भूक मिटवण्यासाठी शंभर राणी सोबत लग्न करतो. व त्यातून त्याला शंभर पुत्र प्राप्त होतात.

त्यानंतर शंभर वर्षां नंतर यामराज पुन्हा ययातीला घ्यायला येतात, तेव्हा त्याच्यातील वासनाची न संपणारे भूक बघून आश्चर्यचकित होतात. ययाती पुन्हा यमराजाकडे यौवन साठी प्रार्थना करतो, त्यावर यमराज पुन्हा त्याला पहिल्यासारखेच वरदान देतात, यावर ययाती पुन्हा आपल्या एका मुलाचे यौवोन प्राप्त करतात व हा दिनक्रम पुढचे हजारो वर्षे चालतो.

अशाप्रकारे ययातिने सुखप्राप्तीसाठी वासना चा सहारा घेतला.

ययातीच्या याच वासना ची कहाणी ययाती या पुस्तकात सांगण्यात आली आहे. पुढे राजाला त्याच्या चूक लक्षात येऊन राजाने केलेला पश्चाताप याचे सुद्धा वर्णन केले आहे.

अशा प्रकारे यायातीची ही कहाणी अतिशय सुंदर शब्दांमध्ये वि. स .खांडेकर यांनी मांडली आहे. त्यांनी या पुस्तकातून मनुष्याच्या चिरतरुण राहण्याच्या व भोगवादी वृत्ती वर एक प्रकाश टाकला आहे.

जेव्हा मनुष्याला हा वर मिळतो  त्यावेळेस त्याला  हे जीवनातील अंतिम तथ्य नाही याची जाणीव होते. वि.स.खांडेकर यांनी ययाती ह्य पुस्तकात हेच सर्वसामान्यांना सांगितले आहे. ययाती ‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌ह्या  पुस्तकासाठी  वी.स. खांडेकर यांना इ.स. 1960 मध्ये  साहित्य अकादमी पुरस्काराने आणि इ.स. 1974  मध्ये भारतातील  साहित्यासाठीचा  सर्वोच्च

” ज्ञानपीठ पुरस्काराने “  सन्मानित करण्यात आले.

अशाप्रकारे जीवन जगायला शिकवणारे ” ययाती “ हे मला आवडलेले पुस्तक आहे.

तर मित्रांनो ! ” माझे आवडते पुस्तक निबंध मराठी । Maze Avadte pustak Nibandh Marathi “  वाचून आपणास आवडला असेल तर, तुमच्या सर्व मित्रांना वर शेअर करा.

” मला आवडलेले पुस्तक निबंध । My Favourite Book Essay in Marathi “ यामध्ये आमच्याकडून काही Points राहिले असतील तर कमेंट करून नक्की कळवा.


ये निबंध देखील अवश्य वाचा :-

धन्यवाद मित्रांनो !

Leave a Comment