पाण्याचे महत्व मराठी निबंध लेखन । Essay on Importance of Water in Marathi

पाण्याचे महत्व मराठी निबंध लेखन | Essay on Importance of Water in Marathi

नमस्कार मित्रांनो ! आपले मराठी मित्र या वेबसाईटवर खूप खूप स्वागत आहे या वेबसाईटवर तुम्हाला विविध निबंध वाचायला मिळतील.

आजच्या पोस्टमध्ये आम्ही ” पाण्याचे महत्व मराठी निबंध लेखन । Essay on Importance of Water in Marathi “ या विषयावर निबंध घेऊन आलोत.

आम्हाला खात्री आहे की, या वेबसाईट वरील सर्व निबंध वाचून आपणास नक्कीच आनंद मिळेल.

पाण्याचे महत्व मराठी निबंध लेखन । Essay on Importance of Water in Marathi

पाणी हे निसर्गाने दिलेली सर्वात महत्त्वाची देणगी आहे. त्यामुळे पाणी एक नैसर्गिक संसाधन आहे. पाणी हे सर्व सजीवांसाठी आणि निसर्गासाठी अत्यंत उपयुक्त आहे. या मुळे मानवाच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे.

पाणी म्हणजेच ज्याला आपण जल असे म्हणतो. या पृथ्वीवरील सर्व पशु पक्षांचे आणि माणसाचे जीवन हे पाण्यावरच अवलंबून आहे त्यामुळे पाण्याला जीवन असे सुद्धा म्हणतात.

कारण या पृथ्वीवरील कोणताही जीव म्हणजेच पक्षी, प्राणी इतर जीवजंतू, मनुष्य हे पाण्या शिवाय जगूच शकत आहेत. माणसाच्या मूलभूत गरजा मध्ये पाण्याचा समावेश होतो. माणूस अन्नाशिवाय काही दिवस जगू शकतो पण पाण्याशिवाय जगू शकत नाही. तसेच पाण्याशिवाय आपले जीवन जगण्याची कल्पना सुद्धा करू शकत नाही.

पृथ्वीवर आढळणाऱ्या पाण्यामध्ये दोन प्रकार पडतात एक म्हणजे गोड पाणी आणि दुसरे म्हणजे खारट पाणी.

खारट पाणी हे मुख्यतः समुद्रामध्ये पाहायला मिळते ते गोड पाणी हे सरोवर, नद्या यांच्या मध्ये आढळते. मुख्यता पिण्यासाठी गोड पाण्याचा वापर केला जातो. आपल्या पृथ्वीवर 71 टक्के पाणी होते परंतु त्यातील काही प्रमाणातच म्हणजे साधारणतः 3% पाणी हे पिण्यायोग्य आहे. येथे आता पिण्याच्या पाण्याच्या समस्या उद्भवत आहेत त्यामुळे आपल्याला पाण्याचे महत्त्व जाणून पाणी वाचवणे गरजेचे आहे.

आपल्या दैनंदिन जीवनामध्ये पाण्याचा विविध प्रकारे उपयोग केला जातो. पाणि हे फक्त पिण्यासाठीच वापरले न जाता कपडे धुण्यासाठी, भांडी घासण्यासाठी, साफ-सफाई करण्यासाठी आणि इतर कामासाठी वापरले जाते. त्याप्रमाणे चे पाणी औद्योगिक क्षेत्रांमध्ये सुद्धा वापरले जाते. एवढेच नसून पाण्यापासून ऊर्जा निर्मिती सुद्धा केली जाते.

पाण्याची सर्वात मोठी गरज भासते ती म्हणजे शेती करण्यासाठी. कारण मानव पाणी शिवाय कुठलेही पीक घेऊ शकत नाही आणि पीक घेतले तर अन्न मिळू शकत नाही, त्यामुळे मानवाच्या जीवनामध्ये पाण्याला खूप महत्त्वाचे स्थान आहे. एवढेच नसून आपल्या निसर्गाला आणि झाडे वनस्पतींना पाण्याची खूप गरज आहे.

वनस्पती साठी पाण्याचे महत्व :

मानवाला जेवढी पाण्याची गरज आहे तेवढेच गरज वनस्पतींना सुद्धा आहे. कारण झाडे आपल्या मुळांच्या माध्यमातून जमिनीतील पाणी शोषून घेतात आणि वनस्पतीच्या इतर शाखांत पर्यंत पोहोचवतात. तसेच झाडाच्या खोडामध्ये पाणी साठवले जाते थोडक्यात सांगायचे म्हणजे झाडांना वाढण्यासाठी सर्वात जास्त गरज असते ती म्हणजे पाण्याची.

पाण्याशिवाय झाडांची लागवड केली जात नाही आणि झाडे मोठे सुद्धा होऊ शकत नाहीत. जर झाडांना व्यवस्थित पाणी मिळाले नाही तर झाडे सुकून जातात व काही दिवसात जळतात सुद्धा.

मुख्यता झाडांपासून आपल्याला फळे-फुले, लाकूड ,औषधी उपचार मिळतात मग झाडे आपल्यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत आणि या झाडांना उपयुक्त आहे ते म्हणजे पाणी.

प्राणी आणि पक्षांसाठी पाण्याचे महत्व झाली :

मनुष्याप्रमाणे झाडां प्रमाणे पशुपक्ष्यांना देखील पाण्याची खूप आवश्यकता असते आपल्या पृथ्वीवर आढळणारे सर्वाच पक्षी आणि प्राणी हे जीवन जगण्यासाठी पाणी पितात.. पाणी एक मात्र अशी गोष्ट आहे त्या शिवाय कोणताही सजीव आपले जीवन जगू शकत नाही.

वाळवंटी प्रदेशात आढळणारे कोणते दिवसाला 50 लिटर पाणी पितात त्यानंतर या प्राण्यांना काही दिवस पाणी नाही दिले तरी चालते.

औद्योगिकीकरणा मध्ये पाण्याचे महत्त्व :

आपल्या अवतीभवती अनेक कारखाने व्यवसाय चालत आहेत. आणि यातून मिळणाऱ्या आर्थिक मदतीमुळे मनुष्य आपला उदरनिर्वाह करत आहेत. परंतु या औद्योगिक कारणांमधील काही उद्योगधंदे असे आहेत यासाठी अत्यंत आवश्यकता असते ती म्हणजे पाण्याची.

अशा उद्योगधंद्यांना पाणी नसेल तर ते उद्योगधंदे ठप्प होऊ शकतात त्यामुळे औद्योगिक कारणांमध्ये देखील पाण्याला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे.

पाणी संवर्धन उपाय :

पाणी हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. प्रत्येक सजीवाला आपले जीवन जगण्यासाठी पाण्याचे अत्यंत आवश्यकता असते. त्यासाठी पाणी संवर्धन करणे हे गरजेचे आहे.

पाणी हे एक अमूल्य संसाधन आहे. ज्याचा वापर आपण जितक्या काटकसरीने करू तेवढा आपल्या भविष्यामध्ये पाण्याचा साठा उपलब्ध राहील अन्यथा येणाऱ्या पिढीला पाण्याची कमतरता भासू शकते. त्यासाठी प्रत्येक मनुष्याने पाणी संवर्धन करणे गरजेचे आहे. यासाठी प्रत्येक मनुष्याने पाणी व्यर्थ घालू नये.

माणसाने पाण्याचा उपयोग आवश्‍यकतेनुसार आणि गरजेनुसारच करावा. जेव्हा आपण कुठलेही भाजी किंवा फळे देतो तेव्हा येणाऱ्या खाली न होता एखादा भांड्यामध्ये पाणी घेऊन त्यात धुवावी जेणेकरून पाणी बचत होईल. प्रत्येकाने काम झाल्यानंतर न बंदच केला पाहिजे.

तसेच पावसाचे पाणी टाकी किंवा खड्ड्यांमध्ये साठवून ठेवावे. तसेच आपल्या आसपासच्या परिसरातील नदी, नाले यांमध्ये दूषित पाणी सोडले जाणारे किंवा तेथील पाणी दूषित केले जाऊ नये याकडे लक्ष दिले पाहिजे.

प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये पाण्याचा एक थेंब अत्यंत महत्वाचा आहे. त्यासाठी पाणी हे जपून वापरले पाहिजे, पाण्याचा काटकसरीने वापर केला पाहिजे. पाण्याशिवाय कोणताही सजीव जिवंत राहू शकत नाही यामुळेच म्हणतात, “पाणी हेच जीवन.”

तर मित्रांनो ! ” पाण्याचे महत्व मराठी निबंध लेखन | Essay on Importance of Water in Marathi “  वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.

” पाण्याचे महत्व मराठी निबंध लेखन “ यामध्ये आमच्याकडून पॉईंट  राहिले असतील तर कमेंट करून नक्की कळवा.


ये निबंध देखील अवश्य वाचा :-

धन्यवाद मित्रांनो !

Leave a Comment