माझ्या देशाबद्दल माझे कर्तव्य मराठी निबंध । Essay On My Duty Towards My Country In Marathi

माझ्या देशाबद्दल माझे कर्तव्य मराठी निबंध । Essay On My Duty Towards My Country In Marathi

नमस्कार मित्रांनो आपले मराठी मित्र या वेबसाईटवर खूप खूप स्वागत आहे या वेबसाईटवर तुम्हाला विविध निबंध वाचायला मिळतील.

आजच्या पोस्टमध्ये आम्ही ” माझ्या देशाबद्दल माझे कर्तव्य मराठी निबंध “ या विषयावर निबंध घेऊन आलोत.

आम्हाला खात्री आहे की ,या वेबसाईट वरील सर्व निबंध वाचून आपणास नक्कीच आनंद मिळेल.

माझ्या देशाबद्दल माझे कर्तव्य मराठी निबंध । Essay On My Duty Towards My Country In Marathi

या जगामध्ये जन्माला आल्यापासून मरेपर्यंत प्रत्येक व्यक्तीवर कुठल्या ना कुठल्या प्रकारची कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या असतातच. आपल्या कुटुंबाला सांभाळणे कुटुंबांचे संरक्षण करणे हे प्रत्येक व्यक्ती प्राथमिक कर्तव्य असते. आपण ज्या समाजामध्ये राहतो त्या समाजाचे संरक्षण आणि प्रगती करणे हे सुद्धा आपले कर्तव्यच आहे.

प्रत्येक व्यक्ती हा आपापल्यापरीने स्वतःचे कर्तव्य पार पाडत असते. जसे की शिक्षक हा विद्यार्थ्यांना शिकवणे हे शिक्षकाचे मुख्य कर्तव्य असते आणि तू करतो. पोलीस किंवा सैनिक आपल्या देशाचे रक्षण करून त्यांचे कर्तव्य पार पाडीत असतात.

डॉक्टर एखाद्याला  जीवनदान देऊन आपले कर्तव्य निभावतात. अशा प्रकारे समाजातील प्रत्येक व्यक्ती हा स्वतःचे कर्तव्य पार पाडत असतो. यातील काही जण हे कर्तव्य स्वतःच्या स्वार्थासाठी पार करत असतात तर काही जण हे देशासाठी करत असतात.

प्रत्येक जण जसे आपल्या कुटुंबासाठी आपली कर्तव्य पार पडतात त्याप्रमाणे देश हा आपले कुटुंब मानून आपल्या देशासाठी, देशाच्या संरक्षण आणि प्रगती करणे आपले कर्तव्य  मानले पाहिजे.

माझ्या देशाबद्दल माझे कृत्यावर काय आहे हे प्रत्येकाने जाणून घेतले पाहिजे. प्रत्येक देशातील तरुण पिढी ही देशाचे आत्मा समजली जाते. म्हणूनच या तरुण पिढीला देशाबद्दल व त्यांच्या कर्तव्याबद्दल माहिती असणे आवश्यक आहे.

आपल्या मातृभूमीच्या रक्षणाची जबाबदारी ही  देशातील तरुणांवरच असते. त्यासाठी तरुण आपापल्या इच्छेनुसार भूदल, नौदल, हवाई दल मध्ये जाऊन आपल्या देशाबद्दल आपले कर्तव्य पार पाडले पाहिजे. कित्येक महान पुरुषांनी माझ्या देशाबद्दल तश माझे कर्तव्य जाणून आपल्या प्राणांची आहुती सुद्धा दिलेली आहे.

देशाची प्रगती ही देशातील तरुणांवर अवलंबून आहे. विज्ञान, कला, शिक्षण इत्यादी क्षेत्रात फक्त तरुणांना देशाच्या गरजा भागवाव्यात लागतील. त्यामुळे प्रत्येक तरुणाने माझ्या देशाबद्दलचे माझे कर्तव्यच जाणूं आपापली जबाबदारी योग्य रीतीने पार पाडलीच पाहिजे.

आपल्या देशामध्ये आज हे अन्नधान्याची कमतरता आहे, काही भागामध्ये व्यवस्थित पाण्याची सोय नाही, रस्त्यांची गरज आहे. वीजनिर्मिती वाढवली पाहिजे. या सर्व समस्या तरुण पिढीने समजून याबद्दल ज्ञान घेतले पाहिजे.

फक्त देशातील तरुणच देशाला योग्य दिशेने घेऊन जाऊ शकतात. देशाला नवीन विकासाची दिशा दाखवू शकतात. शेती,‌उद्योग, व्यापार या क्षेत्रामध्ये आधुनिक पद्धतीचा अवलंब करून देशात प्रगतीचा प्रकाश आणू शकतात. यासाठी गरज आहे ती म्हणजे देशातील तरुण पिढींना देशाबद्दल त्यांचे कर्तव्य काय आहे हे जाणून देणे.

देशातील तरुणांनी राजकारणामध्ये जाऊन आपल्या देशाला स्वच्छ केले पाहिजे. आज राजकीय आणि आर्थिक क्षेत्रामध्ये बराच भ्रष्टाचार पाहायला मिळतो. भ्रष्ट घटक आपल्या प्रशासनामध्ये दाखल झाले आहेत. त्यामुळे देशातील निवडणुका धोक्यात आल्या आहेत. अशा पद्धती मधून केवळ तरुण देशाला वाचवू शकतो. देशाच्या सरकाराला कल्याणकारी रूप देणे हे केवळ तरुणांच्या हातात आहे.

आज आपल्या देशामध्ये अनेक नवनवीन समस्या पाहायला मिळत आहेत. अशा समस्याचे निराकरण करण्यासाठी देशाला तरुणांच्या प्रबुद्ध बुद्धीचे गरज आहे. समाजातील जाती व्यवस्था संपवली पाहिजे. त्याप्रमाणेच समाजातील उच्चनीच भेदभाव दूर केला पाहिजे.

हुंडा न घेता लग्न करण्याचा निश्चय केला पाहिजे. सिनेमा आणि दूरदर्शन यांच्या माध्यमातून मागासलेल्या समाजाला एक नवीन दृष्टिकोन देण्याचा प्रयत्न केला पाहिजे.  ग्रामीण भागामध्ये विविध शिबिरे आणि कार्यक्रम, उपक्रम आयोजित करून त्या ठिकाणी जनजागृती केली पाहिजे.

देशातील तरुणांनी देशाला  देशाला बुद्ध आणि महावीर यांच्या धार्मिक मार्गावर घेऊन गेले पाहिजे. गांधीजींन प्रमाणे स्वत: च्या आत्मविश्वासाने देशातील सर्व समस्यांवर मात केली पाहिजे.

यासाठी देशातील तरुणांनी चांगले नेता, सेनापती, शिक्षक, डॉक्टर, पोलीस, सैनिक, कलाकार बनून देशाच्या विकासासाठी आपले योगदान दिले पाहिजे. एकच नव्हे तर देशाची सेवा करण्यासाठी कुठल्याही पदाची आवश्यकता नसल्याने चांगले व्यक्तिमत्त्व बनून समाजाचा विकास केला तरी  एक प्रकारे देशाची सेवा केल्यासारखेच ठरू शकते.

अशाप्रकारे तरुणांना इच्छा असेल तर तरुण देशाबद्दलचे आपले कर्तव्य पार पाडू शकतात. यासाठी तरुणांनी पहिले स्वतःची जबाबदारी ओळखली पाहिजे. यासाठी ‌सर्वप्रथम  तरुणांना चोरी, व्यसन, वाईट संगत त्याला बळी न पडता चांगले व्यक्तिमत्व घडवले पाहिजे.

माझ्या देशाबद्दल माझी कर्तव्य याची ओळख सर्वप्रथम करून घेतली पाहिजे. त्यानंतरच आपले कर्तव्य पार करण्याची आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे.

तर मित्रांनो ! ” माझ्या देशाबद्दल माझे कर्तव्य । Essay On My Duty Towards My Country In Marathi “ वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना आवाज शेअर करा.

” माझ्या देशाबद्दल माझे कर्तव्य। Essay On My Duty Towards My Country In Marathi “ यामध्ये आमच्याकडून काही पॉईंट राहिले असतील तर कमेंट करू नक्की कळवा.


ये निबंध देखील अवश्य वाचा :-

धन्यवाद मित्रांनो !

Leave a Comment