मी सरपंच झालो तर मराठी निबंध लेखन | Mi Sarpanch Zalo Tar Nibandh Marathi
मी एका छोटासा खेडेगावांमध्ये राहतो. खेडेगाव म्हणजे येथे कुठल्याही सुविधा नसतात हे आपण सर्वांना तर माहितीच आहे. परंतु खेडेगावाचा संपूर्ण कारभार तेथे असलेल्या सरपंच पाहत आसतो.
जसे तालुक्याचा कारभार नगरपालिकेचे अध्यक्ष पाहतो त्याप्रमाणे खेडे गावाचा सर्व कारभार गावचा सरपंच पाहतो. त्यामुळे मला मोठे होऊन सरपंचा होण्याची इच्छा आहे.
मी सरपंच झालो तर मराठी निबंध लेखन | Mi Sarpanch Zalo Tar Nibandh Marathi
जर मी सरपंच झालो तर प्रथम गावांमध्ये पाण्याची व्यवस्था करेल. कारण मी ज्या गावांमध्ये राहतो तेथे उन्हाळा येताच गावांमध्ये पाण्याच्या समस्या मोठ्या प्रमाणात उद्भवतात लोकांना पिण्यासाठी पुरेसे पाणी सुद्धा उपलब्ध नसते.
त्यामुळे जर मी सरपंच झालो तर सर्वप्रथम पाण्याची समस्या दूर करीन. तसेच आमच्या गावामध्ये झाडांची संख्या खूप कमी प्रमाणात आहे. त्यामुळे उन्हाळा ऋतु मध्ये गावच्या तापमानाचा पारा 50 डिग्री सेल्सिअस पर्यंत पोहचतो. त्यामुळे मला सतत विचार येतो की, गावाची आशी परिस्थिती कशी बदलता येईल?
त्यामुळे मी मोठा झाल्यावर सरपंच झालो तर गावचे पूर्ण चित्रच बदलून टाकेल. मी गावांमध्ये वृक्षारोपण करीन जेणेकरून घरामध्ये भरपूर झाडे उगवतीला व त्यामुळे तापमान तर कमी होईल सोबत गावच्या परिसरामध्ये पाऊस पडून पाण्याची समस्या थोड्या प्रमाणात कमी होण्यास मदत होईल.
तसेच आमच्या गावामध्ये विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी पुरेशा सुविधा नसल्याने म्हणजेच गावांमध्ये शाळा महाविद्यालय नसल्यामुळे गावातील लोकांना 5-6 मीटरचे अंतर पार करून शाळेसाठी जावे लागते.
अशा परिस्थितीमध्ये पालक आपल्या मुलांना शाळेमध्ये पाठवण्यात घाबरतात त्यामुळे मी सरपंच झालो तर गावातील विद्यार्थ्यांसाठी गावांमध्येच शाळेची सुविधा उपलब्ध करून देईन. जेणेकरून गावातील सर्व मुलांना माध्यमिक पर्यंतचे सर्व शिक्षण गावामध्येच दिले जाईल.
त्यानंतर दुसरा महत्त्वाचा टप्पा म्हणजे भूमी गावातील रस्ते दुरुस्ती करीन. अलीकडे रस्त्याच्या खरावे मुळे अनेक अपघाताच्या दुर्घटना आपल्याला पाहायला मिळत आहे.
अशा परिस्थितीमध्ये मी सरपंच झालो तर गावातील सर्व रस्ते दुरुस्त करीन जेणेकरून गावांमध्ये रस्त्याच्या समस्येमुळे कुठलाही प्रकारचा अपघात होणार नाही.
जर मी सरपंच झालो तर गावामध्ये विजेचे सुविधा उपलब्ध करून देईन. आमच्या गावामध्ये सुरळीत वीजपुरवठा नसल्याने विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यामध्ये अडचणी येत असत तर विजेवर अवलंबून असलेले उद्योगधंदे किंवा व्यवसाय करणारा लोकांना यांचा खूप मोठा परिणाम भोगावा लागतो. त्यामुळे जर मी सरपंच झालो तर गावाला व्यवस्थित वीज पुरवठा करण्यासाठी प्रयत्न करेन.
तसेच ग्रामीण भागामध्ये योग्य वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसल्याने अनेक व्यक्ती गंभीर रोगाने ग्रासले जातात तर काही जण यांचा मृत्यू सुद्धा होतो.
जर मी सरपंच झालो तर आमच्या गावा मध्ये रुग्णालयाची व्यवस्था करणे जेणे करून गावातील लोकांना औषधोपचार गावामध्येच दिला जाईल. तसेच जर मी सरपंच झालो तर गावामध्ये स्वच्छ भारत अभियान राबविन. त्यामुळे सगळे गाव सुंदर होईल त्या सोबतच गावामध्ये कुठल्याही प्रकारचा रोग, महामारी उद्भवणार नाही.
तसेच जर मी सरपंच झालो तर या गावांमध्ये वेळोवेळी स्वच्छ भारत अभियान, पाणी वाचवा पाणी जिरवा, झाडे लावा झाडे जगवा असे विविध उपक्रम राबविन. तसेच गावातील लोकांना शिक्षणाबाबत जनजागृती करून देईल.
असे म्हणतात की, ग्रामीण भागातील लोक अंधश्रद्धेवर खूप मोठ्या प्रमाणात विश्वास ठेवतात त्यामुळे मी गावांमध्ये अंधश्रद्धानिर्मूलन उपक्रम करील जेणेकरून गावातील अंधश्रद्धा पासून दूर राहतील.
तसेच मी गावातील सर्व लोकांना शिक्षणाचे महत्त्व सांगून गावातील सर्वांना साक्षर बनवण्यासाठी प्रयत्न करेन. त्यासाठी मी गावांमध्ये वाचनालयाची स्थापना करीन.
वाचनालयामध्ये विविध पुस्तके, चरित्र आणि ग्रंथ उपलब्ध करून देईल जेणेकरून गावातील सर्व लोक या वाचनालयाचा अनुभव आणि वापर करून घेतील. तसेच जाती भेद, धर्म त्यांच्यामध्ये भेदभाव न ठेवता गावातील सर्व लोकांमध्ये एकोप्याची भावना निर्माण करण्यासाठी प्रयत्न करीत.
अशा प्रकारे जर मी सरपंच झालो तर गावात मध्ये प्रगती घडवून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेन.
तर मित्रांनो ! ” मी सरपंच झालो तर मराठी निबंध लेखन | Mi Sarpanch Zalo Tar Nibandh Marathi “ वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना आवश्य शेअर करा.
ये निबंध देखील अवश्य वाचा :-
- दहशतवाद एक भीषण समस्या मराठी निबंध
- आपत्ती व्यवस्थापन निबंध मराठी
- मी पाणी बोलतोय निबंध मराठी
- शेतकरी जगाचा पोशिंदा मराठी निबंध
- विज्ञान शाप की वरदान निबंध मराठी
धन्यवाद मित्रांनो !