दहशतवाद एक भीषण समस्या मराठी निबंध | Dahashatwad Ek Samasya In Marathi Essay

दहशतवाद एक भीषण समस्या मराठी निबंध | Dahashatwad Ek Samasya In Marathi Essay

आपण नेहेमी वर्तमान पत्रामध्ये बातम्या वाचत असतो किंव्हा पहात असतो की, आपल्या देशामध्ये दहशतवादी हल्ले झालेत या हल्ल्यामध्ये आपल्या देशातील कित्येक जवान शहीद झाले. परंतु दहशतवादी हल्ले किंवा दहशतवाद म्हणजे नेमके काय?

सुरूवातिच्या काळामध्ये दहशतवाद शब्द आपण फक्त कशमिर व पंजाब येथे घडणाऱ्या घटनांशी संबंधित होता. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये हे चित्र संपूर्णता बदललेले आहे त्यामुळे दहशतवाद हा कश्मीर आणि पंजाब वर न राहता संपूर्ण देशामध्ये पसरला आहे.

दहशतवाद एक भीषण समस्या मराठी निबंध | Dahashatwad Ek Samasya In Marathi Essay

1992 मध्ये आणि त्यानंतर 26 नोव्हेंबर 2011 मध्ये मुंबई येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देश हादरून गेला. मुंबईमध्ये कित्येक बॉम्बस्फोट घडवून आणले गेले. त्यानंतर कर्नाटक व आंध्र प्रदेश मधील चर्चवर बॉम्ब स्पोर्ट करण्यात आला.

पुण्यातील जर्मन बेकरी वरती फॉर्म बॉम्ब स्पोट करण्यात आला. एवढेच नसून देशातील संसद भवनावर देखील हल्ला करण्यात आला व येथूनच दहशतवादाचे चित्र बदलत गेले आणि आज आपल्या देशांमध्ये दहशतवादी एक भीषण समस्या बनलेली आहे.

धर्माच्या नावाखाली लोकांच्या भावनांना प्रक्षोभीत करून दंगा पसरवायचा हा दहशतवादाचा मुख्य नीतिमूल्य आहे. आणि या जीवघेण्या स्पर्धेच्या रूपांतर पुढे जाऊन युद्धांमध्ये होते. याचे उदाहरण म्हणजे समाज वादाच्या मुद्द्यावरून जागतिक स्तरावर दोन महाविद्या झालेली आहे ती एक दहशतवादाचे उदाहरण म्हटले तर चुकीचे ठरणार नाही.

दहशतवाद हा युद्धा पेक्षा काही वेगळा असतो अप्रत्यक्षरीत्या केले जाते तर दहशतवादी लपून केलेले केलेले हल्ले असतात. दहशतवादा मध्ये मनासारखी एखादी गोष्ट प्राप्त न झाल्याने किंवा प्रतिपक्षाचे यंत्रणा खीळखीळीत करण्यासाठी अप्रत्यक्षरित्या हल्ले केले जातात.

आपला हेतू साध्य करण्यासाठी प्रती पक्षांमध्ये दुरावा निर्माण करणे हा दहशतवादाचा मुख्य हेतू असतो. मग त्यासाठी सीमेवर हल्ला करणे, गोळीबार करणे, बॉम्बस्फोट करणे, नागरिकांना क्रूर उपायांनी छळणे, लहान मुलांना पळविणे त्यांच्यावर अत्याचार करणे असे मार्ग दहशतवाद स्वीकारतात.

अलीकडे हा दहशतवाद भारत देशामध्ये मोठ्या प्रमाणात पसरत चालल्याचे पाहत आहे थोडक्यात दहशतवादी एक अशी कीड आहे चे संपूर्ण देशाला लागलेली आहे व आज आपल्या देशात दहशतवाद समस्या बनली आहे.

परदेशातून शस्त्र आणणे, विमाने खरेदी करणे, तरुणांना घातपाताचे शिक्षण देणे ही आलीकडे दहशतवादाचे लक्षणे भारतामध्ये अलीकडे उघडकीला आली आहेत. एखादा संसर्गजन्य रोग कसा संपूर्ण देशामध्ये पासरतो त्याप्रमाणे दहशतवाद हा देखील एका व्यक्तीपासून दुसर्‍या व्यक्तीला पसरतो.

आंतरराष्ट्रीय पातळीवर असलेला हा दहशतवाद आज भारताच्या अंतर्गत राजकारणात शिरला आहे. पक्ष पक्षाच्या राजकारणात आणि आपला पक्ष हा सर्वश्रेष्ठ आहे या हेतूने राजकारणामध्ये पक्षाचे पुढारी बहुतांशी गुंडांना आपल्या हाताचे बाळगून असतात. मोठमोठे उद्योगपती, बिल्डर आणि अधिकारी हे सुद्धा गुंडांना सुपार्‍या देऊन आपला हेतू साध्य करतात.

चोरटा व्यापार, घातक, अंमली पदार्थ, दहशतवाद्यांना पाठिंबा देतात.

आता हा दहशतवाद फक्त राजकारणासाठी किंवा सीमेवर न राहता आपल्या दैनंदिन जीवनामध्ये देखील प्रवेश करीत आहे आणि ही खूपच चिंतेची बाब आहे. महाविद्यालयातून चालणारे रॅगिंगचे प्रकार हे देखील दहशतवाद्याचे लक्षण आहे. तसेच हव्या त्या पदासाठी लाच देऊन मिळणारा प्रवेश हा देखील दहशतवादच आहे.

आणि ह्या दहशतवादाचा प्रसार आणि प्रचार हा दूरदर्शन मार्फत दाखवला जाणारा चित्रपट आणि मालिके मार्फत होत आहे. आज प्रत्येक चित्रपटामध्ये दहशतवाद दाखविल्याशिवाय तो चित्रपट होत नाही आणि अशोक चित्रपट बघून आजचे आपली तरुण पिढी बिघडत आहे व दहशतवादाला बळी पडत आहे.

दहशतवादाचा तरुण पिढी वर हा खूप वाईट परिणाम होत आहे. कोणती गोष्ट सरळ मार्गाने मिळत नसेल तर धमकी, मारहाण, दंगली, भांडणे या मार्गाचा अवलंब करून ती गोष्टी मिळवण्याच्या पोटी आजची तरुण पिढी दहशतवादाला बळी पडत आहे.

आपण करत असलेल्या लहान लहान कृतितूनच दहशतवादाला जन्म दिला जातो. दहशतवादाचा अवलंब करून एखादी गोष्ट साध्य करणे, ही जगण्याची पद्धत होत चालली आहे.

देशाच्या भवितव्यासाठी आणि भविष्यासाठी आपल्या देशातून दहशतवाद कमी होणे खूप गरजेचे आहे. आज दहशतवाद ही समस्याने खुप गंभीर रूप धारण केले आहे. हा दहशतवाद रोखण्यासाठी कठोर नियम आणि योजनांचा अवलंब करणे आवश्यक या आहेत.

आपल्या समाजातील आणि देशातील दहशतवाद कमी व्हावा यासाठी कडक नियम आणि तातडीचे निर्णय घेणे गरजेचे आहे. तसेच दहशतवादाची समस्या कमी कारण्यासाठी नैतिक मूल्यांचा विचार देखील करायला हवा.

जेव्हा देशातील प्रत्येक नागरिक नैतिक मूल्यांचा अवलंब करून भ्रष्टाचाराला किंवा दहशतवादाला स्वतःपासून दूर ठेवले तेव्हा आपल्या देशातून दहशतवाद एक भीषण समस्या नक्कीच दूर होईल.


ये देखील अवश्य वाचा :-

धन्यवाद मित्रांनो !

Leave a Comment