डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण मराठी निबंध | Essay on dr sarvepalli radhakrishnan in marathi
आपल्या देशाला अनेक महान राष्ट्रपतींचा सहवास लाभला. असे म्हणतात की, आपल्या भारत देशाला अनेक महान पुरुषांचा वारसा लाभला. भारतात जन्माला आलेला सर्व महान पुरुष आणि पैकी एक म्हणजे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे देखील होते.
सर्वपल्ली राधाकृष्णन यांना भारताचे दुसरे राष्ट्रपती होण्याचा मान मिळाला तसेच शिक्षण तज्ञ देखील होते. तसेच सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी आपल्या देशा साठी केलेल्या अनेक महान कार्यामुळे देखील ओळखले जातात.
डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण मराठी निबंध | Essay on dr sarvepalli radhakrishnan in marathi
Table of Contents
डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस म्हणजेच 5 सप्टेंबर हा दिवस संपूर्ण भारत देशांमध्ये शिक्षक दिन म्हणून अतिशय आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो.
डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म :
सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म 5 सप्टेंबर 1888 रोजी आंध्र प्रदेश येथील तामिळनाडू येथील तिरुतानि या गावामध्ये झाला. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा गणांचा कोकणामध्ये झाला ते कुटुंब मूळचे ब्राह्मण होते.
डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णा यांच्या वडिलांचे नाव विरस्वामी आणि आईचे नाव सीतम्मा असे होते. राधाकृष्ण यांचे कुटुंब ब्राह्मण असल्याने त्यांच्या वडिलांचे स्वप्न होते की, सर्वपल्ली राधाकृष्ण यांनी मोठे होऊन पंडित शास्त्राचा अभ्यास करून भविष्यात एक पंडित व्हावे.
डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा शिक्षण :
पल्ली राधाकृष्णन यांचे प्राथमिक शिक्षण तिरुतानि या गावामध्ये झाले. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांना जेव्हा शाळेत टाकण्यात आले तेव्हा ते शाळेमध्ये अतिशय हुशार होते. शिक्षण घेत असताना आपल्या जीवनामध्ये अनेक शिष्यवृत्त्या देखील प्राप्त केल्या.
याच शिष्यवृत्या पासून मिळणाऱ्या आर्थिक मदतीमुळे त्यांनी पुढे कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. सर्वप्रथम राधाकृष्ण हे वेल्लूर च्या वूर्ही कॉलेजमध्ये प्रवेश घेतला त्यानंतर त्यांनी मद्रासच्या ख्रिश्चन शाळेमधूनआपले शिक्षण पूर्ण करण्याचा निर्णय घेतला.
मद्रास या कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना त्यांच्याकडे पुरेसे पैसे नसल्याने त्यांनी फिलॉसॉफी हा विषय निवडला कारण फिलॉसॉफी विषयाला त्याकाळी जास्त पैसे भरण्याची आवश्यकता नव्हती. व मद्रासच्या ख्रिश्चन कॉलेजमधूनच त्यांनी आपले फिलोसोफी विषयातून शिक्षण पूर्ण केले.
नंतर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी मद्रास मधील प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये तर्कशास्त्राचे प्राध्यापक म्हणून सन 1917 पर्यंत कार्यरत राहिले. सर्वपल्ली राधाकृष्ण यांनी अन्य पदांवर केलेले कार्य सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी आपले प्राथमिक शिक्षण त्यांच्या जन्मगावी पूर्ण केले.
आपले माध्यमिक शिक्षण पूर्ण करण्यासाठी ते मद्रास मधील ख्रिश्चन कॉलेजमध्ये गेले. तेथेच तत्त्वज्ञान या विषयांमध्ये आपले शिक्षण घेत या विषयांमध्ये पहिला क्रमांक मिळविला. त्यानंतर पुढचे एम.ए शिक्षण करण्यासाठी त्याने नीतिशास्त्र हा विषय निवडला.
डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांनी सन 1931 ते 1939 साला पर्यंत राष्ट्रसंघात भारत देशाचे प्रतिनिधित्व केले. 1949 ते 1952 या काळापर्यंत त्यांनी रशियातील राजदूत म्हणून आपला कार्यकाळ सांभाळला.
त्यांनी रशिया देशांमध्ये देखील आपल्या व्यक्तिमत्त्वाचा ठसा उमटविला. त्यानंतर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण 1952 मध्ये भारत देशामध्ये परत आले.
भारतात परत आल्यानंतर 1952 ते 1962 पर्यंत त्यांनी उपराष्ट्रपति या पदावर कार्य केले. त्यानंतर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी राष्ट्रपती होण्याचा देखील मान मिळविला. 13 मे 1962 रोजी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण के राष्ट्रपती पदावर निवडले गेले.
सर्वपल्ली राधाकृष्ण यांचे कार्य :
डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी आपल्या देशासाठी विविध कार्य केले. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी धर्म आणि तत्वज्ञान या दोन्ही विषयाचा अभ्यास केला.
तसेच आपल्या स्वतंत्र भारताला शिक्षक विषयक धोरण निश्चित करणे गरजेचे आहे असा विचार करून डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी सन 1948 साली भारत सरकारने पहिला शिक्षण आयोग सुरू केला. या शिक्षक आयोगाचे मुख्य अध्यक्षपद डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांना देण्यात आले.
त्यासोबतच सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी आपल्या जीवनामध्ये अनेक ग्रंथदेखील रचले. त्याचबरोबर भारतीय धर्माचे श्रेष्ठत्व दाखवून देणाऱ्या ग्रंथदेखील डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी रचले. 10 नंतर शिक्षक कसा असावा व एका चांगला शिक्षकाच्या अंगी असणारे गुण याचेदेखील वर्णन केले.
शिक्षक दिन :
डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी आपल्या जीवनामध्ये अनेक पदांवर कार्य केले त्यातील एक म्हणजे शिक्षक होय. त्यांनी शिक्षकांविषयी आपले उत्कृष्ट असे मत मांडले. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस संपूर्ण भारतामध्ये शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो.
शाळा-महाविद्यालयांमध्ये शिक्षक दिवस साजरा करून सर्व विद्यार्थी आपापल्या शिक्षकांचा सन्मान आणि आदर करतात. शालेय विद्यार्थ्यांसाठी हा दिवस खूप महत्त्वाचा ठरतो कारण विद्यार्थी आपल्या शिक्षकांबद्दल आदर कृतज्ञता व्यक्त करून त्यांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देतात.
सर्वपल्ली राधाकृष्णन यांना मिळालेले पुरस्कार :
सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी आपल्या देशासाठी केलेल्या कार्यांसाठी त्यांना आपल्या देशात एकूण विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी केलेल्या उत्कृष्ट अशा कार्यासाठी त्यांना सन 1958 सली भारताचा सर्वोच्च पुरस्कार म्हणजेच भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच त्यांना सण 1931 मध्ये इंग्लंडने “सर” ही पदवी दिली.
अशाप्रकारे आपल्या देशासाठी महान कार्य करणाऱ्या डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा 17 एप्रिल 1975 रोजी दुःखद निधन झाले.
अशाप्रकारे आपल्या देशासाठी सदैव कार्यरत असणारे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे एक शिक्षक, आदर्शवादी लेखक सुद्धा होते. अशा महान व्यक्तीची दरवर्षी 5 सप्टेंबर रोजी आपण शिक्षक दिनानिमित्त आठवण करून त्यांना वंदन करतो.
तर मित्रांनो ! ” डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण मराठी निबंध | Essay on dr sarvepalli radhakrishnan in marathi “ वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.
ये निबंध देखील अवश्य वाचा :-
- दहशतवाद एक भीषण समस्या मराठी निबंध
- मी सरपंच झालो तर मराठी निबंध लेखन
- मी पाणी बोलतोय निबंध मराठी
- शेतकरी जगाचा पोशिंदा मराठी निबंध
- विज्ञान शाप की वरदान निबंध मराठी
धन्यवाद मित्रांनो !