माझा महाराष्ट्र निबंध मराठी । Maza Maharashtra Nibandh In Marathi

माझा महाराष्ट्र निबंध मराठी । Maza Maharashtra Nibandh In Marathi

नमस्कार मित्रांनो ! आपले मराठी मित्र या वेबसाईटवर खूप खूप स्वागत आहे या वेबसाईटवर तुम्हाला विविध निबंध वाचायला मिळतील.

आजच्या पोस्टमध्ये आम्ही ” माझा महाराष्ट्र निबंध मराठी । Maza Maharashtra Nibandh In Marathi “ या विषयावर निबंध घेऊन आलोत.

आम्हाला खात्री आहे की, या वेबसाईट वरील सर्व निबंध वाचून आपणास नक्कीच आनंद मिळेल.

माझा महाराष्ट्र निबंध मराठी । Maza Maharashtra Nibandh In Marathi

” मंगल देशा ! पवित्र देशा,

महाराष्ट्र देशा

प्रणाम घ्यावा माझा हा

श्री महाराष्ट्र देशा !!”

मित्रांनो! संतांची भूमी म्हणून ओळखला जाणारा माझा महाराष्ट्र चा मराठी मातीचा इतिहास हा फारच शूरवीर आणि पराक्रमी आहे. अनेक महावीरांच्या बलिदानाने माझा महाराष्ट्र बनलेला आहे. माझ्या महाराष्ट्राला महान करण्यामध्ये अनेक शूरवीर पुरुषांचा आणि स्त्रियांचा हात आहे.

माझा महाराष्ट्र हा ” महा “ आणि ” राष्ट्र “ या दोन शब्दांपासून बनलेला आहे महा म्हणजे “महान” आणि राष्ट्र म्हणजेच “संयुक्त सरकार असलेल्या व्यक्तींचा समूह” आशा या दोन शब्दांनी महाराष्ट्र हा शब्द बनलेला आहे. महाराष्ट्र शब्दातच आपल्याला कळेल की महाराष्ट्र हे किती महान राष्ट्र आहे.

1 मे 1960 ला महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली त्या पूर्वीच्या काळात महाराष्ट्राला प्राचीन असा इतिहास लाभलेला आहे. महाराष्ट्र हा बाळ गंगाधर टिळक, दादाभाई नवरोजी, गोपाल कृष्ण गोखले, वीर सावरकर यांसारख्या महान पुरुषांची जन्मभूमी आहे.

महाराष्ट्र राज्याला देशातील श्रीमंत आणि संपन्न राष्ट्र मध्ये समावेश केले जाते. कारण महाराष्ट्र हे भारतातील उद्योग क्षेत्रातील सर्वात अग्रगण्य आणि प्रगतिशील राज्य आहे. महाराष्ट्र राज्याची राजधानी हे “मुंबई” आहे.सोबतच मुंबई ही भारताची “आर्थिक राजधानी” सुद्धा आहे. त्यामुळे भारताच्या नकाशात महाराष्ट्र राज्याला खूप महत्त्वाचे टोकाचे स्थान आहे.

भारतातील एकूण उत्पादनाच्या जवळपास एक चतुर्थांश उत्पादन हे महाराष्ट्र राज्यात होते. उत्पादनाच्या क्षेत्रात येथील राज्याने पैकी महाराष्ट्र राज्य हे अव्वल दर्जाचे आहे. त्याच मे महाराष्ट्राचे विशिष्ट भौगोलिक स्थानामुळे देखील ओळखले जाते. महाराष्ट्राच्या उत्तरेला सातपुडा पर्वत आहे. तर पश्चिमेला अरबी समुद्र वसलेला आहे.

महाराष्ट्र राज्याच्या बहुतांश भागात बेसाल्ट खडक सापडतो. महाराष्ट्र राज्यातील सर्वाधिक उंचीचे शिखर म्हणजे कळसुबाई शिखर आहे. कळसुबाई शिखराची उंची साधारणता 1646 मिटर आहे. याशिवाय महाराष्ट्र राज्याला खूप मोठ्या प्रमाणात जलाशयाच्या साठा लाभलेला आहे. महाराष्ट्रातून गोदावरी, भीमा, कृष्णा, कोयना, पंचगंगा, कावेरी, नर्मदा, पैनगंगा आणि मुळा-मठा इत्यादी नद्या वाहतात.

एवढेच नसून महाराष्ट्र राज्य हे संस्कृतीचा वारसा जपणारे राष्ट्र म्हणून देखील ओळखले जाते. महाराष्ट्र राज्यात विविध जातीचे, धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात.

मराठी ही भाषा महाराष्ट्राची मायबोली भाषा आहे. बायकांसाठी साड्या आणि पुरुषांसाठी धोतर हा महाराष्ट्राची मुख्य वेशभूषा आहे. याशिवाय ड्रेस, पॅन्ट, शर्ट, लग्नासारख्या मोठा कार्यक्रमांमध्ये लेहंगा, चुडीदार ड्रेस इत्यादी वेगवेगळ्या प्रकारची वेशभूषा पाहायला मिळते.

महाराष्ट्र राज्याची सध्याची लोकसंख्या आहे सुमारे बारा करोड एवढी असावी. किंबहुना यापेक्षा अधिक लोक महाराष्ट्र राज्यात राहतात. यामध्ये हिंदू जनसंख्या अधिक प्रमाणात पाहायला मिळते. त्यामुळे महाराष्ट्र राज्याचा प्रमुख सन हा गणेश उत्सव, किंवा गणेश चतुर्थी आहे.

परंतु याशिवाय महाराष्ट्र राज्यात दीपावली, होळी, दसरा, ईद, मकर संक्राती, नारळी पौर्णिमा, गुढीपाडवा इत्यादी मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरे केले जातात. भारत देशात महाराष्ट्र राज्याचा लोकसंख्येच्या दृष्टीने दुसरा क्रमांक लागतो, तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने तिसरा क्रमांक लागतो.

महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी शेकरू हा आहे. राज्य पक्षी हरियाणा हा आहे तर महाराष्ट्र राज्याचे राज्यफूल हेच ताम्हण आहे व राष्ट्रीय फळ हे आंबा आहे.

महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 36 जिल्हे पाहायला मिळतात. महाराष्ट्र राज्य हे भारतीय चित्रपट आणि टेलिव्हिजन उद्योगाचे प्रमुख केंद्र मानले जाते. या उद्योगांमुळे महाराष्ट्र राज्याला दरवर्षी देश-विदेशातून करोडो रुपयांचा महसूल प्राप्त होतो.

महाराष्ट्र राज्याला इतिहासाचा खूप मोठा वारसा लाभलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांसारखे शूरवीर राजे या महाराष्ट्राच्या मातीत होऊन गेले.

एवढाच नसून दलितांचे कैवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्त्री शिक्षणाच्या ज्योती लावणाऱ्या सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले तसेच वारकरी संप्रदायाचे अनमोल रत्ने याच महाराष्ट्राच्या मराठी मातीत होऊन गेली. तसेच संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांसारख्या ज्ञानी आणि विद्वान संतांनीसुद्धा याच मराठी मातीत जन्म घेतला.

त्यानंतर ज्ञान संग्रामी लता मंगेशकर, क्रिकेट चा देवता सचिन तेंडुलकर, भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके, मराठी साहित्यकार कुसुमाग्रज, स्वर सम्राट पंडित भीमसेन जोशी आणि कुष्ठरोग्यांची सेवा करणारे बाबा आमटे, अनेक गरीब आणि अनाथ मुलांची आई सिंधुताईई सपकाळ इत्यादी महान-महान लोकांचा जन्म महाराष्ट्रातून झाला व या लोकांनी आपले संपूर्ण जीवन महाराष्ट्राची सेवा करण्यासाठी सार्थ केले.

इतिहासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेले हे राज्य पर्यटकांच्या दृष्टीने सुद्धा अतिशय महत्त्वाचे आहेत. माझ्या महाराष्ट्रामध्ये अनेक पर्यटक स्थळे आहेत ते पाहण्यासाठी देशविदेशातून लाखो संख्येने पर्यटक महाराष्ट्र राज्याला भेट देण्यासाठी येतात.

महाराष्ट्र राज्यात अनेक प्राचीन गुहा, वास्तुशिल्प, मोठ्या डोंगर दर्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनेक लहान-मोठे किल्ले, अजिंठा वेरूळच्या लेण्या, अमाप निसर्ग सौंदर्याने नटलेला कोकण असे अनेक ठिकाणी महाराष्ट्र राज्यामधील पर्यटकांसाठी प्रसिद्ध आहेत.

याशिवाय विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाणारे शहर म्हणजेच पुणे हे सुद्धा पर्यटकांसाठी प्रसिद्ध आहे. औरंगाबाद शहर सुध्दा पर्यटकांसाठी महत्त्वपूर्ण ठरते. याशिवाय महाराष्ट्र राज्यात अनेक लहान-मोठी दर्शनीय तीर्थक्षेत्र आहेत.

पंढरपूरचे विठोबा मंदिर, नाशिकचे सप्तशृंगी मंदिर, तुळजापूरच्या भवानी मातेचे मंदिर ,अक्कलकोटचे स्वामी समर्थ मंदिर अनेक लहान-मोठे तीर्थस्थळे महाराष्ट्रातील प्रसिद्ध आहेत. या ठिकाणी दरवर्षी हजारोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात.

अशाप्रकारे माझा महाराष्ट्र हा सर्वच दृष्टीने एक संपन्न राज्य आहे. माझ्या महाराष्ट्राला प्राचीन ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे आणि या गोष्टीचा मला सार्थ अभिमान आहे.

तर मित्रांनो ! ” माझा महाराष्ट्र निबंध मराठी । Maza Maharashtra Nibandh In Marathi “ मला वाचून आपणास आवडले असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.

” माझा महाराष्ट्र निबंध मराठी । Maza Maharashtra Nibandh In Marathi “ यामध्ये आमच्याकडून काही पॉईंट राहिले असतील तर कमेंट करून नक्की कळवा.


ये निबंध देखील अवश्य वाचा :-

धन्यवाद मित्रांनो !

3 thoughts on “माझा महाराष्ट्र निबंध मराठी । Maza Maharashtra Nibandh In Marathi”

  1. भरपूर चांगला निबंध आहे।महाराष्ट्राबाबतीत सर्वकाही चांगले लिहिले आहे

    Reply

Leave a Comment