माझा आवडता विषय‌ इंग्रजी मराठी निबंध | Maza Avadta Vishay English Nibandh

माझा आवडता विषय‌ इंग्रजी मराठी निबंध | Maza Avadta Vishay English Nibandh

नमस्कार मित्रांनो ! आपले मराठी मित्र या वेबसाईटवर खूप खूप स्वागत आहे या वेबसाईटवर तुम्हाला विविध निबंध वाचायला मिळतील.

आजच्या पोस्टमध्ये आम्ही ” माझा आवडता विषय‌ इंग्रजी मराठी निबंध | Maza Avadta Vishay English Nibandh “ या विषयावर निबंध घेऊन आलोत.

आम्हाला खात्री आहे की, या वेबसाईट वरील सर्व निबंध वाचून आपणास नक्कीच आनंद मिळेल.

माझा आवडता विषय‌ इंग्रजी मराठी निबंध | Maza Avadta Vishay English Nibandh

इंग्रजी भाषा ही आज काळाची गरज बनली आहे. सर्वत्र इंग्रजी भाषा शिकण्यासाठी बहुत दिला जात आहे लहानापासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण इंग्रजी भाषा शिकण्याकडे कल देत आहेत.

शाळा महाविद्यालय मध्ये सुद्धा इयत्ता पहिली पासून ते पुढचे सर्व शिक्षण हे इंग्रजी भाषेमध्ये दिले जात आहे. इंग्रजी भाषेचा उपयोग हा जगातील कानाकोपरा मध्ये सर्वत्र केला जातो. त्यामुळे आज आपल्या जीवनामध्ये सर्वात जास्त महत्व आहे इंग्रजी भाषेला प्राप्त झाले आहे.

मुळात इंग्रजी भाषेचे ज्ञान हे इंग्रजी विषया मार्फत दिले जाते. इंग्रजी विषय हा आज लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांच्या विद्यालयांमध्ये मुख्य विषय बनला आहे. या सर्व कारणांमुळे माझा आवडता विषय इंग्रजी बनला आहे.

मला इंग्रजी विषय खूप खूप आवडतो. मला हे विषय आवडण्याचे मुख्य कारण म्हणजे इतर सर्व विषयांच्या तुलनेमध्ये इंग्रजी विषय हा खूप सोपा आहे इंग्रजी भाषा ही सोपी आहे या भाषा मध्ये कुठलाही प्रकारचा काना, मात्रा पाहायला मिळत नाही. इतकेच नसून इंग्रजी विषयातून भावना, थीम, नैतिकता, मूल्य आणि उत्कटतेची वैविध्यपूर्ण श्रेणी ऑफर केली जाते.

तसेच इंग्रजी भाषा जगभरात सर्वत्र बोलली जाणारी भाषा आहे आणि या भाषेचे ज्ञान हे आपल्याला इंग्रजी विषयात दिले जाते. इंग्रजी विषयातून मानवी अनुभव आणि अभिव्यक्ती यांची श्रेणी सांगितली जाते. तसेच एखाद्या व्यक्तीशी संवाद साधताना जे वापरले जाणारे व्याकरण असते त्याचे योग्य ज्ञान इंग्रजी  विषया मार्फत दिले जाते.

त्यामुळे इंग्रजी विषय लहानपणापासूनच सर्वांच्या अभ्यासामध्ये पहायला मिळते. जेणेकरून सर्वांना इंग्रजी भाषा बोलता किंवा लिहिता येईल.

इंग्रजी भाषेने अभिव्यक्तीचे एक स्वतंत्र रूप दिले आहे. ज्यामुळे कला, लेखन, साहित्य, कल्पित कथा आणि टीका या कथांमध्ये कथात्मक रूप विकसित झाले. विल्यम शेक्सपियर यांच्या कवितांमुळे इंग्रजी भाषेला नवीन योगदान मिळाले आहे.

त्यांनी इंग्रजी भाषेच्या माध्यमातून आपल्या कवितांमध्ये मानवी भावना आणि परिस्थिती चे शब्द ओतले. तसेच त्यानी इंग्रजी भाषेतील परिवर्तनाचे प्रदर्शन केले जाणे बरीच व्याख्या केलेल्या विवेकी विचारांचा हालचालीला चालना मिळाली. मला इंग्रजी विषय आवडण्याचे आणखी एक कारण म्हणजे इंग्रजी भाषा व्यक्त केली जाणारी सामग्री नुसार अभिव्यक्तीचे रूपांतर करण्याची क्षमता ठेवू शकते.

त्यामुळे मला इंग्रजी भाषा विषय खूप आवडते. त्यामुळे मी इंग्रजी विषयाचा अभ्यास  करणे खूप  आवडते. इंग्रजी विषयाचे शब्दात पाठ करणे, ग्रामर वाचणे  इत्यादी मी आवडीने करतो.

तसेच मी इंग्रजी विषया सोबत इतर विषयाचा अभ्यास करतो परंतु माझा जास्त आवडीचा विषय म्हणजे इंग्रजी हाच आहे.‌ माझी इच्छा आहे की मी मोठे होऊश इंग्रजी विषयाचा शिक्षक बनावे. त्यासाठी मी आतापासूनच प्रयत्न करीत आहे.  इंग्रजी विषयाचे संपूर्ण ज्ञान ग्रहण करत आहे. आज पर्यंत मला इंग्रजी विषयांमध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळाले आहेत.

माझ्या वर्गातील सर्व मित्र-मैत्रिणींना इंग्रजी विषयातील काही समस्या असेल तर त्याचे निराकरण करण्याचे काम माझ्याकडे असते. तसेच मला सर्वांच्या इंग्रजी विषयाबद्दल  सर्व समस्या दूर करायला फार आवडतात.

मी घरामध्ये ही सर्वांना इंग्रजी भाषा मध्येच बोलत असतो त्यामुळे आई-बाबा नाही माझ्यामुळे इंग्रजी भाषा बोलायला येत आहे.  तसेच आमच्या शेजारी लहान मुलांचे इंग्रजी इतिहास मी घेत असतो. त्यामुळे आता पासूनच मला इंग्रजी विषयाचा शिक्षक असल्याचे वृत्ती निर्माण होत आहे. इंग्रजी विषयाचे उत्तम ज्ञान घेऊन मी इंग्रजी विषयाचा उत्कृष्ट शिक्षक होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल.

इंग्रजी विषयाबद्दल माझी आवड पाहून आई-बाबांनी मला इंग्रजी विषयाचे उत्कृष्ट क्लास लावले आहेत.  ज्यामुळे मी इंग्रजी विषयाचे आणखी ज्ञान प्राप्त करू शकतो. आणि मोठे होऊन माझे इंग्रजी विषयाचे शिक्षक होण्याचे स्वप्न पूर्ण करू शकतो.

तर मित्रांनो ! ” माझा आवडता विषय‌ इंग्रजी मराठी निबंध | Maza Avadta Vishay English Nibandh  “ वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना आवाज शेअर करा.


ये निबंध देखील अवश्य वाचा :-

धन्यवाद मित्रांनो !

Leave a Comment