मी झाड झालो तर निबंध मराठी | Mi Zad Zalo Tar Marathi Nibandh

मी झाड झालो तर निबंध मराठी | Mi Zad Zalo Tar Marathi Nibandh

नमस्कार मित्रांनो ! आपले मराठी मित्र या वेबसाईटवर खूप खूप स्वागत आहे. या वेबसाईटवर तुम्हाला विविध माहिती आणि निबंध वाचायला मिळेल.

आजच्या पोस्टमध्ये आम्ही ” मी झाड झालो तर निबंध मराठी | Mi Zad Zalo Tar Marathi Nibandh “ घेवून आलोत.

आम्हाला खात्री आहे की या वेबसाईट वरील सर्व इन्फॉर्मेशन वाचून आपणास नक्कीच आनंद मिळेल.

मी झाड झालो तर निबंध मराठी | Mi Zad Zalo Tar Marathi Nibandh

मित्रांनो ! निसर्गाने आपल्याला अनेक महत्त्वपूर्ण गोष्टी दिलेल्या आहेत. ज्या आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वापरतो. निसर्गाने दिलेल्या सर्व अनमोल गोष्टींपैकी एक महत्त्वपूर्ण आणि आपल्यासाठी जीवन आवश्यक असलेली गोष्ट म्हणजे झाड.

पृथ्वीवर गुण्यागोविंदाने राहत असलेले सर्व सजीव जीवन या झाडांवर मुळेच संभव आहे. आजच्या ह्या लेखात मी झाड झालो तर मराठी निबंध देण्यात आलेला आहे. झाड झाल्यानंतर माझे विचार आणि प्रतिक्रिया कशी असेल त्याबद्दल वर्णन करण्यात आलेले आहे.

झाडे आपल्याला विविध गोष्टी देतात.‌ जसे की फळे-फुले, लाकूड, औषधी आणि इतर काही गोष्टी. झाडापासून मिळणाऱ्या सर्व गोष्टींपैकी महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे प्राणवायू म्हणजेच ऑक्सिजन होय.

ऑक्सीजन देण्यासाठी झाडेझुडपे अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतात. ऑक्सीजन शिवाय या पृथ्वीवर जीवन जगणे अशक्य आहे. तसेच वातावरणाला शुद्ध करण्यासाठी झाडे महत्त्वाची भूमिका बजावतात.

वातावरणातील कार्बन डाय ऑक्साईड शोषून घेऊन त्यापासून शुद्ध ऑक्सिजन सोडतात. झाडे फक्त मनुष्यासाठी नव्हे तर या सजीव सृष्टीतील संपूर्ण प्राणी आणि पक्षांसाठी सुद्धा महत्त्वपूर्ण ठरतात.

कडकडत्या उन्हाळ्यात जेव्हा मनुष्याला सावलीची गरज असतो तेव्हा झाडे थंड वारा आणि छाया देतात. अशाप्रकारे सर्व दृष्टीने फायद्याचे ठरणारे झाडे असतात. त्यामुळे मी झाड झालो तर मला मी झाड असल्याचा खूप अभिमान वाटेल.

मनुष्य जातीवर झाडांचे फार उपकार आहेत. जारी मी झाड राहिलो असतो तर मला याचा खूप अभिमान झाला असता आणि माझ्यातील प्रत्येक भागाचा उपयोग दुसऱ्यांच्या कामी येण्याची सौभाग्य प्राप्त झाले असते.

जर मी झाड असतो तर मला येणारे फळे आणि फुले लोकांच्या कामाला आले असते. कोणाला भूक लागल्यास त्यांनी माझी फळे तोडून स्वतःची भूक भागवली असते. तसेच माझ्या लाकडांचा उपयोग लोकांनी घरामध्ये फर्निचर बनविण्यासाठी केला असता. तसेच काही लोकांनी माझ्या लाकडांचा उपयोग करून अन्न शिजवले असते. मी लोकांच्या संपूर्ण दृष्ट्या मदतीला येतो हे पाहून मला खूप आनंद झाला असता.

जर मी झाड असतो तर, हे पाहून खूप आनंद झाला असता कि निरनिराळे आणि रंगीबिरंगी पक्षी माझ्यावरती आपले घरटे बांधून राहतात. तसेच काही पक्षी आपल्या घरट्यामध्ये लहान लहान पिलांना जन्म देतात. माझ्या फळांपासून आपल्या पिलांची भूक भागवतात.

मी विविध पक्षी प्राणी आणि मनुष्य ना माझी फळे आणि फुले दिली असती. माझ्यावर फुलणाऱ्या सुंदर फुलांनी तुमच्या बागेची शोभा आणखीन वाढली असती. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये थकलेल्या किंवा वारा साठी आतुरलेल्या लोकांना माझा थंड वार्‍याने तृप्त केले असते. कामावरून थकून आलेल्या लोकांना उन्हामध्ये माझ्या झाडाखाली बसून विसावा मिळाला असता.

याशिवाय आज आपल्या पृथ्वीवर विविध प्रकारचे संकट पाहायला मिळतात जसे की प्रदूषण, जागतिक तापमान वाढ, विविध रोग आणि महामारी. अशा रोगांपासून बचाव करण्यासाठी किंवा या संकटांपासून मुक्त होण्यासाठी मी लोकांच्या कामी आलो असतो.

अलीकडे अनेक शास्त्रज्ञांनी सुद्धा पर्यावरणाच्या बाबतीत जागृती निर्माण करण्याचे कार्य सुरू केले आहे. मी झाड झालो तर माझ्या पूर्ण शक्तीने पर्यावरणाचे संतुलन राखण्याचा प्रयत्न केला असता.

मी झाड झालो तर मला मनुष्याचे मदत करण्याचा आत्ता दीप आनंद होईल त्यासोबत भीती सुद्धा असेल. कारण अलीकडे मनुष्य स्वतःच्या स्वार्थासाठी वृक्षतोड करत आहे. त्यामुळे मला सतत भीती राहिली असते की कोणी मला तोडून तर टाकणार नाही?

कारण आज आपल्या देशामध्ये आणि पृथ्वीच्या विविध भागांमध्ये वाढते औद्योगिकरण आणि वाढती लोकसंख्या या कारणांमुळे मोठ्या प्रमाणात वृक्षतोड आणि जंगलतोड करण्यात येत आहे.

मी झाड झालो तर माझी‌ सर्व मनुष्यांना एकच प्रार्थना राहील की, मनुष्याने मला कापायला नको. कारण मी मनुष्यासाठी खूप काळजाचा ठेवतो मनुष्याला जेवण आवश्यक असलेला प्राणवायू माझ्यापासून प्राप्त होतो.

तसेच माझ्या शरीराचे विविध दहा मनुष्याच्या विविध कामासाठी फायद्याचे ठरतात. थोडक्यात मी मनुष्याच्या अन्न, वस्त्र, निवारा या तीनही गरजा पूर्ण करतो. त्यामुळे मला नष्ट करण्यामागे कुठल्याही शहाणपणा नाही. मी जोपर्यंत जिवंत राहील तोपर्यंत मनुष्यासाठी चांगल्या पर्यावरणासाठी कार्य करत राहील.

अशाप्रकारे मी झाड झालो तर संपूर्ण पृथ्वीचे रक्षण करीत वातावरण स्वच्छ करण्यासोबतच मी मनुष्याला अनेक जीवनावश्यक गोष्टीसुद्धा मोफत उपलब्ध करून देईल. म्हणून मी झाड झालो तर या प्रकारे सर्वांची मनोभावाने सेवा करीन आणि आतून मला आनंद सुद्धा प्राप्त होईल.

तर मित्रांनो ! ” मी झाड झालो तर निबंध मराठी | Mi Zad Zalo Tar Marathi Nibandh “ वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना आवश्य शेअर करा.

या निबंधा मध्ये आमच्याकडून काही पॉईंट राहिले असतील तर कमेंट करून नक्की कळवा.


ये निबंध देखील अवश्य वाचा :-

धन्यवाद मित्रांनो !

1 thought on “मी झाड झालो तर निबंध मराठी | Mi Zad Zalo Tar Marathi Nibandh”

Leave a Comment