मातृप्रेम वर मराठी निबंध । Matruprem Essay in Marathi

मातृप्रेम वर मराठी निबंध । Matruprem Essay in Marathi

नमस्कार मित्रांनो ! आपले मराठी मित्र या वेबसाईटवर खूप खूप स्वागत आहे, या वेबसाईटवर तुम्हाला विविध माहिती वाचायला मिळेल .

आजच्या पोस्टमध्ये आम्ही ” मातृप्रेम वर मराठी निबंध । Matruprem Essay in Marathi “ घेवून आलोत.

आम्हाला खात्री आहे या वेबसाईटवर सर्व निबंध वाचून आपणास नक्कीच आनंद मिळेल.

मातृप्रेम वर मराठी निबंध । Matruprem Essay in Marathi

आई या शब्दांमध्ये संपूर्ण जग दडले आहे. असे म्हणतात की, देव पृथ्वीवर येऊन सर्वांची सेवा आणि प्रेम न करू शकल्याने देवाने आई रुपी व्यक्ती प्रत्येकाच्या जीवनामध्ये पाठवली.

आईची किंवा माता हा शब्द उच्चारताच डोळ्यासमोर दिव्या आसी मूर्ती उभरते. तुझ्या मायेचा आणि ममतेचा अंत नाही. आईचे प्रेम अथांग सागरा एवढे असते ते कधीही न संपणारे. आईच्या मांडीवरर बसण्याचा आनंद हा त्रीलोक के राजाचे सिंहासनावर बसण्या पेक्षा मोठा असतो.

त्यामुळेच म्हणतात ना, ” स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी “. मातृ प्रेम हे कधीही न संपणारे प्रेम आहे.

आईचे प्रेम हे स्वाभाविक आहे प्रत्येक आई आपल्या मुलावर प्रेम करत असते. आईचे प्रेम हे फक्त मनुष्यामध्ये नसून या सुट्टीवर असलेल्या सजीवांमध्ये पाहायला मिळते.

मातृप्रेमाचे बरीच उदाहरणे आपल्या आसपास पाहायला मिळतात. मनुष्य प्राण्याप्रमाणे‌ पक्षी, प्राणी सुद्धा आपल्या मुलांवर तितकेच प्रेम करतात. माकडीन आपल्या पिल्लाला नेहमी आपल्या पोटाशी धरून ठेवते हे त्या माकडांच्या मातृप्रेम आहे.

त्या प्रमाणे मांजर आपल्या बाळाला तोंडात घेऊन सुरक्षित ठिकाणी जाते परंतु ती आपल्या दातांची एकूण पिल्लांना लागू देत नाही. तर कांगारू हा प्राणी आपल्या पिलांना नेहमी आपल्या पोटाशी असलेल्या पिशवीमध्ये ठेवतात.

चिमणी पक्षी स्वतः उपाशी राहून आपल्या पिल्लांना भरीवते. इतकेच नव्हे तर या सृष्टीवर असलेला प्रत्येक व्यक्ती आपापल्या मुलांचे रक्षण करून आपली मातृप्रेम दाखवत असतात. आई आपल्या मुलांचे रक्षण करण्यासाठी आपले प्राण सुद्धा बलिदान करण्यासाठी डगमगत नाही. त्यामुळे मातृप्रेम या अतुलनीय आहे या प्रेमाची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही.

मातृप्रेमाचे तुलनेमध्ये या जगामध्ये असलेले सर्व नाते आणि प्रेम शुल्लक दर्जाचे आहे. आपल्या मुलाच्या चेहऱ्यावरील स्मित हास्य पाहून आईला स्वर्गीय आनंदाचा लाभ होतो.

आपल्या मुलाच्या प्रत्येक गोष्टीतून आईला आनंद मिळतो. जेव्हा मूल रडते, ओरडते किंवा आडखते आणि जमिनीवर पडते तेव्हा आई त्याला प्रेमाने उचलते आणि जवळ घेऊन त्याच्या डोक्यावरून हात फिरवते. प्रत्येक गोष्टीतून आई आपल्या मुलांना मातृ प्रेम देत असते.

आईचे मूल हे जरी निरुपयोगी, कुरूप, मूर्ख, निर्विकार किंवा आहारी गेलेले असले तरीही आईला त्या मुलाबद्दल तितकेच प्रेम असते. आईच्या प्रमाणे एखादा सुंदर सद्गुणी मुलांचे पालन पोषण करते त्याप्रमाणे ती कुरूप आणि वाईट गुनान च्या मुलांच्या देखील पालन करीत असते. आईची प्रेमी कोणामध्ये विभागलेले नसते आपल्या सर्व मुलांना सारखेच प्रेम करते. आई आपल्या मुलाची काळजी घेत असते, यातून आईच्या मातृप्रेम कळून येते.

आईची प्रेम हे सर्व प्रेमापेक्षा आपार आणि पवित्र असते. आईच्या प्रेमाचे तुलना कोणाच्याही प्रेमाशी करता येणार नाही. वडिलांचे प्रेम बहुधा बदल्यात काहीतरी मिळेल अशी आशा ठेवून असते. वडील आपल्या मुलांचे पालनपोषण करतात त्यांना शिकवतात.

जेणेकरून त्यांचे मूल म्हातारपणात त्यांचा आणि त्यांच्या घराचा सांभाळ करेल. परंतु मातृ प्रेम हे निस्वार्थी असते. मातृ प्रेम हे केवळ प्रेमच असते आईला आपल्या प्रेमाबद्दल कुठल्याही गोष्टीची अपेक्षा नसते. आई ही ममतेची खरी  मूर्ती असते.

आईच्या निस्वार्थ आणि नैसर्गिक प्रेमामुळे मुलांवर याचा चांगला वाईट होऊ शकतो. आईचे प्रेम हे मुलांना चांगला मार्गाला जाण्यासाठीचा प्रोत्साहित करते तर काहीवेळा वाईट मार्गाला जाण्यासाठीही कारणीभूत ठरते. परंतु कुठल्याही आईला असे वाटत असते की आपला मुलगा वाईट मार्गाला जावो.

वाईट आणि चांगला मार्ग निवडणे हे त्या मुलांवर अवलंबून असते. आई फक्त आपल्या मुलांना मातृप्रेम देत असते. काही वेळा आईची आपुलकी ही मुलांना चांगले व्यक्तिमत्व बनवण्यासाठी फायदेशीर ठरते.

आई जिजाऊंनी शिवाजी महाराजांना कठोर शिक्षण दिले नसते तर आज शिवाजी महाराजांसारखे महान पुरुष आपल्या इतिहासात पहायला मिळाले नसते. महात्मा गांधी यांना महात्मा पर्यंत घेऊन जाणार्या यांच्या आई पुतळाबाईच होत्या. तसेच साने गुरुजी यांच्या मागे त्यांच्या आईचे होत्या. अनेक पुरुषांना महान बनविण्यामागे सर्वात मोठा वाटा हा त्यांच्या आईचा आहे.

खरंच! वात्सल्याची मूर्ती असलेल्या आईने आपल्या मुलांना एक रत्नाचा आकार देऊन त्यांचे व्यक्तिमत्त्व साकारले आहे. त्यामुळे मातृप्रेम हे अपार आहेत याची तुलना कोणाशीही होणार नाही आणि मातृप्रेम मांडण्यासाठी शब्द अपुरे पडतील.

पुत्र कुपुत्र होऊ शकतो, परंतु माता कधीही कुमाता होऊ शकत नाही. खरंच!  वात्सल्याची मूर्ती असलेल्या या मातेचे मातृप्रेम हे शब्दात व्यक्त करता येणार नाही.

तर मित्रांनो ! ” मातृप्रेम वर मराठी निबंध । Matruprem Essay in Marathi “ वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना आवश्य शेअर करा.


ये निबंध देखील अवश्य वाचा :-

धन्यवाद मित्रांनो !

Leave a Comment