माझा भारत देश महान निबंध मराठी | Maza Bharat Desh Mahan Nibandh In Marathi

माझा भारत देश महान निबंध मराठी | Maza Bharat Desh Mahan Nibandh In Marathi

भारतीय नागरिक असल्याचा मला अभिमान आहे. मी ज्या देशांमध्ये राहतो त्या देशाचे नाव भारत देश असे आहे. माझा देश आहे मला खूप आवडतो. त्यामुळे माझ्या मते माझा भारत देश महान आहे. माझा भारत देश जगातील सर्व देश आणि पैकी सर्वात मोठे लोकशाही राज्य आहे.

माझ्या भारत देशाचा इतिहास हा खूप मोठा प्राचीन आणि सांस्कृतिक वारसा चे नेम जोपासलेला आहे. प्राचीन भारतीय संस्कृति ही माझ्या भारत देशाला लाभलेली सर्वात मोठी देणगी आहे. हजारो तेजस्वी परंपरा माझ्या भारताला लाभली आहे.

माझा भारत देश महान निबंध मराठी | Maza Bharat Desh Mahan Nibandh In Marathi

भारतात राहणारे विविध जातीचे धर्माचे लोक आणि भारताच्या प्रत्येक राज्याची विशेष अशी बोलली जाणारी भाषा हे माझ्या भारत देशाचे वैशिष्ट्य आहे. भारतामध्ये बोलल्या जाणाऱ्या सर्व भाषा साहित्य आणि समृद्ध आहेत.

हिंदी भाषा ही माझ्या भारत देशाची राष्ट्रभाषा आहे तर सत्यमेव जयते हे भारताचे ब्रीदवाक्य आहे. जनगणमन हे भारताचे राष्ट्रीय गीत आहे. विश्वविजयी असा तिरंगा माझ्या भारताचा राष्ट्रध्वज आहे.

संपूर्ण विश्वाला शांतीचा संदेश देणारे अशोकचक्र ही भारताची अस्मिता आहे. रुपया हे भारताचे चलन आहे. कमळ हे माझ्या भारताचे राष्ट्रीय फूल आहे तर वाघ हा माझ्या भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे.

135 करोड लोकसंख्या असलेला लोकसंख्येच्या दृष्टीने दुसऱ्या क्रमांकाचा माझा भारत देशामध्ये विविध जातीचे, पंथाचे आणि धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. विविधत जाती-धर्म याचा रितीरिवाज आणि सांस्कृतिक आविष्कार अशी भिन्नता लाभलेली आहे. या मुळेच माझ्या भारत देशाला विविधता मध्ये एकता असणारा देश म्हणून देखील ओळखले जाते.

भारत देशाच्या प्रमाणे विविध जाती धर्माचे लोक लाभले आहेत त्याप्रमाणे ऋतूनुसार बदलणारे वातावरण देखील लाभले आहे. मोसमी वाऱ्यांची वरदान, गंगा, यमुना, कृष्णा, गोदावरी अशा पवित्र नद्या, हिमालय सारखा पर्वत, काश्मीर- महाबळेश्वर सारखी निसर्गाची सुंदर देण तिचा धार्मिक ठिकाणे यांसारख्या पवित्र अशा मातृभूमेने माझ्या भारत देशाला आणखीनच महान बनवले आहे.

दीडशे वर्षे ब्रिटिशांच्या राजवटीखाली गुलाम करणारा माझा भारत देश आज जगामधील विकसनशील देशाच्या यादीमध्ये सामाविष्ट झाला आहे. जसा काळ बदलत गेला तसा माझा भारत देशाचे रूप देखील बदलत गेले.

माझ्या भारत देशाला स्वातंत्र्य देण्यासाठी कित्येक महान क्रांतिकारी आणि पुरुषाने आपल्या प्राणांची आहुती दिली. छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक महान पुरुषांच्या आणि स्त्रियांच्या बलिदानाच्या रक्ताने माझ्या भारत देशाला महान बनविले आहे.

स्वतः च्या प्राणाचा त्याग करून माझ्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी कित्येक महान धडपडले अखेर माझ्या भारत देशाला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले. माझा भारत देश स्वतंत्र झाला. त्यानंतर 26 जानेवारी 1950 रोजी माझा भारत देश प्रजासत्ताक झाला व माझा भारत देशात संविधान लागू झाले.

तसेच माझ्या भारत भूमी मध्ये अनेक रत्नांनी जन्म घेतला. सम्राट अशोक, गौतम बुद्ध, महावीर अशा अनेक रत्नांनी माझा भारत भूमीला पावन केले. दया, क्षमा, शांतता, समाज प्रबोधन घडवणाऱ्या संतांचा वारसा माझ्या भारत देशाला लाभला. अशा या माझ्या पावन आणि विविधतेने नटलेल्या भारतावर जेव्हा परराष्ट्रीय देशाने आक्रमण केले तेव्हा माझ्या भारतातील सर्व जनता त्यांना तोंड देण्यासाठी एकत्रितपणे उभा राहिले.

आजच्या आधुनिक  भारताने तर सर्व क्षेत्रांमध्ये आपली कामगिरी दाखवली आहेत खेळापासून ते चित्रपट सृष्टी पर्यंत माझा भारत देश  अव्वल दर्जावर आहे. माझ्या भारत देशाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे माझा भारत देश कृषिप्रधान देश आहे. माझा भारत देशातील बहुतांश जनता हे शेतीवर अवलंबून आहे.

स्वतः च्या कर्तब बाजीवर माझ्या भारत देशातील लोकांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये आपली कामगिरी बजावली आहे. आज माझ्या भारत देशामध्ये विविध उद्योगधंदे कंपन्या व्यवसायात अस्तित्वाला आले आहेत.

एवढेच नसून सेवा आणि शिक्षण क्षेत्राने तर माझा भारतामध्ये खूप प्रगती केलेली आहे. आज माझ्या भारत देशामध्ये डिजिटल स्वरूपाचे शिक्षण दिले जाते जेणेकरून विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त ज्ञान मिळावे व तरुण पिढीने देशाच्या प्रगतीसाठी काहीतरी नवीन कार्य करून दाखवावे.

अलीकडच्या काही वर्षांपासून माझ्या भारत देशाला स्वच्छ भारत व सुंदर भारत करण्याचा प्रयत्न चालू आहे. तसेच माझ्या भारत देशातील प्रत्येक जनता आत्मनिर्भर आणि स्वावलंबी कसे बनते याकडे लक्ष केंद्रित केले जात आहे.

जगातील अनेक कमजोर देशांना  क्षमता मिळवून देण्यासाठी माझा भारत देश कार्यरत आहे. एक उगवती महासत्ता  म्हणून संपूर्ण जग माझ्या भारताकडे पाहत आहे. म्हणून तर जागतिक प्रश्नाच्या वेळी जगाला भारत देशाचे मत जाणून घ्यावे लागत आहे. त्यामुळे जगाच्या पाठीवर वावरणार्‍या प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये एकच मंत्र घुमत आहे ते म्हणजे माझा भारत महान!

तर मित्रांनो ! ” माझा भारत देश महान निबंध मराठी | Maza Bharat Desh Mahan Nibandh In Marathi “  वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना व शेअर करा.


ये निबंध देखील अवश्य वाचा :-

धन्यवाद मित्रांनो !

Leave a Comment