माझा आवडता सण होळी निबंध इन मराठी | Maza Avadta San Holi Nibandh

माझा आवडता सण होळी निबंध इन मराठी | Maza Avadta San Holi Nibandh

नमस्कार मित्रांनो ! आपले या वेबसाईटवर खूप खूप स्वागत आहे या वेबसाईटवर तुम्हाला विविध निबंध वाचायला मिळतील.

आजच्या पोस्टमध्ये आम्ही ” माझा आवडता सण होळी निबंध इन मराठी | Maza Avadta San Holi Nibandh “ या विषयावर निबंध घेऊन आलोत.

आम्हाला खात्री आहे की, या वेबसाईट वरील सर्व निबंध वाचून आपणास नक्कीच आनंद मिळेल.

माझा आवडता सण होळी निबंध इन मराठी | Maza Avadta San Holi Nibandh

मनातील सर्व राग, द्वेष विसरून पुन्हा एकत्र येऊन आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जाणारा सण म्हणजे होळीचा सन होय. भारतामध्ये वर्षभरात विविध सण साजरे केले जातात. प्रत्येक सणाचे विशिष्ट असे आपले महत्त्व असते. त्याप्रमाणेच होळी हा सणाचे सुद्धा एक विशिष्ट महत्व आहे.

भारतामध्ये साजरा केल्या जाणाऱ्या सर्व सरदारांपैकी माझा आवडता सण म्हणजे होळीचा सण होय. लहानपणापासूनच मला होळीचा सण खूप आवडतो. रंगांमध्ये भिजून एकमेकांना रंग राहणे आणि होळीचा आळंद घेणे हे या सणाचे वैशिष्ट्य आहे.

संपूर्ण भारत देशात होळी हा सण साजरा केला जातो. दरवर्षी आम्ही राहतो त्या परिसरामध्ये देखील होळी हा सण साजरा केला जातो. आमच्या संपूर्ण गावामध्ये एकत्रित एकच होईल केली जाते आणि त्याचा होईल या सर्व जण पूजा करतात. गावातील सर्व लोक मिळून कचरा, झाडाची बारीक लाकडे, सुकलेले गवत, काटक्या आणि गायीच्या शेनापासून केलेल्या गोवऱ्या एकत्रित करून त्यापासून होळी पेटवतात.

होळी हा सण मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने संपूर्ण देशभरात साजरा केला जातो. होळीचा सण सुद्धा हिंदू धर्मामध्ये महत्त्वाचा समजला जातो. प्रत्येक सणामागे काही ना काही धार्मिकता असतात त्याप्रमाणे होली या सणामागे होलिका आणि भक्त प्रल्हाद यांची एक अनोखी कथा आहे.

होळी या सणाला होळी पौर्णिमा किंवा रंगाचा सण म्हणून देखील ओळखले जाते. लहान मुलांसाठी तर हा सण खूप आवडतो कारण होळी सुरू झाल्यापासून संपेपर्यंत लहान मुले खूप आनंदात हा सण साजरा करतात.

देशभरातील प्रत्येक गावात आणि शहरांमध्ये दरवर्षी होळी बनवली जाते. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी होळीची जागा ठरलेली असते. बायका होळीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून होळीचे हळद-कुंकू लावून पूजा करतात व होळीला नारळ सुद्धा फोडतात.

होळी सणाच्या दुसऱ्या दिवशी धुलीवंदन किंवा रंगपंचमी हा सण साजरा केला जातो. होळीच्या दिवशी सगळे एकमेकांना रंग लावून रंगपंचमी साजरी करतात. होळीच्या सणाला रंग लावून म्हणून या सणाला रंगाचा सण म्हणून सुद्धा ओळखले जाते.

त्या दिवशी सर्वजण एकमेकांना रंग लावून हा सण साजरा करतात. काही लोक रंगाने भरलेली पिचकारी घेऊन बाहेर पडतात अशाप्रकारे एकमेकांचे भेदभाव, राग जातिभेद सर्वकाही विसरून सर्वजण एकमेकांच्या रंगांमध्ये रंगून जातात.

होळी सणाचे वातावरण खूप उत्साह दायक असते. एका बाजूला रंग आणि दुसऱ्या बाजूला गुलाब त्यामध्ये भांग सारख्या पी याचे सेवन करून सर्वजण अतिशय उत्साहात आणि आनंदात होळीचा सण साजरा करतात. वयस्कर आणि वृद्ध माणसे सुद्धा होळीचा रंगची मजा घेतात.

आवडता सण होळी असण्यामागचे आणखी एक कारण म्हणजे होळी हा सण एकमेकांमध्ये एकता निर्माण करतो, प्रेम, आनंद आणि उत्साह वाढतो. सर्व लहान-मोठी, भाऊ-बहीण शेजारीपाजारी सर्वांना एकत्रित घेऊन सहकार्याची भावना निर्माण करतो.

परंतु आधुनिक काळाची होली हे आधुनिक काळाप्रमाणे विनाशकारी  बनात चालली आहे. कारण, आजच्या काळामध्ये होळी या सणा साठी वापरले जाणारे  रंगांमध्ये केमिकल्सचा वापर केला जातो त्यामुळे.

त्वचा  वर या रंगांचा परिणाम दिसून येतो. त्यामुळे  होळी हा सण खेळताना कोरड्या रंगांचा वापर करायला हवा. गुलाल ने होळी खेळणे अतिशय योग्य ठरेल. कारण गुलाल मध्ये कोणतीही नकारात्मक गोष्ट नाही.

त्यामुळे सर्वांनी होळीच्या आगी मध्ये मनातील राग, द्वेष सर्व काही विसरून प्रीत आणण्यासाठी होळी हा सण खूप महत्त्वाचा ठरतो. असा हा सर्वांना एकत्र आणणारा आणि सहकार्याची भावना निर्माण करणारा हा माझा आवडता सण होळी आहे.

तर मित्रांनो ! हे निबंध वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना वर शेअर करा.


ये निबंध देखील अवश्य वाचा :-

धन्यवाद मित्रांनो !

Leave a Comment