वृक्ष आपले मित्र मराठी निबंध | Essay On Tree Our Best Friend In Marathi

वृक्ष आपले मित्र मराठी निबंध | Essay On Tree Our Best Friend In Marathi

अस्तित्वात असलेल्या सर्व ग्रहांन पैकी पृथ्वी चा आसा ग्रह आहे जेथे मनुष्यवस्ती पाहायला मिळते. थोडक्यात पृथ्वीच‌ असा एकमेव ग्रह आहे यावर सर्व सजीव सुखाने राहतात यामागचे कारण म्हणजे पृथ्वीवर अस्तित्वात असलेली झाडे होय.

इतर कोणत्याही ग्रहावर मानवी जीवन पाहायला मिळत नाही कारण पृथ्वी सोडून कुठल्या ग्रहावर झाडे पाहायला मिळत नाही आपण आज सुखाय राहतो त्यामागचं कारण म्हणजे झाडेच होय.

म्हणून झाडे आपले मित्र आहेत येवढ्याच नसून आपल्या पर्यावरणाचे संतुलन ठेवण्यासाठी आणि पर्यावरणाला शुद्ध हवा पुरवण्यासाठी झाडे खूप महत्त्वाची भूमिका बजावतात.

वृक्ष आपले मित्र मराठी निबंध | Essay On Tree Our Best Friend In Marathi

पर्यावरणामध्ये विविध प्रकारचे वृक्ष पाहायला मिळतात. जे आपल्या पर्यावरणाचे सुंदरता राखण्यासाठी खूप महत्वाचे ठरतात. इतर प्रकारच्या वृक्षांमुळे आपल्या पर्यावरणाचे सौंदर्य टिकून राहते. म्हणून प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये वृक्षांना खूप महत्त्वाचे स्थान आहे.

वृक्ष हे मानवाचे खरे मित्र असतात. आपल्यासाठी पर्यावरणात अस्तित्वात असलेल्या प्रत्येक वृक्ष कुठल्या ना कुठल्या कार्यासाठी महत्त्वाचे ठरतात. आणि या वृक्षापासून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचा फायदा होतो.

वृक्षांनामुळे मानवाला वेगवेगळ्या गोष्टी प्राप्त होतात. मानवाचे जीवनासाठी आवश्यक असलेला प्राणवायू म्हणजे ऑक्सिजन देण्यासाठी वृक्ष महत्त्वाची भूमिका बजावतात. पृथ्वीवर ह्या वृक्षांचे अस्तित्व आहे म्हणूनच सजीव जीवनन पृथ्वीवर टिकून आहे.

तसेच वृक्ष वातावरणातील हावा शुद्ध बनवितात व वातावरणात स्वच्छ आणि सुंदर बनवण्यासाठी कार्य करीत असतात. तसेच वृक्षा पासून आपल्याला फळे, फुले पाने, भोजन किंवा अन्न आणि इंधन प्राप्त होते.

तसेच वृक्ष हे आपल्या पृथ्वीवरील सर्व सजीवांना जगण्यासाठी आवश्यक असणारा ऑक्सीजन प्राप्त करून देतात. तसेच वातावरणातील सजीवांसाठी हानिकारक असणारा वायू म्हणजेच कार्बन-डाय-ऑक्‍साईड शोषून घेऊन हवेला शुद्ध करतात.

तसेच वृक्षांनापासून मिळालेल्या लाकडांचा उपयोग मानव व आपल्या दैनंदिन जीवनामध्ये करतो. मुख्यता ग्रामीण भागातील लोक वृक्षांच्या लाकडाचा उपयोग इंधन म्हणून करतात. तसेच जगभरातील सर्व घरे बांधण्यासाठी लाकडांचा उपयोग मोठ्या प्रमाणात केला जातो.

मानव वृक्षांच्या लाकडांपासून खिडक्या, दरवाजे, फर्निचर च्या वस्तू, टेबल, खुर्च्या इत्यादी तयार करतो व त्यांचा वापर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये करतो. तसेच वृक्षांपासून उद्योगाचा कच्चामाल तयार केला जातो. वृक्षांच्या पालापाचोळा पासून खत बनविला जातो त.र काही वृक्षांपासून रबर, माचिसच्या काड्यांचा उपयोग केला जातो.

आपल्या अवतीभवती अनेक अशी झाडे आहेत त्यांचा वापर आपण आपल्या जीवन सोयिस्कर काढण्यासाठी करतो म्हणजेच काही वृक्षांपासून पासून औषध निर्मिती केली जाते. तसेच आपल्या वातावरणामध्ये अशा अनेक वृक्ष आहेत त्यांच्यामध्ये विविध या आजारांवर मात करण्याचे गुणधर्म आहेत त्यामुळे बहुतांश वृक्षांचा उपयोग औषधी गुणधर्मासाठी केला जातो.

वृक्षांचा आणखीन एक महत्त्वपूर्ण उपयोग म्हणजे वृक्ष आपली जमीन सुपीक करण्यासाठी महत्त्वाची ठरतात. वृक्षांची मुळे जमिनीवर खोलवर जातात त्यामुळे जमिनीची धूप देखील होण्या पासून बचाव होतो. आज वृक्षां मुळेच आपल्या जमिनीची होणारी धूप टाळत आहे व आपली जमीन सुपीक होऊन जमीनीमध्ये पीक योग्य प्रकारे येत आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने वृक्ष आपले मित्र आहेत.

वृक्षांचा विविध प्रकारे आपला दैनंदिन जीवनात वापर होतो. एवढेच नसून वृक्षांना भारतीय संस्कृतीमध्ये खूप महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे. वृक्ष आणि मनुष्य यांच्यातील अतूट नाते हे खूप पूर्वीच्या काळापासून चालत आलेले आहे. हिंदू धर्मामध्ये तो रुक शांतला देवता समजून वृक्षाची पूजा केली जाते. जसे की, वड, पिंपळ, तुळसी, यांसारख्या वृक्षांना देवाचे स्थान देऊन त्यांची दैनंदिन जीवनामध्ये पूजा केली जाते.

वृक्षाचे महत्त्व सांगावे तितके कमीच आहे. आपल्या निसर्गाला स्वच्छ, सुंदर बनविण्या सोबत एक निसर्ग सौंदर्य प्राप्त करून देण्यासाठी रुक्ष महत्त्वाची भूमिका बजावत असतात. ज्या भागांमध्ये भरपूर वृक्ष आहेत तो भाग हिरवागार दिसतो आणि त्या भागात मध्ये पर्यटक आवडीने जातात. निसर्गाचे हिरवे रूप, एकांतीचे वातावरण हे सर्व काय आपल्याला वृक्षांमुळे प्राप्त झाले ‌.

आपल्याला आजपर्यंत प्रत्येक गोष्टींमध्ये हात देणारे हे मित्राप्रमाणे वृक्षांच्या जीवावर आज मनुष्य उठला आहे. स्वतःच्या सुख, सुविधा पूर्ण करण्याच्या हेतूने आजचा मनुष्य स्वार्थी व आंधळा झाला आहे. मोठमोठे इमारती आणि उद्योगधंदे बांधण्याच्या हेतूने आज बेसुमार वृक्षतोड केली जात आहे.

यामुळे वृक्षांची संख्या कमी होतच आहे त्यासोबत पर्यावरणाचे संतुलन देखील बिघडत आहेत वृक्ष आपला पर्यावरणाचा संतुलन बरोबर ठेवण्यासाठी महत्त्वाची कामगिरी बजावतात. परंतु वृक्षांची संख्या कमी होऊन प्रदूषणाच्या समस्या उद्भवल्या आहेत. तेवढेच नसून जागतिक तापमान वाढ मागे वृक्षतोड हेच कारण आहे.

आणि अलीकडे बदलत चाललेले ऋतुचक्र आणि पावसाचे कमी प्रमाण हे देखील वृक्षतोडीचे परिणाम आहेत. वृक्षांच्या कमतरते मुळे आपले पर्यावरण खराब होतच आहे त्यासोबत वृक्षांवर अवलंबून असणारे प्राणी व पक्षी यांचे निवासस्थान देखील संपुष्टात येत आहे.

मोठा मोठी‌जंगले नष्ट करून त्या भागात इमारती किंवा उद्योगधंदे टाकल्याने त्या भागात राहणारे प्राणी आणि पक्षी हे रस्त्यावर आले आहेत यामुळे त्यांची संख्या कमी झाली आहे व या सर्वांचा परिणाम आपल्या पर्यावरण साखळीवर होत आहे.

काय सांगायचे एवढेच की, वृक्ष आपले मित्र आहेत त्यामुळे आपण वृक्षतोड याकडे लक्ष केंद्रित केले आहे आपण वृक्ष वाचवले पाहिजे. यासाठी आपल्या परिसरामध्ये झाडे लावा झाडे जगवा असे उपक्रम राबवले पाहिजेत.

जर आपल्या आसपास वृक्षांची संख्या मोठ्या प्रमाणात असेल तर आपले स्वास्थ्य देखील निरोगी असेल त्यामुळे आपल्या सर्व सजीवांसाठी वृक्ष खूप महत्वाचे आहेत हे लक्षात ठेवून वृक्षतोड कमी करून त्याचे संगोपन व संवर्धन करणे ही काळाची गरज आहे.

तर मित्रांनो ! ” वृक्ष आपले मित्र मराठी निबंध | Essay On Tree Our Best Friend In Marathi “ वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.


ये निबंध देखील अवश्य वाचा :-

धन्यवाद मित्रांनो !

Leave a Comment