भारत माझा देश आहे निबंध । Bharat Maza Desh Aahe Marathi Nibandh

भारत माझा देश आहे निबंध । Bharat Maza Desh Aahe Marathi Nibandh

नमस्कार मित्रांनो ! आपले मराठी निबंध या वेबसाईटवर खूप खूप स्वागत आह. या वेबसाईटवर तुम्हाला विविध निबंध वाचायला मिळतो.

आजच्या पोस्ट मध्ये आम्ही ” भारत माझा देश आहे निबंध । Bharat Maza Desh Aahe Marathi Nibandh “  घेऊन आलोय.

आम्हाला खात्री आहे या वेबसाईट वरील सर्व निबंध वाचून आपणास नक्कीच आनंद मिळेल.

भारत माझा देश आहे निबंध । Bharat Maza Desh Aahe Marathi Nibandh

संपूर्ण जगात संस्कृतीने आणि विविधतेने नटलेला देश म्हणून अजरामर असलेला ,माझा देश म्हणजेच ” भारत देश.” भारत हा माझा देश आहे. माझा देश हा सर्व देशांमध्ये प्राचीन आणि महान देश आहे.

मी माझ्या देशाचा एक जागरूक नागरिक आहे. माझ्या देशाची ख्याती ही संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे. म्हणून माझ्या देशाला संस्कृतीने नटलेला देश म्हणून ओळखला जाते.

संपूर्ण विश्वामध्ये माझ्या भारत देशाचा वा क्रमांक लागतो तर लोकसंख्येच्या दृष्टीने माझा भारत देशाचा दुसरा क्रमांक लागतो. असलेल्या आपल्या भारत देशात आणि जातीचे धर्माचे लोक मिळून राहतात. माझ्या भारत विविधतेत एकता म्हणून ओळखला जातो.

संपूर्ण जगाला अन्न पुरवणारा अन्नदाता म्हणजे शेतकऱ्याचे वास्तव्य माझ्या देशात पाहायला मिळते. माझा देश आहे संपूर्ण दृष्टीने परिपूर्ण आहे आणि एक विकसनशील देश म्हणून जगाच्या यादीत माझ्या देशाचे नाव आहे. माझ्या देशातील मातीची महानता सुद्धा खूप वेगळी आहे. माझ्या देशातील प्रत्येक नागरिक देशाच्या मातीला ” धरतीमाता “ म्हणतो.

 माझ्या देशाची विविध नावे :

माझ्या देशाला ” भारत “ जरी म्हणत असलो ,तरी माझ्या भारत देशाला अनेक नावाने ओळखले जाते. पूर्वी माझ्या देशाचे नाव हिंदुस्तान होते.

सोबतच माझ्या देशाला इंडिया, हिंदुस्तान , आर्य व्रत, भारत ,सोने की चिडिया इत्यादी नावांनी संपूर्ण जगभरात ओळखले जाते. म्हणतात की माझ्या देशाला भारत हे नाव भरत राजाच्या नावावरून पडले आहे,

जगाच्या उंबरठ्यावर ताठपणे उभा असलेला माझा भारत देश आहे विविध नावाने माझ्या देशाला ओळखत असल्या तरी माझ्या देशाचा प्राचीन इतिहास संपूर्ण जगाला प्रेरणा देणार आहे.

 माझ्या देशातील धर्म आणि भाषा :

भारत देश विविधतेने नटलेला देश आहे माझे भारत देशात विविध जातीचे आणि धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. माझ्या देशात 29 राज्य आहेत आणि प्रत्येक राज्याची भाषा आणि वेशभूषाही वेगवेगळे आहे.

माझ्या देशात ख्रिश्चन जैन बुद्ध फारसे अशा विविध धर्माचे लोक एकत्र राहतात. इथे प्रत्येक धर्माची भाषा ही वेगवेगळे आहे येथील लोक मराठी हिंदी गुजराती कन्नड तेलुगू उर्दू अशा विविध भाषा बोलतात.

माझा भारत देश धर्मनिरपेक्ष देश आहे, तसेच माझ्या देशात सर्व धर्म समानता सुद्धा आहे म्हणूनच माझ्या देशात सर्व जातीचे व धर्माचे लोक एकत्र येऊन नांदतात.

 माझ्या देशाचे सभ्यता आणि संस्कृती :

माझ्या भारत देशाची संस्कृती ही वेगवेगळी आहे ज्यामध्ये भारताचा इतिहास,भूगोल आणि सिंधु घाटी ची सभ्यता च्या दरम्यान बनली आणि पुढे जाऊन वैदिक युगात विकसित झाली.

भारतीय संस्कृती ही कर्म प्रधान संस्कृती आहे मोहंजोदडो च्या खुदाई नंतर ही मिश्र, मेसोपोटेमिया ची सर्वात जुनी सभ्यता मध्ये समाविष्ट केली आहे.

माझ्या भारत देशाची हडप्पा आणि सिंधू संस्कृती ही चार हजार वर्षापेक्षा जास्त जुनी आहे. माझ्या देशात राहणारा प्रत्येक नागरिक आमच्या भारतीय संस्कृतीवर गर्व करतो ,आणि देशातील परंपरेचे पालन करतो.

सर्वांगीनता , विशालता ,उदारता, प्रेम आणि सहिष्णुता च्या दृष्टीने अन्य संस्कृतीपेक्षा भारतीय संस्कृती महत्त्वाचे स्थान मिळते. म्हणून माझा देश संस्कृती आणि सभ्यता च्या बाबतीत संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे.

 माझ्या देशातील ऐतिहासिक स्थळे :

माझा भारत देश संस्कृती आणि सभ्यता साठी प्रसिद्ध तर आहेच , सोबतच माझ्या देशातील ऐतिहासिक स्थळे सुद्धा संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहेत. त्यामुळे दरवर्षी लाखोंच्या संख्येने पर्यटक भारतात ऐतिहासिक स्थळे बघण्यासाठी येत असतात.

माझा भारत देश हा एकमेव असा देश आहे.जिथे लाल किल्ला, वेरूळच्या लेण्या,कश्मीर सारखा स्वर्ग, सुवर्ण मंदिर, राजवाड्यांचे शहर मैसूर यांसारखी ऐतिहासिक आणि पर्यटक स्थळे स्थिर आहेत. तसेच जगातील सात आश्चर्यापैकी एक असणारे ताजमहल हे भारतातील आग्रा या शहरांमध्ये स्थिर आहे.

तसेच माझ्या भारत देशात अन्य पर्वतांचा व शिखरांचा खजिना सुद्धा आहे. हिमाचल पर्वता सारखा सर्वात मोठा पर्वत भारत देशातच आहे. त्यामुळे लाखोच्या संख्येने पर्यटक येथे भेट देण्यासाठी येतात.

भारतामध्ये ऐतिहासिक आणि पर्यटन स्थळ सोबतच काही धार्मिक स्थळ सुद्धा आहेत. त्यामध्ये प्रसिद्ध असणारे म्हणजे अमृतसरचे सुवर्णमंदिर, तिरुपतीचे बालाजी मंदिर, कोल्हापूरचे महालक्ष्मी चे मंदिर, तुळजापूरचे भवानी मातेचे मंदिर, शिर्डीचे साईबाबा मंदिर, पंढरपूरचे विठोबा मंदिर अशी अनेक धार्मिक स्थळे आहेत ज्या ठिकाणी भाविक श्रद्धेने आणि भक्तीने भेट देतात.

 भारत देशातील महान पुरुष :

माझ्या भारत देशाच्या मातीमध्ये अनेक थोर महान पुरुषांच्या जन्म झाला.

छत्रपती शिवाजी महाराजांसारखे वीर पुरुष माझ्या देत होऊन गेले, त्यासोबतच दलितांसाठी लढणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्त्री शिक्षणासाठी आपले संपूर्ण जीवन खर्ची करणारे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले, स्वतंत्र भारताच्या चळवळीचे नेतृत्व करणारे व राष्ट्रपिता म्हणून ओळखणार एक महात्मा गांधी, भारत स्वातंत्र्यासाठी लढा देणारे बाळ गंगाधर टिळक, सुभाष चंद्र बोस, चाचा नेहरू असे कितीतरी महान पुरुष भारत मातेच्या मातीमध्ये जन्माला येऊन गेले.

याच महान पुरुषाने भारतमातेसाठी आपल्या प्राणाची आहुती सुद्धा दिली.

आजही आपण या महान पुरुषांच्या जन्मतिथी पुण्यतिथी आणि जयंती मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा करतो. त्यांनी दिलेल्या बलिदानाचा विचार करून आज ही त्यांच्या कीर्ती चे गुण गातो, अशा महान पुरुषांनी भारत भूमीवर जन्म घेऊन, भारत मातेला अजूनही महान आणि पवित्र बनविला आहे.

 भारत देशाला स्वातंत्र्य :

माझ्या भारत देशाला स्वातंत्र्य देण्यासाठी अनेक क्रांतिवीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. आपल्या भारत देशाची इंग्रजांच्या हातून सुटका व्हावी म्हणून ,अनेक महान पुरुष या भारत भूमीवर जन्माला आले.

जसे की भगतसिंग ,राजगुरू, सुखदेव ,चंद्रशेखर आझाद, राणी लक्ष्मीबाई या सर्व महान क्रांतिवीरांनी ब्रिटिश सरकार पासून आपल्या देशाची सुटका व्हावी यासाठी इंग्रजांविरुद्ध लढा दिला.

शेवटी सर्वांच्या बलिदानानंतर अखेर तो दिवस उजाडला, 15 ऑगस्ट 1947 रोजी माझ्या भारत देशात सुवर्ण किरण आली. म्हणजेच या दिवशी माझ्या भारत देशाला स्वतंत्रता मिळाली व माझा देश इंग्रजाच्या ताब्यातून सुटका मिळाली व माझा देश स्वतंत्र झाला.

अखेर ब्रिटिश सरकारच्या गुलामगिरीतून आपल्याला मुक्तता मिळाली. ब्रिटिशांविरुद्ध दिलेल्या लढ्यानंतर संपूर्ण भारत देशात विविध यांमध्ये एकता ही संकल्पना उदयास आली. आणि या स्वतंत्र सोबतच भारताने आपले लोकशाही पद्धतीने राज्यकारभार सुरू केला. आज माझा भारत देशा सर्व देशांम एक विकसनशील देश म्हणून ओळखला जातो.

 भारतातील सण उत्सव :

माझ्या भारत देशात अनेक जाती धर्माचे लोक राहतात त्या प्रमाणात या देशात अनेक वेगवेगळ्या प्रकारचे सण साजरे केले जातात. हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण म्हणजे “दिवाळी.”

भारतामध्ये दिवाळी हा सण खूप उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जातो. दिवाळी सण संपूर्ण देशाला उज्वल करून जातो. फटाके आणि दिवाळीचा हा सण. नऊ दिवस नऊ वेगवेगळ्या देवींचे दर्शन घडवणारा नवरात्र हा सण खानदेशातील एक सध्याचा आणि भक्तीचा सोंग समजला जातो.

वाईटावर विजय मिळवून देणारा दसरा हा सण खूप मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.

सर्वांच्या मनातील राग द्वेष विसरून एकमेकांच्या सहवासात आणि एकमेकांच्या जीवनात आनंदाचे उधळणारा सण म्हणजे होळी, नव्या वर्षाचे स्वागत करणारा सण म्हणजे गुढीपाडवा. आनंद ,उत्साह आणि श्रद्धेचा सण म्हणजे गणपती उत्सव. महाशिवरात्रि रंगपंचमी

बैल पोळा असे वेगवेगळे सण वर्षभरात माझ्या देशात साजरी केले जातात.

 संतांची भूमी आणि विद्वानांची खाण :

माझा भारत दिलेल्या पावन भूमी मध्ये अनेक महान संत होऊन गेले. जसे कि ,संत तुकाराम, संत नामदेव, संत ज्ञानेश्वर या संतांनी आपल्या भजन आणि कीर्तनातून समाज क्रांती घडविण्यासाठी प्रयत्न केले. तसेच एपीजे अब्दुल कलाम सारखे महान विद्वान माझ्या देशात होऊन गेले.

तर मित्रांनो ! ” भारत माझा देश आहे निबंध । Bharat Maza Desh Aahe Marathi Nibandh ” वाचून आपणास आवडला असेल तर ,तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.

” भारत माझा देश आहे निबंध । Bharat Maza Desh Aahe Marathi Nibandh “ यामध्ये आमच्याकडून काही पॉईंट्स राहिले असतील तर, कमेंट करून नक्की कळवा.


ये निबंध देखील अवश्य वाचा :-

धन्यवाद मित्रांनो !

Leave a Comment