मी शेतकरी झालो तर निबंध मराठी । Mi Shetkari Zalo Tar Marathi Nibandh

मी शेतकरी झालो तर निबंध मराठी । Mi Shetkari Zalo Tar Marathi Nibandh

नमस्कार मित्रांनो ! आपले मराठी निबंध या वेबसाईटवर खूप खूप स्वागत आहे. या वेबसाईटवर तुम्हाला विविध माहिती आणि निबंध वाचायला मिळेल.

आजच्या पोस्टमध्ये आम्ही ” मी शेतकरी झालो तर निबंध मराठी । Mi Shetkari Zalo Tar Marathi Nibandh “ घेवून आलोत.

आम्हाला खात्री आहे की, या वेबसाईट वरील सर्व इन्फॉर्मेशन वाचून आपणास नक्कीच आनंद मिळेल.

मी शेतकरी झालो तर निबंध मराठी । Mi Shetkari Zalo Tar Marathi Nibandh

आपला भारत देश हा कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो भारतातील निम्म्यापेक्षा अधिक जनसंख्या हे शेतीवर अवलंबून आहेत. आपण जे अन्नधान्य खातो आणि ज्याच्यावर आपले जीवन जगतो ते या शेतीतूनच मिळते.

तरी शेतामध्ये राबराब कष्ट करून पिक पिकवितो. म्हणून शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा देखील म्हटले जाते. भारतात शेती मुख्यता ग्रामीण भागातून केली जाते ग्रामीण भागातील बहुतांश जनता हे आपली उपजीविका शेतीवर भागवते.

असा हा शेतकरी संपूर्ण देशाला अन्नधान्य पुरवठा  करून एक प्रकारे देशाची सेवाच करतो.

त्यामुळे मला देखील मोठे होण्या एक उत्कृष्ट शेतकरी बनण्याची इच्छा आहे. त्यामुळे जर मी शेतकरी झालो तर‌ आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून मी कमी खर्चामध्ये आणि कमी जागेमध्ये अधिक अधिक पीक घेण्याचा प्रयत्न करीन. मी शेतकरी झालो तर मी माझ्या शेतामध्ये पारंपरिक पद्धतीने पीक घेईन. शेतकरी हा संपूर्ण जगाचा पोशिंदा आहे त्यामुळे मला मी शेतकरी असल्याचा अभिमान असेल.

अलीकडे आपल्या येथे नवनवीन रासायनिक खतांचा वापर करून शेती केली जाते. कृत्रिम पद्धतीने तयार केलेली  रासायनिक खते आणि बी बियाणे वापरून अलीकडेच थोड्या वेळामध्ये अधिक पीक घेऊन जास्त पैसा कमावण्याच्या उद्देशाने शेती केली जाते परंतु जर मी शेतकरी झालो तर  मी असे ना करता सेंद्रिय खतांचा वापर करून शेती करीन. जेणेकरून, माझ्या शेतामध्ये पिकवलेला अन्नधान्य खाल्ल्याने लोकांना कुठल्याही प्रकारची हानी पोहोचणार नाही.

त्याप्रमाणेच हायब्रिड बियाणे न वापरता मी नैसर्गिक बियाण्यांचा वापर करीत.

 मी शेतकरी झालो तर माझ्या शेतामध्ये शेततळे तयार करून आणि त्यामध्ये पावसाचे पाणी जमा करून तेच पाणी माझ्या शेतीला देईन. त्यामुळे पाण्याची बचत होईल त्यासोबत माझीशेती नैसर्गिक रित्या येईल. तसेच मी शेतीला पूरक असा जोडधंदा विचारसुद्धा करे जसे की मत्स्यपालन, पशुपालन ज्यातून मला आर्थिक नफा होईल.

मी मनापासून शेती करीन नाकी पैशाच्या आभावा साठी किंवा   लोकांच्या आरोग्यासाठी हानिकारक असलेल्या रासायनिक खतांचा वापर करून.

जर मी शेतकरी झालो तर  मला मी शेतकरी असल्याचा आनंद असेल कारण मी माझ्या कष्टातून उत्कृष्ट  पीक पिकवले आहे. एवढेच नसून शेतकऱ्यावर आणि शेतकऱ्यांच्या शेतीवर संपूर्ण देशाचे भवितव्य अवलंबून असते.

म्हणजे शेतकऱ्याने वेळोवेळी आपल्या शेतीमध्ये अन्नधान्ये पिकवली तरच आपल्या देशातील सर्व लोक पोटभर जेवण करू शकते. त्यामुळे  जर मी शेतकरी झालो तर एक प्रकारे आपल्या देशाची सेवा करण्याचे सुख प्राप्त करीन.

आधुनिक काळाने ज्याप्रमाणे प्रगती केली आहे त्याप्रमाणे कृषी क्षेत्राने हे बरेच प्रकारे प्रगती केली आहे. नवनवीन शेती व्यवसायाला पूरक असणारे अवजारे आधुनिक काळामध्ये तयार झालेले असल्याने शेती व्यवसाय करणे अधिक सुलभ झाले आहे.

जर मी शेतकरी झालो तर अशा अवजारांचा नक्कीच माझ्या शेतीसाठी वापर करीत. जेणेकरून कमी वेळा मध्ये मला माझ्या शेतीतून अधिक उत्पादन प्राप्त होईल. तसेच अलिकडच्या काळामध्ये सरकारने देखील शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी विविध योजना बनवल्या आहेत. जर मी शेतकरी झालो तर सरकारच्या संपूर्ण योजनांचा फायदा करून घेईल.

आपण सर्वांना तर माहितीच आहे की, आलीकडचा काळ बदलत चालला आहे तंत्रज्ञानाने अतोनात प्रगती केली आहे अशा काळामध्ये सर्वजण शेती व्यवसायाला दूर ठेवून नवनवीन उद्योग धंदे आणि नोकरीच्या शोधात लागलेले आहेत त्यामुळे शेती व्यवसाय करून खूप जणांचे दुर्लक्ष होत आहे.

पण अलिकडे आपल्या देशातून पुरेसे उत्पादन होत नाही आणि त्यामुळे अन्नधान्याचे भाव गगनाला पोहचले आहेत. परंतु अशा परिस्थितीमध्ये देखील मी शेती व्यवसायाकडे दुर्लक्ष न करता अतोनात प्रयत्नातून यशस्वीरित्या शेती व्यवसाय करेल.

त्यामुळे जर मी शेतकरी झालो तर मला मी शेतकरी असल्याचा खूप आनंद  असेल त्यासोबतच गर्व सुद्धा वाटेल की, मी शेतीमधून आपल्या देशाची सेवा सुद्धा करीत आहे.

तर मित्रांनो ! ” मी शेतकरी झालो तर निबंध मराठी ” वाचून आपणास आवडला असेल तर  तुमच्या सर्व मित्रांना आवश्य शेअर करा.

या निबंधा मध्ये आमच्याकडून काही पॉईंट राहिले असतील तर कमेंट करून नक्की कळवा.


ये निबंध देखील अवश्य वाचा :-

धन्यवाद मित्रांनो !

Leave a Comment