७/१२ उतारा माहिती ऑनलाईन माहिती | 7/12 Utara Information in Marathi
मित्रानो तुम्ही खरेदी केलेल्या मालमत्तेवर कोणत्याही प्रकारचा दावा नाही किंवा खटला नाही७ १२ उतारा याबद्दल ऐकलेच असेल. सातबारा हा उतारा एखाद्या जमिनीवरील मालकीचा हक्क कोणाचा आहे हे सहजपणे सांगून देण्याकरिता देण्यात येत असतो.
क्रमांक 7 व क्रमांक 12 हे जमिनीच्या मालकीच्या हक्काचा संबंधित दोन कलमे आहे. आजच्या लेखामध्ये आपण ७ १२ उतारा याबद्दल माहिती पाहणार आहोत. चला तर मग पाहूया, ७ १२ उतारा माहिती ऑनलाईन माहिती | 7 12 utara Information in Marathi.
७/१२ उतारा माहिती ऑनलाईन माहिती | 7/12 Utara Information in Marathi
आपल्या भारत देशामध्ये कोणत्याही प्रकारची मालमत्ता खरेदी करण्यासाठी अनेक प्रकारच्या कागदपत्रांची आवशक्यता असते म्हणजे जर आपणाला जमीन घ्यावयाची असेल तर दे जमीन घेतल्याने त्या जमिनीवर आपला हक्क आहे हे दाखवून देण्यासाठी कायद्यानुसार आपली कागदपत्रे त्या जमिनी सोबत लागू करावी लागतात.
या कागदपत्राच्या माध्यमातून सुनिश्चित केले जाऊ शकते की, खरेदी केलेल्या मालमत्तेवर कुठल्याही प्रकारचा दावा नाही किंवा खटला नाही. एखादी मालमत्ता किंवा जमीन खरेदी केल्यावर त्यातील सर्वात महत्वाचे कागदपत्र म्हणजे ७/१२ उतारा हे होय. जर एखादी व्यक्ती जमिनीमध्ये गुंतवणूक करत असेल तर त्या व्यक्तीला या कागदपत्रांची अत्यंत आवश्यकता असते.
७/१२ उतारा म्हणजे काय? 7 12 utara Information in Marathi
जमिनीच्या गावचा या संबंधित कुठल्याही प्रकारची गुंतवणूक करायची असेल तर सातबारा उतारा हे कागदपत्र खूप गरजेचे ठरते. सातबारा उतारा है विविध प्रकारच्या माहितीने परिपूर्ण असणारे कागदपत्र आहे.
कागदपत्रांमध्ये भूमीचा तपशील, सर्वेक्षण क्रमांक, तारीख, क्षेत्र, आणि त्या भूमी च्या मालकाचा तपशील या सर्वांचा उल्लेख केलेला असतो.
सातबारा उतारा मध्ये मुख्यता दोन फार्म असतात किंवा कलमे असतात. फॉर्म 7 मध्ये संबंधित जमिनीचा मालकाची माहिती आणि अधिकाऱ्यांचा उल्लेख केलेला असतो तर फॉर्म 12 मध्यें त्या जमिनीचे सर्व माहिती व ती जमीन कोणत्या कारणासाठी वापरली जाते याबद्दल सर्व माहितीचा उल्लेख असतो.
दोन कलमांना मे महाराष्ट्र राज्यामध्ये 7/12 Extract या कागद पत्राला स्थानिक मराठी भाषेमध्ये “सातबारा उतारा” या नावाने ओळखले जाते. सातबारा उतारा या दस्तऐवजांची नोंदणी महाराष्ट्र राज्यातील कर वसुली करण्यासाठी राज्यातील महसूल विभागाकडून केली जाते.
सातबारा उतारा यासाठी अप्लाय केलेल्या या लोकांचे हे दस्तावेज त्या भागातील तहसीलदार किंवा जमीन प्राधिकरणा द्वारे वाटप केले जाते.
7/12 उतारा का महत्वाचा मानला जातो? Why 7/12 Extract important in Marathi
एखाद्या जमिनीच्या क्षेत्राला स्वतःची मालकी प्राप्त करून देण्यासाठी किंवा कायदेशीर दर्जा प्राप्त करून देण्यासाठी सातबारा हा उतारा महत्वाचा ठरतो. कोणत्याही जमिनीच्या क्षेत्राची पूर्व माहिती प्राप्त करण्यासाठी या उतारा चा वापर केला जातो.
एखाद्या जमीन क्षेत्रावर पूर्वी झालेले वाद-विवाद, खटले, कायदेशीर आदेश यापूर्वी जमीन कोणाच्या मालकी मध्ये होती ही सर्व माहिती जाणून घेण्याकरिता हा उतारा महत्त्वाचा ठरतो. याव्यतिरिक्त 7/12 उतारा मध्ये भूत काळामध्ये घडलेल्या जमिनीवरील क्रियांचा अहवाल देखील कळतो. जमिनीसंबंधीची सर्व माहिती व त्या जमिनीची ओळख ही सातबारा उतारा मध्ये दिलेली असते.
एखाद्या शेत जमिनीचा 7/12 हा उतारा असेल तर त्या शेत जमिनी मध्ये मागील वर्षांमध्ये किती उत्पादन झाले हेचा देखील उल्लेख केलेला असतो.
ऑनलाइन 7/12 हा उतारा कसा काढावा?
7/12 उतारा हा ग्रामीण आणि निम्न ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात कृषी आणि बिगर शेती कर्ज देण्याकरिता जमीन मालकांना ओळखण्या करीता या दस्तऐवजाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.
आपली जमीन ज्या भागामध्ये येते त्या भागातील तहसिलदाराकडून सात बारा हा उतारा काढता येतो. हा उतारा केवळ विशिष्ट कालावधीमध्ये दिला जातो परंतु अलीकडे आधुनिक काळामध्ये सातबारा उतारा ऑनलाइन पद्धतीने सुद्धा काढता येतो.
पुढील प्रमाणे आपण ऑनलाइन पद्धतीने सातबारा उतारा काढू शकतो.
1. ऑनलाइन पद्धतीने सातबारा हा उतार काढण्याकरिता सर्वप्रथम तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या bhulekh.mahabhumi.gov.in या वेबसाईटला भेट द्या.
2. bhulekh.mahabhumi.gov.in या वेबसाइटला भेट दिल्यावर तेथे यादी येतील त्या यादीतून आपला विभाग, जिल्हा, तालुका, व गाव यांची निवड करा.
3. त्यानंतर जमिनीचा मालकाचे पहिले नाव, मधले नाव आणि आडनाव टाकून मालमत्तेचा गट क्रमांक निवडावा.
4. वरील प्रमाणे सर्व माहिती भरुन झाल्यानंतर येथील शोधा या बटणावर क्लिक करा अशाप्रकारे तुम्ही घर बसल्या तुमचा ऑनलाईन 7/12 उतारा काढू शकता.
तर मित्रांनो ! ” ७/१२ उतारा माहिती ऑनलाईन माहिती | 7/12 Utara Information in Marathi “ हा लेख वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर कर.
ये देखील अवश्य वाचा :-
- केवायसी म्हणजे काय? | केवायसी चा इंग्रजी अर्थ
- भारतीय स्वातंत्र्य दिन मराठी निबंध
- औद्योगिक सुरक्षा मराठी निबंध
- म्युच्युअल फंड म्हणजे काय?
- गुढीपाडवा वर निबंध मराठी
धन्यवाद मित्रांनो !
very good information it helps to understood a lot in local language