औद्योगिक सुरक्षा मराठी निबंध । Essay On Industrial Safety In Marathi

औद्योगिक सुरक्षा मराठी निबंध । Essay On Industrial Safety In Marathi

मित्रांनो ! आपल्याला माहितीच आहे  भारत देशा विकसनशील देश आहे. आपल्या भारत देशामध्ये अनेक नवनवीन कारखाने उद्योगधंदे उदयास आलेले आहे.

थोडक्यात भारतामध्ये औद्योगिक क्रांती झाली आहे औद्योगिक क्षेत्राने विस्तृत असा विकास केलेला आहे परंतु या औद्योगिक क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या कामगारांची सुरक्षितता ही देखील महत्त्वाची बाब ठरली आहे.

म्हणून आज आपण औद्योगिक सुरक्षा वर मराठी निबंध पाहणार आहोत. चला तर मग पाहूया, औद्योगिक सुरक्षा मराठी निबंध । Essay On Industrial Safety In Marathi

औद्योगिक सुरक्षा मराठी निबंध । Essay On Industrial Safety In Marathi

औद्योगिक सुरक्षिततेला अलीकडे खूप महत्व दिले जात आहे कारण दिवसेंदिवस वाढत चाललेल्या औद्योगिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कामगारांसोबत काही ना काही घटना होता यामध्ये काही जण जखमी होतात तर काहीजण मृत्युमुखी सुद्धा पडतात. त्यामुळे औद्योगिक सुरक्षा ( Industrial Safety) खूप महत्वाची आहे.

औद्योगिक क्षेत्रांमधून उत्पादन होणाऱ्या पैकी पाच टक्के उत्पादनाचे पैसे हे औद्योगिक सुरक्षिता मध्ये जखमी झालेल्या किंवा मृत्युमुखी पडलेल्या परिवारांच्या देण्याकरता  खर्ची लावले जातात.

औद्योगिक दुर्घटनांमध्ये मृत्यू होणाऱ्या लोकांची संख्याही दिवसेंदिवस वाढत चालली आहे. तसेच इतर दुर्घटनां पेक्षा औद्योगिक दुर्घटनां या अधिक भयंकर ठरतात.

त्यामुळे औद्योगिक दुर्घटना यात का घडतात यामागचे कारण काय? हे शोधून काढण्यासाठी व औद्योगिक सुरक्षिततेकडे सर्वांनी एक पाऊल उचलायला हवे.

औद्योगिक सुरक्षिततेची आवशक्यता :

औद्योगिक क्षेत्रांमध्ये जर असुरक्षितता असेल तर त्याचे रूपांतर फोटो भयंकर दुर्घटना मध्ये होऊ शकते. जसे की एकाद्या फॅक्टरी मधील विजेचे कनेक्शन व्यवस्थित आहे का नाही हे न पाहताच तेथील कामगारांना कारखान्यातील मशिनरी चालविण्याकरिता दिल्या असता याचा काय विपरीत परिणाम होऊ शकतो याची आपणास खात्री असेलच.

म्हणून औद्योगिक सुरक्षिततेची खूप आवशक्यता आहे. औद्योगिक क्षेत्रांमधील सुरक्षितता व त्यांचे आपण पडताळणी करू शकतो जर इतर काही समस्या किंवा अडचणी येत असल्यास आपण ते दुरुस्त करून कित्येक कामगारांना जीवन दान देऊ शकतो.

तसेच औद्योगिक आसुरक्षितता आपण पूर्णता समाप्त देखील करू शकतो. आपल्या देशामध्ये दिवसेंदिवस वाढत चाललेला औद्योगिक असुरक्षिततेमुळे कित्येक लोकांचा बळी जात आहे त्याला आळा घालण्याकरीता आपल्याला औद्योगिक सुरक्षिततेची खूप आवश्यकता भासत आहे.

औद्योगिक सुरक्षितता घेण्याकरिता घ्यावयाची काळजी;

1. काम करणाऱ्या लोकांचे योग्य नियोजन :

जर एखाद्या औद्योगिक क्षेत्रा  मध्ये काम करणारा कामगार हा शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या कमजोर असेल अस्वस्थता असेल तर त्याला तुरंत कामावरून काढणे गरजेचे आहे.

एवढेच नसून आपल्या कारखान्यांमध्ये किंवा कोणत्याही उद्योगांमध्ये एखाद्या व्यक्तीचे निवड करताना तो व्यक्ती त्या कार्यामध्ये कितपत कुशल आहे हे तपासणे देखील आवश्यक आहे.

2. तंत्रज्ञानाचा चा योग्य वापर :

आजच्या काळामध्ये तंत्रज्ञानाने अतोनात प्रगती केलेली आहे त्यामुळे कुठल्याही क्षेत्रांमध्ये तंत्रज्ञान हे वापरले जाते त्यातल्यात्यात औद्योगिक क्षेत्रांमध्ये तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणात वापरले जाते त्यामुळे औद्योगिक क्षेत्रामध्ये वापरला जाणारा तंत्रज्ञान हे सुरक्षित पद्धतीने हाताळले आणि वापरले पाहिजे जेणेकरून औद्योगिक क्षेत्रामध्ये  कुठलीही ही दुर्घटना होणार नाही.

3. योग्य ऑपरेटर प्रशिक्षण :

औद्योगिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कामगारांना योग्य ऑपरेटर प्रशिक्षण देणे खूप गरजेचे आहे. नोकरी पाडण्याची पद्धती सुरक्षित किंवा असुरक्षितता जरी असली तरी काम करणाऱ्यांना योग्य प्रशिक्षण देणे गरजेचे आहे.

4. दुर्घटना प्रतिबंध आणि योग्य शिक्षण :

औद्योगिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या काम करायचे नेतृत्व कौशल्य हे त्या क्षेत्रातील पर्यवेक्षक याच्या नेतृत्वाखाली होत असते. त्यामुळे अपघातांच्या प्रतिबंधा  बाबत कामगारांना जागृत करणे हे पर्यवेक्षक याचे काम असते.

पर्यवेक्षकांच्या मुख्य हेतू हा कामगारांना सुरक्षिततेबाबत शिकविणे हा आहे. जेणेकरून कामगार आपल्या क्षेत्रामध्ये असुरक्षित परिस्थिती ओळखू शकते व त्या परिस्थितीमध्ये काय करायचे त्याचे शिक्षण त्यांना उपलब्ध होईल.

सुरक्षा कार्यक्रम :

औद्योगिक क्षेत्रांमध्ये वेळ व्हेरी सुरक्षा कार्यक्रम करून  कामगारांना सुरक्षिततेची जाणीव करुन देणे गरजेचे आहे. अपघात कधी आणि का होतात हे ओळखले साठी सुरक्षा कार्यक्रम महत्वाचे ठरतात.

त्यामुळे सुरक्षा कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट हे अपघात कमी करणे व अति सुरक्षेचा व दक्षता याची जाणीव करून देईल. कामाशी संबंधित बहुतेक अपघात टाळणे  शक्य आहे असे गृहीत धरून सुरक्षा कार्यक्रम सुरू केला जातो.

सुरक्षा कार्यक्रम अंतर्गत औद्योगिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कामगारांना पुढील प्रमाणे जाणीव करून दिली  जाते.

  1. औद्योगिक क्षेत्रामध्ये योग्य प्रकाश योजना, वायुविजन आणि औद्योगिक युनिट चे योग्य मानक आहे का हे वेळोवेळी तपासणे.
  1. औद्योगिक क्षेत्रांमध्ये वापरले जाणारे साधने आणि उपकरणे ही सतत देखभाली खाली व देखरेखेखाली ठेवणे.
  1. सुरक्षित कटिंग आणि वेल्डिंग याबाबत मार्गदर्शन करणे.
  1. वैयक्तिक संरक्षणात्मक कारणांसाठी सुरक्षा उपलब्ध आहे का नाही हे वेळोवेळी पाहणे.
  1. घातक रसायनांचे वर्गीकरण करणे व असे पदार्थ अग्निशामक पदार्थांपासून दूर ठेवणे.

तर मित्रांनो ! ” औद्योगिक सुरक्षा मराठी निबंध । Essay On Industrial Safety In Marathi “ हा लेख वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.


ये निबंध देखील अवश्य वाचा :-

धन्यवाद मित्रांनो !

Leave a Comment