गुढीपाडवा वर निबंध मराठी | Gudi Padwa Essay In Marathi | Gudi Padwa Nibandh in Marathi

गुढीपाडवा वर निबंध मराठी | Gudi Padwa Essay In Marathi | Gudi Padwa Nibandh in Marathi

मित्रांनो! आपली भारत देशाची संस्कृती जगामध्ये कोठेही पहायला मिळत नाही. कारण आपल्या भारत देशाच्या संस्कृतीमध्ये सण आणि उत्सवदिले जाते भारत देशामध्ये वर्षभरामध्ये अनेक सण साजरे केले जातात.

महाराष्ट्र राज्यामध्ये दरवर्षी मराठी नववर्षाच्या सुरुवातीला गुढीपाडवा हा सण साजरा केला जातो. गुढीपाडवा हा सण साजरा करूया मराठी नववर्षाचे स्वागत देखील केले जाते.

आजच्या लेखामध्ये आपण या गुढीपाडवा सणा वर निबंध पाहणार आहोत. चला तर मग पाहूया, गुढीपाडवा वर निबंध मराठी

गुढीपाडवा वर निबंध मराठी | Gudi Padwa Essay In Marathi | Gudi Padwa Nibandh in Marathi

दर वर्षी आपल्या देशामध्ये अनेक सण साजरे केले जातात. प्रत्येक सणाचे विशिष्ट असे महत्त्वाचे असते आणि या सणातून आपली भारतीय संस्कृती संपूर्ण जगासमोर ठेवण्याचे काम केले जाते म्हणूनच आपल्या देशाला सणांचा देश म्हणून देखील ओळखली जाते.

दरवर्षी मराठी नववर्षाच्या सुरुवातीला म्हणजे एक चैत्र या तारखेला संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये गुढीपाडवा हा सण मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो.

कोणताही सण साजरा करण्यामागे देशातील लोकांमध्ये एकजुटता निर्माण व्हावी हा हेतू असतो. सण साजरा करताना सर्व काही विसरून एकत्र येऊन सण साजरा करतात. गुढीपाडवा सण महाराष्ट्रामधील सर्व जाती-धर्माचे लोक मिळून साजरे करतात.

गुढीपाडवा हा सण चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षामध्ये येतो. पाडवा या सणा पासूनच मराठी नववर्षाची सुरुवात देखील होते. भारतातील सर्व लोक गुढीपाडवा हा सण खूप मोठा उत्साहाने आणि आनंदाने साजरा करतात.

आणि पुरातन कथांचा गुढीपाडवा या सणा दिवशी  ब्रह्मदेवाने संपूर्ण सृष्टीची निर्मिती केली होती. आणि काही पौराणिक कथांनुसार गुढीपाडवा याच दिवशी भगवान राम रावणाचा वध करून आयोध्या मध्ये परत येतात.

यामुळे रामाचे स्वागत करण्यासाठी आयोध्या नगरीतील सर्व लोक गुढीपाडवा हा साजरा करतात. गुढीपाडवा सणाचे आणखीन एक पौराणिक कथा म्हणजे शालिवाहन राजाने कुंभार पुत्राचा वध करण्याकरिता एक मातीचा पुतळा मधील सैन्य भरले तेव्हापासूनच चैत्र महिन्याला शालिवाहन पर्व देखील म्हणतात.

गुढीपाडवा या सणा दिवशी सर्वजण सकाळी उठून अंघोळ करतात. घरासमोर सडा रांगोळी करून दरवाज्याला फुलांची तोरण बांधतात. त्यानंतर दारासमोर गुढी उभारतात गुडी म्हणजेच  बांबूचे लाकूड असते त्याला खडा ला सुट्टी देऊन त्याची पूजा करून या लाकडाच्या एका टोकाला  नवीन साडी कशी नेसतात व पितळेचा तांब्या ठेवून कडूलिंबाची पाने त्याला लावतात.

गुढीला फुलांचा हार व साखरेचा हार घालण्याची प्रथा आहे.  अशाप्रकारे गुढी तयार करून ती गुढी दारोदारी लावली जाते. त्यानंतर गुढीच्या अवती भोवती रांगोळी काढली जाते व गुढीला नेवेद्य ठेवून सर्व जण  गुढीला नमस्कार करतात. अशाप्रकारे सर्व जण आपल्या दारोदारी नववर्षाचे स्वागत करण्याकरिता गुढी उभारतात. पूर्ण दिवस गुढी उभारल्या ने दुसऱ्या दिवशी पहाटे उठून सर्वजण हे गुढी काढतात

तेलुगु भाषेमध्ये गुढी चा अर्थ “लाकूड अथवा काठी” असा होता.  त्याप्रमाणेच गुढी चा अर्थ तोरण असा देखील होतो. गुढीपाडव्याचे जसे सामाजिक महत्त्व आहे त्याप्रमाणे गुढीपाडव्याला नैसर्गिक आणि आयुर्वेदिक रित्या महत्त्व प्राप्त झालेले आहे.

चैत्र महिन्यापासून हिवाळ्याची थंडी कमी होऊन उन्हाळा ऋतुला सुरूवात होत असते. त्यावेळी कडुलिंबाची पाने खाल्ल्याने शरीरातील जंतूंचा नाश होतो त्यामुळे गुढीपाडवा सणांमध्ये कडू लिंबाच्या पानांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. तसेच गुढीपाडव्याच्या सुमारास झाडांना नवीन पालवी देखील फुटते.

गुढीपाडवा या सणा दिवशी सर्वजण आपल्या घरामध्ये गोड पदार्थ बनवतात आपल्या नातेवाईकांना घरी जेवण्यासाठी बोलतात.

गुढीपाडवा या दिवशी घरामध्ये नवीन वस्तू आणि शुभकार्याला सुरुवात करणे किंवा सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. गुढीपाडवा या सणा दिवशी सर्वजण नवीन वस्त्र धारण करतात लहान मुलांना साखराचा घातला जातो. अशाप्रकारे दरवर्षी महाराष्ट्रामध्ये गुढीपाडवा हा सण मोठ्या आनंदामध्ये आणि उत्साहा मध्ये साजरा केला जातो.

तर मित्रांनो ! हा लेख वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना आवश्य शेअर करा.


ये निबंध देखील अवश्य वाचा :-

धन्यवाद मित्रांनो !

1 thought on “गुढीपाडवा वर निबंध मराठी | Gudi Padwa Essay In Marathi | Gudi Padwa Nibandh in Marathi”

Leave a Comment