कचऱ्याचे व्यवस्थापन निबंध Waste Management Information in Marathi

कचऱ्याचे व्यवस्थापन निबंध Waste Management Information in Marathi

प्रस्तावना :

आपण दिवस- भरामध्ये कित्येक कामे करतो. त्या प्रत्येक कामा मधून कमी जास्त प्रमाणात टाकाऊ पदार्थ निर्माण होतात. काही टाकाऊ पदार्थ आपल्या पर्यावरणाला हानिकारक असतात तर काही टाकाऊ पदार्थ उपयुक्त असतात. निसर्ग मधून आपल्याला अनेक वस्तू मिळतात. त्या प्रत्येक वस्तू पासून काही ना काही प्रकारे वापर करून घेत असतो.

काही वस्तू आपण वापर झाल्यावर अनावश्यक म्हणून फेकून देतो. व ते पदार्थ निसर्गामध्ये कचरा म्हणून ओळखले जातात. अर्थात निसर्गात कोणत्याही प्रकारचा कचरा नसतो.

कचरा हा आपणच मनुष्य निर्माण करत असतो. कचऱ्याचे योग्य प्रकारे विल्हेवाट न लावल्यास तो कचरा हानिकारक सुद्धा होतो.

कचऱ्याचे व्यवस्थापन निबंध Waste Management Information in Marathi

तर आजच्या या निबंधामध्ये आपण ‘ कचरा व्यवस्थापन’ कसे करायचे याची माहिती बघणार आहोत.

आजच्या काळात झपाट्याने वाढणारी शहरी करण यामुळे प्रदूषणाच्या ज्या समस्या निर्माण होत आहेत त्या मध्ये कचऱ्याचे एकत्रीकरण, व्यवस्थापन व कचऱ्याची विल्हेवाट लावणे ही

एक मोठी गंभीर आणि खर्चाची समस्या बनली आहे. तसेच पर्यावरणाच्या दृष्टीने तर अत्यंत हानिकारक आहे.

कचऱ्याचे प्रकार :

आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कित्तेक प्रकारचा कचरा निर्माण करतो याची कोणाला कल्पनाही नसेल. त्या कचऱ्या मध्ये अनेक हानिकारक व घातक पदार्थ असतात ते आपल्या पर्यावरणा सोबत आपले वैयक्तिक जीवन सुद्धा उध्वंसक करण्यासाठी कारणीभूत ठरतात. मुख्यतः कचऱ्याचे दोन प्रकार आहेत.

  • 1. सेंद्रिय कचरा
  • 2. असेंद्रिय कचरा

1. सेंद्रिय कचरा :

सेंद्रिय कचऱ्याला ” ओला कचरा” असेही म्हणतात. सेंद्रिय कचऱ्याला घन कचरा असे सुद्धा म्हणतात. हा कचरा प्रामुख्याने आपल्या घरामध्ये, ऑफिस मध्ये, जनावरांच्या गोठ्या मध्ये व आपल्या आसपासच्या परिसरामध्ये निर्माण होतो.

यात फळांची साली, भाजी- पाल्यांचा नको असलेला भाग, खरकटे, घरातील धूळ, जनावरांची विष्ठा, शेण किव्वा मूत्र, घरामध्ये सजावटी साठी वापरलेल्या प्लास्टिकच्या वस्तू,

झाडांचा पालापाचोळा व अंगणा- मधील केरकचरा व निरुपयोगी असलेल्या काही वस्तू अशा काही किती तरी सेंद्रिय पदार्थांमुळे हा कचरा निर्माण होतो.

सेंद्रिय कचऱ्याची विल्हेवाट कशी करावी :

घरात जो कचरा निर्माण होतो तो कचरा कुठेही न टाकता योग्य पद्धतीने एका ठिकाणी किंवा योग्य रीतीने आवश्यकते- नुसार खड्डा खोदून त्या मध्ये फळांच्या साली, भाजी- पाल्यांचा नको असलेला भाग, खरकटे हे पदार्थ टाकून त्यांची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावावी हा कचरा कुजला किंवा फार दिवसांनी कंपोस्ट खत म्हणून शेतामध्ये पिकांसाठी वापर सुद्धा होतो. यामुळे जमिनीची सुपिकता वाढते व पिकांचे प्रमाण वाढून जमिनीची धूप होण्यापासून बचाव होतो.

जनावरां पासून मिळणारे शेण आणि मूत्र कुठेही न फेकता. ते एका खड्ड्या मध्ये जमा करून त्या पासून गोबर गॅस ची निर्मिती केली पाहिजे त्यामुळे कचऱ्याचे ही प्रमाण कमी होऊन आर्थिक मदत होते. झाडांचा पालापाचोळा व रोजच्या घरातला ओला कचरा कंपोस्ट खड्ड्यात टाकावा किंवा गांडूळ निर्मितीच्या खड्ड्यात टाकावा त्यामुळे त्या कचऱ्याचा योग्य फायदा होईल.

अशा पद्धतीने सेंद्रिय कचऱ्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावल्यास पर्यावरणावर होणारा धोका टाळण्यास मदत होते व सेंद्रिय कचरा खत म्हणून वापरात आणल्यास त्यामुळे जमिनीला व पिकांनाही त्यांचा फायदा होतो.

असेंद्रिय कचरा :

असेंद्रिय कचरा म्हणजे, वेगवेगळे कारखान्यातून निघणारे टाकाऊ पदार्थ, हॉस्पिटल मधील कचरा, लोखंडी वस्तू, प्लास्टिक पिशव्या, रबर, फायबरच्या वस्तू महत्त्वाचे म्हणजे E – कचरा या सर्व कचऱ्यांचा समावेश हा सेंद्रिय कचऱ्या मध्ये होतो तसेच याला ” सुका कचरा” असे ही देखील म्हणतात.

असेंद्रिय कचऱ्याची विल्हेवाट कशी लावावी :

मुख्यतः आपल्या घरातून निघणार्‍या असेंद्रिय कचऱ्यामध्ये प्लास्टिकच्या पिशव्यांचा समावेश होतो. व पाणी पिण्याच्या बाटल्या या वस्तू इथे- तिथे न टाकता एका ठिकाणी जमा करून कचऱ्याच्या गाडीत टाकाव्यात अन्यथा त्या वस्तू घरापासून दूर खड्डा करून टाकाव्यात.

रबर, फायबर, लोखंडी वस्तू या सर्व प्रकारच्या खराब झालेल्या वस्तू कुठेही न टाकता त्या वस्तू विकाव्यात जेणे करून पुढे त्या दुरुस्त करून पुन्हा वापरात येतील किंवा त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावली जाईल.

इ- कचरा :

इ- कचरा म्हणजेच इलेक्ट्रॉनिक कचरा. या कचऱ्यावर व्यवस्थापन करण्यासाठी २००६ पासून भारत सरकारने नियम काढला होता. भारताची आर्थिक राजधानी म्हणून ओळखले जाणारे मुंबई शहर औद्योगिक दृष्ट्या खूप प्रगत झालेले आहे.

येथे इलेक्ट्रॉनिक आणि उपभोक्ता टिकाऊ वस्तूंचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. या इलेक्ट्रॉनिक कचऱ्याच्या अभिक्रियेसाठी, पुनर्वापरासाठी व पुनर्चक्रीकरणासाठी

त्यांची विल्हेवाट लावण्या साठी कुठल्याही सुविधा व यंत्रणा नाहीत त्यामुळे इ- कचरा हे एक मोठे संकट जगासमोर उभे राहिले आहे.

इ- कचऱ्याची विल्हेवाट कशी लावावी :-

या इ- कचऱ्याच्या विल्हेवाट मध्ये सर्वप्रथम मोबाईल, टीव्ही, मिक्सर, विविध प्रकारच्या मशिनरी यांचा खराब झालेला भाग कुठेही न टाकता ते विकावेत जेणेकरून त्यांना दुरुस्त करून पुन्हा वापरात आणले जातील.

हॉस्पिटल मध्ये खराब झालेले इंजेक्शन, सुई, सलाईन, बॉटल, ब्लेड्स, पाईप इत्यादी वस्तूंची योग्य विल्हेवाट लावावी. ई- कचरा मध्ये समाविष्ट होणाऱ्या सर्व कचरांचा पुनर्वापर व पुनर्चक्रीकरण करणे बंधन कारक आहे.

आपल्या अवती-भवती कचऱ्याची समस्यांने अनेक गंभीर रूप धारण केले आहे. जिकडे बघावे तिकडे कचरा पसरलेला दिसेल. या सर्व कचऱ्याला कारणीभूत म्हणजे एकमेव माणूस आहे.

अलीकडे मुंबई मधील मोठा नदीला आलेला पूर याचे कारण म्हणजे प्लास्टिकच्या पिशव्या होते. वेळेवर गटारी, नाले साफ न केल्याने सर्व कचरा, पालापाचोळा व प्लॅस्टिक नदी- नाल्यांमध्ये जाऊन जमा झालेले आहे त्यामुळे पाण्याचा प्रवाह थांबला व नदीचे पात्र तुंबले व त्यामुळेच तेव्हा मुंबई मध्ये पूर आला.

अलीकडे शहरांमध्ये कचऱ्याची समस्या खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे. शहरां मध्ये बघावे तिकडे कचऱ्याचे ढिगारे दिसत आहेत. त्यामुळे डासांचे प्रमाण वाढून डेंग्यू, मलेरिया यांसारखे आजार वाढत आहेत. त्यासाठी आपण कचरा करणे थांबवले पाहिजे व कचऱ्याची योग्य प्रकारे व्यवस्थापन केले पाहिजे आजच्या काळाला कचरा व्यवस्थापन करणे ही गरजेची बाब झाली आहे.

स्वतः केलेला कचरा स्वतःने साफ केला पाहिजे. सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवली पाहिजेत. बगीचे, किल्ले, प्राचीन काळातील एखादे ठिकाण अशी सार्वजनिक ठिकाणी कचरा केल्यास दंड आकारला पाहिजे.

कचरा ही एक आपल्या पर्यावरणाला लागलेली मोठी कीड आहे. जर आपण या कचऱ्याचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने केली नाही तर याचा परिणाम आपल्या रोजच्या जीवनामध्ये होईल.

आपल्या सभोवती अनेक प्रदूषण वाढत जात आहे ते आपण पाहतो त्या मध्ये कचरा हा सुद्धा एक प्रकारच्या प्रदूषणाचाच भाग आहे. त्यामुळे हा कचरा कमी करणे व त्याचे योग्य व्यवस्थापन करणे

आपल्या नागरिकांच्या हातात आहे आणि ते आपण योग्य पद्धतीने पार पाडणे हे आपली जबाबदारी आहे.

धन्यवाद मित्रांनो !


ये निबंध देखील अवश्य वाचा :-