माझे बाबा या विषयावर मराठी निबंध । My Father Essay in Marathi

माझे बाबा या विषयावर मराठी निबंध । My Father Essay in Marathi


प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये प्रत्येक समस्यांमध्ये, अडचणी मध्ये एक साथीचा हात व पुढे जाण्यासाठी प्रोत्साहित करणारी एक अदृश्य हाक असते ती म्हणजे बाबांची.

आपल्या जीवना मध्ये आईला जेवढे महत्त्वाचे स्थान आहे तेवढेच स्थान बाबांनाही आहे. आई- जसे आपले प्रेम मुलांवर दाखविते तसे बाबा दाखवत नसतात पण ते ही तितकेच प्रेम किंबहुना त्या पेक्षा जास्त प्रेम आपल्या मुलांवर करत असतात.

तरी आजच्या या निबंधामध्ये आपण याच महान व्यक्ती वर निबंध बघणार आहोत ते म्हणजे ” माझे बाबा “.

माझे बाबा या विषयावर मराठी निबंध । My Father Essay in Marathi

प्रत्येक जण आपापल्या वडिलांना, डॅडी, पप्पा, बाबा, अप्पा अशा वेगवेगळ्या नावांनी आवाज देत असतो बोलवत असतो. मी माझ्या वडिलांना ” बाबा” म्हणून बोलतो.

कारण मला असे वाटते की, पप्पा, डॅडी या शब्दांमध्ये जेवढी आपुलकी नाही तेवढी या बाबा शब्दात आहे. बाबा म्हणताच माझ्या अंगावर काटे उभे राहतात व माझ्या बाबांचा चेहरा माझ्या डोळ्यांसमोर येऊन डोळ्यात अश्रु दाटतात.

माझ्या बाबांचे नाव ” श्रीकांत” आहे जसे नाव माझे बाबा ही तसेच आहेत. स्वभावाने अतिशय प्रेमळ आहेत. माझ्या सर्व कुटुंबांसोबत माझे बाबा आणि आम्ही सर्वजण एका खेडेगावांमध्ये राहतो.

आमच्या आजोबांच्या अगोदरच्या काळापासून आम्हाला थोडी शेती आलेली आहे आणि याच शेती मध्ये काम करून माझे बाबा आम्हा सर्व कुटुंबांचे पालन करतात.

मला आठवते तेव्हा पासून माझे बाबा शेतामध्येच काम करून आमच्या कुटुंबाला सांभाळण्याचे दृश्य मी बगत आलो बाबा म्हटले की बाबां बद्दल बोलावे काय हे मला कळतच नाही कारण बाबांचे महत्व सांगण्यासाठी

माझ्या जवळ शब्दच नाहीत असे म्हणतात की, देव स्वतः घरोघरी जाऊन सगळ्यांची पालन करू शकत नाही म्हणून त्यांनी आई- बाबा या दोन महान व्यक्तींना बनविले.

जे स्वतःचा विचार न करता आपल्या मुलांसाठी जगत असतात आपल्या मुलांचे भविष्य चांगले व्हावे, त्याला चांगले शिक्षण मिळावे. उत्कृष्ट संस्कार मिळावे म्हणून ते दिवस रात्र डोळ्यात तेल घालून

आपल्या मुलांच्या भविष्यासाठी कबाड कष्ट करीत असतात. माझे बाबांचे संपूर्ण आयुष्य शेती मध्येच गेले. बाबांचे बालपण गरिब आणि खडतर परिस्थिती मध्ये गेलेले आहे.

त्यामुळे बाबांना लहानपणापासून गरीब परिस्थितीची जाणीव आहे आणि याच कारणामुळे बाबा लहानपणी शाळेला जाऊ शकले नाही. तरी माझ्या बाबांचे शिक्षण इयत्ता दहावी पर्यंत झालेले आहे.

पण पुढे गरीब परिस्थितीमुळे ते शिकू शकले नाही. त्यामुळे बाबांना शिक्षणाचे महत्त्व माहिती आहे. आम्ही मुलं ही बाबांन प्रमाणे गरिबी या कारणामुळे अशिक्षित राहू नये असे बाबांना वाटते व त्यासाठीच बाबा दिवस-रात्र कष्ट करतात.

माझ्या बाबांचे स्वप्न आहे की, मी मोठे होऊन डॉक्टर व्हावे व आई बाबांचे नाव उंच करावे. त्या साठी बाबांनी मला लहानपणापासून चांगल्या शाळेला टाकले व ते रोज रात्री मला डॉक्टर व्हायचे आहे याची जाणीव करून देतात. आणि बाबांनी समजावून सांगितल्या मुळे मला आणखी जास्त आत्मविश्वास मिळतो. मला चांगले शिक्षण देऊन साक्षर करण्यामागे माझ्या बाबांचे खूप मोठे योगदान आहे.

माझे बाबा नेहमी म्हणत की, ” आयुष्यामध्ये पुढे जायचे असेल तर मिळाली ते करून जावे”, बाबांच्या या बोलण्यामुळे मला सुद्धा कामाची सवय लागली. व सुट्टीच्या दिवशी मी सुद्धा बाबांसोबत शेतामध्ये कामाला जाऊन त्यांना मदत करत असतो.

बाबांच्या कामाची सुरुवात ही दिवसाच्या पहाटे पाच वाजल्यापासून होते. बाबा सकाळी लवकर उठून आंघोळ करतात, देवाला नमस्कार करून घरामध्ये पिण्यासाठी पाणी आणून देत व काहीतरी नाष्टा करून कामाला जातात. व कधी वेळ मिळेल तेव्हा बाबा व्यायाम, सूर्यनमस्कार, योगा सुद्धा करतात.

बाबा- आई दोघे मिळून काटकसरीने घर चालवतात पण आम्हा मुलांच्या माझ्या व माझ्या बहिणीच्या कुठल्याही गरजा पूर्ण करताना ते विचार करत नाहीत. आम्हाला लागणाऱ्या सर्व गोष्टी जसे की, वही, पेन, पुस्तक, कपडे, चप्पल घेताना ते पैसाचा कसलाही विचार करत नाही.

बाबा स्वतः एकाच कपड्यावर, चप्पल वर कित्येक दिवस राहतात पण आम्हाला प्रत्येक सण- वार मध्ये नवीन कपडे घेऊन देतात. माझ्या बाबांनी स्वतःच्या कुठल्याच गरजा पूर्ण केल्या नाहीत पण आम्हा मुलांना प्रत्येक गोष्टी वेळेवर पुरविल्या.

बाबा जसे आमच्या कुटुंबाचा संभाळ करतात त्याप्रमाणेच बाबा इतर लोकांशी, गावातील व्यक्तींची वागतात म्हणून गावामध्ये बाबांना सर्व लोक आदाराच्या भावनेने बघतात.

दारावर आलेल्या प्रत्येक व्यक्तीची विचारपूस करून त्यांना चहा, पाणी आणि कधी- कधी तर जेवायला सुद्धा देतात. बाबा नेहमी म्हणतात की ” अतिथी देवो भव: ” दारावर येणारा ओळखीचा असो किंवा अनोळखी व्यक्ती असो त्याला

देव समजून त्याची सेवा केली पाहिजे हे बाबांच्या संस्कारातूनच आमच्या मध्ये आलेला चांगल्या संस्काराचा एक नमुना आहे. म्हणून बाबा घरी आलेल्या प्रत्येक पाहुण्यांची चांगली काळजी घेतात.

बाबा जरी जास्त शिकलेले नसले तरी त्यांना चांगल्या – वाईट गोष्टींची बारकाईने पारखं आहे. ते आम्हाला नेहमी सत्याच्या व इमानदारीच्या मार्गावर जाण्याचा सल्ला देतात.

म्हणून मला कुठल्याही बाबतीत कशाची ही अडचण असल्यास मी पहिल बाबांचा सल्ला घेतो व बाबा जे काही त्या अडचणींवर उपाय सांगतील मी त्या उपायांच्या मार्गावर चालतो.

बाबांना आम्हाला बोलण्यासाठी जास्त वेळ मिळत नसली तरी सुद्धा बाबा कामातून थोडा वेळ काढून आम्हाला ज्ञान देत असतात. बाबांजवळ पुस्तकी ज्ञान जरी नसले तरी समाजामध्ये चांगले

व्यक्तिमत्व घडविण्यासाठी जे काही ज्ञान लागते ते बाबांजवळ खूप आहे. आणि याच ज्ञानाच्या आधारावर बाबा मला की चांगले वागण्याचे धडे शिकवत असतात. अनेक उदाहरणे देऊन बाबा चांगल्या – वाईट गोष्टींची माहिती करून द्यायला कंटाळा करत नाहीत.

बाबांचा स्वभाव जेवढा प्रेमळ आहे तेवढाच रागीष्ट ही आहे. आमच्या कडून किंवा आई कडून काही चूक झाल्यास बाबा आम्हाला रागवतात आणि समजून सुद्धा सांगतात म्हणून बाबांना माझ्या आयुष्या मध्ये खूप महत्त्वाचे स्थान आहे, थोडक्यात माझे बाबा माझा आधारस्तंभ आहेत.

बाबा माझ्या सोबत आहेत म्हणून मी आयुष्या मध्ये पुढे जाऊ शकलो. माझ्या घराचा पाया आणि छत्र हे माझे बाबाच आहे. त्यांना माझ्या जीवनात सर्वात पहिले आणि देवापेक्षा महत्त्वाचे स्थान राहील.

माझ्या आयुष्यातला मार्गदर्शक असलेला गुरु म्हणजे माझे बाबाच आहेत. त्यांनी माझ्यासाठी, माझ्या शिक्षणासाठी आणि माझ्या संपूर्ण कुटुंबांसाठी खूप कष्ट केलेले आहे.

मी त्यांच्या या कष्टाची जाणीव आयुष्यभर ठेवेन. माझ्या बद्दल बाबांचे असलेले स्वप्न म्हणजे मी मोठा होऊन शिक्षण शिकून डॉक्टर व्हावे हे मी नक्कीच पूर्ण करेन.

बाबांचे आजवरचे आयुष्य कष्ट करण्या मध्येच गेले त्यांना पुढील आयुष्यामध्ये मी कश्याचीही कमी न करता त्यांची सेवा करेन त्यांनी माझ्यासाठी केलेल्या कष्टाचे फळ मी त्यांना देईन माझ्या सर्व अडचणींमध्ये माझे बाबा आधारस्तंभ माझ्या सोबत उभे राहिले तर पुढील येणाऱ्या आयुष्यामध्ये मी बाबांचा आधारस्तंभ होऊन त्यांची सेवा करीन.

या जगामध्ये आई- बाबांना खूप महत्त्वाचे स्थान आहे. त्यांची जागा कोणीही घेऊ शकत नाही. किती धन, दौलत, पैसा असला आणि आई- बाबा नसेल तर त्या पैसा, दौलतला काहीही अर्थ नाही.

जीवनामध्ये कुठलीही दौलत कमवली नाही तरी चालेल व आई आणि बाबा ही दौलत कमवावी. पण आजच्या या काळात आई- बाबांचे महत्व कमी होत चालले आहे. त्यांना सांभाळायला, म्हातारपणी त्यांना आधार देण्यासाठी मागे- पुढे बघत आहेत. तर मी तसे न करता आई- बाबांची निस्वार्थपणे सेवा करेन.

आई- बाबांनी आपल्याला या जगात आणले एक सुंदर जीवन दिले त्यांनी केलेल्या या उपकाराची परतफेड आपण कुठल्याही परिस्थितीत करू शकत नाही.

माझे बाबा माझ्यासाठी माझे संपूर्ण जीवन आहेत. मी त्यांच्या चांगल्या वाईट दोन्ही परिस्थिती मध्ये त्यांच्या सोबत उभा राहील. त्यांनी माझ्या साठी केलेला त्यागांची व कष्टाची जाणीव ठेवेन.

बाबांनी मला एवढे प्रेम दिले चांगले संस्कार दिले मी ही बाबांना सदैव आनंदी ठेवून त्यांची सेवा करीन. मी माझ्या बाबांवर खूप खूप प्रेम करतो आणि हेच बाबा मला पिढ्या न पिढ्या मिळावे ही ईश्वर चरणी प्रार्थना करतो !

धन्यवाद मित्रांनो !


 

ये निबंध देखील अवश्य वाचा :-