जर मी शिक्षक झालो तर या विषयावर मराठी निबंध

जर मी शिक्षक झालो तर या विषयावर मराठी निबंध

शिक्षण हे एक प्रगतीचा मार्ग आणि या मार्गावर मार्गदर्शन करण्याचे महत्त्वपूर्ण काम शिक्षक करत असतात म्हणून आज मी तुमच्यासाठी मी शिक्षक झालो तर………..

हा निबंध मराठी भाषेत घेऊन येत आहे, या निबंधा मधून विद्यार्थ्यांना जी माहिती ती योग्य पद्धतीने मिळेल आणि हा निबंध तुम्हाला नक्कीच आवडेल.

जर मी शिक्षक झालो तर सर्व विद्यार्थ्यांना समानतेने व मनमोकळे पणाने वागेन. मुले शाळेमध्ये शिक्षकांच्या जबाबदारीने येत असतात. मी ती जबाबदारी योग्य रीतीने पार पाडेल.

मुलांना शिस्त लावण्याचे महत्त्वपूर्ण काम मी करेन. मी त्यांना अगदी सोप्या विद्यार्थ्यांना कळेल या सुलभ भाषेत त्यांना माझ्या विषयाचे पाठ शिकवणार.

शिकवून झाल्यानंतर जर काही विद्यार्थ्यांना समजले नसेल तर त्यांना तो पाठ बरोबर समजेपर्यंत पुन्हा- पुन्हा सांगत राहील. कारण शिक्षक हा एकमात्र असा व्यक्ती आहे जो विद्यार्थ्यांचे भविष्य घडवू शकतो

त्यांना योग्य मार्ग दाखवू शकतो म्हणून मी माझ्या वर्गातील कमकुवत विद्यार्थ्यांना व ज्यांना सांगितलेले, शिकवलेले चटकन कळत नाही त्या विद्यार्थ्यांकडे अतिरिक्त लक्ष देईन. असे म्हणतात की, कुंभार हा मातीच्या चिखला पासून मटकी बनवितो त्याला पाहिजे तसा आकार देतो, त्याचप्रमाणे शिक्षक सुद्धा विद्यार्थ्यांना पाहिजे ते योग्य ज्ञान देतात त्यांना चांगल्या- वाईट गोष्टीची शिकवण देतात मी ही त्याप्रमाणेच विद्यार्थ्यांना सर्व गोष्टींचे ज्ञान देऊन परिपूर्ण व्यक्ती बनविण्यासाठी प्रयत्न करेन.

मी विद्यार्थ्यांना फक्त पुस्तकी ज्ञान न देता त्या बाहेरील ज्ञान, सामान्य ज्ञान आयुष्य जगताना ज्या गोष्टींची आवश्यकता असते मी त्या सर्व गोष्टींचे ज्ञान विध्यार्थ्यांना देण्यासाठी प्रयत्न करेन. कारण मला असे वाटते की, विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञाना सोबत बाहेरचे ज्ञानाची ही गरज असते. जेव्हा विद्यार्थी बाहेर मुलाखतीला किंवा बाहेर मोठ्या लोकांना बोलतो तेव्हा त्याचे पुस्तकी ज्ञान विचारात न घेता बाहेरचे ज्ञान तपासले जाते.

मला असे वाटते की, शिक्षक असणे हे खरोखरच एक वरदान असते. जर मी शिक्षक झालो…… तर ते माझ्यासाठी खूप भाग्याचे ठरेल. शिक्षकांचा विद्यार्थ्यांच्या जीवनावर मोठा व महत्त्वाचा प्रभाव असतो कारण शिक्षकच विद्यार्थ्यांना सर्वोत्तम व्यक्ती बनण्यासाठी कारणीभूत असतात. त्याचप्रमाणे एक शिक्षकच विद्यार्थ्यांना वाईट मार्गावर घेऊन जाण्यास कारणीभूत ठरतात.

विद्यार्थी हे शिक्षकांकडून मूलभूत गोष्टी शिकत असतात. म्हणूनच शिकविणे आणि शिकणे हा एक व्यवसाय आहे. ज्यासाठी शिक्षकांना अतोतात कष्ट व परिश्रम घेणे आवश्यक असते. शिक्षकांचा प्रभाव हा विद्यार्थ्यांचे जीवनावर अमर राहतो. विद्यार्थ्यांच्या वागणुकी वरून शिक्षकांचे वर्तन कळले जातो. म्हणून मी शिक्षक म्हणून माझी सर्व कर्तव्य व जबाबदाऱ्या काय आहेत ते स्पष्टपणे समजून घेऊन व ते योग्य तऱ्हेने पूर्ण करण्यास प्रयत्न करेन.

जर मी शिक्षक झालो तर मी माझ्या शिकवण्याच्या पद्धतीला एक उत्कृष्ट दर्जा देऊन त्याला मनोरंजन व मजेदार बनवेल जेणेकरून विद्यार्थी माझ्या तासाला लक्ष देतील व त्यांना माझे शिकविणे आवडेल.

मी माझ्या सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्यातील चांगल्या गुणांची ओळख करून देऊन त्यांच्या कल्पनाशक्ती आणि विचारांना उडायला शिकवेन. जेणेकरून विद्यार्थ्यांना त्यांच्या परिस्थितीशी व संकटांशी तोंड देण्याची ताकद देईन.

मी माझ्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या अभ्यासा बाबतीत असणाऱ्या सर्व अडचणी मध्ये त्यांच्या सोबत उभा राहीन कारण विद्यार्थ्यांना समजून घेणे हा शिक्षकांची नैतिक व महत्त्वाची जबाबदारी असते. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मी कुठल्याही विद्यार्थ्याला कधीही कमी लेखणार नाही सर्व विद्यार्थ्यांना समान व एक दृष्टीने बघेन.

जर मी शिक्षक झालो तर मी विद्यार्थ्यांना बोलण्यास व सुसंवाद साधण्यास शिकवेन कारण आजच्या जगात बोलणाऱ्या व्यक्तींना खूप महत्त्व आहे. थोडे ज्ञान कमी असेल तर चालेल व विद्यार्थ्यांनी बोलले पाहिजे, आपल्या अडचणी शिक्षकांना सांगितल्या पाहिजेत म्हणून मी प्रथम प्राधान्य विद्यार्थ्यांना बोलण्यास शिकवेन नुसते बोलण्याची नव्हे तर विद्यार्थ्यांनी समोर स्टेज वर येऊन बोलण्यास सांगेन त्यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढेल व त्यांची भीती नाहीसे होईल.

मी विद्यार्थ्यांना एक चांगला व समजूतदार व्यक्ती बनवण्यासाठी प्रयत्न करेन कारण समजूतदार व्यक्ती समाज आणि राष्ट्र या दोघांसाठी चांगला मनुष्य ठरेल व प्रगतीच्या मार्गावर घेऊन जाण्यास कारणीभूत ठरेल. मला कधी ही कोणी विचारले की तु मोठे होऊन काय बनणार तर मी सर्वांना गर्वाने म्हणेल की, मला शिक्षक व्हायचे आहे कारण मला शिक्षक होऊन विद्यार्थ्यांना शिकवायचे आहे.

जर मी शिक्षक झालो तर मी माझे भाग्यच समजेल कारण शिक्षक हा शाळेतला गुरु असतो. व गुरुला देवाचे स्थान दिले जाते, कारण शिक्षकच विद्यार्थ्यांना घडवीत असतात.

शिक्षक विद्यार्थ्यांना उद्याचे भविष्य घडविण्याची ताकद देत असतात. येणाऱ्या पिढीचे डॉक्टर, इंजिनीयर, शास्त्रज्ञ, शिक्षक व एक चांगला माणूस होण्याचे ज्ञान अर्पण करण्याचे काम हे एका शिक्षकाचे असते व मी ते काम पूर्ण जबाबदारीने पार पाडीन.

शिक्षकाचे कर्तव्य म्हणजे विद्यार्थ्यांना फक्त पुस्तकी ज्ञान देणे, शिकविणे एवढेच नव्हे तर विद्यार्थ्यांना उच्च कर्तव्य त्यांच्या जबाबदारी कोणत्या याची जाणीव करुन देणे हे सुद्धा शिक्षकाचे काम असते.

मी आजवर पाहत आलो की, बरेच शिक्षकांना आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांकडे पाहिजे तेवढे लक्ष नसते. त्यांना आपल्या वर्गातील मुला- मुलींचे नावे सुद्धा माहिती नसतात. ते शिक्षक फक्त वर्गातल्या हुशार विद्यार्थ्यांकडे लक्ष घालतात बाकी विद्यार्थ्यांकडे लक्ष देत नाहीत तर मी तसे न करता सर्व विद्यार्थ्यांना समान दृष्टिकोनाने बघेन.

सर्व विद्यार्थ्यांची ओळख करून घेऊन सगळ्यांना लक्ष देईन व वर्गातल्या मुली विद्यार्थींन कडे विशेष लक्ष देईन कारण मुलींचा स्वभाव हा लाजाळू असतो, त्या आपल्या अडचणी लवकर कोणाला सांगत नाहीत.

म्हणून मी मनमोकळे पणाने वर्गातल्या सर्व विद्यार्थींनी सोबत राहीन जेणेकरून त्या स्वतःहून मला त्यांच्या अडचणी सांगतील. मी प्रत्येक विद्यार्थ्यांचा स्वभाव व व्यक्तिमत्व ओळखून घेण्यास प्रयत्न करीन.

विद्यार्थ्यांच्या बुद्धीचा विकासा सोबतच त्यांच्या सर्वांगीण गुणांची विकास होणे तितकेच गरजेचे असते म्हणून मी शाळेमध्ये आठवड्यातून दोन तास खेळाचे एक तास व्यायाम साठी निवडेन.

तसेच वर्षातून एक आठवडा क्रीडा स्पर्धेचे आयोजित करेन. व डान्स स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा, मेहंदी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा व अन्य अनेक स्पर्धा अशा सर्व स्पर्धांचे आयोजित करेन ज्यामुळे विद्यार्थ्यांना शाळा शिकण्यास आणखी रुची वाढेल.

या सर्व स्पर्धा सोबतच विद्यार्थ्यांना दैनंदिन चालू घडामोडींचा आढावा कळावा म्हणून रोजच्या रोज वर्तमानपत्रे वाचून दाखवेन व महिन्यातून एकदा सामान्य ज्ञानाच्या निगडीत एक पेपर घेईन ज्यामुळे विद्यार्थी मन लावून अभ्यास करतील.

मुलांना शिस्त असणे खूप गरजेचे असते. नीट रहाणे, टीप टॉप दिसणे, चांगले बोलणे, चांगले वागणे ही चांगल्या व्यक्तिमत्त्वाची लक्षणे आहेत. म्हणून मी विद्यार्थ्यांना व्यवस्थित शिस्तबद्ध राहण्यासाठी सांगेन.

विद्यार्थ्यांवर रागाने किंवा कठोरतेने सांगितल्यास विद्यार्थी ऐकत नाहीत म्हणून मी विद्यार्थ्यांना जेवढं होईल तेवढं प्रेमाने समजून सांगेन . कारण विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शिक्षकांची चांगली प्रतिमा बनायला हवी.

प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात शिक्षकांची भूमिका अत्यंत आवश्यक व महत्त्वाचे असते. शिक्षक विद्यार्थ्यांना जे शिकवितात ते योग्य आहे का अयोग्य आहे याची जाणीव विद्यार्थ्यांना असलाच पाहिजे. आपण काय करणे योग्य ठरेल व आपण कुठे चुकतो, आयोग्य वागतो हे सांगणारे एक शिक्षकाचा असतात.

शिक्षक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत असतात त्यामुळे शिक्षकांचे विचार हे सकारात्मक असायला हवे. त्यामुळे मी शिक्षक झाल्यास माझी जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडीन.

विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये आई- वडील यांच्या नंतर जी कोण महत्त्वाची व योग्य मार्गावर घेऊन जाणारी व्यक्ती म्हणजे शिक्षकच असतो. त्यामुळे मी शिक्षक झालो तर प्रथमतः मी सर्व विद्यार्थ्यांना कधीही आणि कुठेही मदत करणार विद्यार्थ्यांच्या पालकां प्रमाणेच मी सुद्धा विद्यार्थ्यांची काळजी घेईन.

मी माझ्या सर्व विद्यार्थ्यां सोबत मैत्रीपूर्ण संबंध बनवून ठेवेन. माझे सर्व विद्यार्थी खुल्या मनाचे असावेत जेणेकरून ते मला त्यांच्या सर्व अडचणी सांगतील मग त्या अभ्यासा व्यतिरिक्त अडचणी असल्या तरी सुद्धा मी सल्ला देईन.

जर मी शिक्षक झालो तर माझ्या सर्व जबाबदाऱ्या चांगल्या पद्धतीने नक्कीच पार पाडीन.

धन्यवाद मित्रांनो !


ये निबंध देखील अवश्य वाचा :-