महात्मा गांधी मराठी निबंध । Mahatma Gandhi Essasy in Marathi

महात्मा गांधी मराठी निबंध । Mahatma Gandhi Essasy in Marathi

आपल्या भारत देशात अनेक शूरवीर नेते व व्यक्तिमत्व होऊन गेले त्यांनी आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले आणि त्यात ते सफल सुद्धा झाले तरी आजच्या या निबंधामध्ये आपण एक महान व्यक्ती बद्दल माहिती बघणार आहोत ती म्हणजे ” महात्मा गांधी”.

आपण जरी ” बापू” म्हणून ओळखत असलो तरी महात्मा गांधीजींचे संपूर्ण नाव ” मोहनदास करमचंद गांधी” आहे. त्यांचा जन्म ऑक्टोबर २ इ. स. १८६९ मध्ये गुजरात मधील पोरबंदर येथे झाला.

महात्मा गांधी मराठी निबंध । Mahatma Gandhi Essasy in Marathi

गांधीजींच्या वडिलांचे नाव करमचंद आणि आईचे नाव पुतलीबाई होते. गांधीजींचे कुटुंब हिंदू जातीचे होते. सुरुवातीचे शिक्षण गांधीजींनी या गुजरातमध्ये केले व शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर वयाच्या एकोणिसाव्या वर्षी इ. स. १८८८ मध्ये गांधीजी इंग्लंड मधील लंडनला युनिव्हर्सिटी कॉलेज मध्ये वकिलीचे शिक्षण घेतले.

तेथे त्यांनी इनर टेंपल या गावी राहून बॅरिस्टर होण्यासाठी भारतीय कायदा आणि न्याय शास्त्राचा अभ्यास केला. इंग्लंडमध्ये कायद्याचा अभ्यास करून ते बॅरिस्टर बनून भारतात येऊन वकिली करू लागले.

महात्मा गांधी मराठी निबंध

महात्मा गांधीजींनी भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील प्रमुख नेते होते व या संग्रामामध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. महात्मा गांधींनी अहिंसात्मक असहकार आंदोलनांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले.

अहिंसात्मक मार्गांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी गांधीजींनी संपूर्ण जगाला प्रेरित केले. भारतीय स्वतंत्र्याचे शिल्पकार म्हणून संपूर्ण जगात महात्मा गांधीजींना ओळखले जाते. म्हणूनच गांधीजींना ” राष्ट्रपिता” असा दर्जा देण्यात आला. रवींद्रनाथ टागोर यांनी सर्वप्रथम गांधीजींना महात्मा म्हणून संबोधले होते. महात्मा म्हणजे महान आत्मा आणि तेव्हा पासून आज पर्यंत गांधीजींच्या नावासमोर महात्मा हा शब्द जोडला जातो.

सर्वप्रथम गांधीजींनी वकिल या पदवीच्या सहाय्याने दक्षिण आफ्रिका मधील भारतीय लोकांच्या नागरिकताच्या हक्कासाठी सत्याग्रह केला व १९१७ मध्ये गांधीजी भारतामध्ये परत आले. व त्यांनी भारतामध्ये शेतकऱ्यांसाठी कामगारांना एकत्र करून अत्याधिक जमीन कर व शेतसारा यांवर भेदभाव विरुद्ध लढा देण्यासाठी एकत्र केले. १९२१ मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला संभाळले नंतर त्यांनी देशातील गरीबी दूर करण्यासाठी प्रयत्न केले,

महिलांच्या अधिकारासाठी लढा दिला तसेच गांधीजींनी धर्म, जातिभेद दूर करून सर्वत्र एकता व आत्मनिर्भरता साठी अनेक ठिकाणी जाऊन कार्यक्रम केले.

या सर्व कार्यक्रमांमध्ये विदेशी राज्य मधून मुक्ती देणारा स्वराज्य प्राप्तीचा कार्यक्रम मुख्य होता. गांधीजीने ब्रिटिश सरकार मार्फत भारतीय लोकांवर लावलेला मिठाच्या कराच्या विरोधात १९३० मध्ये मिठाचा सत्याग्रह केला. आणि त्यानंतर १९४२ मध्ये इंग्रज भारत छोडो आंदोलन करून संपूर्ण देशात प्रसिद्धी मिळवली.

गांधीजीने प्रत्येक परिस्थिती मध्ये अहिंसा आणि सत्याचा मार्ग स्वीकारला आणि त्याच्या सर्व नियमांचे पालन केले म्हणून महात्मा गांधींना अहिंसा व सत्याचे पुजारी म्हणून सुद्धा ओळखले जाते.

सत्याच्या व अहिंसेचा मार्ग सर्वांनी पाळावा म्हणून काही काळ गांधीजींनी वकिली केली. महात्मा गांधी चे संपूर्ण जीवन साबरमती आश्रम मध्ये गेले. गांधीजी भारतीय संस्कृती मधील परंपरागत पोशाख धोती आणि सुती कपडा ची शाल गांधीजी घालत असत.

दक्षिण आफ्रिका मध्ये भारतीयांना होणाऱ्या भेदभावा बद्दल गांधीजींनी सामना केला. त्या दरम्यानात गांधीजीं ना अनेक समस्यांचा सामना करायला लागला सुरुवातीला गांधीजींना प्रथम श्रेणी कोच ची वैध तिकीट असून सुद्धा त्यांना तिसऱ्या श्रेणीच्या डब्बा मध्ये जाण्यास सांगितले त्याकरिता गांधीजींनी नकार दिला त्यामुळे त्यांना रेल्वेतून बाहेर फेकण्यात आले.

त्यांनी या आंदोलनासाठी अनेक समस्यांना तोंड दिले. आफ्रिका मधील हॉटेलांमध्ये गांधीजींना राहण्यासाठी परवानगी दिली नाही. दक्षिण आफ्रिका मध्ये भारतीयां विरुद्ध होणाऱ्या अन्याया विरुद्ध लढा देताना

महात्मा गांधी ने अंग्रेजी साम्राज्याच्या अंतर्गत असलेल्या भारतवासी लोकांच्या सन्मानासाठी न्यायालयामध्ये अनेक प्रश्न केले हे आंदोलन साधारणता ( १८९३ – १९१४ ) २० वर्षे चालले. पण शेवटी गांधीजींना यामध्ये सफलता मिळाली

तसेच. १९०६ मध्ये झुलू दक्षिण आफ्रिका मध्ये नवीन निवडणुका दरम्यान कर लादण्यात आला आणि या दरम्यान ब्रिटिश मधील दोन अधिकाऱ्यांना मारण्यात आले. त्यांच्या बदला घेण्यासाठी ब्रिटिशांनी जुलू के खिलाफ युद्ध पुकारले. गांधीजींनी भारतीयांना या मध्ये भरती करण्यासाठी ब्रिटिश अधिकाऱ्यांना प्रेरित केले.

त्यानंतर गांधीजींनी पहिल्यांदा १९१८ मध्ये चम्पारन सत्याग्रह आणि खेडा सत्याग्रह नावाचे आंदोलन केले. गांधीजी पहिल्या पासूनच अस्पृश्यता आणि अहिंसाचे विरोधी होते. त्यासाठी गांधीजींनी असहयोग, अहिंसा आणि शांतीपूर्ण प्रतिकार च्या विरोधान ब्रिटिशां विरोधात आंदोलन केले.

दांडी मध्ये गांधीजींनी ५ एप्रिल १९३० मध्ये मिठाचा सत्याग्रह केला. या आंदोलनाच्या आठवणी मध्ये ४०० किलोमीटर पर्यंतची यात्रा, अहमदाबाद ते दांडी, गुजरात पर्यंत हे आंदोलन चालले आहे. यामुळे आपल्या भारत देशात स्वतः मिठाचे उत्पादन केले जाऊ लागले.

नंतर द्वितीय विश्व युद्ध ( दुसरे महायुद्ध ) आणि भारत छोडो आंदोलनाच्या दरम्यान गांधीजीने ब्रिटिशांच्या प्रयत्नांना हिंसात्मक नैतिक सहयोग देण्याचा पक्ष घेतला. गांधीजींचे जीवन मध्ये काही सिद्धांत होते आणि त्यांचे जीवन याच सिद्धांतामध्ये गेले.

  •  १) सत्य :-

गांधीजींचे संपूर्ण जीवन सत्याच्या मार्गाला अर्पण केले. त्यांनी लक्ष प्राप्तीसाठी आपली स्वतःच्या चुकीवर आणि स्वतःवर प्रयोग करत नवीन काही शिकण्याचा प्रयत्न केला. गांधीजींनी स्वतःच्या आत्म कथेला सत्याचा प्रयोग असे नाव दिले.

  • २) अहिंसा :-

गांधीजी आपल्या जीवनामध्ये सदैव अहिंसाच्या मार्गावर चालले. त्यांनी कधीही कोणावर अन्याय केला नाही व हिंसा ही देखील केलेली नाही.

  • ३) शाकाहारी वृत्ती :-

गांधीजींनी लहानपणापासून मासाहारी जेवण खाल्ले नाहीत. गांधीजी गुजरात राज्यात राहत होते आणि तिकडे सर्वाधिक लोक शाकाहारी जेवण करत म्हणून गांधीजी शाकाहारी वृत्तीचे होते .

अशा या महात्मा गांधींजी ३० जानेवारी १९४८ मध्ये नथुराम गोडसे यांच्या हाती गोळी मारून गांधीजींची हत्या केली गेली.


ये निबंध देखील अवश्य वाचा :-