वेळेचे महत्व निबंध मराठी मध्ये । Importance of time Essay in Marathi

वेळेचे महत्व निबंध मराठी मध्ये । Importance of time Essay in Marathi

आपण सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपण्याच्या वेळे पर्यंत कित्येक कामे करत असतो, प्रत्येक कामाला आपण विशिष्ट वेळ देतो व ते काम तेवढ्याच वेळेत पूर्ण व्हावे म्हणून प्रयत्न करत असतो.

आपल्या आसपासच्या परिसरा मध्ये आपण बघतो. की काही व्यक्ती असे असतात की ते आपली सर्व कामे वेळेवर किंवा वेळेच्या अगोदर करून बाकीचा वेळ मध्ये नवीन काहीतरी शिकत असतात

अर्थात त्या व्यक्तीला वेळेचे महत्त्व माहिती असते व वेळ किती महत्त्वाचे आहे ते समजलेले असते. तरी आजच्या निबंधा मध्ये याच वेळे बद्दल माहिती व वेळेचे महत्व या विषयावर निबंध बघणार आहोत.

वेळेचे महत्व निबंध मराठी मध्ये । Importance of time Essay in Marathi

आपल्या जीवना मध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट काय असेल तर ती म्हणते वेळ. कारण आपल्याला आयुष्य हे एकदाच मिळते याच आयुष्या मध्ये आपण काय करायचं आहे.

ते करू शकतो आणि त्या साठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे वेळ वेळेचे, योग्य नियोजन करून आपली कामे त्याच वेळे मध्ये पूर्ण करून वेळेचा सदुपयोग करणे हे बुद्धिमान माणसाचे लक्षण आहे असे समजले जाते.

वेळ किती महत्त्वाचे आहे याची उदाहरण म्हणजे फ्रान्स चा सम्राट नेपोलियन बोनापार्ट हा त्या काळाचा महान विजेता होता. पण वाटरलू येथे इंग्रजा बरोबर झालेल्या एका युद्धामध्ये त्याची अतिशय खराब पद्धतीने पराभव झाला, त्या पराभवाच्या मागचे कारण म्हणजे युद्धाच्या वेळी सेनापतीची निवड करण्यासाठी अर्धा तास उशीर झाला व त्या सेनापतीची मदत नेपोलियनला मिळाली नाही या कारणामुळे तो अपयशी ठरला म्हणजे त्याच्या जीवनातला वाया गेलेला तो अर्धा तास त्याच्या पराभवाला कारणीभूत ठरला यावरुन आपल्याला कळेल की, जीवनात वेळ किती महत्त्वाचे आहे.

म्हणून वेळेचा सदैव सदुपयोग केला पाहिजे. आपल्या जीवनामध्ये पैसा खर्च केला तर काम करून तो पुन्हा कमविता येतो व गेलेली मौल्यवान वेळ पुन्हा कधीच येत नाही. म्हणून आपल्या जवळ असलेल्या वेळेला किंमत देऊन त्या वेळेचा सदुपयोग केला पाहिजे.

संत कबीर दास यांनी वेळेचे महत्त्व सांगताना त्यांच्या दोहे मध्ये लिहिले होते की, ” उद्या करायची काम आज करा, आणि आज करायची कामे आत्ताच करा “. याचा अर्थ असा की एखादे काम उद्यावर टाकून न टाळता ते काम आज करून आपल्या जवळ असलेल्या वेळेचा योग्य फायदा करून घ्यावा या अनुषंगाने आपण आपली सर्व कामे वेळेत पूर्ण करू व भविष्यात आपल्याला कशाची चिंता व काळजी करायची वेळ येणार नाही.

वेळ ही अशी एक मात्र गोष्ट आहे. जी कधीही आणि कुठेही कोणासाठी थांबत नाही, त्यामुळे जी व्यक्ती वेळे सोबत प्रवास करून वेळेचे महत्त्व समजून घेतात तीच व्यक्ती जीवनात यशस्वी होतात.

आपण कुठल्याही यशस्वी व्यक्ती सोबत संवाद साधल्यास आपल्याला समजेल की, त्यांच्या यशा मागील महत्त्वाचे कारण म्हणजे वेळ. यशस्वी व्यक्ती लहानात लहान गोष्ट जरी करायचे असेल तर, ती वेळेच्या आतच करत असतात.

ज्यामुळे त्यांना वेळ नाही म्हणून पश्चाताप करावा लागत नाही. आपल्या देशातील महा पुरुष, साधू- संत त्यांच्या लेखातून वेळेचे महत्व काय याचेच महत्त्व सांगत आले आहेत. राष्ट्रपिता म्हणून ओळखले जाणारे महात्मा गांधी हे आपले काम स्वतः करत व ती वेळेवरच पूर्ण करत असत.

आपण बऱ्याच वेळी बघत असतो की काही लोक वेळेला किंमत व महत्त्व न देता वेळेचा कसा ही वापर करतात व नंतर वेळ नाही म्हणून रडत बसतात व पश्चाताप करतात, हे असे न करता वेळ आपल्या साठी खूप महत्त्वाची आहे.

या संपूर्ण जगामध्ये प्रत्येक व्यक्तीला वेळ ही सारखीच दिलेली असते, पण काही लोक वेळेचा सदुपयोग करून यशस्वी होतात तर काही लोक वेळेचा दुरुपयोग करून आपलेच आयुष्य खराब करीत असतात.

प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये वेळ खूप महत्त्वाचे आहे. म्हणून आपल्याला लहान वयात व शालेय जीवनामध्ये वेळेचे महत्त्व समजावून सांगितले जाते. ” आळस हा माणसाचा शत्रू आहे ”

ज्यामुळे आपला आयुष्य खराब सुद्धा होऊ शकते. म्हणून अंगातला आळस हा गुण काढून टाकून वेळेला महत्त्व दिले पाहिजे. जे व्यक्ती वेळेचे महत्त्व समजून काम करतात ती आयुष्यात नक्कीच यशस्वी होत असतात.

जर कोणाला एक वर्षे वेळेचे महत्व काय आहे हे माहिती करून घ्यायचे असेल तर परीक्षेमध्ये नापास झालेल्या विद्यार्थ्याला विचारा त्याच्या पेक्षा जास्त कोणी सांगू शकणार नाही. ही एक वर्षे किती महत्त्वाचे आहे. आणि नऊ महिन्याचे महत्व काय आहे ते एक स्त्रीला विचारा जी नऊ महिने आपल्या बाळाला पोटात सांभाळते. वेळ ही खूप अनमोल गोष्ट ज्याची तुलना आपण कुठल्याही इतर गोष्टीं सोबत करू शकत नाही.

वेळेचे महत्त्व सर्वांनी तर करायला पाहिजे पण नव- युवकांनी वेळे बाबतीत जास्त जागरुक असलं पाहिजे. शालेय व महाविद्यालयीन जीवनां मध्ये आपण आपल्या भविष्यासाठी शिकत असतो मग त्यासाठी आपण योग्य पाऊल उचलले पाहिजे. म्हणजेच वेळेनुसार केलेले काम आपल्याला नक्कीच यशस्वी बनवेल. प्रत्येक व्यक्तींनी आपल्या दैनंदिन जीवनात करणाऱ्या प्रत्येक कामाचे एक वेळापत्रक तयार करून त्यानुसार आपली कामे केली पाहिजेत.

वेळ ही एक मात्र अशी गोष्ट आहे जी अनिश्चित आहे. आपल्या येणाऱ्या भविष्यात कधी काही होईल हे कोणालाही मोठा ज्योतिषी किंवा मोठा प्रसिद्ध व्याख्याता शास्त्रज्ञ असो तो ही सांगू शकत नाही.

त्यामुळे आपल्या जीवनातला प्रत्येक क्षण हा आनंदानी जगता आलं पाहिजे आणि आपल्या येणाऱ्या भविष्यासाठी योग्य योजना केल्या पाहिजेत भूतकाळात झालेल्या चुकांना आठवण करून रडत बसण्यापेक्षा त्या चूकांपासून आपण काय शिकलो हा विचार केला पाहिजे.

वेळ ही जगातील कोणत्याही हिऱ्या पेक्षा, खजिना पेक्षा व धातू पेक्षा अधिक मौल्यवान आहे कारण एकदा गेलेली गोष्ट कधीही परत येऊ शकत नाही. आत्तापर्यंत या पृथ्वीवर अनेक राजे, महाराज, सम्राट, महान संत व अनेक जिज्ञासू शास्त्रज्ञ होऊन गेले पण यांपैकी कोणीही वेळेवर विजय मिळवू शकले नाही.

किती मोठ्या सत्ता व महासत्ता होऊन गेल्या पण काळाची/ वेळेची सत्ता जिंकू शकले नाहीत. अनंत काळापासून वेळही चालत आलेली आहे आणि भविष्य काळात या पृथ्वीवर कोण असो या नसो वेळ मात्र नक्कीच असणार

कारण वेळ ही कधीही आणि कुठेही कोणासाठी थांबत नाही म्हणून आजवर वेळेवर कोणीही राज्य केलेले नाही, वेळ स्वतःच्या मर्जीने चालत राहते व सर्वांनाच नि: स्वार्थी पणाने संधी देत पुढे जात असते.

कोण गरीब, श्रीमंत, उच्च, निच्च, लहान- मोठा असा भेदभाव न करता सर्वांच्या आयुष्या- मध्ये समान विभागलेली असते ती म्हणजे वेळच. पण त्या वेळाचे सदुपयोग कसा करायचा.

वेळेचा फायदा कसा करायचा ते अवलंबून असते. म्हणजे आपल्यावर, ज्या व्यक्ती हुशारीने व चतुराईने संधीचा व वेळेचा फायदा करून घेतात त्याच व्यक्ती जीवनामध्ये प्रगती करतात.

वेळेचा सदुपयोग करायचा असेल तर सर्वप्रथम स्वतःला शिस्त लावून घेणे सर्वात महत्त्वाचे आहे. घरातील सर्व कामे वेळेवर करणे, वेळेवर झोपणे व वेळेवर उटणे, ठरवलेले सर्व कामे वेळेवर करून घेतली पाहिजेत. वेळेवर शाळेला- ऑफिसला किंवा अन्य कामाला जाणे किंवा येणे हे योग्य त्या ठरलेल्या वेळेवरच केले पाहिजे.

विद्यार्थ्यांनी अभ्यासाचे योग्य नियोजन करून त्या प्रकारे वाटचाल केली पाहिजे. कुठलीही गोष्ट पुढे न ढकलता वेळेवर केली पाहिजे. वेळ वाया घालवणे हे अपयशाकडे घेऊन जाते व वेळचा दुरुपयोग करूने नाशवंती लोकांचं लक्षण आहे. आणि वेळेचे महत्त्व समजून न घेणे हा सर्वात मोठा वेडेपणा आहे. काही लोक उशीर पर्यंत झोपत असतात. आपला किमती वेळ गप्पा मारण्यात जातो, एखाद्याची निंदा करतात अशा लोकांचे जीवन बरबाद होते.

ते लोक वेळेला महत्व न देता वेळ वाया घालवतात. तर वेळ त्या लोकांचे आयुष्य वाया घालवते. म्हणून वेळेचा सदुपयोग करणे हा चांगला उपाय आहे. आपल्या जीवनातला एक- एक क्षण हा मौल्यवान आहे. वेळ वाया घालवणे म्हणजे आपले जीवन वाया घालवण्या सारखे आहे. म्हणून वेळेचे महत्त्व जाणून घ्या आणि जास्तीत जास्त वेळ आपल्या कामाला द्या व वेळेचा सदुपयोग करा.

वेळेला महत्त्व देणे आणि वेळेचे योग्य व्यवस्थापन करणे ही सध्याच्या काळाची गरज आहे. कारण ” Time is Money ”

धन्यवाद मित्रांनो !


ये निबंध देखील अवश्य वाचा :-