राष्ट्रीय प्राणी वाघ वर मराठी निबंध । Essay On Tiger in Marathi
प्रस्तावना :
भारताचा राष्ट्रीय प्राणी म्हणून ओळखला जाणारा सर्व प्राण्यांपेक्षा हिंसक व अतिशय शक्तिशाली चपळ प्राणी म्हणजे वाघ. सर्वसाधारण परिचयाचा सर्वांने कुठे ना कुठे वाघा बद्दल ऐकलेच असेल. व सामान्यता कुठेही न दिसणारा परंतु घनदाट जंगलामध्ये आवश्य आढळणारा क्रूर प्रकारचा प्राणी आहे वाघ.
वाघ हा मार्जार कुळातील व मांजरीच्या प्रजाती मधील सर्वात मोठा प्राणी आहे. व वाघाला अन्न साखळी मध्ये अनन्य साधारण व सर्वात महत्वाचे टोकाचे स्थान आहे.
राष्ट्रीय वाघ वर मराठी निबंध । Essay On Tiger in Marathi
Table of Contents
आपण जरी वाघ म्हणून ओळखत असलो तरी वाघ या नावाची उत्पत्ती संस्कृत भाषेमधील व्याघ्र या शब्दापासून झाली आहे.
आपण मराठीत वाघ म्हणतो आणि खूप मोठ्या वाघ आला ढाण्या वाघ सुद्धा म्हणतात व इंग्रजी भाषेत वाघाला टायगर असे म्हटले जाते.
राष्ट्रीय प्राणी वाघ वर मराठी निबंध
भारत देशाला वाघाचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. सोबतच ब्रह्मदेश, थायलँड, चीन व रशिया या देशात सुद्धा वाघाचे अस्तित्व आढळते. प्रत्येक देशाच्या प्राणी संग्रहालयांमध्ये वाघ बघायला मिळतो.
वाघा हा मांजरांच्या कुटुंबातील, फेलिडे याचा सर्वात मोठा जिवंत प्राणी आहे. वाघ एक शिकारी प्राणी असून तो स्वतः शिकार करून मांस खातो. वाघाच्या संख्येतील एकूण ७०% वाघ भारतामध्ये आढळतात.
वाघाचे वर्णन :
वाघ हा वर वर्णन केल्या प्रमाणे मार्जार कुळातील सर्वात मोठा व हिंसक प्राणी आहे. वाघाचा आकार हा तो आढळतो त्या स्थानिक परिस्थिती प्रमाणे कमी जास्त असतो.
सायबेरियन वाघ हा भारतीय वाघापेक्षा आकाराने मोठा असतो. सायबेरीयन वाघ हा ३.५ मीटर लांब असतो तर त्याचे वजन ३०० किलो असतो तर भारतीय वाघ ३ मीटर लांब व १०० ते १८० किलोपर्यंत वजनाचा असतो.
तर सुमात्रा मधील वाघ हा आणखी लहान असतात. मुख्यत: वाघांच्या अंगावर काळे पट्टे व तांबूस रंगाची फर असते, त्यांच्या याच पट्ट्यां वरून वाघाला ओळखले जाते.
प्रत्येक वाघाच्या अंगावरील पट्टे हे वेगवेगळे असतात. व वाघाच्या अंगावरचे हे पट्टे साधारणता १०० पट्टे असतात. याच पट्ट्यांचा उपयोग करून घनदाट झाडांमध्ये लपतात.
तसेच प्रत्येक वाघाच्या पंजांची रचना ही वेगळी असते व याच पंज्यांच्या ठश्यावरून वाघांची गणना केली जाते. वाघाचा पंजा हा आकाराने खूप मोठा व ताकदवान असतो, साधारणता वाघाच्या पंज्याचा व्यास हा ६ ते ८ इंच इतका भरतो.
आणि वाघाच्या याच पंज्या व जबडा खूप ताकदवान असतो व त्यांमध्ये सुळे दात असतात त्यांच्या सही आणि तो भक्ष्याला पकडतो व ओढून घेऊन जातात.
असे म्हणतात की, वाघाला पाणी खूप आवडते म्हणून उन्हाळ्याच्या दिवसात वाघ पाण्यात बसलेले दिसतात व स्वतःला थंड ठेवतात.
वाघाचे वस्तीस्थान :
वाघ मुख्यतः दाड व अतिशय घनदाट झाडींच्या जंगलात राहतात. वाघ हा मांसाहारी प्राणी असल्याने तो इतर प्राण्यांची शिकार करून त्यांच्या मांसावर आपली उपजीविका करतो.
म्हणून वाघ हा जंगलांमध्ये आढळतो प्रत्येक वाघांचे शिकारीचे क्षेत्र हे साधारणता १०० चौ. किमी एवढे असते त्यामुळे वाघ मोठ्या जंगलात पाहायला दिसतात. म्हणूनच पूर्वीच्या मध्यम आकारांच्या जंगलामध्ये वाघ आढळत नाही व आज ती जंगले लहान झाल्याने वाघांचे अस्तित्व कमी होत आहेत.
भारतातील महाराष्ट्र राज्यामधील सह्याद्री जंगल व कोकणातील जंगले यांमध्ये वाघाचे अस्तित्व दिसत नाही. भारतामधील पानगळी जंगलांमध्ये वाघांचे सर्वाधिक वस्तीस्थान बगायला मिळते सोबतच सुंदरबन, ओडिसा, हिमालय व तराई विभाग व अरवली पर्वताच्या पूर्व भागातील शुष्क जंगलांमध्ये वाघांचे अस्तित्व आढळते.
भारतामध्ये २०१४ साली वाघांची संख्या २,२२६ होती व पुढे ती २०१८ साली २,९७६ एवढी झाली. वाघांची संख्या भारतात जरी सर्वाधिक असला तरी अलीकडे भारतात देखील वाघ हळू- हळू दुर्मिळ होत असून त्यांची संख्या चिंताजनकच आहे.
वाघाचे प्रजनन :
वाघ हा माणसा प्रमाणेच जरायुज गटात येतो करत तो बछड्यांना जन्म देतो. वाघांच्या पिलांना बछडा असे म्हणतात.
मादी वाघ ही वर्षातून थोडे दिवस माजावर असते व त्याच काळात ती नर वाघाशी संलग्न करून प्रणयराधना करते. मोठमोठ्याने डरकाळ्या फोडत वाघांचा समागम चलतो व त्या दरम्यान नर वाघ मादी वाघाची मान आपल्या जबड्याने पकडतो. मादी वाघाला गर्भ धरणा झाल्यानंतर १६ आठवड्याच्या काळानंतर ती ३ ते ४ या प्रमाणात बछड्यांना जन्म देते.
वाघाच्या बछड्यांचा पूर्ण वाढ होण्यासाठी १८ महिने म्हणजेच दीड वर्षे लागतात. हे दीड वर्षे मादी वाघ पिलांचा सांभाळ करते. लहानपणी वाघाची पिल्ले खूप खेळकर असतात पण पिल्ले जसजशी मोठी होतात
तशी मादी वाघ पिलांना शिकार कशी करावी याची शिकवण देते सुरुवातीला ती अर्धमेल्या प्राण्यांवर शिकार करण्याचे शिक्षण देते व हळू- हळू जिवंत सजीवांवर आक्रमण करण्यास शिकवते. पिल्ले मोठी झाल्यास स्वतः शिकार करण्यास सक्षम होतात.
पूर्ण वाढ झालेला वाघ साधारणता ६५ किलोमीटर / तास इतक्या वेगाने चाल करून जाऊ शकतो. वाघाची एक ढांग ही ५ ते ६ मीटर पर्यंतची असते. हरण, सांबर यांची शिकार करणे वाघाला आवडते व सांबरचे मांस वाघाचे सर्वांत आवडीचे मांस समजले जाते. वाघ अतिशय चतुराईने व चपळाईने शिकार करत असतात.
वाघाच्या उपप्रजाती :
वाघाच्या स्थानिक परिस्थिती नुसार व त्याच्या आकारमानानुसार वाघाच्या अनेक उपप्रजाती पडतात.
इंडो चायनीज वाघ :
हा वाघ मुख्यतः अशियाच्या ईशान्य भागात दिसून येतो त्यामध्ये ब्रह्मदेश, थायलँड, मलेशिया या देशांचा समावेश होतो. यात नर वाघाचे वजन १५० ते १९० किलोपर्यंत तर मादी वाघाचे वजन १०० ते १३० किलोपर्यंत असते.
मलेशियन वाघ :
हा वाघ मुख्यतः मलेशियातील दक्षिण भागात आढळून येतो. मलेशियन वाघ राष्ट्रीय चिन्हावर असल्याचे दिसते.
सुमात्रन वाघ :
सर्वात लहान आकाराचा वाघ म्हणून सुमात्रन वाघ ओळखला जातो. हा वाघ इंडोनेशियाच्या सुमात्रा बेटावर आढळून येतो. यातील नर वाघाचे वजन १०० ते १३० किलो असते तर मादी वाघाचे वजन ७० ते ९० किलो असते हा वाघ अतिशय घनदाट जंगलात आढळते.
सायबेरियन वाघ :
सर्वात मोठ्या आकाराचा वाघ म्हणून सायबेरियन वाघाला ओळखले जाते. हा वाघ रशिया मध्ये आढळतो. या वाघाला, कोरियन वाघ किंवा उत्तर चीनी वाघ असे म्हणतात.
दक्षिण चीनी वाघ :
हा वाघ अलीकडे नष्ट झाल्याची चिन्हे दिसत आहेत कारण १९८३ ते २००७ मध्ये एकही चीनी वाघ बघायला दिसला नाही. दक्षिण चीनी वाघाला सर्वात चिंताजनक वाघाची प्रजाती म्हणून ओळखले जाते.
वाघ नष्ट होण्याची कारणे :
वाघांची संख्या सातत्याने कमी होत चालली आहे काही वाघाच्या प्रजाती तर नामशेष झाल्या आहेत. त्या मध्ये दक्षिण चिनी वाघ हा कायमचा नष्ट झालेला आहे.
वाघाच्या वाढत्या शिकारीचे प्रमाण यामुळे वाघांचे प्रमाण कमी झाले. तसेच वाढती वृक्ष तोड त्यामुळे जंगले नष्ट झाली व वाघाचे अस्तित्व हे जंगलांमध्ये असते.
जंगले नष्ट झाल्याने वाघांचे अस्तित्व नष्ट झाले व वाघांची संख्या कमी होताना दिसत आहे. सुरुवातीला भारत देशामध्ये वाघाचे प्रमाण जास्त होते व कालांतराने ते कमी होत असल्याचे दिसते.
भारतात सध्या २,२२६ वाघ असल्याचे सांगितले जाते. म्हणून भारतामध्ये वाघाची शिकार करणे दंड कारक मानले जाते. वाढते शहरीकरण व लोकसंख्या या कारणामुळे जंगले तोडली जात आहे.
त्यामुळे तापमान वाढले व पावसाचे प्रमाण कमी झाले व जंगलातील प्राणी अन्न आणि पाण्यासाठी रस्त्यावर आल्याचे दिसत आहे व त्यामुळे मनुष्य घाबरून त्यांची शिकार करण्यासाठी कारणीभूत ठरत आहे. वाघ हा सजीव साखळी मधील महत्वपूर्ण घटक आहे. त्यामुळे वाघाच्या प्रजाती वाढवणे व सजीव सृष्टीला स्थिर ठेवणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.
वाघाचे महत्व :
वाघ हा एक शक्तिशाली सामर्थ्य असलेला चपळ प्राणी असल्याने वाघाला भारताचा राष्ट्रीय प्राणी म्हणून निवडले गेले. तसेच वाघाला किंग ऑफ द फॉरेस्ट आणि रॉयल टायगर चा नावाने सुद्धा ओळखले जाते.
वाघांना संपूर्ण निसर्ग साखळीमध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. वाघ हे अन्न साखळीमध्ये महत्त्वाचे स्थान भूषवतात म्हणजेच वाघ इतर प्राण्यांची शिकार करून स्वतःची उपजीविका करतात त्यामध्ये मुख्यतः ते तृणभक्षी प्राण्यांची शिकार करतात.
निसर्गात गवत हे सर्वत्र आढळते त्यामुळे गवतावर अवलंबून असणाऱ्या प्राण्यांची संख्या भराभर वाढते. आणि या प्राण्यांवर नियंत्रण ठेवण्याचे महत्त्वपूर्ण काम वाघ करीत असतात.
जर वाघ नसतील तर या प्राण्यांची संख्या झपाट्याने वाढेल व त्यांवर नियंत्रण करणे अवघड होईल त्याचा परिणाम म्हणजे संपूर्ण निसर्गचक्र बिघडून जाईल.
म्हणजे वाघ जंगलात असणे हे जंगलाच्या स्वास्थ्याच्या दृष्टीने अत्यंत गरजेची बाब आहे. वाघ जंगलात असल्याने त्यांच्या भीतीने वृक्षतोड होणार नाही. व वृक्षतोड नाही झाल्यास निसर्गचक्र व्यवस्थित चालेल.
धन्यवाद मित्रांनो !