स्त्री पुरुष समानता मराठी निबंध | Stri Purush Samanta Essay In Marathi

स्त्री पुरुष समानता मराठी निबंध | Stri Purush Samanta Essay In Marathi

” स्त्री आणि पुरुष संसाराची दोन चाके आहेत “ असे म्हटले जाते. याचे एक जरी चाक खराब असेल किंवा तुटलेला असेल तर तो संसार पुढे जात नाही. तरीसुद्धा आपल्या समाजामध्ये स्त्रियांना कमी आणि पुरुषांना अधिक अधिकार किंवा मान सन्मान दिला जातो. आपल्या समाज्यातील प्रत्येक स्त्रीला व पुरुषांना समान हक्क, समान अधिकार आणि समान मान असतो का?

फार पूर्वीच्या काळापासून आपल्या समाजामध्ये एकत्रित चालत आली आहे ती म्हणजे अशी स्त्रीने घर संभाळायचे आणि पुरुषाने संपत्ती कमवायचे. पूर्वीच्या काळामधील संसार गाडा हाकण्यासाठी केलेली ही विभागणी होती.

परंतु यातूनच संपती कमावणारी पुरुषप्रधान आणि चूल व मूल सांभाळणारी स्त्री अशी संस्कृती प्राप्त झाली. आणि हाच विचार जसजसा काळ बदलत गेला तसतसे स्त्रियांना गुलाम समजले जाऊ लागले. मग स्त्री झाली पुरुषांच्या लाथा खाणारी पायाची दासी!

स्त्री पुरुष समानता मराठी निबंध | Stri Purush Samanta Essay In Marathi

परंतु आजच्या आधुनिक काळाने त्याप्रमाणे प्रगती केले आहे त्याप्रमाणे स्त्रीचे चित्र देखील पालटून टाकले आहे. आजची स्त्री ही स्वतःच्या पायावर उभारली आहे. तिने आपली कार्यक्षमता सिद्ध केली आहे.आज प्रत्येक क्षेत्रामध्ये पुरुषांप्रमाणे स्त्री देखील पाहायला मिळते.

असे कुठलेही क्षेत्र नाही ज्यामुळे दिसती काम करताना पाहायला मिळणार नाही. वकिली असो किंवा वैद्यकीय क्षेत्र, शिक्षण क्षेत्र, महाविद्यालयीन प्राचार्य, सैनिक, पोलीस, डॉक्टर, इंजिनियर अशा जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्री आपली भूमिका बजावते.

स्त्रीने केलेली ही कामगिरी खरोखरच अलौकिक आहे. आजच्या विज्ञानाच्या काळामध्ये माहिती संरक्षण तंत्रज्ञान हे क्षेत्र अग्रेसर क्षेत्र म्हणून समजले जाते. या सर्वात मोठे क्षेत्र समजला जाणार्‍या मध्ये देखील स्त्री रेल्वे, कार, विमान इत्यादी वाहने चालवताना पाहायला मिळते. तेवढेच नसून अंतरामध्ये देखील स्त्रीने आपली कामगिरी बजावली आहे.

आज स्त्री साठी कुठलेही क्षेत्र असाध्य असे राहिले नाही ती प्रत्येक क्षेत्रांमध्ये आपली महत्त्वाची कामगिरी बजावू शकते. ग्रामीण भागातील स्त्रिया या पुरुषांच्या बरोबरीने शेतामध्ये राब राब कष्ट करतात. गुरे सांभाळतात, कुकुट पालन करतात. एवढेच असून आज ग्रामीण भागातील स्त्रिया या सरपंच, उपसरपंच या पदावर देखील असलेल्या पाहायला मिळतात.

त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये सैन्याने आपल्या सर्वच क्षेत्रामध्ये महत्त्वाची कामगिरी बजावली तरीसुद्धा आपण स्त्री-पुरुष असा भेदभाव करणे योग्य आहे का?

आजची स्त्री ही प्रत्येक क्षेत्रामध्ये आपली कामगिरी करताना दिसत असली तरी दुर्दैवाने काही भागांमध्ये आज ही स्त्री-पुरुष असा भेदभाव केव्हा पक्षपात केला जातो. आजची स्त्री घरातील पत्नी, गृहिण, माता, बहिण, मुलगी अशा सर्व भूमिका पार पाडतेच याशिवाय बाहेरची कित्तेक कामे सुद्धा करते.

जेवढी पुरुषांवर नसते तेवढी जबाबदारी स्त्रिया असते संपूर्ण घराचा सांभाळत करीत असते. मुलांचा अभ्यास घेणे, कुटुंबातील प्रत्येक सदस्यांचे काळजी घेणे, इत्यादी काही जबाबदाऱ्या ती अतिशय मनापासून पार पाडत असते तरीसुद्धा स्त्रियांच्या मनाला जरासुद्धा किंमत दिली जात नाही.

काळातील स्त्रिया पुरुषांप्रमाणे राजकारणाच्या क्षेत्रात उतरले आहेत काही भागांमधील स्त्रिया सरपंच, जिल्हा परिषद, अध्यक्ष मुख्यालयाच्या अधिकारी, कलेक्टर अशा विविध पदांवर पोहोचलेले आहेत. तसेच आजच्या काळामध्ये स्त्रियांनी शिक्षणाकडे लक्ष केंद्रित केले आहे.

शिक्षणाच्या जोरावर स्त्री प्रत्येक क्षेत्रामध्ये आपली कामगिरी बजावत आहे. आज ग्रामीण भागातील स्त्रिया आपले बचत गट स्थापन करून स्वावलंबी बनत आहेत. स्त्रियांचे कर्तृत्व ओळखून आज मुलांच्या प्रत्येक प्रमाणपत्र मध्ये वडिलांसोबत आईंचे नाव देखील जोडले जात आहे.

पूर्वीच्या काळामध्ये जो स्त्री-पुरुष असा भेदभाव होता तो दूर करून स्त्री पुरुष समानता करणे हे आजच्या काळाने जाणले आहे. त्यामुळे आजचा काळ देखील स्त्री-पुरुष संबंध कडे आपली पावले टाकत आहे.

एवढेच नसून आजची स्थिती आपल्या विरुद्ध झालेला अन्याय आणि अत्याचाराविरुद्ध लढण्यासाठी सुद्धा सक्षम झालेली आहे. संविधानानुसार भारतातील प्रत्येक नागरिकाला चे काय हक्क दिलेला आहे त्यातील हक्क स्त्रियांना दिले जात नव्हते परंतु स्त्री आणि आपले महत्त्व समजून आपल्या हक्काविषयी लढा दिला आहे त्यामुळे आज आपल्या समाजामध्ये बहुतांश भागांमध्ये स्त्री पुरुष समानता पहायला मिळतं आहे.

एवढे असून सुद्धा आपल्या समाजाबद्दल काही भागांमध्ये आजच्या काळात सुद्धा स्त्रियांना बंदिस्त करून त्यांच्यावर अत्याचार केले जात आहेत. एका बाजूने स्त्री आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये उंच उडी मारली आहे तर दुसऱ्या बाजूने अनेक ग्रामीण भागातील किंवा अनेक भागाचे स्त्रियांना बंदिस्त ठेवले जात आहे व त्यांच्यावर अन्याय केला जात आहे.

आजही काही भागांमध्ये स्त्रियांवर गुलामी सारख्या अत्याचार केले जात आहेत. म्हणून आपल्या देशामध्ये खऱ्या अर्थाने स्त्री-पुरूष समानता करायचे असेल तर संपूर्ण देशामध्ये स्त्रीचा सन्मान करणे गरजेचे आहे व तिला देवीचे स्थान देणे गरजेचे आहे. आपल्या देशातील प्रत्येक भाग हा स्त्रीला मान सन्मान करून तिला पुरुषांप्रमाणे वागणूक देत असेल तर तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्या देशामध्ये स्त्री पुरुष समानता होईल.

तर मित्रांनो ! स्त्री पुरुष समानता मराठी निबंध | Stri Purush Samanta Essay In Marathi “ वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.


ये देखील अवश्य वाचा :-

धन्यवाद मित्रांनो !

Leave a Comment