मी शिक्षक होणार मराठी निबंध | Mi Shikshak Honar Marathi Nibandh

मी शिक्षक होणार मराठी निबंध | Mi Shikshak Honar Marathi Nibandh

प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व स्थान आहे. आणि योग्य आणि उच्चस्तरीय शिक्षण देण्याचे काम शिक्षक करीत असतात. शिक्षक हा एक प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी आदर्श व्यक्ती असतो.

शिक्षक ज्याप्रमाणे विद्यार्थ्यांना घडवितो विद्यार्थी त्या प्रमाणात गरज असते म्हणून शिक्षकाला विद्यार्थ्यांचा गुरु असेसुद्धा म्हटले जाते. प्रत्येक विद्यार्थी शाळेमध्ये जाताना भविष्यामध्ये काहीतरी होण्याचे स्वप्न  बाळगत असतो.

म्हणून आजच्या लेखामध्ये आम्ही ” मी शिक्षक होणार मराठी निबंध | Mi Shikshak Honar Marathi Nibandh “ घेऊन आलो.

मी शिक्षक होणार मराठी निबंध | Mi Shikshak Honar Marathi Nibandh:

शाळेला जाणारा प्रत्येक विद्यार्थी भविष्यामध्ये काहीतरी होण्याचे स्वप्न घेऊन जात असतो.  माझे देखील स्वप्न आहे की,   मोठे होऊन शिक्षक होणार आहे.

आज आपण बराच शिक्षकांना पाहतो, नाशिक क्षणाचे खरे मूल्य कळत नाही व विद्यार्थ्यांना कशाप्रकारे योग्य ज्ञान व जीवनामध्ये यशस्वी होण्याचे धडे शिकवावे हे माहिती नाही. अशा शिक्षकांना पाहिल्यावर माझ्या मनामध्ये निरनिराळे प्रश्न उद्भवतात.

मला देखील वाटते की, मोठी होऊन मी  शिक्षक होऊन अशा शिक्षकांना दाखवून द्यावे वाटते की आदर्श शिक्षक कसा असतो.  त्यामुळे मी आता निश्चय केला आहे की, मोठे होऊन मी शिक्षक होणार.

जर मी शिक्षक झालो तर,  सर्व समाजासमोर आणि सर्व शिक्षक वर्गा समोर एक आदर्श निर्माण करेल.

जर मी शिक्षक झालो तर विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण करीन. जेणेकरून सर्व विद्यार्थी शिक्षक घेण्याकरिता अधिक उत्साहीत होतील.  मी विचार त्यांच्या मनामध्ये शिक्षणाबद्दलची दूर विचार आणि दूर्लक्ष दूर करेल. शिक्षकाची मुख्य भूमिका म्हणजे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शिक्षणाबद्दल आवड निर्माण करून देणे. जो शिक्षक विद्यार्थ्यांना योग्य रित्या समजून घेत नाही व योग्य ज्ञान देत नाहीत याला शिक्षक म्हणता येईल का?

विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये आणि शिक्षकांच्या योग्य मार्गदर्शन यामध्ये मान रामले तर तो विद्यार्थी शिक्षणामध्ये उच्चस्तरीय कामगिरी करू शकतो. त्यामध्ये एक शिक्षक असा व्यक्ती असतो ज्याच्या मार्गदर्शनाखाली आणि छत्रछायेखाली एक आदर्श व्यक्तिमत्व किंवा आदर्श विद्यार्थी घडत असतो. विषय आहेत आणि या भविष्याला योग्यरीत्या घडविण्याची कामगिरी शिक्षकांवर असते.  म्हणून मी शिक्षक होणार आणि माझी ही कामगिरी उत्तम रित्या पार पाडणार.

मी शिक्षक झालो तर विद्यार्थ्यांना चांगल्या  ज्ञाना बरोबर चांगले संस्कार सुद्धा देईल.

मी शिक्षक झाल्यानंतर कधी असं शिक्षक बनणार नाही तो केवळ पैशांन साठी काम करेल. मी शिक्षक झाले तर मी माझ्या शिक्षक पदाचा अभिमान मानून विद्यार्थ्यांना योग्य ते ज्ञान देईल. तसेच मी त्या शिक्षकांन मधला नसेल जे केवळ पुस्तकी ज्ञान प्रधान करतात.

मी विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञान तर देईलच त्यासोबत त्यांना मी  शिकवलेले समजते का नाही हे सुद्धा विचारून घेइन. मी विद्यार्थ्यांना जो विषय तो विषय त्यांना उत्तम रित्या कळाला का नाही हे विचारून घेईल व त्या विषयाचे त्यांना सर्व ज्ञान मिळेल याची काळजी घेइन.

मी शाळेमध्ये असे वातावरण तयार करीन न घाबरता आपल्या अडचणी आणि शंका मला विचारतील. आणि मी सर्व विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करण्याचा प्रयत्न करीन.

मी विद्यार्थ्यांना  पुस्तकी ज्ञानाबरोबरच त्यांचा सर्वांगीण विकासाकडे ही खूप लक्ष केंद्रित करेल. मी शिक्षक झाल्यानंतर माझ्यासाठी माझा वर्ग हा कुटुंबाप्रमाणेच असेल. मी माझ्या वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्यांची माझ्या लहान भावाप्रमाणे आणि बहिणीप्रमाणे काळजी घेइन.

मी विद्यार्थ्यांच्या शिस्तीकडे विशेष लक्ष देईल. एकदा लागलेली शिस्त ही आयुष्यभर त्यांच्या सोबत राहील त्यामुळे मी विद्यार्थ्यांना लहान वयामध्ये शिस्तप्रिय होण्यासाठी प्रयत्न करेल. त्याप्रमाणेच अभ्यासामध्ये कमकुवत असणाऱ्या विद्यार्थ्यांकडे आवर्जून लक्ष देईल.

मी माझ्या सामर्थ्यावर माझ्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा करून होईल याकडे लक्ष केंद्रित करेल. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मी शाळेमध्ये विविध स्पर्धांचे आयोजित करीन. जसे की, सामान्य ज्ञान परीक्षा, निबंध परीक्षा, चित्रकला परीक्षा, खेळ इत्यादी स्पर्धांमध्ये भाग घेण्यास व मार्गदर्शन करण्यासाठी मी नेहमीच प्रोत्साहित करेल.

सुविचार आणि साधे राहणीमान हा माझा हेतू असेल आणि हीच धारणा मी विद्यार्थ्यांच्या मनामध्ये रुजविण्याचा प्रयत्न करेन. त्यामुळे मी शिक्षक झालो तर विद्यार्थ्यांमध्ये साधेपणाचे आणि नम्रतेची भावना जागृत करण्यासाठी योग्य ते प्रयत्न करेल. तसेच माझ्या सोबत काम करणाऱ्या इतर शिक्षकांबद्दल माझे वर्तन हे आपुलकीचे आणि मैत्रीपूर्ण असेल.

मी शिक्षक झालो तर माझ्या जीवनातील सर्व मोहापासून दूर होऊन शिक्षकाची भूमिका व शिक्षकाचे कर्तव्य मी अवघड रित्या पार व प्रामाणिकपणे पाडीन. मी विद्यार्थ्यांना ज्ञान देत असताना नेहमी लक्षात ठेवेन की, विद्यार्थी हे आपल्या देशाचे भविष्य आहे त्यामुळे मी विद्यार्थ्यांना योग्य नागरिक बनविण्याचा प्रयत्न करीन. जेणेकरून देशाचे भार सांभाळण्यासाठी हे विद्यार्थी सक्षम असतील.

मी शिक्षक झालो तर,   एपीजे अब्दुल कलाम आणि स्वामी विवेकानंद यांचे विचार विद्यार्थ्यांच्या मनामध्ये रुजविण्याचा प्रयत्न करीन.

आशा प्रकारे मी शिक्षक झालो तर माझे सर्व कर्तव्य आणि जबाबदाऱ्या मी प्रामाणिकपणे पार पाडीन, त्यामुळे मी  शिक्षक होणार आहे.

तर मित्रांनो! “मी शिक्षक होणार मराठी निबंध | Mi Shikshak Honar Marathi Nibandh”  हा लेख वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना आवश्य शेअर करा.


ये देखील अवश्य वाचा :-

धन्यवाद मित्रांनो !

Leave a Comment