संत रामदास स्वामी यांची संपूर्ण माहिती | Sant Ramdas Information In Marathi

संत रामदास स्वामी यांची संपूर्ण माहिती | Sant Ramdas Information In Marathi

संत रामदास स्वामी हे संत तुकारामांच्या काळातील एक संत होते व ते संत तुकारामांच्या सहवासा मध्ये राहिले. राजकारण धर्मकारणात जाणीवपूर्वक अंतर्भूत करणारे रामदास हे एकमेव महाराष्ट्रीय संत होते.

संत रामदास स्वामी यांची संपूर्ण माहिती | Sant Ramdas Information In Marathi

समर्थ रामदास स्वामींचे मूळ नाव ” नारायण सूर्याजीपंत कुलकर्णी ( ठोसर )” असे होते.

संत रामदास माहिती मराठी मध्ये 

महाराष्ट्रात जेवढे काही संत झाले त्यामधील स्वतःची वेगळी ओळख रचणारे समर्थ रामदास स्वामी होते.

समर्थ रामदास स्वामींचा जन्म, बालपण :

रामदास स्वामींचा जन्म महाराष्ट्र राज्यातील जालना जिल्ह्यातील जांब या तीर्थक्षेत्री झाला. जमदग्नी गोत्राच्या देशस्य ऋग्वेदी ब्राह्मण परिवारामध्ये 24 मार्च 1906 रोजी जन्म झाला.

रामदास स्वामींच्या वडिलांचे नाव सूर्याजीपंत ठोसर होत तर आईचे नाव हे राणुबाई सूर्याजीपंत ठोसर असे आहे. रामदास स्वामींच्या मोठ्या भावाचे नाव गंगाधर होते. रामदास स्वामींचे संपूर्ण सूर्योपासक होते. रामदास स्वामींचे वडील रोज ” आदित्यहृदय ” स्त्रोत म्हणत.

रामदास स्वामींना त्यांच्या बालपणी नारायण या नावाने ओळखले जातं. नारायण लहानपणा पासूनच खूप चपळ आणि खोडकर होते. झाडावरून उड्या मारणे, नदी मध्ये पुरा मध्ये पोहणे, घोड्यावर सवारी करणे इत्यादी गोष्टी ते आवडीने करत.

नारायणांना मित्रांच्या सहवासात राहायला खूप आवडत त्यांना आठ मित्र होते. नारायण जातीभेद पाळत नसत त्यांना विविध जाती धर्माच्या मित्रांच्या सहवासात आपले बालपण घालवले. व मित्रांच्या सहाय्याने त्यांनी विविध व्यवसायाचे ज्ञान प्राप्त करून घेतले.

एकदा रामदासांची आई राणूबाई नारायणांना म्हणली की, ” नारायणा, तू दिवसभर काही ना काही आगावपणा करत असतो, त्यापेक्षा काहीतरी काम कर, ” तुझा मोठा भाऊ गंगाधर आपल्या परिवाराच्या चिंतेने काम करत आहे.

” आईचे हे वाक्य नारायणाच्या मनावर लागले ” व ते घरांमध्ये एका खोलीत जाऊन ध्यान करत बसले. त्यांच्या आईने नारायणाला सर्वत्र शोधले असता ते कुठेही दिसले नाहीत संध्याकाळच्या वेळेस त्यांच्या आईचे लक्ष घरातील बंद खोलीत बघितले असता त्यांना नारायण ध्यानमग्न दिसले. त्यांच्या आईने विचारले नारायण हे तू काय करत आहेस तेव्हा नारायण म्हणाले, ” आई मी संपूर्ण विश्वाची चिंता करण्यात मग्न आहे ”

नारायणाचे असे कृत्य पाहून त्यांच्या कुटुंबांनी लग्न करून संसाराच्या जाळ्यात अडकविण्याचा प्रयत्न केला. वयाच्या बाराव्या वर्षी रामदास स्वामींचे म्हणजे नारायणाचे लग्न ठरविण्यात आले. लग्नामध्ये पुरोहित यांनी ” सावधान ” हा शब्द उच्चारला तेव्हा त्यांनी अंगावरील नेसलेले कपडे काढून लग्नमंडपातून पळाले.

लोकांनी त्यांचा पाठलाग केला पण ते पळत नदीच्या पात्रात उतरले. पुढे तेथून पायी चालत चालत पंचवटीस येऊन रामाचे घेतले आणि दिलेल्या तपश्चर्या केली.

वयाच्या बाराव्या वर्षी नाशिकला आलेल्या नारायणांनी पुढील बारा वर्षे दीर्घ तपश्चर्या केली व कोणी ही आपल्याला ओळखू नये म्हणून त्यांनी नारायणाचे नाव बदलून ” रामदास ” केले. टाकळी येथे ते 1621 ते 1633 एक बारा वर्षे राहिले.

आपल्या साधनेसाठी टाकळी हे गाव रामदासांनी निवडले त्या मागील कारण म्हणजे टाकळी येथून नंदिनी नदी वाहते व या नंदिनी नदीच्या टेकड्यां वरील गुहे मध्ये असलेली शांतता मध्ये तपश्चर्या करण्यात एकाग्रता वाढते. रामदास स्वामींनी सूर्योदयापासून ते माध्यान्हा पर्यंत नंदिनी नदीच्या पात्रात छाती पर्यंत एवढ्या पाण्यात राहून

ओम भूर र्भुव स्वः

तत्सवितुर्वरेण्यं

भर्गो देवस्य धीमहि

धियो यो न: प्रचोदयात् ।।

या मंत्राचा जप करीत व पुढचे ४ तास ते ” श्री राम जय राम जय जय राम ” या त्रयोदशाक्षरी राम मंत्राचा जप करीत. जेव्हा रामदास राम नावाचे १३ कोटी वेळा नामस्मरण करून घेत नसत तोपर्यंत ते पुढच्या कार्याला आरंभ करत नसत.

तीर्थयात्रा आणि भारत भ्रमण :

रामदास स्वामींची तपश्चर्या व साधना पूर्ण झाल्यावर म्हणजे रामदास स्वामींना जेव्हा आत्मसाक्षात्कार झाला त्यानंतर ते तीर्थयात्रा साठी निघाले. त्यांनी १२ वर्षे भारत भ्रमण केले. भारत भ्रमण करताना ते हिमालय मध्ये आले. हिमालयातील शुद्ध आणि पवित्र वातावरणात ते रमले. तेथे त्यांना श्रीराम दर्शन झाले. आत्मसाक्षात्कार झाला.

तीर्थयात्रा करीत असताना ते श्रीनगर येथे आले. श्रीनगर मध्ये समर्थ रामदास स्वामी यांची भेट शिखांचे गुरु हरगोविंद महाराज यांच्याशी झाली. हरगोविंद महाराज यांनी रामदासांना धर्म रक्षेच्या उद्दिष्टाने सज्ज राहण्याचे मार्गदर्शन दिले.

भारत भ्रमण करताना त्यांनी लोकांची गरिबी आणि दुर्दशा बघितली त्यानंतर त्यांनी साधना सोबतच लक्ष स्वराज्याची स्थापना च्या मदतीने लोकांना अत्याचाराचे मुक्ती देण्याचा विचार केला.

समर्थ रामदास स्वामींचे कार्य :

समर्थ रामदास स्वामींनी आपल्या शिष्यांच्या मदतीने समाजात एक चैतन्यदायी संघटनेची स्थापना केली. रामदास स्वामींनी सातारा जिल्ह्यातील ” चाफल ” नावाच्या गावात श्रीराम मंदिराचे निर्माण केले.

मंदिर बांधण्यासाठी त्यांनी भिक्षा मागितली व त्यातून आलेल्या पैशातून मंदिराची स्थापना केली आहे. तसेच, रामदास स्वामींनी काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत १100 मठांची स्थापना करण्यासाठी लोकांना प्रेरित केले.

समर्थ रामदासांनी मारुतीच्या अकरा मंदिरांची स्थापना केली. गावोगावी जाऊन मारुतीचे मंदिरे बांधली. मारुती हा शक्ती आणि भक्तीचा देवता असल्याने मारुती मंदिरांच्या परिसरात त्यांनी तरुणांना एकत्रित करून व्यायामाची प्रेरणा दिली.

रामदास स्वामींनी 350 वर्षे पहिल संत वेणा स्वामी यांसारखे विधवा महिलांना ही एकत्रित करून कीर्तनाच्या अधिकार दिला.

रामदास स्वामींच्या भक्तांना किंवा शिष्यांना ” रामदासी ” म्हटले जाते. समर्थ रामदास स्वामीं द्वारा स्थापित केलेल्या संप्रदायांना ” समर्थ संप्रदाय ” किंवा ” रामदासी संप्रदाय ” म्हणतात. ” जय जय रघुवीर समर्थ ” हे रामदास स्वामींच्या संप्रदायाचे जयघोष आहे आणि ” श्रीराम जय राम जय जय राम ” हे जप मंत्र आहे.

समर्थ रामदास स्वामींची ग्रंथरचना :

समर्थ रामदास स्वामींनी त्यांच्या आयुष्यात अनेक किर्तन केले व ग्रंथरचना सुद्धा केली. समर्थ रामदास स्वामींनी दासबोध, आत्माराम आणि मनोबोध या ग्रंथांची रचना केली. समर्थ रामदास स्वामींचा प्रमुख ग्रंथ ‘ दासबोध ‘ हा आहे व ग्रंथाची रचना ही गुरूशिष्याच्या संवाद रूपात केली आहे.

तसेच समर्थ रामदास स्वामींनी लिहिलेल्या ९० पेक्षा अधिक आरत्या महाराष्ट्रातील घरा- घरात म्हटल्या जातात. तसेच रामदास स्वामींनी अनेक अभंग सुद्धा लिहिलेत.

समर्थ रामदासांनी तत्कालीन परिस्थितीला बघून आपल्या ग्रंथात राजनीति, व्यवस्थापन, प्रपंच, शास्त्र अशा किती तरी विषयांवर मार्गदर्शन केले आहे. १०० पेक्षा जास्तच देवी- देवतांचे स्त्रोत समर्थ रामदास स्वामिनी लिहिलेले आहेत.

आत्माराम, पंचीकरण, चतुर्थमान, स्फुट अभंग, बाग प्रकरण, मानपंचाक हे रामदास स्वामींनी केलेल्या काही रचना आहेत. मराठी भाषेतील ओवी नावाच्या छंदात या रचना बघायला मिळतील.

समर्थ रामदास स्वामींचा शेवट :

समर्थ रामदास स्वामींच्या जीवनाचा शेवटचा काळ त्यांनी सातारा जिल्ह्यातील जवळील परळी या किल्ल्या वर घालवला. प्रभू श्रीराम, माता सीता आणि भगवान लक्ष्मण यांच्या मूर्ती समोर बसून रामदास स्वामींनी त्यांच्या जीवनातील शेवटचा पाच दिवस निर्जल उपवास केला. आणि सन 1682 मध्ये रामनाम जप करत करत पद्मासन मध्ये बसून ते ब्रम्हालीन झाले. आणि तिथेच त्यांची समाधी ही बनवली आहे.

” दासनवमी ” त्या नावाने त्यांच्या समाधी दिवसाला ओळखले जाते. दरवर्षी दास नवमीला २ ते ३ लाख या संख्येने भक्त रामदास स्वामींच्या समाधी दर्शनासाठी येतात.


ये निबंध देखील अवश्य वाचा :-

धन्यवाद मित्रांनो !