राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची संपूर्ण माहिती । Sant Tukdoji Maharaj Information In Marathi

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची संपूर्ण माहिती । Sant Tukdoji Maharaj Information In Marathi

Sant Tukdoji Maharaj Information In Marathi आपल्या भारतात अनेक थोर संत होऊन गेले. तुकडोजी महाराज हे सुद्धा आधुनिक काळातील महान संत होते.

आडकोजी महाराजांचे शिष्य तुकडोजी महाराज होते. तुकडोजी महाराजांचे मूळ नाव माणिक असे होते. पण आडकोजी महाराजांनी माणिक हे नाव बदलून तुकडोजी असे केले.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची संपूर्ण माहिती । Sant Tukdoji Maharaj Information In Marathi

विदर्भ भागात तुकडोजी महाराजांचा विशेष स्वरूपाचा संचार होता. फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर ते संपूर्ण भारत देशात फिरून अध्यात्मिक, सामाजिक आणि राष्ट्रीय एकात्मतेचे प्रबोधन ते करत.

एवढेच नाही तर ते भारता व्यतिरिक्त जपान सारख्या बलाढ्य देशांत जाऊन सर्वांना विश्वबंधुत्वाचा संदेश दिला.

तुकडोजी महाराज माहिती ( Tukdoji Maharaj Mahiti )

भारत जोडो आंदोलनाच्या दरम्यान म्हणजे सन 1942 साली संत तुकडोजी महाराजांना अटक झाली होती. त्यांची रचलेले ” आते है नाथ हमारे ” हे पद त्या काळातील स्वतंत्र लढण्यासाठी स्फूर्तीगान ठरले.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा जन्म :

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा जन्म 27 एप्रिल 1909 मध्ये अमरावती जिल्ह्यातील यावली या गावात झाला. तुकडोजी महाराजांचे संपूर्ण नाव माणिक बंडोजी इंगळे असे होते. त्यांच्या वडिलांचे नाव बंडोजी तर आईचे नाव हे मंजुळाबाई इंगळे असे होते. ते ब्रह्मभट वंशातले होते.

पण सर्वजण भट या शब्दाचा उलट अर्थ काढून भात असे म्हणत. तुकडोजी महाराजांचे प्राथमिक शिक्षण हे, चांदूर बाजार येथे झाला. तुकडोजी महाराजांचे गुरु आडकोजी महाराजांनी त्यांचे नाव बदलून ” तुकड्या ” असे ठेवले.

तुकडोजी महाराजांचे कार्य :

आपला भारत देश हा खेड्यांचा देश आहे. अनेक खेडेपाडे मिळूनच आपला देश बनला आहे. जर या खेडांचा विकास झाला तर भारताचा विकास व आपल्या देशाचा विकास आपोआप होईल असे तुकडोजी महाराजांना वाटे त्यासाठी त्यांनी प्रयत्न सुद्धा केले. समाजातल्या सर्व घटकांमधील लोकांचा विकास कसा होईल यासाठी ते सतत चिंता करत होते.

खेळांची उन्नती, विकास आणि कल्याण हे जणू तुकडोजी महाराजांच्या जीवनाचा केंद्रबिंदूच होता. म्हणून तुकडोजी महाराजांनी ग्रामविकासाच्या विविध समस्यांवर विचार करून त्या समस्या कशा प्रकारे सोडवता येतील यासाठी उपाय योजना सुचविल्या आणि त्यांनी केलेल्या उपायांचे फळ सुद्धा त्यांना मिळाले.

अमरावती जवळ असलेल्या मोझरीच्या गुरुकुंज आश्रमाची स्थापना करणे हे तुकडोजींच्या आयुष्यातील लक्षणीय कार्य होते, त्याबरोबरच ग्राम गीतेचे लेखन करणे हे सुद्धा त्यांच्या जीवन कार्यातील सर्वात महत्वाचा भाग होता. ग्रामगीता हा लेख तुकडोजी महाराजांच्या वाड़मयाची पूर्तीच होती.

तुकडोजी महाराज स्वतःला तुकड्यादास म्हणून घेत त्या मागचे कारण म्हणजे भजन म्हणताना ते जी भिक्षा घेत, त्यावर आपण बालपणी जीवन कंठील, ह्या गोष्टीची त्यांना जाणीव होती.

ग्रामविकासाना कमी होईल, ग्राम सुरक्षित व्हावं, स्वयंपूर्ण बनावे, सुसंस्कृत व्हावे, गावातील लोकांच्या गरजा पूर्ण व्हाव्यात, ग्रामोद्योग नव्याने उभारावेत यासाठी तुकडोजी महाराजांनी खूप प्रयत्न केले. याचे सर्व प्रयत्न आणि त्यासाठी त्यांनी केलेल्या कार्याचे प्रतिबिंब ग्रामगीता या लेखात आहे.

समाजातील जुनाट पद्धती, देवभोळेपणा, अंधश्रद्धा दूर व्हाव्यात यासाठी तुकडोजी महाराजांनी खूप प्रयत्न केले.

समाजात सर्व धर्म समभाव ही धारणा निर्माण व्हावी हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारविश्वाचा एक वैशिष्टये होते. त्यासाठी त्यांनी सामुदायिक आणि सर्वधर्मीय प्रार्थनेचा आग्रहपूर्वक पुरस्कार केला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी त्यांच्या जीवनाच्या शेवट पर्यंत त्यांच्या भाषणातून समाजामध्ये आध्यात्मिक, सामाजिक प्रबोधन केले.

महिलांच्या उन्नतीसाठी आणि विकासासाठी त्यांनी प्रयत्न केले. महिला उन्नती हा त्यांच्या जीवनाचा विलक्षण पैलू होता. कुटुंब व्यवस्था, समाज व्यवस्था, आणि राष्ट्र व्यवस्था ही

स्त्रीवर अवलंबून असते तुकडोजी महाराजांनी त्यांच्या कीर्तना मधून समाजाला पटवून दिले. स्त्रियांना आज्ञानात व दस्थ्यात ठेवणे हे अन्यायकारक आहे. हे त्यांनी प्रभावीपणे लोकांना पटवून दिले.

देशातील सर्व तरुण हे आपल्या राष्ट्राचे भविष्य कालीन आधारस्तंभ आहेत असे तुकडोजी महाराज म्हणत होते. म्हणून तरुण हे बालोपासक असावेत म्हणजे ते समाजाचे आणि राष्ट्राचे संरक्षण करू शकतील.

देशातील तरुण हे नीतिमान व सुसंस्कृत युक्त कसे होतील. याबद्दल मार्गदर्शन लेखन तुकडोजींनी केले. तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या लेखनातून व्यसन निधीचा निषेध केल्याचे दिसून येते.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या सामाजिक सुधारणा / जनजागृती :

तुकडोजी महाराजांनी आपला समाज सुधारावा यासाठी अनेक प्रयत्न केले. ते आपल्या भजनातून त्यांनी जाति भेद पाळू नका असा संदेश दिला त्याबरोबरच अस्पृश्यता समाजातून काढून टाका, दारू पिऊ नका. आणि आपल्या देशावर प्रेम करा असा संदेश दिला.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आपल्या कीर्तनातून आणि भजनातून अंधश्रद्धा व्यसन आणि वाईट रुढी परंपरेला आळा घालण्यासाठी सांगितले.

सर्व पंथाचे व धर्माचे लोक तुकडोजी महाराजांचे अनुयायी बनले. ” ग्रामगीता ” चे लेखन करून लोकांचे आणि ग्राम विकासाचे कल्याण कशात आहे हे त्यांनी समजून सांगितले.

1962 मध्ये झालेले चीन युद्ध आणि 1965 मध्ये झालेले पाकिस्तान युद्ध च्या वेळी ते स्वतः सैन्यास धीर देण्यासाठी देशाच्या सीमेवर गेले आणि त्यांनी तेथे वीर गीते गाइली व सैन्याचे धीर वाढविले.

तुकडोजी महाराजांनी केलेल्या ग्रंथरचना :

संत तुकडोजी महाराजांनी आपल्या कीर्तनातून समाज प्रबोधनाचा पाया रचला. त्याच बरोबर त्यांनी अनेक ग्रंथ आणि लेख सुद्धा लिहिले. सन 1925 मध्ये त्यांनी ” आनंदामृत ” ग्रंथाची रचना केली. ” ग्रामगीता ” हा तुकडोजी महाराजांचा ग्रंथ ग्राम विकासा करिता प्रसिद्ध आहे.

हिंदू भाषेतून लिहिलेले त्यांचे पुस्तक ” लहरकी बरखा ” हे सुद्धा प्रसिद्ध आहे. तसेच त्यांनी मराठी, हिंदी भाषेमध्ये साहित्य रचना केली. 5 एप्रिल 1943 ला त्यांनी गुरुदेव मुद्रनाल्याची निर्मिती करून गुरुदेव मासिकाचे प्रकाशन केले.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा शेवट :

सन 1968 ला 11 ऑक्टोंबर या गुरुवारच्या दिवशी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ब्रह्मलीन झाले. त्यांनी केलेल्या कार्यासाठी त्यांची चरणी आपले शत: शत: प्रणाम !


ये निबंध देखील अवश्य वाचा :-

धन्यवाद मित्रांनो !

Leave a Comment