संत नामदेव माहिती मराठी मध्ये | Information About Sant Namdev In Marathi

संत नामदेव माहिती मराठी मध्ये | Information About Sant Namdev In Marathi

( Sant Namdev Information in Marathi | Sant Namdev Chi Mahiti )

आपल्या देशात आणि वारकरी संप्रदायामध्ये अनेक संत होऊन गेले. त्यातीलच एक म्हणजे संत नामदेव हे सुद्धा वारकरी संप्रदायातील एक संत होते.

असे म्हणतात की, नामदेवांनी शतकोटी अभंग रचण्याची प्रतिज्ञा घेतली होती. पण काही कारणा मुळे त्यांना ती पूर्ण करता आली नाही.

भक्त शिरोमणी संत नामदेव हे संत ज्ञानेश्वरांच्या कालखंडात होऊन गेले. वारकरी संप्रदायाचे प्रचारक नामदेव महाराज नामदेवाची अनिल नामविद्येचे प्रमुख प्रेणेते असलेले महाराष्ट्र राज्यातील एक थोर संत होते.

आजही नामदेवाचे ५०० ते ६०० अभंग उपलब्ध आहेत. पण नामदेव गाथेमध्ये असलेल्या अभंगा मधील काही अभंग हे नामदेवाचे असल्यासारखे वाटत नाहीत.

संत नामदेव माहिती मराठी मध्ये | Information About Sant Namdev In Marathi

नामदेव गाथेत विष्णुदास नाम्याचे आणि नामदेवांची अभंगही अंतर्भूत आहेत.

‘ नामदेव कीर्तन करी, पुढे देव नाचे पांडुरंग’ – अशी नामदेवांची योग्यता होती.

” नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी ” ही नामदेवांच्या आयुष्याचे एकमेव ध्येय होते.

भागवत धर्माचे एक आद्य प्रचारक म्हणून संत नामदेवांनी संत ज्ञानेश्वरांच्या संजीवन समाधी नंतर सुमारे ५० वर्षे भागवत धर्माचा प्रचार केला.

संत नामदेवांचा जन्म :

संत नामदेवांचा जन्म हा 26 ऑक्टोंबर १२70 मध्ये झाला. त्यांच्या वडिलांचे नाव दामाशेट्टी तर आईचे नाव हे गोणाइ होते. त्यांच्या वडिलांचा व्यवसाय शिंपी होता म्हणजेच कपडे शिवण्याचा व्यवसाय ते करीत. नामदेवांच्या कुळातील सर्व पुरुष हे सात्विक स्वभावाचे भगवभक्त होते.

हिंगोली जिल्ह्यातील नरसी- बामणी ( नरसी नामदेव ) हे नामदेवांचे जन्म गाव होते. कार्तिक शुद्ध एकादशीस आणि रोहिणी नक्षत्रास नामदेवांचा जन्म झाला होता.

नामदेवांची संपूर्ण बालपण हे विठ्ठलांच्या पावस भूमीत म्हणजे पंढरपुर मध्ये गेले. नामदेवांनी लहान पणापासूनच श्रीविठ्ठलाची अनन्य साधारण भक्ती केली व ते विठ्ठलाचे भक्त होते.

संत नामदेवांच्या कुटुंबात त्यांच्या पत्नी राजाई, मोठी बहीण आऊबाई, नारा, विठा, महदा, गोंदा हे त्यांचे चार पुत्र होते आणि त्यांना एक मुलगी होती तिचे नाव लिंबाई होते.

असे सर्व सदस्य मिळून १५ सदस्यांचा मिळून नामदेवांचा परिवार होता. तसेच स्वतःला नामयाची दासी म्हणून घेणाऱ्या संत जनाबाई ह्या नामदेवांच्या कुटुंबातील एक सदस्य होत्या.

संत नामदेवांचे जीवन :

महाराष्ट्रातील एक वारकरी संतकवी संत नामदेव यांना शिरोमणी नामदेव महाराज असेही म्हणतात. रेळेकर हे नामदेवांचे आडनाव होते. सर्वाधिक जुन्या काळातील मराठी कवीं पैकी एक कवी म्हणून संत नामदेवांना ओळखले जाते. त्यांनी मराठी भाषे सोबतच वज्र भाषेत सिद्धांत काव्य रचना केलेले आहेत.

शिखांचे गुरु ग्रंथ साहिबातले चित्रपट, आत्म चरित्रकार आणि अनेक कीर्तनाच्या मदतीने भागवत धर्म पंजाब पर्यंत नेण्याचे काम संत नामदेवांनी केले.

असे म्हणतात की, नामदेवांच्या कीर्तन कलेमुळे प्रत्यक्ष देव पांडुरंगाला डोलायला लावणारी म्हणजे आपल्या कीर्तनामध्ये अनेकांची मने दंग करणारी कीर्ती व कला होती.

नामदेवांचा विवाह हा जाई नावाच्या एका स्त्रीशी झाला होता आणि तिच्या पासून त्यांना नारायण, महादेव, गोविंद, आणि विठ्ठल अशी चार पुत्रे झाली आणि लिंबाई नावाची एक कन्या झाली होती.

परिवारामध्ये सदस्यांची संख्या जास्त असल्याने कुटुंबाची जबाबदारी नामदेवांनी घ्यावी असे नामदेवांच्या आई-वडिलांना वाटत. नामदेव सतत विठ्ठल भक्तीत लीन असल्याने विठ्ठल भक्तीला त्यांच्या घरातून विरोध होता परंतु नामदेव विठ्ठल भक्तीच्या मार्गावरून हलले नाहीत.

पुढे १२91 मध्ये नामदेवांची संत ज्ञानदेवाशी भेट झाली. गुरु विना आपली भक्ती अपुरी आहे हे त्यांना ज्ञानदेवाला भेटल्या नंतर लक्षात आले. म्हणून ते औंढा नागनाथ येथे गेले आणि विसोबा खेचर यांकडून गुरुपदेश घेतला व त्यांचे शिष्ठत्व संपूर्णता स्वीकारले. असे सांगितले जाते.

जेव्हा संत नामदेव विसोबा यांना भेटायला गेले होते तेव्हा विसोबा हे महादेवाच्या देवळात महादेवाच्या पिंडीवर पाय ठेवून झोपल्याचे दृश्य नामदेवांनी पाहिले.

हे दृश्य पाहून नामदेवांना खूप चीड आली. विसोबा म्हणले देव नसेल तेथे माझे पाय उचलून ठेव. तेव्हा नामदेवांना ” देवाविना ठाव बोलण्याची वाव ” हा विचार मनाला ठोचला व त्यांचा गुरु उपदेशामुळे अहंकार नष्ट झाला. वयाच्या २६ व्या वर्षी त्यांनी ठरवले की, पुढचे सर्व आयुष्यभर ईश्वर भक्ती, आणि भागवत धर्माचा प्रसारा साठी घालवायचे.

संत नामदेवांचे साहित्य :

संत ज्ञानदेवांनी अनेक अभंग, कविता, चरित्र यांमधून साहित्य रचना केली आहे. २५०० अभंग आजही उपलब्ध आहेत. त्यांनी मराठी वज्र तथा शौरसेनी भाषेतही काही अभंग रचना केले आहे. 125 पदे आणि 62 अभंग नाम देवजीकी मुखबानी शीख पंथाच्या गुरुग्रंथसाहेब मध्ये गुरूमुखी लिपीत आहेत.

तीर्थावली या ग्रंथातून नामदेवांनी संत ज्ञानेश्वरांची चरित्र सांगितले आहे. ज्ञानेश्वरांच्या समाधी नंतर ५० वर्षे भागवत धर्माचा प्रसार नामदेवांनी केला. भागवत धर्म पंजाब पर्यंत घेऊन जाण्याचे काम नामदेवांनी केले. कठीण परिस्थितीला तोंड देऊन महाराष्ट्राची भावनिक एकात्मता जपण्याचे महत्त्वाचे काम नामदेवांनी केले.

पंजाब मधील घुमान हे ते सिख बांधवांनी त्यांचे मंदिर उभारले आहे. तसेच राजस्थान मधील सिख बांधवांनी सुद्धा नामदेवांचे मंदिर उभारले आहे.

संत नामदेवांविषयी काही आख्यायिका :

१. संत नामदेव महाराज खूप लहान असताना त्यांच्या वडिलांनी नामदेवांना सांगितले की, ‘ आज देवाला नैवेद्य तू दाखव’, तेव्हा नामदेवांनी देवाला नुसता प्रसाद दाखविला नाही तर देवा समोर वाट पाहत बसले की देव नैवेद्य केव्हा खाईल. त्यांच्या त्या अत्यंत निरागसतेला मान देऊन साक्षात विठ्ठल नाम देवांसमोर प्रकट झाले व नामदेवांनी दिलेला नैवेद्य सुद्धा देवाने ग्रहण केला.

२. एकदा कुत्र्याने नामदेवांची चपाती पळवली तर कुत्र्याला ती कोरडी खाऊ लागू नये म्हणून संत नामदेव तुपाची वाटी घेऊन कुत्र्याच्या मागे लागले.

३. एकदा महाशिवरात्रीच्या दिवशी संत नामदेव औंढा नागनाथ येथे दर्शनासाठी गेले असता मंदिरात भजन / कीर्तन न करण्यास तेथील पुजार्‍यांनी नामदेवांनी विनवले.

म्हणून त्यांच्या विनंतीस मान ठेवून, नामदेव मंदिराच्या मागच्या बाजूला बसून नागनाथाच्या दर्शनासाठी विनंती करू लागले. नामदेवांची ही भक्ती आणि श्रद्धा बघून देवाने दर्शन देण्यासाठी पूर्वाभिमुख असलेले मंदिर पश्चिम दिशेला केले. अशा प्रकारच्या नामदेवांच्या काही आख्यायिका आजही प्रसिद्ध आहेत.

संत नामदेवांची शिकवण :

संत नामदेवांनी समाजात कर्मकांड- पूजा, मंत्र- तंत्र, बुवाबाजी, दांभिकता आणि अनितीने ग्रासलेल्या लोकांना थोडक्यात सांगायचे झाले तर अंधश्रद्धेला ग्रासलेल्या समाजात आपल्या अभंगातून,

कीर्तनातून नामस्मरणाचे महत्त्व पटवून दिले. अंधश्रद्धे पासून लोकांनी दूर रहावे ही शिकवण संत नामदेव महाराजांनी दिली.

संत नामदेवांचे शेवट / समाधी :

संत नामदेवांना वयाच्या 80 व्या वर्षी हे जग सोडून जाण्याचा निर्णय घेतला. आषाढ शुद्ध एकादशी शके १२72 रोजी ते विठ्ठला समोर जाऊन आज्ञा दयावी म्हणून विनंती केले व त्यानंतर आषाढ वद्य त्रयोदशी शके १२७२ या दिवशी त्यांनी पंढरपूर येथे विठ्ठल मंदिराच्या महाद्वारी समाधी घेतली.

विठ्ठल दर्शनासाठी येणाऱ्या सर्व संत सज्जनांनी व भक्तांची धुड आपल्या मस्तकी लावावी ही नामदेवांची इच्छा असल्याने त्यांनी महाद्वाराच्या पहिल्या पायरीवर स्वतःचे समाधी स्थान करण्याचे ठरवले.


ये निबंध देखील अवश्य वाचा :-

धन्यवाद मित्रांनो !

Leave a Comment