निसर्ग माझा मित्र निबंध मराठी । Nature Is My Friend Essay Marathi

निसर्ग माझा मित्र निबंध मराठी । Nature Is My Friend Essay Marathi

प्रस्तावना :

आपण सकाळ पासून ते रात्री झोपे पर्यंत ज्या वातावरणात, पर्यावरणामध्ये वावरतो तो निसर्ग असतो. म्हणून आपल्याला या दैनंदिन निसर्गाला आपण मित्र मानायला पाहिजे म्हणून आज आपण निसर्ग माझा मित्र निबंध मराठी

निसर्ग ही सर्वात सुंदर देणगी देवाने आपल्याला दिलेली आहे आणि परमेश्वराने या निसर्गाला अतिशय सुंदर बनवले आहे. संपूर्ण सृष्टीवर पृथ्वी हा एक असा ग्रह आहे ज्यावर सजीव आणि मनुष्य- वस्ती स्थित आहे.

आणि या पृथ्वीवर जीवन स्थिर असण्याचे एकमेव कारण म्हणजे इथे असणारे वातावरण आणि निसर्ग. आणि या निसर्गातून मनुष्याला जीवनावश्यक गोष्टी मिळतात. म्हणून निसर्ग आणि मनुष्य या दोघांचा खूप जुना संबंध आहे.

निसर्ग माझा मित्र निबंध मराठी । Nature Is My Friend Essay Marathi

निसर्गा शिवाय आणि निसर्गातून मिळणाऱ्या वस्तूं शिवाय मनुष्य आपले जीवन जगूच शकत नाही. निसर्ग हा मनुष्याला सर्व काही देतो पण त्या बदल्यात मनुष्याकडून काहीच अपेक्षा ठेवत नाही.

आज आपण याच निसर्गावर निबंध बघणार आहोत तो म्हणजे निसर्ग माझा मित्र.

निसर्ग कशाला म्हणतात :

आपल्या आजू- बाजूला असणाऱ्या सर्व वस्तू म्हणजे पाणी, हवा, जमीन, आकाश आणि अग्नी या पंच तत्वांनी मिळून बनलेली सृष्टी म्हणजेच ” निसर्ग ” होय. मनुष्याचा जन्म होतो तो या निसर्गातच आणि मृत्यू ही याच निसर्गात होतो.

आपण सर्व सजीव या निसर्गात जन्म घेतो, वाढतो, मोठे होतो आणि शेवटी याच निसर्गात विलीन ही होतो. आपल्याला आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टींचा पुरवठा निसर्गातूनच होतो.

निसर्गातून आपल्याला जीवनावश्यक वस्तू तर मिळतातच पण आर्थिक मदत सुद्धा होते. आपण रोजच्या जीवनात कुठल्या ना कुठल्या रीतीने निसर्गाशी संबंध ठेवत असतो.

निसर्गातून मिळणाऱ्या वस्तू :

निसर्ग आपल्याला सर्व गोष्टी पुरवते. आपल्या मूलभूत गरजा सुद्धा निसर्गातूनच पूर्ण होतात. अन्न, वस्त्र, निवारा आणि प्राणवायू म्हणजे हवा सुद्धा निसर्गातून आपल्याला मिळतात. फुले, फळे, भाज्या सर्व काही निसर्ग आपल्याला देतो.

आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग म्हणजे निसर्ग आहे. अनेक प्रसिद्ध कवी, लेखक, चित्रकार आणि कलाकार यांना निसर्गा बद्दल अनेक सुंदर रचना केल्यात अनेक चित्रपट व सिनेमातील गाणे यांमध्ये निसर्गाचे सुंदर चित्रण केल्याचे दिसते.

जंगल, पर्वत, नद्या. झाडे- झुडपे, सूर्य, चंद्र, समुद्र या सर्व गोष्टींचा मिळून निसर्ग तयार होतो. या निसर्गात लाखो सजीव निर्जीव वस्तुंचा समावेश आहे.

निसर्ग आपल्याला खाण्यासाठी अन्न, पिण्यासाठी पाणी, राहण्यासाठी निवारा म्हणजेच लाकूड देतो. निसर्गा शिवाय मनुष्य आपल्या जीवनाची सुरुवातच करू शकत नाही.

कारण मनुष्याला जे काही मिळते ती या निसर्गाचीच देण आहे. आपल्या सकाळी उठल्या पासून रात्री झोपे पर्यंतच्या वापरल्या जाणाऱ्या सर्व गोष्टींमध्ये निसर्ग चे तत्व बसलेला असतो. म्हणून निसर्ग हा आपला एक खरा मित्र आहे.

खरे, पहाता निसर्ग हा आपला खरा मित्र आहे. निसर्ग ही सर्वात मोठी शक्ती आहे. या विश्वातील सर्व काही आपल्याला निसर्ग पासूनच प्राप्त होते. निसर्गामध्ये अशी शक्ती आहे जी आपल्यातील नकारात्मक विचारांना दूर करते.

आणि याच निसर्गात अशा काही वस्तू आहेत या आपल्या विचारांना चालना देतात. निसर्गातील नजारा आपण मानसिक ताणतणाव दूर होतो. म्हणून आपल्याला कधी ही तणाव आला असल्यास आपण या निसर्गामध्ये मन मोकळे होऊन फिरले पाहिजे. निसर्गातील गोष्टींचा आनंद घेतला पाहिजे. विविध प्रकारची फुले, प्राणी, पक्षी यांना पाहिले तर मनाला शांती आणि आराम मिळतो.

या निसर्गाने तयार केलेले ऋतुचक्र आणि यांनुसार होणारे सृष्टीतील बदल मनाला मोहवणारे आहेत. निसर्गाने आपल्या सुंदर, हिरवळ दिली आहे. डोळ्यांना भुलिवणारे रंग निसर्गातूनच मिळतात.

जगण्यासाठी आवश्‍यक असणारा प्राणवायू याच निसर्गातील झाडांपासून मिळाला आहे. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू निसर्गाचे सुंदर देण आहे. मनुष्य, पक्षी, प्राणी सर्व सजीवांना आवडणारा पाऊस हा या निसर्गामुळे आपल्याला लाभला आहे. म्हणून निसर्ग हा फक्त मनुष्याचाचं नव्हे तर संपूर्ण सृष्टी चा मित्र आहे.

मनुष्याला सर्वात बुद्धिमान प्राणी म्हणण्या मागेचे कारण निसर्गच आहे. कारण मनुष्याने याच निसर्गातील वस्तूंचा वापर करून प्रगती केली. याच निसर्गातील दगडांचा वापर करून अग्नीचा शोध लावला व विविध हत्यारे, अवजारे बनवले. असेच प्रगती करत आज मानवाचे स्वतःच्या गरजेच्या सर्व गोष्टींचा शोध लावला आहे. म्हणून निसर्ग हा आपला सर्वात जवळचा मित्र आहे.

मानव आणि निसर्गाचा नातं :

मानवाचा आणि निसर्गाचं नातं हे हजारो वर्षापासूनच आहे. म्हणून मानवाच आणि निसर्गाचा नातं खूप जुना समजलं जातं. सुरुवातीला मनुष्याला कशाचे ज्ञान नाही होते. पण तो या निसर्गातील गोष्टींचा उपयोग करून प्रगती करू लागला.

आज मनुष्य मोठ- मोठ्या इमारती बांधत आहे. कपडे घालत आहे. मानवाला नव- नवीन प्रकारच्या आजारांचे निधन करणार्‍या रोगांवर औषध मिळाले आहेत. त्यामुळे तो निरोगी झाला आणि माणसाचे आयुष्य वाढू लागले.

आज लोकसंख्या अफाट वाढू लागली म्हणून नवीन समाज निर्माण होऊ लागला. भाषेची आणि लिपी ची गरज भासू लागली तसेच संस्कृती आणि नव- नवीन परंपरा निर्माण झाल्या. माणसाच्या या प्रगतीमध्ये पावलो- पावली निसर्ग मानवाच्या सोबत होता.

माणसाच्या विकासासाठी विविध प्रकारची सामग्री निसर्गाने दिली. त्यानंतर हळू- हळू प्रगती होत गेली. विजेचा शोध लावला, रस्ते बांधले, समुद्री मार्गाने प्रवास चालू झाला. आणि ही सगळी कल्पना आणि प्रेरणा मनुष्याला निसर्गाकडून प्राप्त झाली.

निसर्गातील झाडांचे महत्त्व :

निसर्गाने आपल्याला अनेक गोष्टी दिल्यात त्यातील सर्वांत महत्त्वाची गोष्ट आणि निसर्गाची देणगी म्हणजे झाडे आहेत. झाडांमुळे आपल्याला वेग वेगळ्या वस्तू मिळाल्या त्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जीवनावश्यक असलेला प्राणवायू म्हणजेच ऑक्सिजन. झाडे आपल्याला ऑक्सिजन देतात आणि वातावरणातील कार्बन डाय ऑक्साईड शोषून घेतात त्यामुळे निसर्गाचा समतोल राहतो.

तसेच झाडे आपल्याला फळ, फुले देतात. आणि काही झाडांपासून औषधे मिळतात त्यामुळे आपले स्वास्थ्य निरोगी राहते.

झाडांचा उपयोग आपण आपल्या रोजच्या जीवनात करतो. ग्रामीण भागातील लोक झाडांचा लाकडाचा उपयोग इंधन म्हणून करतात.

तसेच झाडांचा लाकडापासून दरवाजे, खिडकी आणि विविध प्रकारच्या लाकडी खेळणी तयार करतात. म्हणून निसर्गातील झाडे आपल्याला खूप महत्त्वाची आहेत. तसेच काही झाडांपासून सुगंधी वस्तू तयार करतात. कागद, रबर यांसारख्या वस्तू झाडांपासून मिळतात.

झाडांमुळे आपल्याला आर्थिक मदत ही होते. म्हणून आपल्या दैनंदिन जीवनात झाडांना खूप महत्त्व आहे. निसर्गातील झाडे ही अनमोल आहेत. परंतु आजचा मनुष्य आपली सुख सुविधा पूर्ण करण्यासाठी व स्वतःच्या स्वार्था साठी झाडांची तोड करीत आहे. पण माणसाचे असे वागणे निसर्गासाठी व संपूर्ण सृष्टीसाठी धोक्याचे ठरत आहे.

निसर्गाचा ऱ्हास :

निसर्गाने आपल्याला सर्व काही सुख सुविधा दिल्या पण माणूस आणखी, हवा त्यापोटी आणि स्वतःच्या स्वार्थासाठी या सुंदर निसर्गाचा आपला सुख- सुविधा पूर्ण करण्यासाठी ऱ्हास करत आहे.

आज वाढते उद्योगधंदे, औद्योगिकरण यांच्या साठी जंगलतोड करून मोठ- मोठ्या इमारती बांधत आहे. त्यामुळे निसर्गातील महत्त्वपूर्ण झाडे नष्ट होत आहेत. त्यामुळे पर्यावरणातील co2 गॅसचे प्रमाण वाढून प्रदूषण वाढत आहे.

व याचा दृष्ट परिणाम म्हणजे वाढते तापमान त्याला आपण ग्लोबल वार्मिंग म्हणतो. वाढत्या ग्लोबल वार्मिंग मुळे व प्रदूषणामुळे, वृक्षतोडी मुळे पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. निसर्गातील हिरवळ व मनाला भुलवणारा निसर्ग. डोंगर वाळून जात आहे. नद्या, तलाव कोरडवाहू होत आहे.

आजच्या मनुष्याचे निसर्गाचा ऱ्हास करून निसर्गाचे जीवन चक्र बदलून टाकले आहे.

निष्कर्ष :

या सृष्टी वर राहणाऱ्या सर्व सजीवांची आज निसर्ग जपणे ही महत्त्वाची गरज आहे. या निसर्गामुळे आपला जन्म झाला, आपल्या सर्व गरजा पूर्ण झाल्या आणि आज आपण याच निसर्गामुळे प्रगती केलो. पण आपण निसर्गाने दिलेल्या सर्व गोष्टी विसरलो आणि आज याच निसर्गाचा विनाश करण्याच्या मार्गावर आहोत.

जर आपण निसर्गाचा विनाश असंच करत राहिलो तर निसर्ग सुद्धा आपला विनाश नक्कीच करेल. आपण सर्वांनी मिळून निसर्गाचे संगोपन केले पाहिजे.

आणि आपला निसर्ग कसा सुंदर राहील याचा विचार केला पाहिजे. निसर्ग आपला मित्र आहे. म्हणून त्यांचे संगोपन करणे आपल्या सगळ्यांचे कर्तव्य आहे.

निसर्ग आपला मित्र आहे ! हे मात्र विसरू नका.


ये निबंध देखील अवश्य वाचा :-

धन्यवाद मित्रांनो !