मेळघाट अभयारण्य माहिती । Melghat Tiger Reserve Information In Marathi

मेळघाट अभयारण्य माहिती । Melghat Tiger Reserve Information In Marathi

भारत देशातील एक व्याघ्र प्रकल्प हा मेळघाट अभयारण्य आहे. मेळघाट हे अभयारण्य अमरावती या जिल्ह्यात वसलेले आहे.

आजच्या या आर्टिकल मध्ये आपण “मेळघाट अभयारण्य माहिती मराठी” म्हणजेच “Melghat Tiger Reserve Information In Marathi “ यावर संपूर्ण माहिती बघणार आहोत.

आज आपण याच अभयारण्याची माहिती बघणार आहोत. चला तर मग बघुया ” मेळघाट अभयारण्याची माहिती “.

मेळघाट अभयारण्य माहिती । Melghat Tiger Reserve Information In Marathi

मेळघाट हे अभयारण्य अमरावती जिल्ह्यात वसलेले असून या अभयारण्याचा परिसर हा डोंगराळ प्रदेश आणि घनदाट जंगलांनी व्यापलेला आहे.

हा भाग सातपुडा पर्वत रांगा च्या दक्षिण भागात मोडतो. चिखलदरा व धारणी या तालुक्यांतील डोंगराळ भागाला मेळघाट या नावाने ओळखले जाते आणि याच ठिकाणी मेळघाट अभयारण्य आणि व्याघ्रप्रकल्प आहे.

मेळघाट हे अभयारण्य महाराष्ट्रातील जैवविविधतेचे भांडार आहे. मेळघाटातून सिपना, गाडगा आणि डोलार अशा नद्या वाहतात. त्यामुळे मेळा घाटाचा हा परिसर हिरवागार आणि विविध प्राणी पक्ष्यांनी भरलेला आहे.

मेळघाट अभयारण्यातील अतिसंरक्षित भाग 301.05 चौरस किलो मीटरचा असून उर्वरित भाग हा 1270.69 चौरस किलो मीटर येवढा आहे. म्हणजे संपूर्ण मेळा घाटाचे शेत्रफळ हे 1571.74 चौरस किलो मीटर आहे.

भारतातील 9 व्याघ्र प्रकल्पांपैकी एक म्हणजे हा मेळ घाटाचा व्याघ्र प्रकल्प आहे. आणि हा प्रकल्प 1974 साली अस्तित्वात आला.

वाघांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या या मेळघाट अभयारण्याच्या परिसरात कोरकू या आदिवासी जमातीचे लोक राहतात. मेळघाट व्याघ्र प्रकल्पात गुगामल उद्यान, मेळघाट वन, आंबाबरवा आणि नरनाळा या अभयारण्याचा समावेश होतो.

मेळघाट अभयारण्यातील जैवविविधता :

भारतातील जैवविविधतेने भंडार असलेले हे मेळघाट अभयारण्यात विविध प्रकारची जैवविविधता बघायला मिळते. मेळघाट अभयारण्यातील जंगले ही पानगळी या प्रकारात येतात. मेळघाटच्या अभयारण्यात सागाची झाडे ही मोठ्या प्रमाणात आहेत.

तसेच काही वने ही उष्टा प्रदेशातील शुष्क प्रवातीमिश्र वनांच्या प्रकारांमध्ये मोडतात. मेळघाट अभयारण्यातील वन्य प्राण्यांच्या रक्षणासाठी येथे विविध गवताचे, झाडांचे, झुडपांची लागवड केली गेली आहे.

मेळघाट अभयारण्यातील प्राणीजीवन :

मेळघाट अभयारण्यात विविध प्रकारचे प्राणी जीवन बघायला मिळेल. या अभयारण्यात विविध प्रकारचे प्राणी आढळतात. विशेषतः अभयारण्य पट्टेवाले वाघ या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे. पण येथे अन्य वन्य जीव सुद्धा आढळते.

त्यात बिबटे, रानडुक्कर, रानगवे, सांबर, अस्वल, भेकरे, वानर, चितळ, कोल्हे, लांडगे, ससे, रान मांजर, तरस, कृष्णमृग, उडत्या खारी अशा प्रकारचे विविध प्राणी मेळघाट अभयारण्यात आढळतात.

तसेच या अभयारण्यात सरपडणारे प्राणी सुद्धा आढळतात. त्यामध्ये साप, नाग, धामण, घोरपड, घोणस, फुरसे, फड्या नाग, अजगर, वृक्षसर्प, हरणटोळ इत्यादी प्राण्यांचा समावेश होतो.

घार, पोपट, पारवे, बुलबुल, सुतार पक्षी, मैना, सर्प गरुड, ससाणे, सुगरण, मोर, रानकोंबड्या, राखी बगळा, भुरा बगळा, करकोचे, बदक, बलाक इत्यादी पक्ष्यांचा समावेश मेळघाट अभयारण्य होतो.

पट्टेवाला वाघ :

मेळघाट अभयारण्यात आढळणारा हा पट्टेवाला वाघ अतिशय ताकदवान, आणि मोठ्या आकाराचा असतो. भारताचा राष्ट्रीय प्राण्याचा मान याच पट्टेवाला वाघाने मिळवला आहे.

पूर्ण वाढ झालेल्या वाघ हा 9 फूट लांब असतो. कधी कधी तो 10 ते 12 फूट येवढा मोठा सुद्धा होतो. वाघाचे वजन हे साधारणता 180 किलो ते 230 किलोपर्यंत भरते.

या वाघांना फिरायला व रहायला हिरवीगार दाट जंगले आवडतात. हरण, सांबर, माकड अशा प्राण्यांची शिकार करून ते आपले पोट भरतो. या वाघांच्या अंगावर ठसठशीत पट्टे असतात व बारीक केस असतात.

या वाघांचा समागमाचा कालावधी हा साधारणा पावसाळ्या ऋतु नंतर असतो. वाघ मादीच्या गर्भ धारणेचा काळ सुमारे 15 ते 16 आठवडे असतो. मादी एका वेळी 2 ते 3 बच्चांना जन्म देते. पिल्ले मोठी होई पर्यंत मादी पिलांचे संगोपन करते.

वाघाचे शरीर जरी लांब आणि वजनदार असले तरी वाघ हा एक चपळ प्राणी आहे. तो पाण्यामध्ये पोहू सुद्धा शकतो आणि झाडांवर ही चढू शकतो आणि अति वेगाने धावू सुद्धा शकतो.

मेळघाट अभयारण्यातील पर्यटन :

मेळघाट हे अभयारण्य जैवविविधतेने नटलेले असल्याने या ठिकाणी दिवसें दिवस पर्यटकांची संख्या वाढत आहे. या मेळघाट अभयारण्यातील विविध जातीच्या पक्ष्यांनी आणि प्राण्यांनी या ठिकाणाचा परिसर जिवंत ठेवला आहे. त्यामुळे अनेक पक्षी प्रेमी आणि निसर्गप्रेमी या ठिकाणी भेट देण्यासाठी येतात.

ऑक्टोबर ते फेब्रुवारी या महिन्यांन दरम्यानचा काळ हा येथील निसर्ग सौंदर्य बघण्यासाठी उत्तम आहे. आणि मेळघाट अभयारण्यातील प्राणी पाहायचे असेल तर मार्च ते जून या महिन्यांन दरम्यान चा कालावधी उत्तम आहे.

हिरवाईची चादर पांघरलेला इथला प्रदेश दूरवर पसरलेल्या उंच उंच पर्वत रांगा आणि खोल दऱ्या यामुळे मेळघाट अभयारण्य पर्यटनाचे उत्तम ठिकाण आणि आकर्षित ठिकाण बनले आहे.

मेळघाट अभयारण्यास कसे जावे :

मेळघाट अभयारण्यास जाण्यासाठी आपण खालील मार्गाचा उपयोग करू शकतो.

विमान :

मेळघाट अभयारण्यापासून जवळचे विमानतळ हे नागपूर जिल्ह्यात आहे. ते मेळघाट पासून सुमारे 240 किलो मीटरवर आहे.

रेल्वे :

मेळघाट अभयारण्यापासून जवळचे रेल्वे स्टेशन हे बडनेरा येथे आहे. ते मेळघाट पासून सुमारे 110 किलो मीटरवर आहे.

रस्त्याने :

मेळघाट अभयारण्यात जाण्यासाठी परतवाडा ते धारणी व बऱ्हाणपूर येथे बस सेवा आहे.


ये निबंध देखील अवश्य वाचा :-

धन्यवाद मित्रांनो !

Leave a Comment