संत गाडगे बाबा यांची माहिती । Sant Gadge Baba Information In Marathi

संत गाडगे बाबा यांची माहिती । Sant Gadge Baba Information In Marathi

Information About Sant Gadge Baba

देबुजी सिंगरजी जानोकर या नावाला सामान्यता कोणीही ओळखत नसेल पण संत गाडगेबाबा किंवा संत गाडगे महाराज हे नाव ऐकताच नजरे समोर एक समाज सुधारक आणि स्वच्छते साठी धडपडणारी मूर्ती येते.

आज देखीलं आदराने आणि सन्मानाने ज्यांचे नाव ओठांवर येते ते म्हणजे संत गाडगे महाराजांचे.

संत गाडगे बाबा यांची माहिती । Sant Gadge Baba Information In Marathi

संत गाडगे महाराजांनी त्या काळातील भारतातील ग्रामीण भागामधील समाजात मोठा बदल घडवून आणला. त्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले.

त्यांनी स्वतःच्या इच्छेने गरीब जीवन स्वीकारून ते लोकांना सामाजिक न्याय देण्याच्या इच्छेने दिवसभर विविध गावात भटकत असत. संत गाडगे महाराजांची सामाजिक न्याय, सुधारणा आणि स्वच्छते बद्दल मनामध्ये वेगळीच रुची होते.

संत गाडगेबाबा माहिती मराठी ( Sant Gadge Maharaj Marathi Mahiti )

आज सुद्धा अनेक राजकीय पक्ष आणि सामाजिक संस्था गाडगे महाराजांनी केलेले कार्य लक्षात घेऊन त्यांच्या कार्यातून नव- नवीन प्रेरणा घेत आहेत.

विसाव्या शतकातील अनेक समाज सुधारक होऊन गेले. त्या समाज सुधारकांच्या यादीमध्ये संत गाडगे महाराज या महान पुरूषाचे देखील नाव आहे. गाडगे महाराज हे महाराष्ट्र राज्यातील एक समाज सुधारक होतेच सोबत एक कीर्तनकार संत सुद्धा होते.

संत गाडगे महाराजांचा जन्म आणि बालपण :

संत गाडगे महाराजांचा जन्म 23 फेब्रुवारी 1877 मध्ये अमरावती जिल्ह्यातील शेंगाव या गावी झाला. डेंबुजी झिंगराजी जानोरकर असे गाडगे बाबा चे पूर्ण नाव होते. त्यांच्या वडिलांचे नाव झिंगराजी जानोरकर होते. आणि त्यांच्या आईचे नाव सखुबाई झिंगराजी जानोरकर असे होते.

गाडगे बाबांचे बालपण मुर्तीझापूर तालुक्यातील दापुरी येथे त्यांच्या आजीच्या घरी गेले व ते तेथेच लहानाचे मोठे झाले. गाडगे महाराजांच्या मामाकडे पुरेशी शेती जमीन होती.

लहानपणा पासूनच गाडगे महाराजांना शेतीमध्ये विशेष रस होता, आवड होती. त्यातला त्यात गाडगे महाराजांना जनावरे गुरेढोरे पाळण्याची फार आवड होती. वयाच्या 18 व्या वर्षापासूनच गाडगे महाराजांनी स्वतःच्या घरातील कठीण परिस्थितीची आणि समाजाच्या मागसलेपणाचा आणि आवडी पणाचे बारकाईने निरीक्षण केले.

गाडगे महाराजांनी आपल्या मामाच्या शेतात अतोनात कष्ट आणि परिश्रम करून शेती फुलवली अज्ञानी आणि दारिद्र्य अंधश्रद्धेने जखडलेल्या समाजा समोर परिश्रमाचा एक मोठा आदर्श ठेवला.

गाडगे महाराज हे कठोर परिश्रम करून स्वतः कष्ट करून, राबून आपले जीवन जगत होते. गाडगे महाराजांच्या जीवनातील बारा वर्षे त्यांनी अज्ञात वासात काढली. त्यावेळी त्यांनी मिळेल ते अन्न खाऊन अंधारावर फाटक्या चिंध्या पांघरून देह श्रमाची पराकाष्टा केली.

समाज सुधारणा करण्यासाठी ते स्वतः खराट्याने गावाचे रस्ते झाडीत असे करत त्यांनी महाराष्ट्र सर्वत्र फिरत व स्वच्छता करत. गाडगे महाराज हे त्या काळातील प्रसिद्ध समाज सुधारक होते.

मागासलेल्या समाजा साठी आणि पीडितांच्या सेवे साठी त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य अर्पण केलं. गाडगे महाराज नेहमीच खेड्यातल्या कुठल्याही लोकांना मदतीचा हात देण्यासाठी तयार असायचे. कुठल्याही कामाला कमी न समजता स्वयं सेवा करणारे गाडगे महाराज हे पहिले होते. 1892 मध्ये गाडगे महाराजांचे लग्न झाले होते.

गाडगे महाराजांनी आपल्या कीर्तनातून समाजातील रूढी, परंपरा आणि चाली रीती यांवर टीका करीत आणि लोकांना स्वच्छतेची शिकवण देऊन स्वच्छतेचे महत्त्व पटवून देत होते.

गाडगे बाबा नेहमी म्हणायचे ही देव हा देवळात नसून देव माणसात आहे. माणसाची पूजा करा देव आपोआप मिळेल.

गाडगे बाबांची शिकवण :

समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, भोळ्या समजुती, अडाणीपणा, अनिष्ट रूढी- परंपरा आणि अनिष्ट चालीरिती दूर करण्यासाठी गाडगे बाबांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजाला सुधारण्यासाठी अर्पण केले आहे.

समाजात सुधारणा करण्यासाठी गाडगे महाराजांनी कीर्तनाचा मार्ग अवलंबला होता. आपल्या कीर्तनात ते समोर बसलेल्या आणि कीर्तन ऐकणाऱ्या श्रोत्यांना विविध प्रश्न विचारून त्यांना त्यांच्या अज्ञानाची, दुर्गणांची आणि दोषांची जाणीव करून देत.

गाडगे महाराज आपल्या कीर्तनातून सोपे आणि लोकांना समजेल या भाषेत उपदेश देत. गाडगे महाराज म्हणत की, चोरी करू नका, अंधश्रद्धेला आणि अस्पृश्यतेला बळी पडू नका, देव- धर्माच्या नावाखाली मुक्या जनावरांची हत्या करू नका, जातिभेद, उच्च- नीचता पाळु नका.

गाडगे बाबा आपल्या कीर्तनातून लोकांना शिकवण देत असत. देव दगडात नसून तो माणसात आहे. माणसांची सेवा करा देव आपोआप मिळेल हा महत्व पूर्ण संदेश सर्व सामान्यांचा मनावर ठसवण्याचा प्रयत्न गाडगे बाबांनी केला.

” मी कोणाचा गुरू नाही, मला कोणी शिष्य नाही ” असे गाडगे बाबा म्हणत. संत तुकाराम महाराजांना गाडगे महाराज आपले गुरु मानत. समाजातील भोळ्या लोकांना ते समजून सांगत.

गाडगे महाराजांच्या सामाजिक सुधारणा :

गाडगे महाराजांनी सामाजिक सुधारणे साठी आपले आयुष्य घालविले. त्यांनी समाज सुधारणेची सुरुवात स्वतःच्या कुटुंबा पासून केली. जेव्हा गाडगे बाबांना मुलगी झाली.

तेव्हा आपल्या मुलीच्या बारश्या च्या दिवशी त्यांनी रूढी प्रमाणे ठरलेल्या दारू व मटणाच्या जेवणा ऐवजी गोडी- धोडाचे शुद्ध शाकाहारी जेवण दिले होते. हे त्यांचे परंपरा व रूढी विरोधात घेतलेले पहिले पाऊल होते.

गाडगे महाराजांनी समाज सुधाराचे कुठलेही काम असो ते पुढे येऊन करत. त्यांनी कीर्तना मधून स्वच्छतेचा संदेश दिला. 1 फेब्रुवारी 1905 रोजी गाडगे बाबांनी घरादाराचा त्याग करून संन्यासी जीवन स्वीकारले.

संत गाडगे महाराज अडचणीत सापडलेल्या लोकांच्या मदतीसाठी लगेच धावून यायचे. मदत केल्याच्या मोबदल्या मध्ये ते काही ही घेत नसत. सार्वजनिक स्वच्छता आणि अंधश्रद्धा निर्मूलून ही तत्त्वे समाजात रुजविण्यासाठी गाडगे बाबा धडपडत.

देव दगडात नसून माणसात आहे, हे सर्व सामान्यांच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न गाडगे बाबांनी केला. समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, रूढी- परंपरा दूर करण्यासाठी त्यांनी आपले जीवनाचा ही विचार केला नाही.

संत गाडगे महाराजांचा दशसूत्री संदेश :

भुकेलेल्यांना………. अन्न

तहानलेल्यांना………. पाणी

उघड्यानागड्यांना……… वस्त्र

गरीब मुला-मुलींना……. शिक्षणाकरता मदत

बेघरांना……… आसरा

अंध अपंग रोग्यांना……… औषधोपचार

बेरोजगारांना……… रोजगार

पशुपक्षी या मुक्या प्राण्यांना……… अभय

गरीब तरुण-तरुणींचे……… लग्न

गोरगरिबांना……… शिक्षण

संत गाडगे महाराजांचा शेवट :

गाडगे महाराज हे थोर समाज सेवक व समाज सुधारक होते. त्यांनी समाज सेवेसाठी संपूर्ण जीवन अर्पण केले. असेच एक दिवस वारकऱ्यां सोबत कीर्तन करीत असताना 20 डिसेंबर 1956 साली अमरावतीत त्यांचे निधन झाले.


ये निबंध देखील अवश्य वाचा :-

धन्यवाद मित्रांनो !

Leave a Comment