माझा आवडता खेळ लंगडी मराठी निबंध । My Favorite Sport ( Langadi ) Essay In Marathi

माझा आवडता खेळ लंगडी मराठी निबंध । My Favorite Sport ( Langadi ) Essay In Marathi

भारता मध्ये विविध प्रकारचे खेळ खेळले जातात. काही खेळ मैदानी खेळ असतात तर काही बैठे स्वरूपातील खेळ असतात. काही खेळ वैयक्तिक खेळले जातात. तर काही ग्रुप मध्ये म्हणजे संघा मध्ये खेळतात.

भारतात खेळल्या जाणाऱ्या खेळां पैकी ” लंगडी” हा एक ग्रामीण खेळ म्हणून ओळखला जातो. कारण हा खेळ विशेषतः ग्रामीण भागातील मुली मुले खेळतात.

माझा आवडता खेळ लंगडी मराठी निबंध । My Favorite Sport ( Langadi ) Essay In Marathi

मुख्यता लंगडी या खेळाला ‘ मुलींचा खेळ’ म्हणून ओळखले जाते परंतु आजच्या काळात मुले सुद्धा हा खेळ खेळतात. तसेच लंगडी खेळाला मैदानी खेळ सुद्धा म्हणतात.

लहान मुलांच्या प्राथमिक हालचालां करिता म्हणजे तोल, चपळपणा, वेळ आणि दमदारपणा वाढवण्यासाठी लंगडी हा खेळ अत्यंत उपयुक्त आहे. आज आपण माझा आवडता खेळ लंगडी या विषयावर मराठी निबंध बघणार आहोत.

आपल्या भारत देशात आणि संपूर्ण जग भरात अनेक वेगवेगळे खेळ खेळले जातात. या सर्व खेळां पैकी काही खेळ हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे तर काही स्थानिक दर्जाचे आहे तर काही ग्रामीण क्षेत्रातले दर्जाचे आहेत.

म्हणजेच काही खेळांचे सामने ही आंतरराष्ट्रीय पातळीवर होतात तर काही खेळांचे सामने स्थानिक पातळी वरील लोकांद्वारे खेळले जातात. या खेळांना विशेष मान्यता नसून हे खेळ काही विशिष्ट भागात व पातळीवर मर्यादित असतात. प्रसिद्ध असतात.

अशाच काही प्रसिद्ध खेळां पैकी एक खेळ आहे तो म्हणजेच ” लंगडी “. लंगडी हा एक भारतीय खेळा सोबत मैदानी खेळ आहे. आणि सर्व खेळां पैकी लंगडी हा माझा आवडता खेळ आहे.

आपल्या भारत देशात साधारणतः 6 – 7 ते 13 – 14 वयोगटातील मुले व मुली लंगडी खेळ खेळताना दिसतील. साधारणता सर्व मुलींचा आवडीचा खेळ म्हणून लंगडी खेळायला ओळखले जाते.

मी ही एका ग्रामीण भागात राहत असल्याने माझ्या घराच्या आजू- बाजूला सर्व मुले- मुली मिळून लंगडी खेळ खेळतात. सुरुवातीला मला हा खेळ कसा खेळावा आणि लंगडी खेळाचे नियम व अटी यांचे पुरेसे ज्ञान नव्हते.

म्हणून मी लांब उभा राहून फक्त बाकीच्या मुलांना खेळताना बघत असो. व हळू- हळू मला या खेळा बद्दल रुची वाढू लागली. व मी ही त्या खेळा मध्ये सामील झालो. व रोज सर्व मुलां सोबत मिळून लंगडी खेळा खेळू लागलो. या खेळात आपण एक पायावर लंगडी घालतो म्हणजे साधारणपणे म्हटल्या तर एकच पायावर उड्या मारत असतो.

मी दररोज माझ्या वर्गातील तसेच गावातील काही मित्र मैत्रिणी सोबत लंगडी खेळतो.

लंगडी खेळाचे मैदान :

लंगडी हा खेळ मैदानी खेळ असल्याने हा खेळ खेळण्यासाठी क्रीडांगणाची खूप आवश्यकता आहे. लंगडी खेळाचे मैदान हे चौरस आकृतीचे असते. या मैदानाची लांबी 12.19 मीटर तर रुंदी 12.19 मीटर असते.

या मैदानाच्या एका बाजूस कोपऱ्यावर प्रवेश खूण असते. आणि या मैदानाला एक कर्ण असतो तो 17.24 मीटरचा असतो.

लंगडी खेळाचे खेळाडू :

लंगडी हा खेळ मैदानी खेळ आहेच पण सोबत एक सांघिक खेळ सुद्धा आहे. या खेळासाठी दोन संघ असतात. आणि प्रत्येक संघात 12 खेळाडू असतात. या 12 खेळाडूं पैकी 9 खेळाडू मैदानात खेळत असतात आणि 3 खेळाडू राखीव असतात.

लंगडी खेळाचा डाव :

लंगडी खेळासाठी प्रत्येकी 5 ते 7 मिनिटांचे 4 डाव असतात. पण आज लंगडी महासंघाने ही वेळ बदलून 9 मिनिटांची केली आहे.

कसा खेळावा लंगडी खेळ :

लंगडी हा खेळ स्पोर्ट्स म्हणून कधी कुणी खेळताना आपण पाहिलाच नाही. कारण लंगडी हा खेळ जवळ जवळ सगळे म्हणजे 90% लोक गंमत म्हणून खेळतात.

लंगडी खेळत असताना संपूर्ण शरीराचे वजन एकाच पायावर बॅलन्स करावे लागतो. कारण एक पाय गुडघ्या पासून दुमडून ठराविक मैदानामध्ये असलेल्या 5 ते 7 प्रतिस्पर्ध्यांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करतो.

लंगडी घालणाऱ्या खेळाडुला दुसरा पाय जमिनीवर ठेवण्याची परवानगी नसते. आणि मैदानात पळणाऱ्या खेळाडूं पैकी एखादा खेळाडू मैदाना बाहेर गेला तर तो बाद ठरला जातो अशा प्रकारे लंगडी हा खेळ खेळला जातो.

लंगडी खेळाचे नियम :

– लंगडी घालणारा खेळाडुने पळणाऱ्या संघातील खेळाडूंना स्पर्श केला तर लंगडी घालणारा संघात 1 गुण दिला जातो.

– लंगडी घालणाऱ्या खेळाडूंने हाताने दुसऱ्या संघातील खेळाडूंना स्पर्श करावा.

– लंगडी घालणाऱ्या खेळाडूचा हात किंवा गुडघ्यातून दुमडलेला पाय जमिनीस टेकल्यास लंगडी घालणारा खेळाडु बाद होतो.

– बाद झालेला किंवा लंगडी घालणारा खेळाडु बाद झाल्यास तो मैदानाबाहेर गेल्या शिवाय पुढचा खेळाडू प्रवेश करू शकत नाही.

– संघातील सर्व खेळाडू बाद झाले आणि वेळ शिल्लक असेल तर पुन्हा बाद झाल्याच्या क्रमाने खेळाडू पळतील.

– धावणाऱ्या खेळाडूने लंगडी घालणाऱ्या खेळाडूला स्पर्श केल्यास किंवा ठराविक मैदाना बाहेर गेल्यास तू खेळाडू बाद ठरतो.

– डाव सुरू झाल्यावर पकडणारा खेळाडू एका पायावर संभाळत राहून दुसरा पाय गुडघ्यात दुमडून उड्या मारत पळणाऱ्या खेळाडूंना शिवण्याचा म्हणजे स्पर्श करण्याचा प्रयत्न करतो.

– लंगडी घालणाऱ्या खेळाडूंनी पळणाऱ्या खेळाडूंना बाद केले हे सांगण्यासाठी पंच असतात व ते शिट्टी वाजवून खेळाडू बाद झाल्याचा इशारा देतात. व बाद खेळाडूंना मैदाना बाहेर काढतात.

– दोन्ही गटांचे लंगडी घालून झाल्यावर पंच आणि दोन्ही संघाचे गुण नोंदणी बघून निर्णय घेतला जातो.

– जो गट जास्त गोड मिळवतो तो गट विजयी घोषित केला जातो.

– दोन्ही संघाने गुण समान असल्यास, ज्या संघाने कमी पकडणारे खेळाडु वापरले तो संघ विजयी घोषित केला जातो.

अशा प्रकारे खेळणारा लंगडी हा खेळ मला खूप आवडतो. याशिवाय लंगडी हा खेळ आवडण्या मागे अनेक कारणे आहेत. लंगडी खेळाला खेळण्यासाठी पुरेशी जागा लागते.

तसेच या खेळामुळे माझा सर्वांगीण विकासा सोबत हाताचा, पायाचा, मानेचा, कंबरेचा व्यायाम सुद्धा होतो. लंगडी खेळ खेळल्याने उंची वाढण्यास मदत होते.

तसेच ह्या खेळाला इतर खेळां प्रमाणे कुठलेही साहित्य लागत नाही त्यामुळे काही खर्च सुद्धा होत नाही. म्हणजेच हा खेळ शून्य खर्चात जास्त फायदा मिळवून देणाऱ्या खेळांमधील एक खेळ आहे.

लंगडी खेळल्याने मला खूप प्रसन्न वाटतो. तसेच माझे शारीरिक आणि मानसिक आरोग्य निरोगी आणि सुदृढ करण्यासाठी लंगडी खेळ फायदेशीर ठरतो. तसेच लंगडी खेळल्या नंतर मला अभ्यासात एकाग्र चित्त लागते. व माझी एकाग्रता वाढून केलेला अभ्यास माझ्या लक्षात राहतो.

अशा हा बहुपयोगी लंगडी हा खेळ मला खूप खूप आवडतो आणि या खेळाला इतर खेळां प्रमाणेच राष्ट्रीय दर्जा प्राप्त व्हावा !


ये निबंध देखील अवश्य वाचा :-

धन्यवाद मित्रांनो !