महिला सशक्तिकरण निबंध मराठी । Women Empowerment Essay in Marathi

महिला सशक्तिकरण निबंध मराठी । Women Empowerment Essay in Marathi

आपला भारत देश हा अफाट लोकसंख्या असलेला देश आहे. या देशात महिला व पुरुष दोघांना बरोबरीचे स्थान आहे.

पण काही भागात ग्रामीण भागात आजही स्त्रियांवर अत्याचार केला जातो.

ते थांबवण्यासाठी स्त्री ने स्वतःच्या हक्कासाठी लढले पाहिजे. स्त्रियांचे सशक्तीकरण म्हणजे स्त्रियांचा संपूर्ण विकास !

महिला सशक्तिकरण निबंध मराठी । Women Empowerment Essay in Marathi

तरी आजच्या निबंधा मध्ये आपण हाच विषय घेऊन आलेलो आहोत तो म्हणजेच ” महिला सशक्तिकरण ” स्त्री घर आणि काम किंवा नोकरी अशी दोन्ही क्षेत्र सांभाळत असते. त्या दरम्यान तिच्यावर अनेक अत्याचार होतात व अनेक समस्यांना सुद्धा तिला तोंड द्यावे लागते. आजच्या स्त्रिया ह्या पहिल्या सारख्या आबला राहिल्या नाहीत.

आजच्या स्त्रीने प्रत्येक क्षेत्रात उंच झेप घेऊन आपले कर्तव्य जगभर पसरवले आहे. तरी सुद्धा भारताला आणखी सक्षम आणि महासत्ता बनण्याच्या प्रयत्नाच्या दृष्टीने महिलांना पाहिजे तेवढा योग्य तो मान आणि ताकद मिळणे गरजेचे आहे आणि त्या साठी स्त्री सशक्तीकरण करणे अत्यंत गरजेचे बाब आहे. प्रत्येक स्त्री ही आर्थिक, सामाजिक आणि मानसिक दृष्ट्या सुरक्षित आणि स्वतंत्र असली पाहिजे.

जेव्हा एखादी स्त्री कुठल्याही कारणामुळे घराबाहेर पडते तेव्हा तिचा योग्य तो सन्मान केला पाहिजे. आज स्त्रीया शिक्षणासाठी कामासाठी व नोकरीसाठी बाहेर पडतात. त्यांच्या संरक्षणासाठी व स्त्रियांवर कुठल्याही अत्याचार व छळ होता कामा नये म्हणून एक सुव्यवस्था केली पाहिजे. मागील दोन दशका पासून स्त्री शिक्षण क्षेत्रात परिपूर्ण झाले आहे. व स्त्रियांच्या या शिक्षणासाठी सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले पुढे आले आणि आज त्यांच्या मुळेच स्त्रिला पुरुषां बरोबरीचा शिक्षणाचा हक्क मिळाला. स्त्रीला शिक्षण तर मिळाले पण गरज राहिली ती योग्य कर्तुत्व देण्याची आणि तिला सक्षम बनवण्याची !

आपल्या सभोवतीच्या समाजामध्ये वावरतांना आपल्याला सामाजिक रजनेनुसार आणि व्यवस्थेनुसार राहावे लागते. समाजातील रूढी-परंपरा आणि बंधनांना धरून चालावे लागते.

मग चालत असताना येथे पुरुष आणि स्त्री असे दोन व्यक्ती विभाजन असल्याची कीड वाढ आहे. स्त्रियांचे हक्क आणि पुरुषांचे हक्क यामध्ये नेहमी भेद-भाव केला जातो. यामध्ये स्त्रियांच्या स्वतंत्र्यांकडे, हक्काकडे योग्य पद्धतीने लक्ष दिले पाहिजे.

आजच्या काळात स्त्री व पुरुष दोघे म्हणून कुठल्याही क्षेत्रात काम करताना दिसतात तेथे फक्त पुरुषांनाच सन्मानित केले जाते व स्त्रियांच्या कर्तुत्वा कडे दुर्लक्ष केले जाते या मागचे एकमेव कारण म्हणजे भेदभाव आणि पारंपारिक व्यवस्था ! आपल्याला माहिती आहे की, पुरातन काळापासूनच आपल्या समाजामध्ये पुरुष वर्चस्व आहे.

यामध्ये स्त्री कधीही सशक्त असल्याच्या गोष्टी आपण ऐकल्या नाहीत आणि आजही बऱ्याच ठिकाणी स्त्रियांना स्वतःच्या हक्कासाठी लढण्याचा हक्क नाही, त्या सशक्त नाहीत. पण आज काळ बदलत जात आहे. आजच्या काळाची गरज आहे. ” महिला सशक्तिकरण “ प्रत्येक महिला आपल्या हक्कासाठी, स्वातंत्र्यासाठी आणि स्वतःवर होणाऱ्या अन्यायासाठी आवाज करू शकते आणि लढू शकते.

महिला सशक्तिकरण म्हणजे स्त्रियांचा संपूर्ण विकास असते. एखादी स्त्री घराबाहेर काम करत असेल तर तिला तेथे काम करणे सुरक्षित वाटले पाहिजे.

Women Empowerment Essay in Marathi

आजच्या स्त्रीची मानसिक तयारी शिक्षणामुळे उंचावली आहे पण बाहेर काम करताना सुरक्षितता वाटावे हे तिला आणखी मजबूत बनू शकेल म्हणून सुरक्षित वातावरण प्राप्त होणे ही प्रत्येक स्त्रीची गरज आहे आणि ही सुरक्षितता तर एखाद्या स्त्रीला लाभली तर ती पुरुषाच्या बरोबरी पुरुषां इतकेच काम सुद्धा करू शकेल.

जेव्हा स्त्री बाल्यावस्थेत असते तेव्हा पासूनच तिच्या वर महिला सशक्तिकरण करणे गरजेचे आहे. प्रत्येक स्त्रीला ती स्वतंत्र असल्याची जाणीव करून देऊन तिला शिक्षणाचा हक्क जोपासण्याची प्रवृत्त केले पाहिजे.

जेव्हा एखादी स्त्री मानसिक दृष्ट्या सक्षम होते तेव्हा ती कुठल्याही क्षेत्रामध्ये यश प्राप्त करु शकते. त्यामध्ये तिचे कुटुंब तिच्या सोबत असेल तर ती अजूनही पुढे जाऊ शकेल.

मना सोबत तिचे शरीर सुद्धा सुदृढ असणे गरजेचे आहे त्यासाठी तिला दररोज व्यायाम करायला लावणे, शारीरिक कष्टाची कामे करायला लावणे आणि धाडसी प्रवृत्ती येणे गरजेचे आहे. त्यामुळे स्त्री शारीरिक दृष्ट्या परिपूर्ण होईल सक्षम होईल. शिक्षणामुळे बुद्धीचा विकास होईलच पण व्यायामामुळे आणि खेळामुळे तिचा शारीरिक विकास सुद्धा होईल.

महिला स-शक्तिकरण करताना प्रथमतः स्त्रियांच्या आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र बनवले पाहिजे. तिला थोड्या पैसा साठी कोणाजवळ हात पसरविण्याची वेळ आली ना पाहिजे. तिझ्या जवळ असलेल्या ज्ञानाच्या आणि कौशल्याच्या साह्याने ती नोकरी करून काम करून आर्थिक दृष्ट्या प्रबळ झाली पाहिजे. आज काळ बदलत जात आहे. त्याचप्रमाणेच स्त्रियांचे स्थान सन्मान बदलत चालला आहे.

आजची स्त्री फक्त चूल आणि मूल सांभाळण्या पुरती राहिली नाही तिने औद्योगिक, शिक्षण आणि तंत्रज्ञान या तिन्ही क्षेत्रात स्त्री आपल्याला बघायला मिळत आहे.

बदलत्या परिस्थितीत स्त्रीची भूमिका सुद्धा बदलत जात आहे. ती आज कोणाच्या घरची मुलगी, सून, पत्नी व आई या सर्व नात्यांना संभाळते. व या नात्यानं व्यतिरिक्त ती अनेक क्षेत्रात काम करताना दिसत आहे.

यावरून कळते की, स्त्रीचा विकास तर झालाच आहे, परंतु त्या विकासाला सर्वांगीण विकास असे म्हणू शकत नाही, कारण समाजाचा काही भाग खूप पुढे गेला प्रगत झाला पण याच समाजाची काही भाग अजूनही मागे राहिलेला आहे.

त्यांचा विकास झालेला नाही या भागातील स्त्रियांवर आजही अत्याचार होतात. छळ होतात. असूनही कित्येक स्त्रिया अंधश्रद्धा, अशिक्षितता, मारहाण, हुंडा या प्रथांना बळी पडलेल्या आहेत. त्यांच्यावर अनेक बंधने लादण्यात आलेली आहेत.

त्यांना स्वतःच्या स्वातंत्र्यासाठी लढण्याचा हक्क सुद्धा नाहीय. त्या स्त्रियांना प्रगतीची दिशाच मिळालेली नाही. नवऱ्याची मारहाण, कुटुंबामुळे मिळालेला छळ यांना बळी पडत आहेत. म्हणतात ना, नाण्याला दोन बाजू असतात, एक बाजू अतिशय सुंदर दुसरी बाजू कुरूप आहे.

एकाकडे आपल्या समाजातील स्त्रिया प्रगत झालेल्या आहेत. त्या महिला शिक्षिका, डॉक्टर, इंजिनिअर, अभिनेत्री, मंत्री- देशाच्या अनेक सर्वोच्च पदावर स्त्रियांनी स्थान मिळवलेले आहे.

तर दुसरीकडे ग्रामीण भागात व अनेक शहरी भागात अनेक स्त्रिया अंधश्रद्धा, मारहाण आणि हुंडा या अभावी मारताना दिसत आहेत. त्यांना न्याय सुद्धा मिळत नाही. अशा महिलांना न्याय देण्यासाठी प्रत्येक शिक्षित प्रगत स्त्री पुढे आलेच पाहिजे.

स्त्री सशक्तीकरण हा मुद्दा प्रत्येक राज्य आणि केंद्र सरकारच्या महत्त्वाच्या मोहिमेत असतो. त्याकडे सरकारने लक्ष दिले पाहिजे. सरकार स्त्रियांना उपलब्ध होतील तेवढ्या सुविधा प्राप्त करून दिल्या पाहिजेत.

समाज्या मध्ये सर्व स्त्रियांना समान दर्जा दिला पाहिजे. महिला सशक्तिकरण ही बाब आपल्या समाजासाठी खूप महत्त्वाचे आहे. त्यासाठी सर्वांनी पुढे आले पाहिजेच. त्यासाठी देशातील सर्व पुरुषांनी सहकार्य केले पाहिजे.

पुरुषांनी स्त्रीला योग्य सुरक्षित वातावरण कर्तुत्व सिद्धीस कार्यरत केले पाहिजे त्यामुळे स्त्रियांनाही योग्य तो सन्मान, दर्जा आणि शक्ती प्राप्त करून घेण्यास मदत होईल.

आपल्या देशाच्या स्त्रियांनी अनेक क्षेत्रात उंच भरारी घेतली आहे. आज इथल्या स्त्री कुठल्याच क्षेत्रात कमी पडली नाही. तिला देवीचे स्थान देण्यात आले आहे. म्हणून सर्जन शीतलतेची शक्ती प्राप्त असलेल्या या स्त्रीला समाजातील दुय्यम स्थान बदलणे आवश्यक आहे.

शारीरिक आणि लैंगिक दृष्टिकोनाने स्त्रियांकडे बगण्याचा हेतू बदलला पाहिजे. प्रत्येक स्त्रीने लैंगिक पातळीवरचे स्वातंत्र्य स्वैराचार यांमधील फरक स्वतः ओळखयला हवा व पुरुष वर्गाला स्वैराचारापासून दूर ठेवण्या इतके सक्षम व्हायला हवे.

जेव्हा एखादी स्त्री स्वतः वर होणाऱ्या अन्याया विरुद्ध स्वतः आवाज करते व लढते तेव्हा ती खऱ्या अर्थाने सक्षम झाली असेल व आपल्या समाजातील स्त्री सशक्ती करण करण्याची गरज सुद्धा भासणार नाही हे मात्र नक्कीच !


ये निबंध देखील अवश्य वाचा :-

धन्यवाद मित्रांनो !