साथीचे रोग यावर माहिती । Epidemic Diseases Information In Marathi
आज-काल आपल्याला आपल्या अवती- भोवती निरनिराळ्या प्रकारचे आजार पहायला मिळतात. एखाद्या भागात विशिष्ट रोगाचा उद्भव अपेक्षित प्रमाणापेक्षा अधिक झाल्यास त्या रोगाची साथ आली असे समजले जाते.
साथीचे वेगवेगळे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. सूक्ष्मजीव, दूषित पाणी, कुपोषण, हवेचे प्रदूषण, दूषित खाद्यपदार्थ यांमुळे साथीचे रोग होण्याची शक्यता व समस्या आढळून येतात.
व अशा साथीच्या आजारांना तोंडा देताना मृत्युमुखी पडल्याची ही उदाहरणे दिवसेंदिवस बघायला मिळतात. पण आजची आपली वैद्यकीय शास्त्रक्रियेच्या प्रगतीमुळे या साथींच्या आजारांवर उपाय- योजना होउ लागल्या.
साथीचे रोग यावर माहिती । Epidemic Diseases Information In Marathi
Table of Contents
साथीचा आजार झालेली व्यक्ती इतर निरोगी व्यक्तीच्या संपर्कामध्ये आल्याने त्या व्यक्तीला हि हा आजार होण्याची शक्यता असते व यामुळे रुग्णांचे प्रमाण वाढले जाते.
भारतासारख्या मोठ्या लोकसंख्येच्या देशात ७०% रुग्ण OPD आणि ६०% रुग्ण उपचारांसाठी खासगी रुग्णालयामध्ये ऍडमिट होतात.
१९९४ मध्ये सप्टेंबर महिन्यात सुरत शहरांमध्ये प्लेग ची साथ आली व ७०० लोकांना प्लेगच्या रोगाची लागन झाली व ५६ लोकांचा मृत्यू देखील झाला.
वर जवळपास ६ लाख लोक सुरत शहर सोडून गेले यामुळे आर्थिक हानी झालीच पण वैयक्तिक जन- जीवन ही विस्कळीत झाले.
साथीचे रोग यावर माहिती :
असे समजले जाते की प्लेग हा रोगी कुत्री, मांजर व उंदीर या प्राण्यापासून होतो तसेच प्लेग हा लोग आपल्याला प्राचीन काळापासून आपल्या जीवनाला आळा घालून बसलेला दिसेल.
तसेच आणखी विविध प्रकारचे साथीचे आजार आजही आपल्या सभोवताली बघायला मिळतात ते म्हणजेच,
कांजण्या रोग यावर माहिती :-
कांजण्या ( चिकन पॉक्स) हा आजार वॅरिसेल्ला- झोस्टर या विषाणूमुळे होतो व अतिशय वेगाने पसरणारा संसर्गजन्य रोग आहे. व हवेमधून यांचा प्रसार होतो.
शक्यतो कांजण्या हा आजार लहान मुलांना जास्त प्रमाणात आढळते व हा आजार जीवन काळात एकदाच होतो असे म्हणले जाते व त्यांचे विषाणू शरीरात राहिल्याने पुढे ” नागीण” या रोगामध्ये त्याचे रूपांतर होते.
कांजण्या झालेल्या व्यक्तीला सुरुवातीला ताप येतो व दोन दिवसाने त्वचेवर बारीक फोडी किंवा पुरळ येते. १०-२० दिवस कांजण्या आजार राहतो.
लक्षणे :-
आजाराच्या सुरुवातीच्या काळात, ताप, थंडी, सर्दी, खोकला इत्यादी त्रास होतो. व दोन दिवसानंतर अंगावर पुरळ किंवा फोडी असल्याचे दिसते. साधारणता संपूर्ण भागावर याचा परिणाम दिसतो.
उपचार :-
हा रोग हवेतून पसरतो व विषाणूजन्य असल्याने तोंडाला मास्क लावावे किंवा खोकताना रुमाल धरावा. ताप नियंत्रित ठेवण्यासाठी ताप नाशक औषधे प्यारासिटोमॉल चा वापर करावा.
व शरीराची स्वच्छता ठेवणे तितकेच महत्त्वाचे आहे त्यासाठी Antiviral Sanitizer चा वापर करावा.
डेंग्यू रोग यावर माहिती :-
डेंग्यू हा आजार डेंग्यू (Denv) या विषाणूमुळे व इडिस जीप्ती डासाच्या चावल्यामुळे प्रसारित होतो. मुख्यतः डेंगू चे दोन प्रकार आढळतात.
- डेंग्यू ताप
- डेंग्यू रक्तस्त्रावात्मक ताप (DHF)
डेंग्यू हा तीव्र व फ्लू या रोगांसारखा आजार आहे. या आजारांमध्ये ताप तीव्र प्रमाणात असते त्यामुळे कधी- कधी डेंगू झालेल्या रुग्णाला मृत्यूचा धोका असतो. सन १९६३ मध्ये भारतातील कलकत्ता येथे डेंग्यूची पहिली मोठी साथ आलेली होती.
१. डेंग्यू ताप रोग यावर माहिती :-
डेंग्यू ताप ही मुख्यता अतितीव्र व सौम्य प्रकारच्या तापातून होते. लहान मुलांना सौम्य तर मोठ्या माणसांना अति तीव्र ताप येतो.
लक्षणे :-
या आजारामध्ये मुख्यतः ताप येणे ही प्रमुख कारण आहे सोबतच डोकेदुखी, अंगदुखी येते. तोंडाची चव नष्ट होते व भूकही मंदावते. पोटात मळमळ होण्यास चालू होते व उलट्या ही होतात.
२. डेंग्यू रक्तस्त्रावात्मक ताप :-
हा आजार डेंग्यू तापा प्रमाणेच असतो पण याचे परिणाम अतिशय धोकादायक असतात. या आजारा मध्ये मृत्यूची शक्यता जास्त असते.
लक्षणे :-
या आजार मध्ये तापा बरोबरच रक्तस्त्राव ही होतो. हिरड्यातून रक्त येतो, शरीरातील प्लेटलेट्सची संख्या कमी होते व वारंवार झोप येते. श्वास घेताना त्रास होतो. उलट्या मार्फत रक्त बाहेर पडते. म्हणून हा अति गंभीर आजारामध्ये विभागला जातो.
उपचार :-
रुग्णाला ताप आलेला आहे असे आढळले तर लगे आराम करावा किंवा पॅरासिटॅमॉल गोळी घ्यावी. रक्तस्त्राव किंवा उलटी मध्ये रक्त आल्यास ताबडतोब रुग्णाला रुग्णालयात भरती करावी.
कॉलरा ( पटकी ) रोग यावर माहिती :-
पटकी म्हणजेच कॉलरा हा आजार व्हिब्रिओ या जिवाणूमुळे होतो. या आजारामध्ये मुख्यतः उलटी सह अचानक जुलाब लागतो, कधी-कधी उलटी येत नाही पण अचानक जुलाब लागतो. हा जर अतिशय वेगाने संक्रमित होतो. तसेच दूषित पाण्यामुळे हा आजार होतो.
लक्षणे :-
वारंवार उलट्या व जुलाब लागते तसेच तोंड कोरडे पडते व पोट मळमळ होण्यास चालू होते तू अचानकच अस्वस्थ वाटून हृदयाचे ठोके वाढतात.
उपचार :-
उलट्या व जुलाब लागल्याचे कळताच शरबत, पेयांचा वापर करावा. झिंक टॅबलेट गोळी घ्यावी त्यामुळे उलट्या व जुलाब कमी होण्यास मदत होते.
हत्तीरोग रोग यावर माहिती :-
हत्तीरोग हा किटकजन्य आजार आहे. व हा डासांमार्फतच संक्रमित होतो. या आजारामध्ये शरीराच अवयव वृषण हे आकारांनी वाढले जाततात.
हत्तीरोग हा ” क्युलेक्स विचकी फॅसिएट्स ” नावाच्या अळ्या मुळे होतो व त्यांना ” मायक्रोफिलेरीई” असेही मानले जाते.
लक्षणे :-
या आजारामध्ये रुग्णाचे हात पाय हत्तींच्या पायासारखे जाड व मोठे होतात व हालचाल करण्यास अवघड होते. व वृषण आकाराचे जाड होतो. थोडी- ताप ही आलेली दिसेल.
उपचार :-
हा रोग डास व आळ्या पासून होत असल्याने तेच सूक्ष्मजीव मरतील अशी औषधे घेणे, डासांवर नियंत्रण करणे. मच्छरदाणी/ कीटकनाशक वापरणे.
कावीळ रोग यावर माहिती :-
माणसाच्या रक्ता मध्ये पित्तरंजक द्रव्याचे प्रमाण वाढल्याने डोळ्यांच्या बुबळाचा रंग पिवळा पडतो तसेच नख व त्वचा मध्ये पिवळसर रंग आल्याचे दिसते. हिपेटायटिस इ हा व्हायरस शरीरात गेल्याने कावीळ होते व हा वायरस दूषित पाणी व अन्न मुळे होतो.
लक्षणे :-
या आजारांमध्ये डोळे, नख व त्वचा पिवळी झालेली दिसेल. व पोट दुखी, भूक न लागणे व वजन कमी होणे हे देखील या रोगाची लक्षणे आहेत.
उपचार :-
कावीळ झाल्यास लोहयुक्त अन्नपदार्थ खावे जसे की सफरचंद वगैरे. कावीळ च्या उपचारा दरम्यान स्टेरॉईड नावाची गोळ्या औषधे दिली जातात.
गोवर रोग यावर माहिती :-
गोवर हा आजार हवेमार्फत प्रसारित व संक्रमित होतो. गोवर हा ” गोवर विषाणूमुळे” होतो. या आजाराने अंगावर ‘प्लिक स्पोर्ट्स ‘ म्हणून ओळखले जाणारे लहान पांढऱ्या रंगाचे लक्षणे दिसायला लागतात. हा आजार मुख्यत: लहान मुलांमध्ये बघायला मिळतो.
लक्षणे :-
या आजारांमध्ये ताप तर येतोच पण त्याशिवाय सर्दी व डोळ्यांची जळजळ हे लक्षणे दिसून येतात. चेहऱ्यावर पांढऱ्या रंगाचे उरला दिसून येतात.
Paramyxovirus मुळे होणाऱ्या गोवर मुळे डोळ्यांमध्ये जळजळ जाणवते तसेच अशक्तपणा, अंगदुखी ही होते
उपचार :-
या आजारावर उपचार म्हणजे या आजारांच्या लक्षणांवर उपचार घेणे म्हणजेच सर्दी, खोकला, ताप यांच्यावर औषधे वेळेवर घेणे.
पोलिओ रोग यावर माहिती :-
‘ पोलिओमयलिटीस ‘ या विषाणूमुळे होणारा ” पोलिओ” हा आजार बालकांना होणारा व अपंग करणारा संसर्गजन्य व संक्रमित रोग आहे. हा विषणू शरीरामध्ये गेल्या वर हळू हळू पोलिओ रोगाची लक्षणे दिसायला लागतात.
लक्षणे :-
पोलिओचा विषाणू जर मेंदू व मज्जारत्तू यांना जोडणाऱ्या भागात गेल्यास रुग्णाला श्वसनाला त्रास होतो तसेच अन्न गिळण्यास हि त्रास होतो.
१०% रुग्णांना जर पोलिओची गंभीर लागण होते व त्या व्यक्तींना डोकेदुखी, अंगदुखी, डोक्यामध्ये व मानेमध्ये वेदना सुरू होतात.
उपचार :-
पोलिओ या आजारांपासून दूर राहण्यासाठी ‘ नियमित टीकाकरण कार्यक्रम’ व ‘ पल्स पोलिओ’ अभियान द्वारा पोलिओ ची वॅक्सीन सर्व भारतामध्ये पाच वर्षाच्या मुलांना मोफत लावण्याची सुरुवात केलेली आहे.