जल प्रदूषण वर निबंध मराठी । Marathi Essay on Water Pollution

जल प्रदूषण वर निबंध मराठी । Marathi Essay on Water Pollution

प्रस्तावना :

आपल्या आजू- बाजूला आज प्रदूषणाने मोठे संकट पसरलेले आहे. त्यात महत्त्वाचे म्हणजे जल, वायू आणि भूमी प्रदूषणाने संपूर्ण जगाला विळाखा घातला आहे.

आपल्या जीवनामध्ये सर्व सजीवांसाठी जगण्यासाठी पाणी असणे खूप गरजेचे आहे. फक्त पाणीच नव्हे तर ते पाणी शुद्ध असणे महत्त्वाचे आहे. आपल्या मानवी शरीराच्या वजनामध्ये सरासरी 60 टक्के पाणी असते.

यावरुन आपल्याला कळेल की, पाणी आपल्याला किती गरजेचे आहे. मानवा प्रमाणे या पृथ्वीवरील प्रत्येक प्राण्याला आणि वनस्पतींना जगण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. काही वनस्पती तर 95 टक्के पाणी असते.

जल प्रदूषण वर निबंध मराठी । Marathi Essay on Water Pollution

आपल्या पृथ्वीवर पुरेश्या प्रमाणात पाणी उपलब्ध आहे. परंतु त्यातील ताज्या पाण्याचे प्रमाणे हे फक्त २ ते ७ टक्के एवढीच आहे. व त्यातील फक्त ३ टक्के पाणी हे शुद्ध व पिण्यायोग्य आहे. तर काही पाणी हे समुद्र, हिमनदी व बर्फाळ शिखरे यांच्या स्वरूपात आहे. पण आज दिवसें दिवस हे पाणी दूषित होत आहे. आज मनुष्याला पिण्याच्या पाण्यासाठी भटकावे लागते.

आजच्या निबंधामध्ये आपण जल प्रदूषण या विषयावर सविस्तर माहिती बघणार आहोत.

1) जल प्रदूषण म्हणजे काय ?

पाण्यात काही घातक व विषारी पदार्थ मिसळल्याने पाण्याचे नैसर्गिक गुणधर्म पूर्णतः बदलतात व ते पाणी पिण्यायोग्य राहत नाही. आरोग्यासाठी हानिकारक होते किंवा त्याची क्षमता कमी होतो, यालाच ” जल प्रदूषण” असे म्हणतात.

जल प्रदूषणाची समस्या आज वाढतच जात आहे. व ही आज संपूर्ण जिल्ह्यात पसरली आहे. WHO ( World Health Organization ) जागतिक स्वास्थ्य संघटनेच्या नुसार पिण्याच्या पाण्याचा Ph हा 7 ते 8 दरम्यान असला पाहिजे.

पण आज अनेक घातक रसायने पाण्यात मिसळल्याने पाण्यातील Ph चे प्रमाण कमी जास्त होत आहे. संपूर्ण पृथ्वी वरील जन जीवन हे पाण्यावर अवलंबून आहे. मानव आणि इतर सजीव प्रजातींसाठी पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत हे नद्या, तलाव, विहीर आहेत.

आपल्याला माहिती आहे की पाण्यामध्ये स्वतःला शुद्ध करण्याची क्षमता असते. परंतु जेव्हा जल शुद्धीकरण्याच्या प्रक्रियेच्या वेगा पेक्षा जास्त वेग हा पाणी प्रदूषणाचा असेल तेव्हा जल प्रदूषण यांसारख्या समस्या निर्माण होतात.

जेव्हा पाण्यामध्ये घातक आणि विषारी रसायने, प्राण्यांचे विष्ठा, अनेक घातक पदार्थ मिसळतात तेव्हा जल प्रदूषण होते आणि ह्याच कारणामुळे बहुतेक पाण्याचे स्त्रोत म्हणजे नदी, नाले, तलाव आणि समुद्र दूषित होतात. आणि ह्या दूषित पाण्याचा संपूर्ण जगावर घातक आणि वाईट परिणाम होत आहेत.

2) जल प्रदूषणाची कारणे :

जल प्रदूषणा मागे अनेक कारणे आहेत ती पुढीलप्रमाणे,

– औद्योगीकरण, कारखान्यां मधून निघणारे घातक आणि विषारी रसायने नदी, तलाव मध्ये सोडले जाते यामुळे आज जल प्रदूषणाची समस्या वाढत आहेत.

– जेव्हा पाऊस पडतो, तेव्हा पावसाच्या पाण्यात हवेतील धुळी कण आणि इतर विषारी पदार्थ मिसळतात. व हे पाणी नदी, नाले, तलावामध्ये जाते व प्रदूषण होते.

– तसेच आज बाजारात नव- नवीन अनेक प्रकारचे डिटर्जंट साबण, निरमा उपलब्ध आहेत. यांमध्ये विषारी पदार्थ असतात व ग्रामीण भागातील लोक यांचा वापर करून नदी, तलाव यांच्या किनाऱ्यावर कपडे धुतात व तेच पाणी पुन्हा नदीमध्ये जाते व जल- प्रदूषण होते.

– जल प्रदूषणा हे पाण्यामध्ये कोणताही प्रकारचा कचरा टाकल्यास पाण्यात घातक सूक्ष्मजीव निर्माण होतात व परिणामी पाणी दूषित होते ते पाणी पिण्यायोग्य राहत नाही.

– आज जल मार्गद्वारे पेट्रोल, डिझेल, तेल यांसारख्या पदार्थांची देवाण घेवाण होते. आणि या आयात- निर्यात मध्ये कित्येकदा जहाजातील पेट्रोल अन्य रासायनिक पदार्थ समुद्रामध्ये गळतात. व यामुळे समुद्रातील पाणी दूषित होत आहे. जल प्रदूषणामुळे समुद्रातील जलचर प्राण्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.

– आज जल प्रदूषणा सोबतच वायू प्रदूषण वाढत आहे. आणि या वारंवार वाढणाऱ्या वायु प्रदूषणामुळे ऍसिड पावसाचे प्रमाण वाढत आहे. ऍसिड पावसामुळे अनेक विषारी पदार्थ पाण्यात मिसळतात. ज्यामध्ये सिसा ( Pb ), कैडमियम ( cd ) आणि अनेक घातक पदार्थाचा समावेश होतो.

– जल प्रदूषणामुळे नदी, तलाव आणि समुद्र यांसारखे पाण्याचे स्त्रोत दूषित होत आहेत. पाण्यामध्ये राहणारे जलचर प्राणी व विविध प्रकारचे मासे यांचे अस्तित्व धोक्यात आले आहेत.

3) जल प्रदूषणामुळे होणाऱ्या समस्या :

– वाढत्या जल प्रदूषणामुळे आज मानवाला आणि प्राण्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

– जर पाण्याचा एखादा स्त्रोत दुषित झाला असेल, तर त्या स्त्रोताच्या जवळपास राहणाऱ्या प्रत्येक जीवाला जल प्रदूषणाचा कोणता ना कोणता वाईट परिणाम होत असतो. तर पाणी मर्यादेपेक्षा जास्त दूषित झाले तर त्याचा परिणाम जीवावर सुद्धा बेततो.

– जल प्रदूषण ही समस्या पिकांसाठी सुद्धा नुकसान दायक व हानिकारक ठरत आहेत. जर पाणी दूषित असेल तर त्यामुळे शेतीच्या जमिनीला सुद्धा तेच दूषित पाणी मिळतो. त्यामुळे जमिनीची उत्पादन क्षमता ही कमी होते आणि जमीन नापीक होतो. म्हणून जल प्रदूषण ही कृषि क्षेत्राला धोकादायक ठरत आहे.

– तसेच जल प्रदूषणाचा आणखी एक दुष्परिणाम म्हणजे जल प्रदूषणामुळे समुद्रातील जीवांवर वाईट परिणाम होतो. जेव्हा समुद्रातील पाणी दूषित होते. तेव्हा समुद्रातील काही जीव मरतात तर काही जीव आजारी पडतात. आणि पाण्याची गुणवत्ता कमी होते.

– जेव्हा नदी, तलाव ह्या स्त्रोतांमधील पाणी दूषित होते आणि तेच पाणी आपण पिण्यासाठी वापरतो. तेव्हा त्यातून आपले आरोग्य खराब होते. साथीचे रोग, कावीळ, कॉलरा, उलट्या यांसारख्या रोगाला सामोरे जावे लागते.

– जल प्रदूषणाचा मोठा फटका हा कृषिक्षेत्राला होत आहे. जेव्हा दूषित पाणी आपण पिकांना देतो, तेव्हा त्या पिकांच्या उत्पादना मध्ये घट होऊन ती जमीन नापीक होते.

याचे उदाहरण म्हणजे आज जोधपूर आणि राजस्थान या सारख्या मोठ्या शहरातील रंगीत छपाई उद्योगातून निघणाऱ्या दूषित पाण्यामुळे तेथील आसपासच्या गावातील जमीन नापीक होत आहे. व 17 ते 30 टक्के उत्पादन घटत आहे.

अशा प्रकारे जलप्रदूषणामुळे आपल्या जीवनावर विपरीत परिणाम होत आहे.

4) जल प्रदूषणामुळे होणारे आजार :

आज जल प्रदूषणाचा परिणाम संपूर्ण जगावर होत आहे. जल प्रदूषणामुळे संपूर्ण जगाला विविध रोगांच्या समोरे जावे लागत आहे. जल प्रदूषणामुळे दररोज 14 हजार पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू होतो.

दूषित पाणी पिल्याने मानवाच्या व पशु पक्ष्यांच्या स्वास्थ्याला एक धोका निर्माण झाला आहे. दूषित पाणी पिल्याने टायफाईड, कावीळ, कॉलरा सारखे आजार उद्भवत आहेत.

जर आपण दूषित झालेले पाणी पिले तर आपल्याला साथीच्या आजारांना तोंड द्यावे लागेल. त्याच बरोबर त्वचेचे आजार, पोटाचे विकार, ताप आणि उलट्या होऊ शकतात. पावसाळा ऋतु मध्ये ह्या समस्या मोठ्या प्रमाणात होत आहेत.

जर हे जल प्रदूषण असेच वाढत गेले तर संपूर्ण जगाला विविध समस्यांना व आजारांना तोंड द्यावे लागेल. एवढेच नव्हे तर जलप्रदूषणामुळे मृत्यूचे प्रमाण सुद्धा वाढेल.

5) जल प्रदूषण रोखण्याचे उपाय :

जल प्रदूषण ही जागतिक पातळीची समस्या झाली आहे. जल प्रदूषण थांबवण्यासाठी आपल्याला प्रत्येकाला वैयक्तिक प्रयत्न केले पाहिजे.

आपल्याला नदी, नाले, तलाव स्वच्छ ठेवली पाहिजेत कुठल्याही प्रकारचा कचरा हा पाण्यामध्ये जाणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे.

आपल्या जवळपासच्या नदी आणि नाले स्वच्छ ठेवली पाहिजे. ग्रामीण भागामध्ये पक्के नाले नसल्यामुळे तेथील पाणी कुठेही निघून जाते व जमा होते. त्यामुळे आपल्याला ग्रामीण भागात पक्के नाले बनवण्याची गरज आहे.

जल प्रदूषणाला आळा घालण्यासाठी आपल्याला सांडपाण्यावरील उपचारांच्या पद्धतीबद्दल सतत संशोधन करत राहिले पाहिजे. आपण दूषित झालेल्या पाण्यावर पुन्हा पुनर्चक्रीकरण करून शुद्ध करून वापरात आणले पाहिजे.

कारखान्यातील आणि उद्योग- धंद्यातून निघणारे विषारी आणि घातक पाणी नदी नाल्यात न सोडता त्या पाण्याचा योग्य निचरा केला पाहिजे.

नदीचे पाणी दूषित होता कामा नये यासाठी कठोर नियम व अटी लागू केल्या पाहिजे. विहीर, तलाव व इतर पिण्याच्या पाण्याचे स्त्रोतां मधून मिळणार्‍या पाण्याचे निर्जंतुकीकरण केले पाहिजे.

जगातील प्रत्येक जागृक नागरिकाला पाण्याचे महत्त्व पटवून दिले पाहिजे. जल प्रदूषण कसे कमी करता येईल याची माहिती देऊन लोकांना जागृत केले पाहिजे.

आपल्याला पाणी टिकवून ठेवायचे असेल आणि आपल्या येणाऱ्या काळामध्ये जल प्रदूषण रोखायचे असेल, तर आपल्याला येणाऱ्या पिढीला पाण्याचे महत्व व प्रदूषण कमी करायचे उपाय सांगावे लागतील. यासाठी आपण शाळा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना पाण्याचे महत्त्व पटवून दिले पाहिजे.


ये निबंध देखील अवश्य वाचा :-

धन्यवाद मित्रांनो !