भ्रष्टाचार वर मराठी निबंध । Essay on Corruption In Marathi

भ्रष्टाचार वर मराठी निबंध । Essay on Corruption In Marathi

नमस्कार ! मित्रांनो आज आपण ” भ्रष्टाचार वर मराठी निबंध । Essay on Corruption In Marathi ” या विषयावर निबंध बघणार आहोत.

या निबंधा मध्ये आज आपण आपल्या देशाला बोळकावलेला भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचारा विषयी असणारी देशातील समाजाची मानसिकता यांवर माहिती बघणार आहोत.

आजचे जग हे एकविसाव्या शतका कडे जात आहे. आणि ह्या एकविसाव्या शतकाला एक राक्षसाने जणू आळाच घातला आहे. त्या राक्षसाचे नाव, ” भ्रष्टाचार” !

भ्रष्टाचार वर मराठी निबंध । Essay on Corruption In Marathi

हल्ली दिवसें दिवस तर वर्तमानपत्रात रोज नव्या ” आर्थिक घोटाळा” बघायला मिळतो. वर्तमानपत्र हे बातम्या देणारे नसून भ्रष्टाचार लिहिणारे पत्रच झाले आहे. त्यात कित्येक बँक घोटाळे, लाच घेणारे अधिकारी, खोट्या नोटा छापणे….. अशा कित्येक घोटाळ्यांच्या बातम्या आपण रोजच वाचत, बघत असतो.

भ्रष्टाचार वर निबंध मराठी

पूर्वीच्या काळातील भ्रष्टाचारा पेक्षा या आधुनिक युगाचा भ्रष्टाचार हा महाभयंकर आहेत. आज कुठल्याही क्षेत्रात विचार केला असता, भ्रष्टाचार नावाची कीड ही त्या क्षेत्राला लागलेली दिसेलच. भ्रष्टाचाराने आज प्रत्येक क्षेत्रात स्वतःचे अस्तित्व स्थापित केलेले आहे.

भ्रष्टाचार म्हणजे काय :

जर आपलं एखादं कोणी बँक कर्मचारी किव्हा सरकारी कर्मचारी काम करत नसेल तर तेला पैशाची लाच देऊन काम करून घेणे हेलाच भ्रष्टाचार म्हणतात.

वाढत्या महागाईला तर पर्यायच नाही. महागाई ही दिवसें दिवस आणखी वाढतच जात आहे. कोणत्याही गोष्टीची कमतरता म्हणजेच टंचाई ही भ्रष्टाचाराला जन्म देते.

आज देशाची लोकसंख्या अफाट वाढलेली आहे. इथे नोकऱ्यांच्या जागा कमी आणि नोकरीसाठी अर्ज केलेल्या लोकांची संख्या जास्त आढळते. मग नोकऱ्यांची टंचाई हा मुद्दा समोर आला की, तेथे भ्रष्टाचाराला वावरण्यासाठी जागा मिळतेच.

वाढता भ्रष्टाचार :-

लाखो रुपयांची लाच देऊन मोठ्या- मोठ्या अधिकाराच्या जागा मिळवल्या जातात, आणि दिलेली लाच पुन्हा मिळविण्यासाठी पुन्हा नव्याने झालेला अधिकारी लाच घेतो, परिणामी हा भ्रष्टाचार वाढत जातो. लाच देणे आणि लाच घेणे चक्र सुरू होते आणि त्यातूनच ” काळा पैसा” निर्माण होत आहे.

आज विज्ञानाने खूपच प्रगती केली आहे. त्यात जीवन जगण्यासाठी लागणाऱ्या चैनीच्या गोष्टी ची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात झाली आहे. नव- नवीन गोष्ट बघायला मिळत आहेत आणि त्या गोष्टींची प्राप्ती करण्यासाठी लालची होत आहे.

कष्ट करून पैसा मिळविणे सगळ्यांना नको वाटत आहे. सहज काही काम न करता पैसा मिळवणे सगळ्यांना सुखाचे वाटत आहे. पण ह्याच वागण्यामुळे, स्वतःच्या स्वार्थासाठी, हव्यासापोटी मनुष्य भ्रष्टाचार सारख्या राक्षसाला जन्म देत आहेत.

आज पैसा मिळवण्यासाठी मनुष्य वाटेल ते करायला तयार आहे. पैशासाठी लोक चुकीचा आणि भ्रष्टाचाराचा मार्ग स्वीकारत आहेत. आज प्रत्येक क्षेत्रात भ्रष्टाचाराचा किडा फिरत आहे.

भ्रष्टाचाराने अन्न आणि औषधी सुद्धा सोडल्या नाहीत. आज अन्नात व औषधात देखील भेसळ केली जात आहे. अन्नाच्या आणि औषधातील भेसळीमुळे रोज कित्येक गरीब आणि निरपराध जीवांचे बळी घेतले आहेत.

तसेच भ्रष्टाचाराने शिक्षण क्षेत्र सुद्धा सोडले नाही. आज कमी गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यां कडून लाच घेऊन त्यांना मेडिकल, इंजीनियरिंग अशा शाखेत भरती केली जाते. बालवर्गा पासून ते शाळा- महाविद्यालयां पर्यंतच्या सर्व शाखेच्या प्रवेशासाठी लाच घेतली जाते.

आणि अशीच लाच घेऊन दहावी ते बारावीच्या परीक्षेच्या प्रश्न पत्रिका फोडल्या जात व लाच घेऊनच परीक्षेतील गुणांची फिरवा फिरवी केली जाते. आज वैयक्तिक स्वार्थासाठी आपल्या देशाची संरक्षण विषय सर्व माहिती परकीय सत्तेला पुरवायला सुद्धा लोक विचार करेनात.

काही वर्षांपूर्वी आपल्या देशात हा भ्रष्टाचार नावाचा राक्षस जन्माला नव्हता पण कालांतराने ती स्थिती बदलली आहे. सुरुवाती भ्रष्टाचारी माणसाला खूप कमी दर्जा देत असत पण आज सर्व नैतिक चालीरीतीचा व मूल्यांचा ऱ्हास झाला आहे.

आज आपल्याला एक ही ठिकाण असे दिसणार नाही की, जिथे भ्रष्टाचार बघायला मिळणार. आजच्या जगातील पापी लोक मंदिरा मध्ये सुद्धा भ्रष्टाचार करताना दिसतील. जे लोक लाच देतात त्यांना दर्शनासाठी पहिले स्थान असते आणि गरीब लोकांना तासांनतास रांगेतच थांबावे लागते.

आज असे एकही असे क्षेत्र नाही तिथे भ्रष्टाचार बघायला नाही सर्वत्र भ्रष्टाचाराचे साम्राज्य पसरलेले दिसेल. आजचा भ्रष्टाचार हा शिष्टाचार झाला आहे.

भ्रष्टाचाराचे राज्य केवळ मोठ्या शहरात नसून लहान लहान खेड्यांपर्यंत पोहोचले आहे. सध्या खेड्यातील लोकांना काही काम करायचे म्हटले तर लाच द्यावी लागते. त्या शिवाय कुठलीच कामे पूर्ण होत नाहीत.

भ्रष्टाचाराचे सर्वात प्रथम प्रसारण हे सरकारी कार्यालयांमधून होताना दिसेल कोणते ही काम सरकारी कर्मचाऱ्यांकडून करून घ्यायचे म्हटले तर आधी त्यांचे ” खिसे भरावे” लागतात. म्हणजेच लाच द्यावी लागते.

भ्रष्टाचार एक समस्या :

आज- काल फसवणूक मोठ्या प्रमाणात होत आहे. फसवणूक हा एक प्रकारच्या भ्रष्टाचाराचाच भाग मानला जातो. फसवे फोन करून बँकेची माहिती घेऊन पैसे चोरणे, फसवणूक काही ना काही वस्तू घेणे आज खूप वाढले आहे.

आज- काल विमा कंपनी, बँका, आयकर विभाग, मोठी कार्यालय, सरकारी कार्यालये या ठिकाणी हा भ्रष्टाचाराने आळा घातला आहे. मोठे अधिकारी आपल्या पदाचा गैर फायदा घेऊन भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देत आहेत.

भ्रष्टाचाराचा क्रीडा सर्वांची मने आणि समाजाला पोखरत आहे. आज भ्रष्टाचार हि मोठी चिंताजनक गोष्ट झाली आहे. कारण भ्रष्टाचाराचा राक्षस आपले हात पाय कापत आहे. म्हणजेच आपल्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी सुद्धा आपल्याला भ्रष्टाचाराला आहारी जावे लागत आहे.

अनेक पवित्र ठिकाणांचा भ्रष्टाचाराची कीड लागून ही ठिकाणे अपवित्र झाली आहेत. वैद्यकीय क्षेत्र हे केवढे पवित्र क्षेत्र मानले जाते. डॉक्टरांना, नर्सना तर परमेश्वराचा दर्जा दिला जातो.

डॉक्टर आपल्याला जीवनदान देतात पण ह्या भ्रष्टाचाराच्या अभावी जाऊन आपल्याला जीवदान देणारे परमेश्वराचे दुसरे रूप मानणारे डॉक्टर राक्षस बनत आहेत. तो पैशाच्या पोटी गरीब माणसांवर उपचार करेना ज्यांच्या कडे पैसा आहे त्यांच्या मागे डॉक्टर ही आहे अशी स्थिती झाली आहे.

माणसाची परिस्थिती, उच्चपद आणि अधिकार हे भ्रष्टाचाराला कारणीभूत ठरतात. हवं ते मिळवण्यासाठी माणूस भ्रष्टाचाराचा मार्ग स्वीकारत आहे. लहान- लहान गोष्टींमधून भ्रष्टाचार जन्म घेत असतो.

तो म्हणजे वजनामध्ये काटा मारणे, कंडक्टरने सुटे पैसे परत न करणे, परीक्षेत नंबर आल्यास विद्यार्थ्यांची बक्षिसे ठेवून घेणे, अशा लहान लहान गोष्टीं मधून भ्रष्टाचार जन्माला येत असतो. आज प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या गोष्टीत भ्रष्टाचार करीत असतो.

राष्ट्राच्या भवितव्याचे नाव सांगून अनेक राजकारणी नेते भ्रष्टाचार करतात. बोगस प्रतिष्ठान, नियम, अटी काढून राजरोस किती मोठ्या प्रमाणात पैसा जमवतात.

शेतकऱ्यांना शेतीसाठी आलेल्या अनुदानातून पैसे काटते, रस्ते- बांधकामाच्या कामातून पैश्याची आदला बदली करणे अश्या कित्येक नव- नवीन कारणांमधून पैसा कमावला जातो भ्रष्टाचार होतो.

भ्रष्टाचार एक कलंक :

काहीजण तर स्वतःच्या स्वार्थासाठी देशाला विकायला सुद्धा कमी करत नाहीत. देशातील गुप्त माहिती इतर देशाला देऊन त्यांच्या कडून पैसे घेणे परिणामी आतंकी हमले अशा समस्यांना तोंड द्यायला भाग पडावे लागते.

नोकरी करताना वरिष्ठ पदासाठी म्हणजे प्रमोशन साठी वरिष्ठ कर्मचाऱ्यांना पार्टी देणे, पैसे देणे हा एक प्रकारचा भ्रष्टाचारच समजला जातो. पण हा भ्रष्टाचार करताना आपण विचार करत नाही की माणूस भ्रष्टाचारी होतो तरी का? माणसाच्या सर्व श्रद्धा निष्ठा हरवतात तर का ?

मंदिरातील देवाच्या सोन्याच्या मुर्त्या सुद्धा चोरीला जातात मग या वागणुकीला म्हणावे तरी काय ?

असे किती तरी प्रश्न आपल्या समोर पडतात. जेव्हा पैसा साठी भ्रष्टाचार करून एखाद्या गरीबा कडून पैशाची लाच घेऊन आपण आनंदी तरी राहू शकतो का ? मग हा भ्रष्टाचार करायचाच का ?

जेव्हा आपण कष्ट करून पैसे कमवतो त्याचा आनंद आपण पैशा सोबत मोजू पण शकत नाही. कोणी भ्रष्टाचार करून आपल्याला देशाला व स्वतःला सुद्धा वाईट मार्गावर घेऊन जात आहोत. प्रत्येक मनुष्याचे स्वप्न असते की चांगले शिकून समाजात चांगला माणूस म्हणून जगावे.

पण हा भ्रष्टाचार रुपी किड आपल्या समाजात येवढ्या मोठ्या प्रमाणात लागली आहे की, गरीब- श्रीमंत, लहान-मोठे, तरुण- म्हातारे सर्व भ्रष्टाचाराला बळी पडत आहेत. म्हणून आपल्या देशाला या भ्रष्टाचाराच्या राक्षसा पासून मुक्त करायचे असेल तर सरकार बरोबर देशातील प्रत्येक नागरिकाने पाऊल उचलले पाहिजे.

भारत देशातील भ्रष्टाचार ही समस्या दूर झाली तर भारत देश हा विकसनशील देशांच्या यादीत येईल. व देशाची प्रगती सुद्धा होईल सोबतच देशातील प्रत्येक नागरिक प्रगती करेल. म्हणून प्रत्येक व्यक्ती प्रामाणिक पणे राहून आपले कर्तव्य पार करण्यासाठी जबाबदार झाला पाहिजे. कोणतीही व्यवस्था, सुविधा आणि यंत्रणा जी लोकांच्या फायद्याची असेल ती अस्तित्वात आणलीच पाहिजे.

मानवी विकास हा फक्त आर्थिक दृष्ट्या न होता तो नैतिक दृष्ट्या होणे गरजेचे आहे. आणि असेच झाले तेव्हाच भ्रष्टाचार आपल्या समाजातून दूर होईल. आणि आपल्या देशाचा विकास होईल व देशातील प्रत्येक नागरिक प्रामाणिक होईल.


ये निबंध देखील अवश्य वाचा :-

धन्यवाद मित्रांनो !