संत तुकाराम विषयी संपूर्ण माहिती । Sant Tukaram Information in Marathi
आपल्या भारत देशात अनेक संत, महान पुरुष होऊन गेले. त्यांपैकी स्वतःची वारकरी प्रांतात वेगळीच ओळख निर्माण केलेले थोर संत म्हणजे संत तुकाराम.
संत तुकाराम हे सतराव्या शतकातील वारकरी प्रांतातील एक महान संत होऊन गेले. संत तुकाराम यांचा जन्म वसंत पंचमीला- माघ शुद्ध पंचमीला देहू या गावात झाला.
संत तुकाराम विषयी संपूर्ण माहिती । Sant Tukaram Information in Marathi
Table of Contents
संत तुकाराम हे पंढरपूरच्या विठ्ठल / विठोबा या देवाचे भक्ती करतात म्हणून त्यांना विठ्ठलाचे आराध्य दैवत सुद्धा म्हणतात. तसेच वारकरी तुकारामांना ” जगद्गुरु” या नावाने ओळखत. म्हणून सर्व वारकरी आजही कीर्तन किंवा प्रवचनाच्या शेवटी-
” पुंडलिक वरदे हरी विठ्ठल,
श्री ज्ञानदेव तुकाराम,
पंढरीनाथ महाराज की जय,
जय सद्गुरू तुकाराम महाराज की जय “
अशा प्रकारे संत तुकारामाचे नाव घेत जयघोष करतात व या जयघोषातून संत तुकाराम महाराजांची आठवण करतात संत तुकाराम हे अनेक अभंग सुद्धा करीत त्यांचे अनेक अभंग आणि कीर्तन प्रसिद्ध आहेत. त्यातील एक अभंग आजही खूप प्रसिद्ध आहे तो म्हणजे,
” जे का रंजले गांजले, त्यांसी म्हणे जो आपुले ।।
तो ची साधू ओळखला, देव तेथेची जाणावा ।।”
या अभंगा मधून संत तुकारामांनी एक सुयोग्य मार्ग दाखविला आहे. जो व्यक्ती गोर, गरिबांना जवळ घेऊन त्यांची सेवा करतो तोच व्यक्ती खरा साधू असतो आणि अशा व्यक्तीपाशी देवाचा वास असतो.
अशा प्रकारे संत तुकारामांनी ईश्वर भक्तीचा योग्य मार्ग दाखविला आणि वारकरी संप्रदायाचे अखंड ज्योत निर्माण केली. सतराव्या शतकामध्ये संत तुकारामांनी समाजाला एक सुयोग्य आणि अचूक मार्गदर्शन करण्याचे काम त्यांच्या अभंग आणि कीर्तनांतून केले. थोडक्यात सांगायचे झाले तर तुकारामांनी समाज प्रबोधनाचे महत्त्वाचे काम केले.
संत तुकारामांचा जन्म :
संत तुकारामांचा जन्म वसंत पंचमीला- शुद्ध पंचमीला म्हणजे 22 जानेवारी 1608 मध्ये देहू या गावात झाला. संत तुकारामांचे संपूर्ण नाव हे ” तुकाराम बोल्होबा अंबिले ” असे होते. त्यांचे मूळ घराणे मोरे होते.
संत तुकारामांच्या कुळातील सर्व लोक पंढरपूर ची यात्रा म्हणजे वारी मध्ये जात होते. संत तुकारामांची आई कनकाई आणि वडील बोल्होबा यांच्या सहवासात गेले.
परंतु तुकाराम जेव्हा 18 वर्षाचे होते तेव्हा त्यांच्या आई- वडिलांची मृत्यू झाली. त्यांना सावजी हा मोठा भाऊ आणि कान्होबा हा धाकडा भाऊ होता. मोठा भाऊ सावजी हा वृत्तीने विरक्त, क्रूर होता. म्हणून घराची संपूर्ण जबाबदारी तुकारामांवर होते. कमी वयातच तुकारामांचा विवाह पुण्याचे आप्पाजी गुळवे यांची कन्या जिजाबाई विषय झाला.
संत तुकारामांचे जीवन :
संत तुकारामांचे जीवन हे अनेक कठीण परिस्थितींत मध्ये गेले. वयाच्या 18 वर्षे त्यांच्या आई वडिलांचा मृत्यू झाला. मोठा भाऊ तीर्थ ला निघून गेला.
त्या वेळी देशात मोठा दुष्काळ पडला होता. त्या दुष्काळा मध्येच त्यांची पहिली पत्नी आणि मुलाची भूखे मुळे मृत्यू झाला. काही काळानंतर त्यांचा विवाह जिजाबाई या मुलीशी झाला. तुकारामांची दुसरी पत्नी म्हणजे जिजाबाई स्वभावाने खूप कर्कश होती.
संत तुकारामांचे हळू- हळू प्रपंचा मधून दुर्लक्ष होऊ लागले. आणि ते सांसारिक सुखां पासून दूर झाले. मनाला शांती मिळवण्यासाठी तुकाराम देहू गावाच्या जवळ असलेल्या भावनाथ पहाडी वर जाऊन भगवान विठ्ठलाचे नामस्मरण करीत.
चिंता रंजनाचा शाश्वत शोध घेत असताना तुकारामांना साक्षात्कार झाला. आणि तेथेच त्यांना परब्रह्म स्वरूप श्रीविठ्ठलाचे दर्शन झाले असे मानले जाते.
संत तुकारामांचा व्यवसाय :
संत तुकारामांचा व्यवसाय हा परंपरागत आलेल्या सावकारीचा होता. परंतु भीषण पडलेल्या दुष्काळा मुळे त्यांनी सर्व कुळांना त्यांच्या सावकारीतून मुक्त केले.
व जमीन घाण ठेवल्याची सर्व कागद पत्रे इंद्रायणी नदीत टाकून दिली. विठ्ठल भक्तीत लीन झाल्याने त्यांना अभंगाची रचना ही प्रवचन आणि कीर्तनांमधून मिळाली. संत तुकाराम हे साक्षात्कारी व निर्भीड बंडखोर संत कवी होते.
संत तुकारामांचे शिक्षण :
संत तुकाराम महाराजांचे शिक्षण हे त्या काळातील संस्कृत आणि प्रतिष्ठित घराण्यातील व्यक्तीप्रमाणे झाले होते. घरचा व्यवसाय सांभाळण्याचे दृष्टी कोणातून लेखन- वाचन जमाखर्च यांचे शिक्षणही तुकारामांना मिळाले होते. साहित्यात आणि संस्कृत- प्राकृत ग्रंथांच्या व्यापक अध्ययनाची आणि सखोल व्यासंगाचीअनेक प्रमाणे मिळतात.
त्यांच्या काही अभंगातून असे दिसते की त्यांना, भक्ति मार्गात असताना पातंजल योग मार्गाचा शोध लागला होता. त्यांच्या मालकीचे पांडुरंग मंदिर असल्याने त्या मंदिरात होणारी रोजची भजने, कीर्तने आणि पुराणे ऐकून संत तुकारामांना लहान वयातच बहुश्रुतपणा आणि विठ्ठला बद्दल आपुलकी आलेली होती.
काही काळा नंतर पुढे ध्यान, भक्ती, वैराग्य आणि परिपक्वता आल्यानंतर वेद रहस्याचा आपल्या वाणीवर विविध विविध रूपे प्रकट होतात ही कल्पना तुकारामांना आली. वेदांचा अर्थ आम्हा सीच आढावा असे ते आत्मविश्वासाने सर्वांना सांगू लागले.
संत तुकारामांचे साहित्य :
संत तुकारामांचे साहित्या मध्ये खूप महत्त्वाचे स्थान आहे. मराठी साहित्यात संत तुकारामांचे अभंग गाथेचे पहिले स्थान मिळवले आहे. संत तुकारामांचे चार हजार अभंग आजही उपलब्ध आहेत.
संसारातील काही प्रसंग, जीवनात आलेले वेगवेगळे अनुभव या बरोबरच गोपाल कृष्णाच्या बालक्रीडा, विराण्या ब्रह्म, तत्त्वाचे साक्षात्कार यांचेही अभंग रूप वर्णन त्यांच्या जाती आढळतात. संत तुकारामांनी त्यांच्या साहित्यातून समाजाला सुयोग्य मार्ग दाखविला.
तसेच संत तुकारामांना महाराष्ट्रातील भागवत धर्माचा पाया उभारले आणि तुकारामांनी वरचा कळस चढविला असे म्हणतात. संत तुकारामांच्या शैलीचे सूत्र उपयुक्त अभंगातून बोलून दाखवले आहे. आपल्या जीवनातून आणि अभंगातून शुद्ध परमार्थाच्या स्थापनेचे कार्य त्यांनी चालू ठेवले.
संत तुकारामांची शिकवण :
संत तुकारामांनी सांगितले आहे की, सर्व मनुष्य हे ईश्वराची मुले आहेत म्हणून सर्वजण एक समान आहेत. संत तुकाराम द्वारा ‘ महाराष्ट्र धर्माचा ‘ प्रचार झाला. त्यांचा सिद्धांत भक्ती आंदोलनाने प्रभावीत झाले. महाराष्ट्र धर्माचे तत्कालीन सामाजिक विचारधारा वर याचा खूप मोठा प्रभाव झाला.
जाती आणि वर्ण व्यवस्था मधील वाद कमी करण्यामध्ये अजून यशस्वी झाले नसताना सुद्धा संत तुकारामांच्या समानतेच्या सिद्धांतामुळे हळू- हळू वर्ण व्यवस्था मध्ये सुधारणा झाली. महाराष्ट्र धर्माचा उपयोग श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जातींना एकत्र ठेवण्यासाठी केला.
संत तुकारामांचा शेवट :
संत तुकारामांना वयाच्या 40 व्या वर्षी हे जग सोडावे असे वाटू लागले. आणि वयाच्या 42 व्या वर्षी त्यांनी निर्णय केला. फाल्गुन वद्य तृतीयेला म्हणजेच 9 मार्च 1650 हा दिवस त्यांचा निर्णय दिवस म्हणून ओळखला जातो. संत तुकाराम महाराज विमानात बसून सदेह वैकुंठास गेले असे चरित्र ग्रंथात आणि कथा कीर्तनात सांगितली जाते.
ये निबंध देखील अवश्य वाचा :-
- वाचाल तर वाचाल मराठी निबंध
- ग्लोबल वॉर्मिंग चे दुष्परिणाम निबंध मराठी
- सोशल मीडिया वर निबंध मराठी
- गाय वर मराठी निबंध
- रक्षा बंधन माहिती मराठी
धन्यवाद मित्रांनो !