कोरोना व्हायरस वर निबंध । Corona Virus Essay in Marathi

कोरोना व्हायरस वर निबंध । Corona Virus Essay in Marathi

प्रस्तावना :

आपल्या देशात अनेक संसर्गजन्य रोग आहेत. त्यातील अलीकडे सर्व जगाला विळाखा घालणारा रोग म्हणजेच ” कोरोना “.

चला तर मित्रांनो  कोरोना व्हायरस वर निबंधCorona Virus Essay in Marathi या विषयावर निबंध आणि माहिती बघणार आहोत.

कोरोना व्हायरस हा एक विषाणूंचा गट आहे. या व्हायरस मुळे सर्व सस्तन प्राण्यांना व पक्ष्यांना विविध रोग होतात.

कोरोना व्हायरस च्या विषाणूंचा प्रसार मानवां मध्ये श्वसनाच्या रोगांचा समावेश होतो. सर्व प्रथम कोरोना व्हायरस हे 1960 च्या सुमारास आढळले.

कोरोना व्हायरस वर निबंध । Corona Virus Essay in Marathi

कोरोना व्हायरस ला Covid-19 सुद्धा म्हणतात. सर्वप्रथम या रोगाचे रुग्ण हे चीन मधील ” वुहान” या शहरात आढळले होते.

1) कोरोना एक महामारी :

कोरोना हा एक व्हायरस असून या रोगाने एक महामारी चे रूप धारण केले आहे आणि संपूर्ण जगावर या रोगाचा फैलाव केला आहे.

या रोगाची सुरुवात ही सर्दी, खोकला, आणि ताप या संसर्गजन्य रोगापासून होते आणि हळू- हळू याचे रूपांतर कोरोना व्हायरस मध्ये होते. या रोगाचा प्रभाव खूप भयंकर असल्याने बहुतेकदा कोरोना रुग्णांचा मृत्यू सुद्धा होतो.

WHO ( World Health Organisation ) ने या रोगाला महामारी म्हणून घोषित केले आहे. कोरोना व्हायरस चा प्रसार हा खूप वेगाने होतो. या रोगाला आळा घालण्यासाठी सर्व देशातील डॉक्टर औषधे आणि व्हॅक्सिन्स बनवण्याच्या तयारीत आहेत.

2) कोरोना रोगाची सुरुवात कशी झाली :

कोरोना या रोगाची सुरुवात 1930 च्या सुमारास झाली होती. सर्वप्रथम या रोगाची लागण एका कोंबडीला झाली होती आणि यामुळे त्या कोंबडीच्या श्वसन प्रक्रियेवर घात झाला होता. आणि पुढे जाऊन 1940 शतकाच्या सुमारास कोरोना व्हायरस हा जनावरांमध्ये आढळलला. व त्यानंतर 1960 मध्ये कोरोना व्हायरस ची संक्रमित असलेला पहिला व्यक्ती आढळला होता.

आणि यानंतर अलीकडच्या काळात म्हणजे 1920 मध्ये परत या रोगाचे संक्रमण चीन मधली वुहान शहरा मध्ये झाले. आणि या रोगाने संपूर्ण शरीरात फैलाव केला आहे.

3) कोरोना व्हायरस च्या संसर्गाची लक्षणे :

आज कोरोना व्हायरसने संपूर्ण जगात महामारीचे रूप धारण केले आहे. कोरोना व्हायरस ची सर्वात साधारण लक्षणे म्हणजे ताप, सर्दी, कोरडा खोकला ही आहेत. परंतु काही रुग्णांना अति तीव्र लक्षणे सुद्धा बघायला मिळतात. ती म्हणजे अतिसार, सतत वाहणारे नाक, घसा दुखणे किंवा खवखवणे.

सुरुवातीला करून रोगाच्या रुग्णांना वरील लक्षणे ही सौम्य प्रमाणात असतात. पण रोगाचा प्रभाव जस जसा वाढावा तशी ही लक्षणे वाढू लागून श्वासनाने आजार मध्ये रुपांतर होते.

काही लोकांना कोरोना व्हायरसचा संसर्ग होतो पण त्यांच्यातील असणाऱ्या रोग प्रतिकार शक्ती मुळे ही लक्षणे काही लोकांना आढळून येत नाहीत. बहुतांश लोकांना तर ( ८०% ) या रोगाचा विशेष उपचार न करताच या आजारातून बरे होतात.

कोरोना व्हायरस होणाऱ्या प्रत्येकी १० पैकी २ रुग्ण गंभीर आजारी पडतात व त्यांना श्वसनाचा आजार होऊन श्वास घेण्यास त्रास होतो.

कोरोना रोगाचा अति धोका हा वृद्ध लोकांना आणि हृदयरोग रुग्ण, उच्च रक्तदाब आणि मधुमेह यांसारखे आजार असणाऱ्या लोकांना या वायरस चांद गंभीर धोका होऊन आजार होण्याची शक्यता असते.

आणि या लोकांचा मृत्यूचा धोकाही असतो. म्हणून या आजारांच्या रुग्णांची त्वरित उपचार घेण्याची आवश्यकता आहे. ताप, खोकला आणि श्वास घेण्यात अडचण असलेल्या लोकांनी त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यावा.

4) कसा करावा कोरोना पासून बचाव :

आज कोरोना व्हायरस ने संपूर्ण जगात महामारी चे स्वरूप धारण केले आहे. या रोगावर आज वर निश्चित आणि योग्य औषधे- गोळ्या उपलब्ध नाहीत.

म्हणून कोरोना व्हायरस पासून स्वतःला वाचविणे आणि स्वतःचा बचाव करणे हीच एक महत्त्वाचा उपाय आहे. कारण हा एक संक्रमित रोग आहे आणि या रोगाचा फैलाव हा खूप वेगाने होत आहे. म्हणून खूप कमी वेळात ही महामारी आज संपूर्ण जगात पसरली आहे. WHO ने काही सावधानी पूर्ण राहण्यासाठी संपूर्ण जगाला प्रेरित केले आहे.

– कोरोना महामारी पासून स्वतःला व स्वतःच्या कुटुंबाला वाचविण्यासाठी सदैव बाहेर जाऊन आल्यास आपले हात पाय साबून नी किंवा इतर जंतु नाशकांची किमान २०- ३० सेकंद पर्यंत धुणे गरजेचे आहे.

– आपल्या हातांना आपल्या तोंडापासून सदैव दूर ठेवणे अनिवार्य आहे कारण आपण कोणाच्या संपर्कात आल्याने किंवा कुठल्याही वस्तूला हात लावल्यास त्या वरील जंतू आपल्या तोंडा मध्ये जाणार नाहीत.

– काही कारणासाठी किंवा जीवन आवश्यक वस्तू घेताना प्रत्येकी लोकां पासून ५ ते ६ फुटाचे अंतर ठेवणे आवश्यक आहे.

– सार्वजनिक व गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे.

– अति महत्त्वाचे काम असल्यास मास्क आणि ग्लब्स घालणे बंधनकारक आहेत.

– कोरोना रोगाचे संक्रमण झालेले असल्यास स्वतःला व दुसऱ्यांना स्वतः पासून लांब ठेवावे आणि जवळच्या दवाखान्यात माहिती द्यावी.

– आपल्या आसपास व कुटुंबां मध्ये कोणालाही कोरोना व्हायरस वायरस ची लक्षणे दिसल्यास त्यांना त्वरित उपचार द्यावा.

– आणि वेळेवर हात सॅनिटायझर किंवा इतर साबुन नी धुवावे.

– सार्वजनिक ठिकाणांवर पान किंवा गुटखा, तंबाखू खाऊन थुंकू नये.

– रेल्वेचा आणि बस चा प्रवास टाळावा.

– आपण कुठल्या कोरोना रोगाच्या संपर्कात आल्याने स्वतःला कुटुंबा पासून आणि समाजा पासून १४ दिवस लांब ठेवावे.

5) निष्कर्ष :

कोरोना व्हायरस हा एक संसर्गजन्य रोग आहे आणि तो आज संपूर्ण जगात एक महामारी बनून पसरला आहे. म्हणून या रोगापासून आपले व आपल्या कुटुंबांचे संरक्षण करावे आपले कर्तव्य आहे.

कोरोना महामारी आज भारत देशा सोबत जगातील 180 देशांपेक्षा जास्त देशात पसरला आहे. आणि आज 1 करोड 30 लाख लोकांना या रोगाचा प्रसार झाला आहे. आणि बहुतांश लोक या रोगा पासून मुक्त सुद्धा झालेत. आणि या रोगा मुळे आजपर्यंत 5 लाख पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू सुद्धा झाला आहे.

जगातील सर्व वैज्ञानिक आणि डॉक्टर या रोगाचे निदान करण्यासाठी प्रयत्न करत आहे.

आज संपूर्ण जग या रोगाला लढा देत आहे. कोरोना व्हायरस या हानिकारक आजाराला न घाबरता WHO ( World Health Organization ) आणि स्वास्थ्य मैत्रिनीं केलेल्या सर्व नियमांचे पालन करून या रोगा पासून स्वतःला वाचवता येईल. जेवढे होईल तेवढे दुसऱ्या व्यक्तींच्या संपर्कात न जाता घरात राहा आणि स्वस्थ राहा !


ये निबंध देखील अवश्य वाचा :-

धन्यवाद मित्रांनो !