सागरेश्वर अभयारण्य माहिती । Sagareshwar Abhayaranya Information In Marathi

सागरेश्वर अभयारण्य माहिती । Sagareshwar Abhayaranya Information In Marathi

महाराष्ट्रातील सर्वांत लहान अभयारण्यांपैकी एक असलेले हे सागरेश्वर अभयारण्य आहे.

आज आपण याच सागरेश्वर अभयारण्य माहिती संपूर्ण सविस्तर मध्ये माहिती बघणार आहोत.

चला तर मग बघुया, ” सागरेश्वर अभयारण्य माहिती Sagareshwar Abhayaranya Information In Marathi “.

सागरेश्वर अभयारण्य माहिती । Sagareshwar Abhayaranya Information In Marathi

सातवाहन काळातील 51 मंदिरांचा समूह असलेले ठिकाण म्हणजे कराड जवळील कृष्णा नदीचे खोरे. या खोऱ्यात 51 मंदिरांचे समूह असून सागरेश्वर हे शंकराचे मुख्य मंदिर आहे.

आणि त्या मंदिराच्या जवळील आसपासच्या घाटाला सागरेश्वर अभयारण्य म्हणतात. या घाटामध्ये विविध प्राणी आणि पक्षी आढळतात त्यामुळे महाराष्ट्र शासनाने 1985 मध्ये या अभयारण्याची स्थापना केली. येथे असलेल्या सागरेश्वर मंदिरामुळे या अभयारण्याला ही ” सागरेश्वर अभयारण्य ” हे नाव देण्यात आले असावे.

सागरेश्वर अभयारण्याचे क्षेत्रफळ हे सुमारे 10.87 चौरस किलो मीटर येवढे आहे व हे अभयारण्य कडेगांव, वाळवा, पलूस या तालुक्यात विस्तारले आहे. हे अभयारण्य आकाराने जरी लहान असले तरी सुद्धा या ठिकाणी नैसर्गिक संपत्ती पाहायला मिळते.

सांगली जिल्ह्यातील हे सागरेश्वर अभयारण्य पर्यटनाचे मुख्य केंद्र आहे. पर्यटकांना राहण्यासाठी येथे विशेष सुविधा असल्याने दरवर्षी मोठ्या संख्येने पर्यटक या ठिकाणी येतात.

सागरेश्वर अभयारण्य वनस्पती :

सागरेश्वर अभयारण्यात नैसर्गिक संपन्नता उत्तम आहे. त्यामुळे या अभयारण्याला वनसंपदा उत्तम लाभली आहे. सागरेश्वर अभयारण्यात जवळपास 30 ते 40 प्रकारचे वेगवेगळे वृक्ष आढळतात.

त्यामध्ये बाभूळ, हावडा, चंदन, सांग, अशा वृक्षांचा समावेश होतो. त्या बरोबरच या अभयारण्यात जंगली वृक्ष सुद्धा आढळतात त्यात, करवंद, बोर अशा झुडपांचा समावेश होतो.

सागरेश्वर अभयारण्यातील प्राणीजीवन :

सागरेश्वर अभयारण्य आकाराने जरी लहान असले तरी सुद्धा या अभयारण्यात विविध प्रकारचे प्राणी आढळतात. त्यामध्ये येथील मृगविहारात काळवीट, सांबर आणि भेर हे प्राणी मोठ्या प्रमाणात आहेत.

त्याबरोबरच वन्य प्राण्यांमध्ये लांडगे, कोल्हे, ससे, वानर, तरस, रान मांजर असे विविध प्राणी येथे आढळतात. प्राण्यांप्रमाणे सागरेश्वर अभयारण्यात पक्ष्यांचाही संसार बघायला मिळतो.

चिमणी, पोपट, घार, मोर, लांडोर, कोकीळ, बुलबुल आणि जंगली कोंबड्या इत्यादी पक्षी सागरेश्वर अभयारण्यात आढळतात.

पर्यटन :

पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे ठिकाण म्हणजे हे सागरेश्वर अभयारण्य होय. शाळा- महाविद्यालयीन विद्यार्थी सहलीसाठी आणि आनंद लुटण्यासाठी हामखास सागरेश्वर अभयारण्याला भेट देतात. येथे असलेले विविध प्राणी आणि पक्षी यामुळे पक्षीप्रेमी आणि निसर्गप्रेमी पर्यटनासाठी येथे येतात.

सागरेश्वर च्या माथ्यावर पोहोचल्यावर आजूबाजूचा निसर्गमयी परिसर दिसतो. खालच्या बाजूला नागमोडी वाहणारी कृष्णा नदी पर्यटकांना आकर्षित करते.

येथील किर्लोस्कर पॉईंट वरून दिसणारा निसर्ग खूपच सुंदर आहे. तसेच महालगुंड, विहार, छत्री बंगला ही निसर्गमयी पर्यटनाची ठिकाणे या ठिकाणी आहेत.

सागरेश्वर हे मंदिर असल्याने येथे पर्यटक मोठ्या संख्येने येतात. तसेच भरपूर पडणारा पाऊस, धुक्याचे वातावरण, हिरवीगार डोंगरी, पक्ष्यांचा किलबिलाट, झाडांवर उड्या मारणारी वानरे आणि डोंगरावरून वाहणारे लहान- लहान झरे यामुळे सागरेश्वर अभयारण्यात अनेक पर्यटक इथल्या निसर्गाचा अनुभव आणि आस्वाद घेण्यासाठी येतात.

सागरेश्वर अभयारण्यास कसे जावे :

निसर्गाच्या जैवविविधतेने नटलेले ह्या अभयारण्याला भेट देण्यासाठी आपण खालील मार्गाचा उपयोग करू शकतो.

1. जवळचे विमानतळ :

या सागरेश्वर अभयारण्या पासून जवळ असलेले विमानतळ हे पुणे या ठिकाणी आहे. हे विमानतळ सागरेश्वर पासून सुमारे 250 किलो मीटरच्या अंतरावर आहे.

2. जवळचे रेल्वे स्टेशन :

सागरेश्वर अभयारण्या पासून जवळ असलेले रेल्वे स्टेशन हे सांगली आणि मिरज येथे आहे. रेल्वे स्टेशन सागरेश्वर पासून अनुक्रमे 50 ते 65 किलो मीटरच्या अंतरावर आहे.

3. रस्त्याने जाण्याचा मार्ग :

सांगली- मिरज आणि पुणे- मिरज अशी बस व्यवस्था असल्याने आपण चारचाकी वाहनाचा वापर करून सागरेश्वर अभयारण्या पर्यंत जाऊ शकतो.


ये निबंध देखील अवश्य वाचा :-

Leave a Comment