सुवर्णदुर्ग किल्ल्याची माहिती मराठी । Suvarnadurg Fort Information In Marathi
महाराष्ट्र राज्यामध्ये असलेल्या किल्ल्यांमध्ये सुवर्णदुर्ग किल्ला चा समावेश होतो.
सुवर्णदुर्ग किल्ला हा सिंधुदुर्ग किल्ल्या प्रमाणेच एक जलदुर्ग आहे.
आज आपण याच सुवर्णदुर्ग किल्ल्याची माहिती आणि इतिहास बद्दल ची बरीचशी माहिती बघणार आहोत.
सुवर्णदुर्ग किल्ल्याची माहिती मराठी । Suvarnadurg Fort Information In Marathi
चला तर मग बघुया ” सुवर्णदुर्ग किल्ल्याची माहिती Suvarnadurg Fort Information In Marathi “ आपल्या मराठी भाषेमध्ये.
सुवर्णदुर्ग हा किल्ला महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यामधील हर्णे ह्या बंदराजवळच स्थित आहे. सुवर्णदुर्ग किल्ला हा जलदुर्ग ह्या किल्ल्याच्या प्रकारामध्ये मोडतो.
कारण हा किल्ल्याच्या आसपास जलाशयाचे क्षेत्र आहे. सुवर्णदुर्ग किल्ल्याचे क्षेत्रफळ हे सुमारे 4.5 हेक्टर येवढे आहे व किल्ल्याची लांबी ही 480 मीटर रुंदी 123 मीटर येवढी आहे.
भारत सरकारने सुवर्णदुर्ग किल्ल्याला दिनांक 21 जून 1910 रोजी ” महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक ” म्हणून जाहीर केले आहे.
-
सुवर्णदुर्ग किल्ल्याचा इतिहास :
सुवर्णदुर्ग हा किल्ला अतिशय भक्कम, मजबूत व बुलंद आहे. ह्या किल्ल्यामागे सुद्धा इतिहास आहे. सुवर्णदुर्ग किल्ल्याची समुद्र सपाटी पासूनची उंची ही सुमारे 1400 फूट येवढी आहे आणि हा किल्ला जलदुर्ग ह्या प्रकारामध्ये मोडतो.
सुवर्णदुर्ग ह्या किल्ल्याचा सर्वात जास्त काळ हा आंग्रे या घराण्यासोबत जोडलेला आहे. असे म्हणतात कि, सरखेल कान्होजी आंग्रेंचे आजोबा सेखोजी आंग्रे यांनी या सुवर्णदुर्ग किल्ल्याच्या तटबंदीचे काम केले.
सेखोजी आंग्रे यांचा मुलगा तुकोजी आंग्रे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात या सुवर्णदुर्ग किल्ल्याचे उपसेनापती होते.
पुढे 1688 साली सुवर्णदुर्ग हा किल्ला मोगल सरदार सिद्दी कासीमने जिंकला. या किल्ल्यासाठी पुढे कितीतरी वर्षे झुंज चालली. व पुढे मराठ्यांच्या ताब्यात हा किल्ला आला. मराठा राजांच्या वतीने सुवर्णदुर्ग किल्ल्याची जबाबदारी ही कान्होजी यांच्याकडे दिली.
इ.स. 1700 मध्ये हा किल्ला राजाराम महाराजांकडे गेला व नंतर ताराराणी यांनी 1714 पर्यंत ह्या किल्ल्याची जबाबदारी घेतली व ताराराणी यांच्या पासून कान्होजी यांनी पक्षाता सोडली तेव्हा हा किल्ला शाहू महाराजांकडे गेला. 1802 मध्ये दुसरा प्रताप बाजीराव हे या किल्ल्यात काही दिवस राहिले.
-
सुवर्णदुर्ग किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व :
सुवर्णदुर्ग हा किल्ला एक जलदुर्ग किल्ला आहे. या किल्ल्यासोबत छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जोडल्याने ह्या किल्ल्याला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. शिवाजी महाराजांनी 1660 मध्ये हा सुवर्णदुर्ग किल्ला जिंकला.
त्यांनी सुवर्णदुर्ग किल्ल्याची चांगल्या प्रकारे डागडुजी केली आणि आपले आरमार सैन्य या किल्ल्यावरच वाढवले. 1757 मध्ये आंग्रे व इंग्रज यांच्यामध्ये बऱ्याचशा चकमकी झाल्या व 1802 मध्ये या सुवर्णदुर्ग किल्ल्यावर दुसरा बाजीराव राहायला आला.
किल्ल्याची उंची जास्त असल्याने हा किल्ला दूरवरूनही आपल्या नजरेस पडतो ही गोष्ट ह्या सुवर्णदुर्ग किल्ल्याची विशेषता आहे. समुद्राच्या एका खडकावर हा किल्ला उभारल्याने ह्या किल्ल्याला खूप महत्त्व आहे. चोही बाजूंनी पाणी असल्याने एक नैसर्गिक दृष्ट्या हा किल्ला पर्यटनाचे महत्त्वाचे स्थान होत आहे.
सुवर्णदुर्ग हा किल्ल्याचा तट हा खूप उंच आहे. व या किल्ल्याला वळणकार दार बांधले आहे. सुवर्णदुर्ग किल्ल्याच्या तटाला बुरूज आहेत व पाण्याची दोन तळी व झाडे या किल्ल्यात आहेत.
-
सुवर्णदुर्ग किल्ल्यावरील पाहण्यासारखी ठिकाणे :
सुवर्णदुर्ग हा किल्ला एक जलदुर्ग असल्याने अनेक पर्यटक या किल्ल्यावर फिरण्या साठी जातात. सुवर्णदुर्ग किल्ल्याचे प्रवेशद्वार हे पूर्व दिशेला असून ते उत्तराभिमुख आहे. या दाराचे वैशिष्ट्ये म्हणजे हे दार छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधले आहे.
या दाराच्या पायरीवर कासवाची कोरलेली प्रतिमा बघायला मिळेल. व उजव्या बाजूच्या तटबंदीवर एक कोरलेली हनुमानची मूर्ती दिसेल. प्रवेशद्वारातून किल्ल्यात प्रवेश केल्यास आपल्याला पहारेकर्यांच्या देवड्या दिसतील.
या देवड्या पासून डाव्या बाजूला गेल्यावर एक विहीर आहे. सुवर्णदुर्ग किल्ल्याच्या भक्कम आणि मजबूत तटबंदीमुळे येथे शेवाळ चढलेले हिरवे पाणी असलेल्या विहीर आहेत.
या पुढे गेल्यास आपल्याला दिसेल ही राजवाड्याचे दगडी चौथरे व वाड्यांचे अवशेष दिसतात. सुवर्णदुर्ग किल्ल्याच्या पश्चिम बाजूला असलेल्या तटाकडे एक सुरेख चोरदरवाजा दिसेल. हा चोर दरवाजा आजही चांगल्या परिस्थिती मध्ये आहे. सुवर्णदुर्ग किल्ल्यावर सात विहिरी आहेत.
-
सुवर्णदुर्ग किल्ल्यावर कसे जावे :
मुंबई गोवा महामार्गावर असणाऱ्या खेड या फाट्यावरून दापोली आणि दापोली पासून हर्णेला जाण्यासाठी बससेवा उपलब्ध आहेत. हर्णे बस स्थानक पासून 15- 20 मिनिटाच्या अंतरावर हर्णे हे बंदर आहे.
आणि हर्णे बंदरापासून सुवर्णदुर्ग किल्ल्यावर जाण्यासाठी 20 मिनिटे लागतात हा प्रवास होडी तून करावा लागतो.