नागझिरा अभयारण्य माहिती । Nagzira Tiger Reserve Information In Marathi

नागझिरा अभयारण्य माहिती । Nagzira Tiger Reserve Information In Marathi

महाराष्ट्रातील प्रसिद्ध अभयारण्यांपैकी नागझिरा हे एक अभयारण्य आहे.

महाराष्ट्रातील भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांच्या मध्यभागी वसलेले हे नागझिरा हे अभयारण्य आहे.

आज अपण याच नागझिरा अभयारण्य माहिती सविस्तर मध्ये बघणार आहोत.

नागझिरा अभयारण्य माहिती । Nagzira Tiger Reserve Information In Marathi

चला तर मग बघुया नागझिरा अभयारण्य माहिती.

नागझिरा हे अभयारण्य तलावांचे जिल्हे म्हणून प्रसिद्ध असलेल्या भंडारा जिल्हा आणि गोंदिया जिल्ह्याच्या मध्ये वसलेले आहे. संस्कृतिक भाषेत नाग म्हणजे हत्ती असे म्हणतात की,

फार पूर्वीच्या काळात या अभयारण्यात हत्तीचे वास्तव्य असल्यानं या अभयारण्याला नागझिरा हे नाव दिले असावे. नागझिरा या अभयारण्याचे क्षेत्रफळ सुमारे 152.18 चौरस किलो मीटर येवढे आहे.

नागझिरा वन्यजीव अभयारण्यात जाण्यासाठी या ठिकाणी ” पिटेझरी” आणि ” चोरखमार” असे मुख्य 2 गेट आहेत. जैवविविधतेने संपन्न असलेल्या अभयारण्याची विशेषता म्हणजे या अभयारण्यात विद्युत पुरवठा अजिबात नाही, नागझिरा अभयारण्य नैसर्गिक रित्या राखले आहे.

या ठिकाणी असलेले ” नागझिरा तलाव” अतिशय प्रसिद्ध आहे. आणि या तलावामुळेच येथील जंगलाचा परिसर हा नैसर्गिक दृष्ट्या संपन्न झाला आहे. या अभयारण्यात पूर्वी हत्तीचे वास्तव्य होते. व्यंकटेश माडगूळकर यांनी ज्या झाडाखाली बसून आपले लिखाण करत ते झाड आजही येथे पाहायला मिळेल. त्या झाडाला कुसुम वृक्ष असे नाव आहे.

हे अभयारण्य नैसर्गिक दृष्ट्या खूप महत्त्वाचे आहे. ह्या अभयारण्याच्या आसपास गोंडी आदिवासी जातीचे लोक राहतात. पूर्वी हे लोक या अभयारण्यातील प्राण्यांची शिकार करत पण आता येथे शिकार करण्यास बंदी घातली आहे.

वैशिष्ट्यपूर्ण जैवविविधतेने नटलेल्या या नागझिरा जंगलांना दिनांक 3 जून 1970 रोजी नागझिरा अभयारण्य म्हणून घोषित केले गेले.

नवीन नागझिरा अभयारण्य :

नवीन नागझिरा अभयारण्याच्या परिसरात भंडारा जिल्ह्यातील साकोली, लाखनी यातील काही भाग तसेच गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्याचा काही भाग समाविष्ट होतो.

या परिसराला जवळच नागझिरा अभयारण्य, नावेगाव अभयारण्य आहेत. आणि या ठिकाणी 12 तलाव आहेत. त्यामुळे हे क्षेत्र वन्यजीवांसाठी पोषक आहे.

नागझिरा अभयारण्यातील वृक्ष :

नागझिरा अभयारण्यात साग, बांबू, आवळा, धावडा, ऐन, बिब्बा, तिवस, सप्तपर्णी यांसारख्या सदाहरित वनस्पती आढळतात. जांभा, बेहडा, मुरुडशेंगा, तामण, जांभूळ यांसारख्या मोठ्या वनस्पती नागझिरा अभयारण्यात आहेत.

नेकेड ब्युटी ऑफ फॉरेस्ट म्हणून ओळखले जाणारे कुरु किंवा भुत्या हे वृक्ष नागझिरा अभयारण्यात मोठ्या प्रमाणात बघायला मिळतात.

तसेच, तोरणवेल, उक्षी, पळसवेल, चांबुळी किंवा चामुळ, शेंबी, घोटवेल, खाजकुइरी या वेलवर्गीय वनस्पती नागझिरा अभयारण्यात आढळतात. काही औषधी गुणधर्म असलेल्या वनस्पती सुद्धा येथे बघायला मिळतात.

झाडां प्रमाणेच गवताचे ही काही प्रकार या अभयारण्यात सापडतात त्यात पवन्या गवत, खसखस गवत, काटे गवत, लव गवत, तलवार गवत, कंगारू गवत, वायर ग्रास इत्यादी प्रकारचे गवत येथे आढळतात.

तसेच नागझिरा अभयारण्यात घाणेरीची झुडपे मोठ्या प्रमाणात आहेत. त्यात काँग्रेस गवत हे तण म्हणून वाढवले आहे.

नागझिरा अभयारण्यातील प्राणी जीवन :

नागझिरा हे अभयारण्य जैवविविधतेने नटलेले आहे. या अभयारण्यात 34 जातींचे सस्तन प्राणी आढळतात. तसेच, अस्वल, वाघ, बिबट्या, लांडगे, रानगवे, रान डुक्कर, कोल्हे, रानकुत्रे, ताडमांजर, उदमांजर, मुंगीखाऊ, काळवीट, हरीण, सांबर, नीलगाय, चितळ, भेकर, पिसोरी हरीण, माकड, खार, उडती खार अश्या वन्य प्राण्यांचा समावेश नागझिरा अभयारण्यात होतो.

त्याप्रमाणेच सरपटणाऱ्या 36 जातींचे प्राणी येथे आढळतात. त्यात अजगर, नाग, धामण, किंग कोब्रा, रसेल व्हाइपर, घोरपड, कीलबॅक स्नेक यांचा समावेश होतो.

प्राण्यांप्रमाणेच नागझिरा अभयारण्यात 200 जातींचे पक्षी आढळतात. त्यात खाटीक, राखी धनेश, नवरंग कोतवाल, सर्प गरुड, मत्स्य गरुड, हळद्या, नीलपंखी, हिरवे कबुतर, स्वर्गीय नर्तक, ससाणा, तिसा, पांढऱ्या डोळ्याचा बाज आणि मोर असे पक्षी आढळतात.

नागझिरा अभयारण्यात 49 जातींचे फुलपाखरू आढळतात. त्यात लाइम बटरफ्लाय, कॉमन रोज, कॉमन मॉरमॉन, कॉमन इंडिअन क्रो, ब्लॅक राजा, कॉमन सेलर अश्या जातींच्या फुलपाखरांचा समावेश होतो.

अशा प्रकारे जैवविविधतेने नटलेले हे नागझिरा अभयारण्य.

नागझिरा अभयारण्यातील पर्यटन :

नागझिरा अभयारण्य हे पर्यटनाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे ठिकाण आहेत. विविध जातींचे पक्षी, प्राणी आणि वनस्पती येथे बघायला मिळतात. त्यामुळे निसर्ग प्रेमी आणि पक्षी प्रेमी येथे पर्यटनासाठी येतात.

या नागझिरा अभयारण्याला भेट देण्याचा उत्तम कालावधी हा ऑक्टोबर- जून आणि एप्रिल- मे या महिन्यांचा आहे. नैसर्गिक दृष्ट्या परिपूर्ण असलेले हे अभयारण्य अतिशय सुंदर आहे.

या अभयारण्याच्या प्रवेशद्वारातून आत गेल्यावर एक संग्रहालय व माहिती केंद्र आहे. या संग्रहालयात प्राण्यांच्या प्रतिकृती व विविध फुलपाखरांचे प्रदर्शन आहे.

वन्यजीवांचे छायाचित्र, पायांचे ठसे, खुणा या ठिकाणी आहेत. त्यामुळे नागझिरा हे अभयारण्य पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठिकाण आहे.

नागझिरा अभयारण्यात कसे जावे :

भंडारा जिल्ह्यापासून सुमारे 40 किलो मीटरच्या अंतरावरील साकोली या शहरापासून 20 किलो मीटरच्या अंतरावर नागझिरा अभयारण्य आहे. या ठिकाणी जाण्यासाठी बसेसची व्यवस्था आहे. सोबतच खाजगी वाहने घेऊन जाण्यास सुद्धा परवानगी आहे.

या अभयारण्याला भेट देण्याची वेळ सकाळी 6 ते 12 वाजेपर्यंत आहे आणि दुपारी 3 ते 6 या वेळेत आपण या नागझिरा अभयारण्यात भेट देऊ शकतो.


ये निबंध देखील अवश्य वाचा :-

1 thought on “नागझिरा अभयारण्य माहिती । Nagzira Tiger Reserve Information In Marathi”

Leave a Comment