पारगड किल्ल्याची माहिती । Pargad Fort Information In Marathi

पारगड किल्ल्याची माहिती । Pargad Fort Information In Marathi

पारगड हा महाराष्ट्र व गोवा ह्या दोन राज्यांच्या सीमेवर वसलेला आहे.

अतिशय सुंदर असा हा किल्ला पर्यटनाचे मुख्य स्थान बनला आहे.

आज आपण याच पारगड किल्ल्याची माहिती Pargad Fort Information In Marathi बघणार आहोत.

पारगड किल्ल्याची माहिती । Pargad Fort Information In Marathi

चला तर मग बगूया काय आहे पारगड किल्ल्याची माहिती मराठी मध्ये.

पारगड हा किल्ला महाराष्ट्र व गोवा राज्याच्या सीमेवर वसलेला हा मुख्य किल्ला आहे. या किल्ल्याचे क्षेत्रफळ सुमारे 48 चौरस एकर येवढा आहे. आणि या किल्ल्याची उंची ही समुद्र सपाटी पासून सुमारे 2420 येवढी आहे.

पारगड किल्ल्याला पूर्व, पश्चिम व उत्तरेला नैसर्गिक कड्यांची तटबंदी आहे. पारगड किल्ल्याला शिवकालीन किल्ला म्हणून सुद्धा ओळखले जाते.

कारण 1676 मध्ये पोर्तुगीजावरील स्वारीवरून परत येताना छत्रपती शिवाजी महाराजांनी या डोंगराचे भौगोलिक स्थान ओळखून ह्या डोंगरावर पारगड किल्ल्याची निर्मिती केली.

पारगड किल्ल्याचा इतिहास :

पारगड किल्ला मजबूत आणि आजही बुलंद आहे. सह्याद्री पर्वताच्या दुर्गम अशा डोंगरांमध्ये 914 मीटर फूट येवढी उंची असलेला हा पारगड किल्ला अरबी समुद्रावर आपली नजर ठेवून उभा असल्याप्रमाणे स्थित आहे. पारगड किल्ल्याची बांधणी 1676 मध्ये शिवाजी महाराजांनी केली. हा किल्ला गिरीदुर्ग या प्रकारामध्ये येतो.

गोव्याच्या पोर्तुगीजांवर नजर ठेवण्यासाठी या उद्देशाने 1676 मध्ये छत्रपति शिवरायांनी पारगड या किल्ल्याची निर्मिती केली. या पारगड किल्ल्यावर त्यांनी सुभेदार तानाजी मालुसरे यांचा मुलगा रायबा याला सेनापती म्हणून निवडले.

पुढे 1689 मध्ये शहजादा मुअज्जम व खवासखान यांनी हा पारगड किल्ला जिंकण्यासाठी प्रयत्न केला. पण ते हा किल्ला जिंकण्या मध्ये अपयशी ठरले. पण या लढाईत तोफखान्याचे प्रमुख असणारे विठोजी मावळे यांना मरण आली. आजही त्यांची समाधी ह्या पारगडावर उपस्थित आहे.

हा पारगडाच्या वास्तुशांतीच्या वेळेस किल्लेदार रायबा हे त्यांच्या 500 सहकार्‍यांसोबत सर्वांनाच शिवाजी राज्यांनी आज्ञा केली की, ” चंद्र सूर्य असेतो, गड जागता ठेवा “.

तेव्हा गडावर सर्व मावळे रायबा आणि राजा शिवाजी महाराज स्वतः जागे राहिले. स्वराज्याचा टोकाचा किल्ला म्हणून शिवाजी महाराजांने या किल्ल्याला ” पारगड किल्ला ” असे नाव दिले. त्यानंतरच्या काळात हा पारगड किल्ला करवीरकर छत्रपतींच्या ताब्यात गेला.

पारगड किल्ल्याचे ऐतिहासिक निर्देश :

पारगड किल्ल्यावर हाकाटी देण्यासाठी मुसलमानांनाही ठेवण्यात आले होते. आजही गडावर व गडाच्या आसपासच्या परिसरात यांचे वंशज आढळतात.

पारगड किल्ल्याची निर्मिती करताना शिवाजी महाराजांनी गडाच्या संरक्षणाचा पूर्ण विचार केलेला. जेव्हा गडाचे बारकाईने निरीक्षण केले तर आपणास दिसून येईल की, पूर्व, पश्चिम आणि उत्तर अश्या तिन्ही बाजूंनी ताशीव कड्यांनी संपूर्ण पारगड केल्याची नैसर्गिकरीत्या संरक्षण तटबंदी केलेली दिसेल. 360 पायऱ्यांची पश्चिम बाजूला असलेली वाट ही एकमेव वाट आहे जी आपल्याला गडापर्यंत घेऊन जाते.

दक्षिण गडावर येण्यासाठी प्रचंड अशी दरी आहे. ज्यामुळे शत्रू चाल करुन येण्याची शक्यता कमी आहे. आणि अश्याच कारणामुळे पारगड किल्ला मोगलांना आणि इंग्रजांना जिंकता आला नाही. आणि ही गोष्ट खरो खरंच कौतुकास्पद आहे.

पारगड किल्ल्यावरील पाहण्यासारखी ठिकाणे :

पारगड हा किल्ला डोंगरावर असल्याने या ठिकाणी जाण्यासाठी रस्ता नाही होता. पण सन 2002 मध्ये विद्यमान गडकर्‍यांनी गडावर जाण्यासाठी डांबरी रस्ता तयार केला आहे.

ह्या रस्त्याने गेले असता डावीकडे गडाच्या शिवकालीन पायऱ्यांचा मार्ग लागतो. ह्या पायऱ्या सुमारे 360 आहेत. त्या 360 पायर्‍यांना पार करून वर किल्ल्याचा सपाट भाग लागतो.

आणि या सपाटीवर तोफांचे अवशेष दिसतात व भगवा ध्वज फडकताना आपले स्वागतच करतो असे वाटते. गडावर 3 तोफा आहेत आणि डाव्या बाजूला मारुतीचे मंदिर आहे. आणि पुढे गेल्यावर येथे राहणाऱ्या लोकांची वस्ती आहे. आणि येथे शिवाजी महाराजांचा पुतळा आहे.

पारगड किल्ल्यावर 17 विहिरी आहेत व त्यातला 4 विहिरी आजही चांगल्या अवस्थेत आहेत. तसेच पारगडावर तानाजी मालुसरे यांचे 11 वे वंशज बाळकृष्ण मालुसरे यांचे वास्तव्य आहे. व यांच्याकडे तानाजी मालुसरेंची तलवार आणि शिवाजी महाराजांच्या गळ्यातील कवड्याची माळ आहे.

पारगड किल्ल्यावर पोहचण्याचा मार्ग :

1. कोल्हापूर जिल्हा पासून बेळगाव मार्गे चांदनगड आणि चंदनगड पासून इसापूर येथे जाण्यासाठी बसेसची सेवा आहे. पुढे इसापूर पासून पारगडावर जाता येथे.

तसेच चंदनगड पासून पारगड जाण्यासाठी थेट बसची सेवा आहे. ही बस आपल्याला थेट पारगडाच्या पायथ्याजवळ आणून सोडते.

2. स्वतःचे खाजगी वाहन असल्यास आपण बेळगाव- शिनोळी- पाटणे या मार्गानी मोटणवाडी पर्यंत जाऊ शकतो. पुढे मोटणवाडी पासून पाऊण तासाच्या अंतरावर पारगड आहे. पारगड किल्ल्याच्या पायथ्याशी स्वतःचे वाहन ठेवण्याची सोय आहे.


ये निबंध देखील अवश्य वाचा :-

2 thoughts on “पारगड किल्ल्याची माहिती । Pargad Fort Information In Marathi”

Leave a Comment