सज्जनगड किल्ल्याची माहिती मराठी । Sajjangad Fort Information In Marathi

सज्जनगड किल्ल्याची माहिती मराठी । Sajjangad Fort Information In Marathi

महाराष्ट्र राज्यातील परळी येथे असलेला किल्ला म्हणजे हा सज्जनगड किल्ला होय.

आज आपण याच सज्जनगड किल्ल्याची माहिती बघणार आहोत.

सज्जनगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परळी येथे वसलेला एक किल्ला आहे.

सज्जनगड किल्ल्याची माहिती मराठी । Sajjangad Fort Information In Marathi

सज्जनगड ह्या नावाचे आपण जरी ओळखत असलो तरी या किल्ल्याला आणखी दुसरेही नाव आहेत. आश्वलायन ऋषींचे वास्तव्य ह्या किल्ल्यावर असल्याने ह्या किल्ल्याला ” आश्वलायनगड ” असेही म्हणतात.

त्याप्रमाणेच अस्वलांची वस्ती या ठिकाणी आढळल्याने ” अस्वलगड ” म्हणून सुद्धा सज्जन गड किल्ल्याला ओळखले जाते, तर ” नवरसतारा ” हे सुद्धा सज्जन गडाचे नाव आहे.

  • सज्जनगडाचे स्थान आणि रचना :

प्रतापगड किल्ल्याच्या पायथ्यापासून सह्याद्री पर्वताची एक उपरांग जाते त्या रांगेला शंभू महादेव या नावानी ओळखले जाते. या शंभू महादेव रांगेचे मुख्य तीन फाटे फुटतात. त्या तीन फाटांपैकी एका रांगेवर समर्थ रामदास स्वामींच्या पादस्पर्शाने पावन झालेला हा सज्जनगड परळी या ठिकाणी स्थित आहे.

सज्जनगड किल्ल्याची समुद्र सपाटी पासूनची उंची सुमारे 3000 फूट उंच आहे, तर हा किल्ला पठारापासून साधारणता 1000 फूट उंच आहे. सज्जनगड किल्ल्याचा आकार हा शंखाकृती आहे.

तर हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारच्या किल्ल्यांमध्ये मोडतो. सज्जनगड किल्ल्याचा परीघ हा 1 किलो मीटरच्या परिसरा मध्ये पसरलेला आहे.

या सज्जनगडाच्या पश्चिम दिशेला खेड- चिपळून, उत्तरेस महाबळेश्वर, प्रतापगड, रायगड, दक्षिणेस कळंब तर ईशान्य दिशेस सातारा शहर आणि अजिंक्यतारा आहे. सज्जनगड किल्ल्याची सध्याची परिस्थिती ही चांगली बघायला मिळते.

  • सज्जनगड किल्ल्याचा इतिहास :

प्राचीन काळी या सज्जनगडाच्या डोंगरावर आश्वलायन ऋषींचे वास्तव्य असल्याने या किल्ल्याला ” आश्वलायनगड “असे नाव पडले. या सज्जनगड किल्ल्याची उभारणी ही शिलाहार राजा भोज ह्याने 11 व्या शतकात केली असावी.

छत्रपती शिवाजी महाराजांनी 2 एप्रिल इ.स. 1673 मध्ये हा किल्ला आदिलशहाकडून जिंकून घेतला होता. व शिवाजी महाराजांच्या विनंती वरूनच समर्थ रामदास स्वामी सज्जन गडावर कायमच्या वास्तव्यासाठी आले. व या किल्ल्याचे नाव तेव्हा पासूनच ” सज्जनगड ” असे पडले.

व पुढे शिवरायांचा राज्याभिषेक झाल्यानंतर इ.स. 1679 मध्ये शिवाजी महाराज सज्जनगडावर रामदास स्वामींच्या दर्शना साठी आले.
18 जानेवारी इ.स. 1682 ला सज्जनगडावर रामाच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली. व त्यानंतर 1682 मध्ये रामदास स्वामींनी देह ठेवला.

या नंतर पुढे 21 एप्रिल इ.स. 1700 मध्ये फतेउल्लाखानने सज्जन गडास वेढा घातला. व 6 जून 1700 मध्ये हा सज्जनगड मुघलांच्या ताब्यात गेला व याच मुघलांनी ” नैरससातारा ” म्हणून या गडाचे नामकरण केले. व पुढे इ.स. 1709 च्या सुमारास हा सज्जनगड किल्ला पुन्हा मराठ्यांनी जिंकला व पुढे इ.स. 1818 मध्ये इतर किल्ल्यांप्रमाणे हा किल्ला इंग्रजांच्या हाती गेला.

  • सज्जन गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे :

सातारा शहरापासून सुमारे दहा किलोमीटर वर सज्जनगड आहे. समर्थ रामदास स्वामींचे वास्तव्य या किल्ल्याला लाभल्याने ह्या किल्ल्याला संस्कृतीक महत्त्व लाभले आहे.

सज्जनगड चढण्यासाठी पायऱ्या आहेत या पायर्‍या चढताना कल्याण स्वामी यांच्या मंदिराचे दर्शन होते. पुढे गेल्यावर एका बाजूस मारुती मंदिर तर दुसऱ्या बाजूला गौतमी चे मंदिर आहे. तर प्रवेश द्वाराच्या डाव्या बाजूला अंगलाई देवीचे मंदिर आहे.

सज्जन गडा वर राम मंदिर आहे. या मुख्य मंदिरात राम, लक्ष्मण, सीता यांच्या पंचधातूंच्या मुर्त्या बघायला मिळतात.

सज्जन गडावर एक भुयार आहे या भुयारात समर्थ रामदास स्वामींचे समाधी स्थान आहे व तेथे असणाऱ्या पेटीत दत्तात्रयाच्या पादुका आहेत.
त्यामुळे या सज्जनगडला एकदा तरी नक्कीच भेट द्यावी.

  • सज्जनगडावर जाण्याचा मार्ग :

१. सज्जनगडावर जाण्यासाठी सातारा ते परळी असा 10 किलो मीटरचा प्रवास आहे. सातारा पासुन परळी येथे येण्यासाठी बसेस आणि खाजगी वाहनांची सुविधा आहे.

२. तसेच गजवाडी या गावापासून ही आपण सज्जन गडावर जाऊ शकतो या ठिकाणाहून 100 पायऱ्या नंतर गडाचा दरवाजा लागतो.


ये निबंध देखील अवश्य वाचा :-

Leave a Comment