पन्हाळा गड किल्ल्याची माहिती । Panhala Fort Information In Marathi

पन्हाळा गड किल्ल्याची माहिती । Panhala Fort Information In Marathi

महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यात वसलेला हा पन्हाळगड किल्ला खूप महत्त्वाचा समजला जातो.

अनेक वर्षोपासून मराठी मातीत टिकून असलेला हा पन्हाळगड किल्ला.

आज आपण याच पन्हाळा गड किल्ल्याची माहिती बघणार आहोत.

पन्हाळा गड किल्ल्याची माहिती । Panhala Fort Information In Marathi

महाराष्ट्र राज्याच्या माती 1,200 वर्षोपासून टिकून असलेला हा पन्हाळगड किल्ला सर्व किल्ल्यांन प्रमाणेच महत्त्वाचा समजला जातो. काही काळ मराठ्या साम्राज्याची राजधानी असलेला हा पन्हाळगड किल्ला आहे.

कोल्हापूर पासून 20 किलो मीटरच्या अंतरावर पन्हाळ या तालुक्यात वसलेला हा किल्ला पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचा समजला जातो.

सह्याद्री पर्वताच्या रंगांमध्ये वसलेला हा किल्ला आजही छत्रपती शिवाजी महाराजांच्या अस्तित्वाची जाणीव करून देतो. पन्हाळगड किल्ल्याची समुद्र सपाटी पासूनची उंची 4040 फुट एवढी आहे. आणि हा किल्ला गिरीदुर्ग या प्रकारामध्ये मोडतो.

भारत सरकारने 2 जानेवारी इ.स. 1954 ला पन्हाळगड किल्ल्याला महाराष्ट्रातील संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे.

  • पन्हाळगड किल्ल्याचा इतिहास :

पन्हाळगड किल्ला हा खूप जुना किल्ला आहे. या किल्ल्या मागे सुमारे 1200 वर्षाचा इतिहास आहे. या वरून आपल्याला कल्पना येईल की हा पन्हाळगड किल्ला किती जुना असेल.

पन्हाळगड हा किल्ला प्रथमता शिलाहार भोज राजा नृसिंह यांच्या कारकिर्दीत बांधण्यात आला होता असे म्हणतात. पन्हाळ गड किल्ल्याच्या पूर्वीचे नावे पन्नग्नालय होते.

पन्हाळगड किल्ल्याचा इतिहास मराठा साम्राज्याची जोडलेले आहे. 2 मार्च 1660 मध्ये पन्हाळगड किल्ल्यावर सिद्धी जौहरचा वेढा पडला. त्यावेळी शिवाजी महाराज हे सिद्धी जौहरच्या या वेढ्यामध्ये अडकले होते.

तेव्हा शिवाजी महाराज्यांच्या एका गुप्तहेरानी एक मार्ग शोधून काढला. तेव्हा त्या मार्गाने शिवाजी महाराजासह 600 मावळे पन्हाळगडावरून विशालगडाकडे निघाले.

तेव्हा या मार्गातून जात असताना शिवा काशीद याने प्रति शिवाजी महाराज बनून आणि बाजी प्रभू देशपांडे यांनी घोडखिंड थोपवून धरून आपले प्राण स्वराज्याच्या हितासाठी अर्पण केले.

त्यानंतर 6 मार्च 1673 मध्ये कोंडाजी फर्जंद यांच्या बरोबर सैन्य पाठवून भेदनीतिचा उपयोग करून छत्रपती शिवाजी महाराजांनी पन्हाळगड हा किल्ला परत ताब्यात घेतला 1710 मध्ये पन्हाळा ही कोल्हापूरची राजधानी झाली व पुढे नंतर 1844 मध्ये हा पन्हाळगड किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला.

  • पन्हाळगड किल्ल्याचे ऐतिहासिक निर्देश :

पन्हाळगड हा किल्ला इतिहासामध्ये एक जुना किल्ला म्हणून ओळखला जातो. पन्हाळगड किल्ल्याचे पुरातण काळाचे नाव हे ब्रह्मगिरी आहे. तसेच पन्हाळगड किल्ल्याला पन्नागालय या नावाने सुद्धा ओळखले जाते.

तसेच शिवकालीन संस्कृत काव्यात या किल्ल्यास पर्णालदुर्ग असे म्हटले आहे. तर मोगलांच्या काळात हा पन्हाळगड किल्ला शहानबी दुर्ग म्हणून ओळखला जात असत.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूच्या अगोदर हा किल्ला औरंगजेब कडे होता. पुढे महाराजांच्या निधना नंतर मराठ्यांनी पुन्हा पन्हाळा जिंकून घेतला. व पुढे काही काळ पन्हाळा कोल्हापूर छत्रपतींकडे होता. कोल्हापूर संस्थांचा कित्तेकदा कारभार हा पन्हाळगडा वरूनच चालला.

महाराष्ट्रातील सर्व किल्ल्यांचा विचार केला असता सर्वात जास्त सोयी सुविधा असलेला किल्ला म्हणजेच आज पन्हाळा गड किल्ला होय.

  • पन्हाळगड किल्ल्यावरील पाहण्यासारखी ठिकाणे :

पन्हाळगड किल्ला हा पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठिकाण ठरत आहे. ह्या किल्ल्यावर पर्यटकांसाठी पाहण्यासाठी बरीच ठिकाणे आहेत ती म्हणजेच खालील प्रमाणे :

  • राजवाडा :

हा ताराबाईचा वाडा म्हणून ओळखला जातो. या वाड्यातील बघण्यासारखे ठिकाण म्हणजे येथे असलेले देवघर. हे देवघर पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे.

  • राजदिंडी :

शिवाजी महाराज सिद्धी जौहरच्या वेढ्यातून सुटून ज्या मार्गानी विशाळगडावर पोहोचले तो मार्ग म्हणजेच ही राजदिंडी होय.

  • सज्जाकोठी :

ताराबाईंच्या राजवाड्यापासून थोडे पुढे गेले असता एक कोठीवजा इमारत दिसते. त्या इमारतीलाच सज्जाकोठी म्हणतात. याच सज्जाकोठीत शिवाजी महाराजांनी या भागाचा कारभार संभाजी राजांना सोपविला.

  • चार दरवाजा :

पूर्वेकडील भागात असलेला सर्वात महत्त्वाचा दरवाजा म्हणजेच हा चार दरवाजा होय. परंतु इ.स. 1844 मध्ये इंग्रजांनी हा दरवाजा पाडून टाकला पण आज ही ह्या दरवाजाचे काही अवशेष बघायला मिळतात. याच चार दरवाजा पाशी ” शिवा काशीद ” यांचा पुतळा आहे.

  • सोमाळे तलाव :

पन्हाळ गड किल्ल्याच्या पाठीमागे हे सोमाळे तलाव आहे. आणि या तळ्याच्या काठावर सोमेश्वर मंदिर आहे.

  • रेडे महाल :

सोमेश्वर तलावा पासून थोडे पुढे गेल्यास तिथे दोन समाध्या आहेत. त्यातील उजवीकडच्या बाजूची समाधी ही रामचंद्रपंत अमात्य यांची आहे. व या समाधीच्या बाजूलाच एक इमारत आहे तेला रेडे महाल असे म्हणतात.

  • महालक्ष्मी मंदिर :

राजवाड्यातून बाहेर पडल्यावर नेहरू उद्यानाच्या खालच्या बाजूस महालक्ष्मी मंदिर आहे.

  • तीन दरवाजा :

तीन दरवाजा हा पश्‍चिमेकडील सर्वात महत्त्वाचा दरवाजा आहे. 1676 मध्ये याच दरवाजा वापर करून कोंडाजी फर्जंदने अवघ्या 60 मावळ्यांना घेऊन किल्ला जिंकला होता.

  • पन्हाळा गड किल्ल्यावर कसे जावे :

कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यामध्ये हा पन्हाळगड किल्ला आहे.

कोल्हापूर शहरापासून पन्हाळा येथे जाण्यासाठी चार दरवाजा मार्गे बसने किंवा खाजगी मार्गांने जाता येते.


ये निबंध देखील अवश्य वाचा :-

Leave a Comment