Olive Oil in Marathi मित्रांनो आपण नेहमी olive ऑइल बद्दल ऐकत असतो परंतु आपल्यातील बऱ्याच जणांना olive oil नक्की असतै तरी काय याबद्दल माहिती नाही म्हणून आजच्या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला olive oil माहिती सांगण्याचा प्रयत्न करणार आहात.
ऑलिव्ह ही लहान लहान बोरां प्रमाणे दिसणारी फळे असतात जी olive नावाच्या झाडावर येतात. अपरिपक्व ऑलिव्ह दिसायला हिरव्या असतात पिकल्यानंतर यांचा रंग काळा होतो.
ऑलिव्ह ऑइल : फायदे आणि तोटे । Olive oil in Marathi
Table of Contents
ऑलिव्हमध्ये व्हिटॅमिन ई आणि इतर शक्तिशाली अँटिऑक्सिडेंट्सचे प्रमाण खूप जास्त आहे.ऑलिव्हमध्ये निरोगी चरबी ऑलिव तेल तयार करण्यासाठी काढल्या जातात, जे आश्चर्यकारकपणे निरोगी भूमध्य आहाराचे मुख्य घटक आहे. ऑलिव्ह बहुतेकदा सॅलड्स, सँडविच आणि टेपेनेडमध्ये देखील वापरले जाते. Olive मध्ये आढळणाऱ्या गुणधर्मामुळे ऑलिव्ह ऑइल खूप फायद्याचे मानले जाते आणि याचे फायदे देखील आहेत.
आजच्या Olive oil in Marathi लेखाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला ऑलिव्ह ऑइल बद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहोत.
चला तर मग पाहूया, Olive oil in Marathi ऑलिव ऑइल बद्दल संपूर्ण माहिती आणि ऑलिव्ह ऑइल फायदे आणि तोटे मराठीमध्ये
Olive oil अलीकडच्या काळामध्ये वापरत होतो मोठ्या प्रमाणामध्ये केला जात आहे जर तुम्हाला स्वयंपाक करण्याची आवड असेल तर तुम्ही नक्कीच स्वयंपाक घरामध्ये ऑलिव्ह ऑइल वापरले असेलच.
Olive ऑइल केवळ आरोग्यासाठीच फायद्याचे नसून त्याचे वेगवेगळे देखील फायदे आहेत त्यामुळे हजार वर्षापासून ऑलिव्ह ऑइल चा वापर केला जात आहे. सौंदर्यप्रसाधने तयार करण्याच्या वेळी देखील या तेलाचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो.
काही वर्षापूर्वी ऑलिव ऑइल केवळ स्वयंपाक घरामध्ये वापरले जात होते परंतु अलीकडच्या काळामध्ये ऑलिव्ह ऑइल चे फायदे सर्वांना कळल्यामुळे हे तेल वेगवेगळ्या फायद्यासाठी आणि कारणांसाठी देखील वापरले जाते.
ओलिया युरोपीया नावाच्या वनस्पति नावाने ओळखले जाणारे ऑलिव्ह म्हणजे ओलेसी कुटुंबातील एका लहान झाडाची एक प्रजाती आहे, जी पारंपारिकपणे भूमध्यसागरीय आढळते. भूमध्य समुद्राच्या सर्व देशांमध्ये तसेच ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, उत्तर आणि दक्षिण अमेरिका आणि दक्षिण आफ्रिका येथे या प्रजातीची लागवड केली जाते.
ऑलिव्हचे फळ, ज्याला “ऑलिव्ह” देखील म्हणतात, ते जैतुनाच्या तेलाचा एक स्रोत म्हणून भूमध्य सागरी शेतीत महत्त्वाचे आहे. हे भूमध्य पाककृतीतील मुख्य घटकांपैकी एक आहे.
ऑलिव्ह म्हणजे काय What is olive in Marathi :
मित्रांनो ऑलिव्ह ऑइल बद्दल जाणून घेण्यापूर्वी आपल्याला olive म्हणजे काय असते हे जाणून घेणे खूप आवश्यक आहे.
olive ही एक वनस्पती आहे जी प्रामुख्याने भूमध्यसागरीय भागा मध्ये आढळते या वनस्पती मोठी झाल्यानंतर व या वनस्पतीची पूर्ण झाल्यानंतर याला बोरांप्रमाणे छोटी-छोटी लहान अशी फळे येतात त्यांना ऑलिव्ह असे म्हटले जाते. ऑलिव्ह हे फळ अपरिपक्व आसताना हिरव्या रंगाचे असते व पूर्णता पिकल्यानंतर त्याचा रंग काळा होतो.
अनेक संशोधनातून असे आढळले आहे की जे व्यक्ती नियमितपणे olive ऑइल चे सेवन करतात त्यांना हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आणि जठरोगविषयक रोगांचे प्रमाण कमी असते. ऑलिव्ह ऑइलमध्ये असंतृप्त चरबी असतात जे पचन करण्यास उपयुक्त असतात आणि कोलेस्ट्रॉल प्लेग आपल्या रक्तवाहिन्यांमधे तयार होऊ देत नाहीत. (Olive oil in marathi) इतर तेलांच्या विपरीत, ऑलिव्हमध्ये केवळ बहुपेशीय चरबी असतात, जे आपल्या रक्तातील कोलेस्टेरॉलच्या योग्य पातळीची देखभाल सुनिश्चित करतात आणि पोषक पेशी पुरवतात.
ऑलिव ऑइल चे प्रकार Types of olive oil in Marathi :
मित्रांनो ऑलिव्ह ऑइल चे वेगवेगळे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. गेल्या काही वर्षांमध्ये, आपल्या देशातही ऑलिव्ह ऑईलचा वापर लक्षणीय वाढला आहे. जे लोक स्वतःच्या आरोग्याबद्दल अधिक जागरूक असतात, ते या तेलाचा सर्वाधिक वापर करतात.
1. एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑईल :
एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑईल हे सर्वोत्तम दर्जाचे ऑलिव्ह तेल मानले जाते. त्याचा सुगंध खूप चांगला असतो. हे जगभरातील सॅलडमध्ये टॉपिंग म्हणून वापरले जाते, ज्यामुळे सॅलडची चव अनेक पटीने वाढते. आपण हे तेल भाज्यामध्ये तडका देण्यासाठी देखील वापरू शकता. जर तुम्हाला लोणीचा वापर कमी करायचा असेल तर लोण्याऐवजी या तेलात ब्रेड बुडवून खा.
2. वर्जिन ओलिव्ह :
हे ऑलिव्ह ऑइल सर्वात लोकप्रिय आणि सुप्रसिद्ध मानले जात आहे, जे स्वयंपाक करण्यासाठी वापरली जाते आणि त्यात फारच कमी अॅसिड असते.
3. शुद्ध ऑलिव्ह तेल :
शुद्ध पाणी ते त्याच्या नावातूनच आपल्याला कळेल या तेलाची शुद्ध नाही कोणता केलेली असते कारण,
हे परिष्कृत ऑलिव्ह तेल आणि अतिरिक्त व्हर्जिन ऑलिव्ह तेल यांचे मिश्रण आहे. यात पोषक तत्वांचे प्रमाण इतर ऑलिव्ह तेलांपेक्षा कमी असते, कारण या तेलाला थंड प्रक्रिया पद्धतीने बनवले जात नाही. आपण या तेलाचा वापर स्वयंपाकात करू शकता, परंतु जर आपण ते केस आणि त्वचेसाठी वापरले तर ते अधिक फायदेशीर ठरेल.
4. लॅम्पंट ऑइल :
या प्रकारचे ऑलिव्ह ऑइल खाण्यासाठी किंवा त्वचा आणि केसांसाठी वापरले जात नाही. हे केवळ तांत्रिक कारणांसाठी आणि इंधनासाठी वापरले जाते.
ऑलिव्ह ऑइल चे फायदे Benefits of Olive Oil in Marathi.
मित्रांनो आता तुम्हाला ऑलिव ऑइल म्हणजे काय? कळलेच असेल आणि त्याच्या प्रकाराबद्दल देखील आपण जाणून घेतले आहे आता आपण ऑलिव ऑइल चे फायदे जाणून घेणार आहोत जे पुढीलप्रमाणे आहे-
1. मधुमेहासाठी ऑलिव्ह ऑइल चे फायदे :
ऑलिव्ह ऑइल मधुमेहासाठी अधिकच फायद्याचे मानले जाते त्यातल्यात्यात अतिरिक्त व्हर्जिन तेल मधुमेहासाठी सर्वोत्तम आहे. यात टायरोसोल नावाचे अँटिऑक्सिडंट असते जे शरीरातील रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करण्यासाठी चांगले असते. याचा अर्थ असा की ते इन्सुलिन प्रतिरोध सुधारण्यास मदत करते. या तेलाचा वापर आपण सॅलडवर वापरू शकता, ब्रेडवर आणि स्वयंपाकात वापरू शकता.
2. ऑलिव्ह ऑइल चे त्वचेसाठी फायदे :
ऑलिव ऑइल त्वचेसाठी खूप फायद्याचे मानले जाते. ऑलिव्ह ऑइल मध्ये आढळणारे पोषक तत्व हे त्वचेला चमकदार बनवण्यासाठी फायद्याचे ठरतात. जुनाट डाग किंवा चेहऱ्यावरील जळजळ कमी करण्यासाठी ऑलिव्ह तेलाचा वापर करू शकता.
3. केसांसाठी ऑलिव्ह ऑइल चे फायदे :
काळे, लांब आणि जाड केस असणे हे प्रत्येक स्त्रीचे स्वप्न असते आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्हाला ऑलिव्ह ऑइल आणि फायद्याचे ठरू शकते. ऑलिव ऑइल मध्ये विटामिन ई चे प्रमाण विपुल प्रमाणात असते जे केस गळती थांबवण्यासाठी फायद्याचे ठरतात.
याशिवाय, त्यात मॅग्नेशियम, जस्त, सल्फर, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन बी असते जे केस लांब करण्यास मदत करते.
4. हाडे मजबूत करण्यासाठी ऑलिव्ह ऑइल चे फायदे :
Olive ऑइल मध्ये कॅल्शियम चे प्रमाण देखील विपुल प्रमाणात असते जय हाडे मजबूत करण्यासाठी फायद्याचे ठरते त्यामुळे जर तुम्हाला हाडे दुखी च्या संबंधित समस्या असतील किंवा हाडे मजबूत करायचे असेल तर तुम्ही ऑलिव्ह ऑइलने मालिश करा.
5. वजन कमी करण्यासाठी ऑलिव ऑइल चे फायदे :
जर तुम्ही लठ्ठपणा समस्येला तोंड देत असतो तेव्हा तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर यावर ऑलिव्ह ऑइल फायद्याचे ठरू शकते.ऑलिव्ह ऑईलमध्ये मोनोसॅच्युरेटेड फॅटी acids (एमयूएफए) भरपूर असतात जे हळूहळू वजन कमी करण्यास मदत करतात. जेव्हा तुम्ही ऑलिव्ह ऑईलने शिजवलेले अन्न खातो, तेव्हा तुम्हाला जास्त वेळ भूक लागत नाही आणि म्हणून तुम्ही जास्त प्रमाणात खात नाही. ऑलिव्ह ऑइलच्या नियमित वापराने भूक कमी होते परिणामी वजन कमी होते.
6. अल्झायमर प्रतिबंध :
ऑलिव्ह तेलामध्ये असलेले ओलियोकॅन्थाल अल्झायमर रोग टाळण्यास मदत करू शकतात. आणि संशोधनातून असे सिद्ध झाले आहे की अतिरिक्त व्हर्जिन ऑलिव्ह ऑईल स्मरणशक्ती वाढते त्यामुळे अल्झायमर असलेल्या लोकांना देखील याचा फायदा होऊ शकतो.
7. कर्करोग रोखण्यासाठी उपयुक्त :
ऑलिव्ह ऑईलचा वापर कर्करोगापासून बचाव करण्यास मदत करतो. संशोधनानुसार, ऑलिव्ह ऑइलमध्ये आढळणाऱ्या घटकांमध्ये कर्करोगविरोधी क्रियाशीलता असते, जे स्तनाच्या कर्करोगासारख्या कर्करोगाचा प्रसार रोखण्यात मदत करते.
ऑलिव ऑइल चे नुकसान Side Effects of Olive Oil in Marathi :
मित्रांनो आता आपण ऑलिव्ह ऑइल चे फायदे पाहिले आहेत त्यासोबतच ऑलिव्ह ऑइल चे काही नुकसान देखील आहेत ते पुढीलप्रमाणे-
मित्रांनो जर तुम्ही ऑलिव्ह oil सेवन करत असाल तर तुम्हाला olive ऑइल चे सेवन करण्यापूर्वी काही खबरदारी बाळगावी लागेल.
जास्त प्रमाणात वापरल्यास ऑलिव्ह ऑइलमुळे दुष्परिणाम होऊ शकतात. ऑलिव्ह ऑइलचे दुष्परिणाम त्वचेवर पुरळ किंवा अतिसार असू शकतात. त्यामुळे ऑलिव्ह ऑईलचे सेवन करताना काही खबरदारीही घेतली पाहिजे.
- जर तुमची त्वचा संवेदनशील असेल तर तुम्ही तुमच्या त्वचेवर ऑलिव्ह ऑइलचा वापर करू नका.
- जर तुमची त्वचा तेलकट असेल तर तुम्ही तुमच्या त्वचेवर ऑलिव्ह ऑइल वापरू नका.
- ऑलिव ऑइल मध्ये साखरेचे प्रमाण आणि रक्तदाब कमी करण्याचे गुणधर्म असतात त्यामुळे ऑलिव ऑइलचे सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.
तर मित्रांनो, ” ऑलिव्ह ऑइल फायदे आणि तोटे । Olive oil in Marathi “ हा लेख वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.