भारतीय सैनिक निबंध मराठी । Essay on Sainik in Marathi

भारतीय सैनिक निबंध मराठी । Essay on Sainik in Marathi

मित्रांनो प्रत्येक व्यक्ती स्वतःचे तसेच स्वतःच्या कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी सज्ज असतात. त्याप्रमाणे आपल्या भारत मातेचे आणि या देशाचे रक्षण करण्यासाठी भारताचे सैनिक ज्यांना आपण “जवान” म्हणतो ते सज्ज असतात. सैनिकांचे त्यांचे एकमेव कर्तव्य असते ते म्हणजे भारत मातेचे रक्षण करणे, कोणत्याही देशाला आपल्या देशावर हल्ला करू न देणे जर कोणी हल्ला करणार असेल तर त्याला ताबडतोब उत्तर देणे. सैनिक सीमेवर डोळ्यामध्ये तेल घालून आपल्या भारत देशाचे रक्षण करतो.

आजच्या ” भारतीय सैनिक निबंध मराठी । Essay on Sainik in Marathi “ या लेखामध्ये आम्ही तुम्हाला भारतीय सैनिक निबंध मराठी आलो. हा निबंध विद्यार्थ्याला तसेच प्रत्येक व्यक्तींसाठी महत्त्वपूर्ण ठरेल कारण विद्यार्थ्यांना पेपर मध्ये अवश्य भारतीय सैनिकांवर निबंध विचारात असतात आणि हा निबंध त्यांच्यासाठी नक्कीच फायद्याचा ठरू शकतो.

भारतीय सैनिक निबंध मराठी । Essay on Sainik in Marathi

” सैनिक तुम्ही या देशाचे,
रक्षक तुम्ही या जनतेचे.
शत्रूचा सदैव असतो तुम्हाला राग
भारत मातेच्या रक्षणासाठी सोडता तुम्ही घरदार..”

प्रत्येक देशाला त्याचे स्वातंत्र्य सर्वाधिक प्रिय असते. या स्वातंत्र्याचे रक्षण करण्यासाठी, देशाच्या सैन्याला नेहमीच सज्ज राहावे लागते. सैनिक आपल्या देशाचे रक्षण करत करताना स्वतःच्या प्राण्याचा देखील विचार करत नाहीत. त्या दृष्टीने, आपल्या देशात एक मोठी सेना आहे, ज्यामध्ये भूदल, नौदल आणि वायुदल असे तीन विभाग आहेत. या प्रत्येक विभागातील सैनिक हे आपल्या देशाचे रक्षण करण्यासाठी सज्ज राहता तो सदैव डोळ्यांमध्ये ओतून देशाची रक्षा करतात.

आपल्या देशाच्या सैन्याच्या प्रत्येक सैनिकाला ‘भारतीय सैनिक’ किंवा ‘जवान’ म्हणतात. भारतीय सैनिक दलामध्ये प्रत्येक जातीचे धर्माचे सैनिक भरती झालेले आहेत. आपल्या देशामध्ये नेहमीच जातीवादाला घेऊन भांडण-तंटे होत असतात परंतु आपल्या देशाच्या सैन्यामध्ये प्रत्येक जातीचे आणि धर्माचे सैनिक दिसतात. ते सदैव एकमेकांशी प्रेमाने आणि आदराने वागतात त्यामुळे त्याच्यासाठी जातीभेदाचे काहीच महत्व नाही. जातिवाद विरोधात देशातील प्रत्येक व्यक्तीसाठी भारतीय सैनिक हे उत्तम उदाहरण ठरू शकते.

धार्मिक विडंबनेचा तर सैनिकांमध्ये लवलेशही नसतो. प्रांतीयतेच्या संकुचित भावनेपासून तो दूर आहे. त्याला केवळ हे माहित आहे की भारतमातेचे रक्षण करणे हे त्याचे प्राथमिक आणि पवित्र कर्तव्य आहे.

सैनिक आपल्या कर्तव्याशी कधीही नाक मोडत नाही, ते स्वतःच्या प्राणांचे पर्यंत देशाच्या रक्षणासाठी लढतात.

सैनिक केवळ लगेच बनत नाही, सैनिक बनण्यासाठी दुःख कष्ट घ्यावे लागतात. ज्या व्यक्तीच्या मनामध्ये खरोखरच आपल्या देशाविषयी अतिशय प्रेम आणि स्वतःचे प्राण द्यायची तयारी असेल असेच व्यक्ती सैनिक बनवतात.

Essay on Sainik in Marathi

सैनिकाला बराच मोठा काळ कठोर प्रशिक्षण घ्यावे लागते. कठोर परिश्रम घ्यावे लागतात. तो केवळ पगाराला महत्त्व देत नासून देशाचे रक्षण करण्यासाठी आवश्यक असलेले गुण जोपासत असतो. भारतातील प्रत्येक सैनिक आपल्या जन्मस्थानाला स्वर्गापेक्षा श्रेष्ठ आणि प्राणापेक्षा प्रिय मानतो. तो जन्मभूमीला आपली आई मानतो. तिचा सन्मान आणि अभिमानाचे रक्षण करण्यासाठी तो आपला जीव धोक्यात घालू शकतो.

प्रत्येक भारतीय सैनिक प्रेमाने भरलेला आहे. ती शौर्याची खरी मूर्ती आहे. धैर्य आणि त्याग त्याच्या रक्तात आहेत. तो देशाची सेवा करण्यासाठी घर, नातेवाईकांपासून दूर निघून जातो. खरोखर, आपल्या सैनिकांमुळे शत्रू देशाकडे डोळा वर करूनही पाहू शकत नाही. सत्य हे आहे की भारतीय सैनिक त्याच्या उत्कृष्ट गुणांनी जगभर प्रसिद्ध आहे.

” कडाक्याची थंडी आणि गोठलेली सृष्टी,
कसा सोसतो आपला सैनिक बर्फाचे वृष्टी,
भूक तहान विसरून तो लढतो अहोरात्र शत्रूशी,
त्यामुळेच घेऊ शकतो आपण निद्रा सुखाची..

१९६२ मध्ये हिमालयातील हिमाच्छादित खोऱ्यात पुरेसे स्रोत नसतानाही, मुठभर भारतीय सैनिकांनी ज्याप्रमाणे चिनी सैन्याशी सामना केला, ते खूप कौतुकास्पद होते. आमच्या जवानांनी प्रत्येक वेळी आश्चर्यकारक आणि अनोख्या पराक्रमासह पाकिस्तानी हल्ल्यांचा सामना केला आहे. पाकिस्तानच्या अमेरिकन पॅटर्नच्या टॅंकची बैलगाड्यांप्रमाणे नासधूस करुन टँकांचे विशाल ‘कब्रिस्तान’ बनवून सोडले होते. त्यांनी बांगलादेशाला पाकिस्तानी अत्याचारापासून निर्भयपणे स्वातंत्र्य दिले.

एवढेच नव्हे तर सुमारे एक लाख पाकिस्तानी सैनिकांना त्यांच्यासमोर पराभव मानावा लागला होता. यामुळे, जगातील बरीच मोठी राष्ट्रेही भारतीय सैनिकांची शक्ती व कौशल्य पाहून आश्चर्यचकित झाली, जगातील सर्वच देशांनी भारताला ‘मोठी शक्ती’ मानण्यास सुरुवात केली आहे.

यावरुन आपल्याला लक्षात येईल की सैनिक हे आपल्या देशावर कितपत प्रेम करतात. ताकत नसली तरी मनामध्ये दृढनिश्चय असला तरी कोणतेही काम पूर्ण होऊ शकते याचे उदाहरण सैनिकां मार्फत आपल्याला मिळते.

आपल्या देशासाठी उत्तम कामगिरी करणाऱ्या या सैनिकांचा सन्मान म्हणून दरवर्षी 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी रोजी उत्तम कामगिरी करणाऱ्या सैनिकांना यश पदक देऊन त्यांचा सन्मान केला जातो. ज्यावेळेस सीमेवर गोळीबार होतो त्यामध्ये कित्तेक सैनिक शहीद होतात आणि आणि कितीतरी सैनिक जखमी होतात. आतंकवादाच्य विरोधात देशांचे चालत असलेले हे युद्ध कितीतरी दिवस चालत असतात. अश्यावेळी सैनिक अन्न, पाणी कोणत्याही गोष्टीचा विचार न करता केवळ त्यांचे एकच ध्येय असतो शत्रूंनवक्ष हल्ला करून विजय मिळवणै.

अशाप्रकारे सैनिक आपल्या देशासाठी स्वतःचे सर्वच अर्पण करतात. स्वतःचे प्राण देखील फरक काय कमी देशाचे रक्षण करण्यात यशस्वी होतात.

तर मित्रांनो हा ” Essay on Sainik in Marathi “ लेख वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.


ये देखील अवश्य वाचा :-

धन्यवाद मित्रांनो !

Leave a Comment