माझा आवडता संत तुकाराम । Maza Avadta Sant Tukaram Essay in Marathi

Maza Avadta Sant Tukaram Essay in Marathi मित्रांनो महाराष्ट्राच्या भूमीला संतांची भूमी म्हटले जाते. महाराष्ट्राच्या या पावन भूमी मध्ये अनेक संत होऊन गेले त्यांनी भगवत धर्माचा प्रसार तर केलाच त्यासोबत संसारी माणसाने आपल्या संसाराचा रथ कशाप्रकारे ओढावा याची देखील शिकवण दिली.

संतांनी आपले संपूर्ण जीवन केवळ लोकांना जनजागृति करण्यामध्ये आणि विठ्ठल भक्ती मध्ये घालवले।

आजच्या “माझा आवडता संत तुकाराम निबंध मराठी Maza Avadta Sant Tukaram Essay in Marathi ” या लेखांमधून आपण माझा आवडता संत तुकाराम निबंध मराठी पाहणार आहोत.

माझा आवडता संत तुकाराम निबंध मराठी Maza Avadta Sant Tukaram Essay in Marathi

मित्रांनो महाराष्ट्राच्या पावन भूमीमध्ये अनेक संत होऊन गेले जसे की संत ज्ञानेश्वर संत एकनाथ, संत तुकाराम, संत जनाबाई परंतु या सर्व संतांनी पैकी माझे आवडते संत संत तुकाराम महाराज होय.

आपल्या भारत देशामध्ये संतांना गुरु मानण्याची परंपरा आहे संतांनी आपल्या देशासाठी ग्रंथाची रचना करून जनजागृती घडवण्याचा प्रयत्न केला तसेच त्यांनी आपल्याला विठ्ठल भक्तीचा वारसा देखील दिला. संतांनी आपल्या शिकवणीतून लोकांमध्ये ऐकताची भावना निर्माण केली.

ज्या प्रमाणे संत ज्ञानेश्वरांना वारकरी संप्रदायाचा पाया म्हटले जाते त्याप्रमाणे संत तुकाराम महाराज हे वारकरी संप्रदायाचे कळस आहेत. संत तुकाराम महाराजांनी आपल्याला माणुसकीची शिकवण दिली.

जे का रांजले गांजले । त्यासी म्हणे जो आपुले,
तोचि साधू ओळखावा ।। देव तेथेची जाणावा.

संत तुकाराम महाराजांचे चरित्र वरील सांगितलेल्या वाक्या प्रमाणेच होते संत तुकाराम महाराज नेहमी गरीबांना आपले मानून त्यांची सेवा करायचे. संत तुकाराम महाराजांचे म्हनने होते कि, देव दगडात नसून माणसात आहे त्यामुळे हे माणसांची सेवा करावी. आणि संत तुकाराम महाराजांच्या याच गुणामुळे संत तुकाराम महाराज माझे आवडते संत आहेत.

संत तुकाराम महाराज यांचा जन्म इसवी सन 1608 मध्ये देहू या ठिकाणी झाला. संत तुकाराम महाराज यांचे संपूर्ण नाव तुकाराम बोल्होबा अंबिले असे होते. त्यांच्या वडिलांचे नाव बोल्होबा आणि आईचे नाव कनकाई असे होते. संत तुकाराम महाराज सतराव्या शतकात वारकरी संप्रदायातील एक वरिष्ठ संत होते.
संत तुकाराम महाराज यांना एक मोठा भाऊ आणि एक लहान भाऊ होता. लहान भावाचे नाव कान्होबा मोठ्या भावाचे नाव सावजी असे होते.

संत तुकाराम महाराज यांना विठ्ठल भक्तीचा वारसा त्यांच्या पूर्वजांपासून एक मिळाला होता. विठ्ठलाची भक्ती ही त्यांच्या कुटुंबामध्ये परंपरेने आलेली होती. त्यासोबतच संत तुकाराम यांच्या घरी पंढरीची वारी करण्याची देखील परंपरा होती.

संत तुकाराम महाराज यांच्या वडिलांनी शेती होती परंपरेत जर तुकाराम महाराज देखील शेती करू लागले. सर्व काही व्यवस्थित चालू असताना अचानक का त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. संत तुकारामांचे जीवन हे अनेक कठीण परिस्थितींत मध्ये गेले. वयाच्या 18 वर्षे त्यांच्या आई वडिलांचा मृत्यू झाला. मोठा भाऊ तीर्थ ला निघून गेला.

त्या वेळी देशात मोठा दुष्काळ पडला होता. त्या दुष्काळा मध्येच त्यांची पहिली पत्नी आणि मुलाची भूखे मुळे मृत्यू झाला. काही काळानंतर त्यांचा विवाह जिजाबाई या मुलीशी झाला. तुकारामांची दुसरी पत्नी म्हणजे जिजाबाई स्वभावाने खूप कर्कश होती.

गावातील लोकांकडून देखील संत तुकाराम महाराजांचा छळ झाला. संत तुकाराम महाराजांनी लिहिलेले सर्व ग्रंथ इंद्रायणी मध्ये सोडून दिले. त्यानंतर काही दिवस संत तुकाराम महाराज तुकाराम अन्न पाण्याशिवाय राहू लागले. त्यानंतर महाराजांचे ग्रंथ आहेत असे इंद्रायणी मधून बाहेर आले. या सर्व दृश्यानं तर संत तुकाराम महाराजांची विठ्ठल भक्ती ची कीर्ती सर्वत्र पसरली.

संत तुकारामांचे हळू- हळू प्रपंचा मधून दुर्लक्ष होऊ लागले. आणि ते सांसारिक सुखां पासून दूर झाले. मनाला शांती मिळवण्यासाठी तुकाराम देहू गावाच्या जवळ असलेल्या भावनाथ पहाडी वर जाऊन भगवान विठ्ठलाचे नामस्मरण करीत.

चिंता रंजनाचा शाश्वत शोध घेत असताना तुकारामांना साक्षात्कार झाला. आणि तेथेच त्यांना परब्रह्म स्वरूप श्रीविठ्ठलाचे दर्शन झाले असे मानले जाते.

संत तुकाराम महाराजांनी लोकांना त्यांच्या अभंगातून आणि कीर्तनातून जागृत करण्याची शिकवण दिली।
संत तुकारामांनी सांगितले आहे की, सर्व मनुष्य हे ईश्वराची मुले आहेत म्हणून सर्वजण एक समान आहेत. संत तुकाराम द्वारा ‘ महाराष्ट्र धर्माचा ‘ प्रचार झाला. त्यांचा सिद्धांत भक्ती आंदोलनाने प्रभावीत झाले. महाराष्ट्र धर्माचे तत्कालीन सामाजिक विचारधारा वर याचा खूप मोठा प्रभाव झाला.

जाती आणि वर्ण व्यवस्था मधील वाद कमी करण्यामध्ये अजून यशस्वी झाले नसताना सुद्धा संत तुकारामांच्या समानतेच्या सिद्धांतामुळे हळू- हळू वर्ण व्यवस्था मध्ये सुधारणा झाली. महाराष्ट्र धर्माचा उपयोग श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जातींना एकत्र ठेवण्यासाठी केला.

त्या प्रकारे संत तुकाराम महाराजांनी आपले संपूर्ण जीवन विठ्ठल भक्ती मध्ये घालवले आणि लोकांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयन्त अभंगातून आणि कीर्तनातून केला.

या यानंतर संत तुकारामांना वयाच्या 40 व्या वर्षी हे जग सोडावे असे वाटू लागले. आणि वयाच्या 42 व्या वर्षी त्यांनी निर्णय केला. फाल्गुन वद्य तृतीयेला म्हणजेच 9 मार्च 1950 हा दिवस त्यांचा निर्णय दिवस म्हणून ओळखला जातो. संत तुकाराम महाराज विमानात बसून सदेह वैकुंठास गेले असे चरित्र ग्रंथात आणि कथा कीर्तनात सांगितली जाते.

तर मित्रांनो ! ” माझा आवडता संत तुकाराम । Maza Avadta Sant Tukaram Essay in Marathi “ हा लेख वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना आवश्य शेअर करा.

ये देखील अवश्य वाचा :

2 thoughts on “माझा आवडता संत तुकाराम । Maza Avadta Sant Tukaram Essay in Marathi”

 1. Hi, I have request
  Can you add a eassy download button for download this all text from the essay.
  This is very useful for students
  Thanks for reading my comment
  And keep it up

  Reply

Leave a Comment